माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

चल्ला पिसं काढू >>> झी वरच्या मालिका ह्या पिसं काढायच्या लायकीच्याच असतात असे गृहीत धरायला लागलोय आपण Happy

मालिकांच्या ट्यार्पीत मायबोलीचा मोलाचा हात असेल. पिसं काढायला मिळावीत म्हणून का होईना मालिका बघत असावेत माबोकर Happy

नेहमी प्रमाणेच अर्ध्यावर मालिका बघणे सोडून द्यायची वेळ या मालिकेबाबत न येवो ही 'झी'चरणी प्रार्थना.

पआमु बंद होते आहे !!!!
समस्त झी टिम चे ह्या निर्णयासाठी हार्दिक अभिनंदन... Lol
पंतसचिवांनी जीव खाल्ला होता अगदी....

<< झी वरच्या मालिका ह्या पिसं काढायच्या लायकीच्याच असतात असे गृहीत धरायला लागलोय आपण >> अपवाद वगळतां, असं गृहीत धरणं स्वाभाविक आहे हें तिथल्या अनेक मालिका अर्ध्यावरच गुंडाळल्या जातात यावरून सिद्ध होतंच ना ! शिवाय, बरेच माबोकर प्रत्यक्ष सिरीयल पेक्षांही [ किंबहुना सिरीयल न पहातांही ] इथलं 'पिसं काढणं' हीच अधिक चांगली करमणूक मानतात, हें आहेच. Wink

अनिता दाते आणि अभिजीत खांडकेकर दिसला प्रोमोत आणि सुहीता थत्ते. अजुन श्वेता मेहेंदळे दिसल्यासारखी वाटते.

अगदी अगदी क्लीओपत्रा, नागपुरी बोली च्या नादात वर्‍हाडी भाषेची वाट लावतात हे लोक Angry
अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते हिरोइन मटेरीअल तर अज्जीब्बात नाहीच

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते हिरोइन मटेरीअल तर अज्जीब्बात नाहीच Proud हो ना. तिला मेन लिडला बघुनच मी डोक्याला हात लावला आणि त्यात हिरो अभिजीत. तिचा लहान भाऊ वाटेल तो, त्याला शोभेल तरी का ती.

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते हिरोइन मटेरीअल तर अज्जीब्बात नाहीच फिदीफिदी हो ना. तिला मेन लिडला बघुनच मी डोक्याला हात लावला आणि त्यात हिरो अभिजीत. तिचा लहान भाऊ वाटेल तो, त्याला शोभेल तरी का ती.>>> +१११११

अनिता दाते आणि अभिजीत खांडकेकर जोडी >>> हे दोघेही माहिती नाहीत पण प्रोमो तर एकदम बोअर वाटला.

अरे जर दुसरी बायको नोकरी नसेल, खरंच दुसरीच्या प्रेमात असेल तर बायको शोभत नाही त्याला म्हणून दुसरी आवडते असं प्रेक्षकांना वाटावं म्हणून अशी जोडी घेतली नसेल ना? हे उगाच मनात आले म्हणून लिहिलं. उगाच बायको असताना अफेअरचं समर्थन वगैरे नाही करायचं.

दातेबाई नाटकात काम करतात. आणी अभिजीत खांडकेकर हा माझिया प्रियाला प्रित कळेना ( झी मराठी ) मध्ये मृणाल दुसानीस ( अस्सा संसार सुरेख आणी तू तिथे मी फेम) बरोबर होता, झी मराठी शो मध्ये अँकरीग पण करतो.

अनिता दाते अय्या आणि गंध दोन्हीत होती. नायिकेची कलीग.
इटीव्हीवर एका मालिकेतही होती.
अभिनय भारी आहे. पण तो बघायचा नसेल तर सोडून द्या.

नताशा, तुला हे दोघे कोण हे माहीत नाही का?>>> हो सूलू पण आता बरीच माहीती मिळाली दोघांबद्दल Wink वर लिहिलेली एकही मालिका किंवा शिणूमा मी पाहिलेला नाही म्हणून हे दोघे कोण ह्याची कल्पना नव्हती.

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते हिरोइन मटेरीअल तर अज्जीब्बात नाहीच>> हे भगवान!! काय म्हणावं या अभिरुचीला? Uhoh बडवला कीबोर्ड आणि टाकली पोस्ट करायच्या आधी किमान गूगलवर कीबोर्ड बडवला असती तरी कळलं असतं की अनिता दाते काय चीज आहे.
जौद्याझालं!

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते>> हे विधान आवडले नाही +++१
मलाही अजीबात आवडंलं नाही हे विधान. मस्त अ‍ॅक्टींग करते ती.

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते>> हे विधान आवडले नाही
मलाही अजीबात आवडंलं नाही हे विधान. मस्त अ‍ॅक्टींग करते ती.>> +१००

मला वाटतं की आपण भावनेच्या भरात कोणाच्या दिसण्यावर टीका नको करुया. टीका कामावर हवी. दिसण्यावर नको. ही चुक माझ्याकडून पण झालीय, कैवल्यच्या डोळ्यावरुन मी लिहीलं होतं (डी ३) पण नंतर मलापण माझं चुकीचं वाटलं.

अनिता दाते अभिनय छान करते.

अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते >>
अनिता दाते पांढर्‍या माकडीसारखी दिसते हिरोइन मटेरीअल तर अज्जीब्बात नाहीच>> हे भगवान!! काय म्हणावं या अभिरुचीला? अ ओ, आता काय करायचं >>>

ही दोन्ही विधान नाही आवडली..
दिसण्यावर ही टीका नको..आणि एका कमेंट वरुन किंवा मतावरुन एकदम काय अभिरूची वगैरे पण जरा जास्त होतेय..पसंत आपली आपली

चील गर्ल्स, मी काही कोणाच्या व्यंगावर टिका केली केली नाही, त्या दातेचा मेकअप इतका पांढरा केलाय की ती की खरोखरच तशी दिसली मला, आता मी पण कोणाला लाल माकडीसारखी दिसत असेल Proud
दातेबाई आधीच गोर्‍या घार्‍या त्यात अजुन पांढरेपणा. हिरोइन म्हणून तर नाही बुआ आवडली, आता आवड आपली आपली..

हे विधान आवडले नाही +++१
मलाही अजीबात आवडंलं नाही हे विधान. मस्त अ‍ॅक्टींग करते ती.>>>> सहमत. मी तिला एका short film मध्ये पाहीलेय. त्याच्यात मस्त modern दिसलीय ती.

अय्या मध्ये ती लेडी गागा सारखे कपडे घालते ती का?>>> तो सम्पुर्ण चित्रपट अ आणि अ category तला होता.

Pages