माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक सुचवावेसे वाटते

या धाग्याचे शीर्षक "माझ्या नवर्याची बायको" च्या ऐवजी "माझ्या नवऱ्याची बायको" असे असायला हवे.

चोप्य पस्ते.. Happy

ती शनाया किती पकाऊ आहे राग तिच्यात काय आवडण्यासारखं आहे अ ओ, आता काय करायचं >> ++११
पण खरंच काय भनगड आहे?

बाकी काल राधिका बिल भरायला गेली तिथे मस्त भांडताना दाखवली आहे, थोडं लाऊड होतं तरी जमलं.
विबासं असेल आणि ते घरी कळू नये असे जर वाटत असेल तर पुरुष बायकोसोबत खुप गोड वागतो असे कुठे तरी वाचले होते, इथं गॅरीच पावलोपावली बायकोचा पानउतारा करुन तिला अफेअरचं कन्फर्मेशन देतोय Uhoh

दोन तीनच एपिसोड पाहिले. एकदम टुकार सिरियल आहे.

धाग्याच्या सुरुवातीला अनिताच्या अ‍ॅक्टिंगचं खुप कौतुक वाचलं, पण अगदीच लाउड आणि आर्टिफिशल वाटते. लेखक आण दिग्दर्शक अजिबात लॉजिकल विचार करत नाहीत याचं उदाहरण म्हणजे हे कॅरे़क्टर.

स्टोरी लाइन घिसीपिटी, ढापलेली आणि महाबोअर

कास्टींग, बंडलेस्ट आहे. हिरो मख्ख, हिऱोइन त्याच्यापेक्षा मोठी दिसते, हिरोचा लवबर्ड अगदीच पात्र आहे. ओवरअ‍ॅक्टिंग क्वीन आहे.

हिरॉइन कशी दाखवायची आहे हे लेखकाला आणि मग दिग्दर्शकाला कळत नाहीए बहुतेक. स्मार्ट कि बावळट? कधी कधी अती बावळट्ट दाखवताहेत आणि कधी कॉर्पोरेट फंक्शनमधे जावुन स्पीच वगैरे???? इकडे बिल काऊंटरवर झाशी की रानी आणि नवरा टोकाचा अपमान करतो तर भांडण सोडा पण रिअ‍ॅक्ट सुद्धा करत नाही. तेव्हा तिचा डॅशिंग स्वभाव कुठे जातो?

माझी आई ७.३० ते ९.३० अशा सगळ्या इल्लॉजिकल स्टोरीज पाहुन लॉजिकल विचार करणं विसरुन जाइल कि काय अशी काळजी वाटते मला Proud

वेल, तो प्रकार भाऊ करतो माहेरी पण आई वैतागते झी युवा लावल्यावर. भाऊ घरी असला की स्पोर्ट्स नाहीतर झी युवा. इ टा तं मात्र बघते आवडीने (माधवीला ओळखतेना म्हणून).

हिरॉइन कशी दाखवायची आहे हे लेखकाला आणि मग दिग्दर्शकाला कळत नाहीए बहुतेक.स्मार्ट कि बावळट? >>> ज्या बाईला फोनवरचा मेसेज perfect English मध्ये वाचता येतो(Thank You so much), तिला नवर्याचे तिला मारलेले English शेरे कळतात (Useless वै). ती बाई गावन्ढळा सारखी का वागेल?

माझ्या नवर्‍याची प्रेयसी असे नाव हवे ना मालिकेचे खरेतर? का ती बच्चा खरंच लग्न करणार आहे त्याच्याशी?

>> मागच्या पानावर कोणीतरी म्हटलंय तसं बहुतेक मालिका 'सवत माझी लाडकी'च्या वळणावर जाईल असं वाटतंय. शिर्षकगीतात का कुठेतरी अनिता त्या बच्चाकडून झाडू मारुन घेतांना दाखवली आहे त्यावरून वाटतेय.. कि अनिता या दोघांचे खोटे का होईना..पण लग्न लावुन देईल आणि मग गॅरीला बच्चाची सच्चाई कळेल. आणि मग उपरती वगैरे.

'Layki ahe ka tuzi evde mahag earrings ghalaychi ' ...ase bolnarya mansache love marriage kase asu shakel ..kahihihihihi dakhvave ka lokana ?? Evda bhangar n tukar pana koni kasa sahan karu shakel ?
Band kara hi serial ...tya abhi la tar tv ch jaun fodave vatle agdi....sooo irritating serial.

Itkya lavkar ataparyant kontyach serial cha titkara ala navta ...nashib remote aplya hatat aste

मालिका बघणे सोडा बरं, पआमु सारखी बंद करतील लगेचं, अर्थात पआमु एवढी काही वाईट नव्हती. युवा वर बन मस्का बरी वाटते त्यापेक्षा. हलकीफुलकी आहे डोक्याला ताप तरी नाही.

