माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रावी... Biggrin
बहुधा ते असं दाखवतील...की 'दुसर्‍यांदा' जे अफेअर त्याने केलं शनाया सोबत ते आणि आधीचं...एकाच काळातलं होतं...राधिकेची काहीतरी गल्लत होत्येय कालमापनात...आणि तो कसा आता खरेच सुधरला आहे! आणि राधिका पूर्वीचीच प्रकरणे उकरुन काढते आहे...आणि मग सगळं आलबेल होईल!
आई गं....!!!! माझंच डोकं आता चक्रवतं आहे!

सोसायटीत ही चारच कुटुंबं राहतात का. नागपूरला राहणारे सुभेदार वर्गणीतून उरलेले पैसे दान करू म्हणतात आणि बाकीचे सगळे लगेच तयार होतात. सोसायटी बाहेरून उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांची वाटतेे आणि अशा सोसायटीत लोक एकमेकांची आयुष्य अशी डिस्कस करतात हे पटत नाही. सगळे चाळीत एकत्र रहात होते आणि मग टाॅवर झाला असं दाखवलं असतं तर एकवेळ पटलं असतं.

तारक मेहताच्या "गोकुळधाम " सोसायटीत कसे फक्त मालिकेतले मेम्बर्स रहतात असं दाखवलाय तसंच समजायचं .फक्त तेवढेच लोक मिटिंग घेतात तेच सगळं ठरवतात तसंच समजायचं मालिकेच्या सोयीसाठी Happy

शनयाने थ्री बीएचके फ्लॅट मागू नये म्हणून गुरु शनायाला आता फॉरेन ट्रीपला ( सिंगापूर ) नेणार आहे म्हणे . कोणातर्फे ?

सध्या सेट टॉप बॉक्स बद्दलची जाहिरात लागते. की तुम्हावर कुणी बंधन घातलं तर आणि झी ची चॅनल्स दिसत नसतील तर ऑपरेटर बदला इ. इ. त्यात ही राधिका दिसते आणि बोलताना म्हणते 'आजपर्यंत तुम्ही निश्शितच आमची साथ दिलित..
निश्शितच? Angry

Happy निश्शितच!

शी इज नॉट शुअर..... की आपण साथ दिली की नाही ते....!!

निश्शितच!
शी इज नॉट शुअर..... की आपण साथ दिली की नाही ते....!!>>> तिला विचाराव, 'बाई ग, तुझ्या नवर्याने तरी तुला कुठे साथ दिली?'

आता फॉरेन ट्रीपला ( सिंगापूर ) नेणार आहे म्हणे .>>> राधिका सुद्दा तिकडेच जाणार होती ना केसरीबरोबर? तिला सिंगापूरला सत्य कळेल असे दाखवतील कदाचित.

अजूनही सत्य कळलं नाहीच का तिला, धन्यवाद आहे. मधे एक प्रोमो दाखवला त्यात ती दोघांना एकत्र रोमँटीक गप्पा मारताना बघते असं दाखवलं होतं. झाले आठ दिवस तरी त्याला.

तिला सिंगापूरला सत्य कळेल असे दाखवतील कदाचित. >>> सत्य कळून तरी काय फरक पडणारे??? ती माह्या नवरा माह्या नवरा, शन्याचं चुकलं असचं करत रहाणार ना

अजूनही सत्य कळलं नाहीच का तिला, धन्यवाद आहे. मधे एक प्रोमो दाखवला त्यात ती दोघांना एकत्र रोमँटीक गप्पा मारताना बघते असं दाखवलं होतं. झाले आठ दिवस तरी त्याला. >>> असं सह्जा सहजी कळत नसतं गुपित, त्या साठी महा एपिसोड असतात खास रविवारचे Wink

>>>¿असं सह्जा सहजी कळत नसतं गुपित, त्या साठी महा एपिसोड असतात खास रविवारचे Wink>>>
हा हा...हो ना... आणि त्यात थोडंस सिंगापूर दाखवणार आणि मेन म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रँड ची जाहिरात करणार...आणि शेवटच्या 5 मिनिटात थोडं कथासूत्र दाखवणार आणि नंतर आता उद्या पहा..... म्हणजे महाएपिसोड मध्ये हाताला काहीच लागत नाही...

अजूनही सत्य कळलं नाहीच का तिला, धन्यवाद आहे.>>> हे तर काहीच नाही. कमला मध्ये ती शरयू एवढी एम. ए झालीये, तरीही तिला शेवटपर्यन्त आपला नवरा आणि कमला यान्च्यामध्ये काय चाललय कळतच नाही. पण ति शेवटच्या एपिसोडमध्ये म्हणते कशी, "मला तुम्हा दोघान्मध्ये काय चाललय हे आधीपासूनच माहीत होत, पण मी घरासाठी गप्प बसले." काय फालतू क्लेरीफिकेशन होत ते. टिपिकल शेवट होऊन मालिका सम्पली ती एकदाची.

>>>¿असं सह्जा सहजी कळत नसतं गुपित, त्या साठी महा एपिसोड असतात खास रविवारचे Wink>>>
हा हा...हो ना... आणि त्यात थोडंस सिंगापूर दाखवणार आणि मेन म्हणजे कुठल्या कुठल्या ब्रँड ची जाहिरात करणार.>>> मी सहजच म्हणाली होती राधिकाच्या सिन्गापूर प्रवासाबद्दल. हि खरच जाते की काय तिकडे? खरच या रविवारी महाएपिसोड असणार आहे का?

सत्य कळून तरी काय फरक पडणारे??? ती माह्या नवरा माह्या नवरा, शन्याचं चुकलं असचं करत रहाणार ना. >>> अगदी अगदी.

काल बघितलं की कपुर साहेबांनी शनायाला नोकरीवरुन काढले आहे आणि तिला राधिकाने माफ केले तरच परत नोकरीवर घेण्यात येईल. ही नक्की काय भानगड आहे Uhoh

एका परिचितांच्या घरी गणपतीला गेलो होतो. तेव्हा तिथे एका एपिसोडचा प्रोमो पाहावा लागला.
शनाया बॉसला मोदक म्हणून मोमोज देते, ते नाराज होतात, मग राधिका हे घ्या उकडीचे मोदक म्हणते, ते खूष होतात... Uhoh
हा पोरकटपणा अजून चालूच आहे! Angry
लेखकाचा फंडा काय्ये नक्की?

लेखकाचा फंडा च पोरकटपणा आहे.
शन्याला मोदक माहित नाहीत हे एकवेळ मान्य केलं तरी मोमोज तर माहित असतील का नाही?
आणि त्या बॉसला कशाला हवं सारखं खाणं? मागे पण काय अळुवड्या का कोथिंबीरवड्या नेलेल्या ना राधाक्काने.
आता प्रोमोत शन्या आरतीचं तबक ओवाळताना हात दुखणार, चटके बसणार मग सर्वगुणसंपन्न राधाक्का ते तबक मोठ्या दिमाखात तिच्या हातातुन घेणार.
शन्या इज गुड फॉर नथिंग आहे झालं.

बिनडोकपणा सुरुय झी मराठीवर.. एखादी व्यक्ती चांगली आहे की नाही हे मोदक करता येतात की नाही, आरती करता येते की नाही यावर कसलं ठरवतात मूर्ख लोक. आणि मोदक करणे न करणे यावर नोकरी जाणं हे म्हणजे कहर आहे..
तिकडे खुलता कळी मध्ये पण तेच.. मोनिकाला वाईट दाखवण्यासाठी चांगुलपणाच्या वेगळ्याच व्याख्या तयार केल्यात

शनाया बॉसला मोदक म्हणून मोमोज देते, ते नाराज होतात, मग राधिका हे घ्या उकडीचे मोदक म्हणते, ते खूष होतात >>> शनायाला हापिसात काम करता येत नाही ते चालत पण मोदक म्हणून मोमो दिलेत हे नोकरीवरुन काढण्याच कारण Angry आणि त्यासाठी राधिकाची माफी मागण्याचा काय संबंध Uhoh

शनायाने राधिकाचे मोदक मुद्दाम धक्का देऊन पाडले.. त्यामुळे तीला पुन्हा करावे लागले.. म्हणून बॉसने हि शिक्षा दिली तीला .. Uhoh

शन्याला मोदक माहित नाहीत हे एकवेळ मान्य केलं तरी मोमोज तर माहित असतील का नाही?.>>> हो ना, आणि आजच्या इन्टरनेटच्या युगात तिला मोदक म्हणजे काय हे सुद्दा माहित नाही म्हणजे कमालच झाली. मिठाईच्या दुकानातून किव्वा समिधाकडून तरी मागवायला हवे होते तिने मोदक.

अतिशय मुर्खपणा होता त्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या भागात. एखाद्या मुलीला असं वागवताना बघुन मलाच चीड आली. ती जरी शन्या असली तरी. आणि तो गॅरी काय तिला टाकुन देतो रस्त्यावर.
राधाक्काचं कॅरेक्टर भैताड आहे. अरे तुझ्या नव्र्याचं अफेयर आहे/ होतं तिच्याबरोबर, तिच्यासाठी तुला तुझ्या मुलाबरोबर बाहेर काढलं होतं त्याने आणी तु हे काय बालिश खेळ करतेस तिच्याशी. Angry
त्या नवर्‍याला बडव आधी. तो डब्बल भैताड.
आणि एवढ होउनही ती शन्या शेवटपर्यंत थांबुन होती. हात दुखत असुन आरतीला टाळ्या काय वाजवत होती. राधाक्का आणी गॅरोबासोबत बोटीत बसुन विसर्जनाला काय गेली. ती ट्रिपल भैताड.
आणि ह्या सगळ्या कलाकारांकडुन हे करवुन घेणारे दिग्दर्शक, निर्माता आणी झी मराठी दाहापट भैताड. Angry Angry Angry

अतिशय मुर्खपणा होता त्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या भागात. एखाद्या मुलीला असं वागवताना बघुन मलाच चीड आली. >>>>>>>>>>>>किळसवाणा प्रकार होता मी एपि पाहता पाहताच त्या झी वाल्यांचा वॉल वर पोस्ट टाकली. एखाद्या मुलीच्या मनाविरूद्ध तिला नाचायला लावणे तिच्या चेहऱ्यावर गुलाल टाकणे (यात तिला त्याची ऍलर्जी असू शकते) अगदीच पांचटपणा. आणि यात ती Anchor पण सामील असणे म्हणजे अगदीच ........जाऊदे शब्द नाहीत तो प्रसंग वर्णन करताना.

ऍक्टर त्यात ती शनाया हिची काहीच चूक न्हवती ती आगाऊ भैताड राधिका तिला खेचत घेऊन जाते काय तर म्हणे तुला आरती करायला पुढे पुढे करायला पाहिजे तुला मंडपात मान हवा पण मिरवणुकीत नाचायला नको (यात काय लॉजिक तिलाच ठाऊक) आणि जबरदस्तीने शनाया आणि ईशाला (समिधाला त्या ईशाला ओढायला सांगते निदान तिने तरी विचार करायला हवा होता ) ओढून नाचायला काय लावते तिच्या चेहऱ्यावर गुलाल काय फेकते.

एकुणात काय त्या एपिसोड लेखकाचा आणि तो डायरेक्ट करणाऱ्या लोकांच्या कुपोषित अकलेचे प्रदर्शन होते कालचा एपी.

Pages