अगो तसे नाही. हिला अगदी त्रास त्रास देणार मग हिचे स्वत्व जागे होणार. ही मेक ओव्हर होणार. एक दिवस फाड फाड गोड इंग्रजी बोलत गुरवाला चकित करणार. त्या शिवाय संपणार नाही. नेहमी सासू व्हिलेन असते. इथे नवराच दाखिवला आहे. म्हणजे कसे. क्रेप शिफॉनची साडी, लांब सेट केलेले मोकळे केस. चांगली ज्वेलरी व मेकप. गोड माफक बोलणे केले कि झालेच. आई व बायको ती चांगली आहेच.

इथे पण अथर्व नाव मग खु ख कु मध्ये पण अथर्व नाव. आता बर्थडेला पण गॅरी नाही येणार, पोर कसनुसे होईल. गोड आहे ग मुलगा.

Garry is totally unprofessional fellow.

त्या टुकार इअर रिंग साठि मिटिंग मध्ये लक्श नव्हत त्याच

आणि म्हणे बे स्ट एमप्लोइ.

मला का माहिती नाही, पण प्रोमोज लक्ष देऊन पाहिल्या वर असं वाटलं की ही बायको मरणार बहुधा आणि मग हा बच्चाशी लग्न करणार, मग ही पहिली बायको भूत होऊन घरात धिंगाणा घालणार.
प्रोमोत शनाया आणि गॅरी सोफ्यावर बसलेले असतात तेव्हा बायको धप्प्कन येऊन बसते तर शनाया उडते.
आणि केस वाळवण्याच्या सिन मध्ये (प्रोमोत) काही न करता बच्चाला शॉक बसत राहतो.

बहुधा घरातली बाई वगैरे पळवून लावणे, सांडणे लवंडणे. काही केल्या त्या दोघांना एकत्र येऊ न देणे असा भंपकपणा करून त्याला विनोदी म्हणून आपल्या गळ्यात मारण्याचा झी प्रयत्न करेल असं मला वाटतंय.

मागच्या पानावर कोणीतरी म्हटलंय तसं बहुतेक मालिका 'सवत माझी लाडकी'च्या वळणावर जाईल असं वाटतंय>>> मला नाही वाटत. तो एक मस्त धमाल सिनेमा होता. त्यात मोजो एक प्रेमळ नवरा (बहुदा गवरी त्याची मुलगी नाही म्हणून असा प्रेमळ दाखवला असेल :P), बाप (नीना कुलकर्णीच्या तोंडी काही संवाद आहेत अश्या स्वरुपाचे), एक चांगला डॉक्टर दाखवला आहे. तो बायकोवर येताजाता अजिबात डाफरत नाही. तिला हिडिसफिडिस करत नाही. इथे त्या गुरवाच तस काहीच नाही.

मोजो चांगला होता म्हणून कदाचित नीना त्याला शेवटी माफ करु शकली पण इथे त्या हिरविणीने गुरवाला माफ कराव अस काहिच नाही.

अवांतर - पती, पत्नी आणि वो मधल्या वो ला नेहमी वाईट समजतात. मला पती वाईट वाटतो कारण बायको कडे त्याची कमिटमेंट असणे अपेक्षेत आहे. वो ची नाही.

अय्या मला ते डॉक्टर आव्डायचे सवत माझी लाडकीतले. तेच हे मोजो?! खरे वाट्त नाही किती म्हातारे झाले म्हणजे. त्यांचा संसार छानच असतो. इथे हा सरळ तिला अब्यूज करतो आहे व्ह्रबली. हिने सेपरेटच व्हावे. इतके अपमान कसे सहन करू शकते?

नुसते तेच नाही कायम यूसलेस अडाणी म्हणतो. बायकोची मैत्रिणी समोर खिल्ली उडवतो व तिला ते दोघे
हसतात. अतिशय अपमानास्पद आहे हे. मुलाला पण वसवस करत राहतो. कार मधून आत्ता उतर म्हणतो. स्वयंपाकाला नावे ठेवतो. हे अब्युझिव बिहेविअर आहे. का हे नवरे असेच अस्णार असे झीला म्हणायचे आहे?

पती, पत्नी आणि वो मधल्या वो ला नेहमी वाईट समजतात. मला पती वाईट वाटतो कारण बायको कडे त्याची कमिटमेंट असणे अपेक्षेत आहे. वो ची नाही. >> +१००

हे अब्युझिव बिहेविअर आहे. >> +१००

मी सांगते स्टोरी. ह्या सतत अपमान करणार्‍या नवर्‍याला कंटाळुन बायको घराबाहेर काढते. तो ही खुश होतो आणि शोब कडे जातो पण शोब त्याला नीट वागवत नाही, त्याला जळके फुलके खायला देते. घरचा मुर्गा दाल बराबर उक्तीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करते. नवा बच्चा शोध्ते, मग हा खंगौन जातो. काहीतरी टपराट कारणाने नोकरी जाते. मग ह्यास बायकोची मुलाची आठवण येते. हा दरदर ठोकरे खात असताना ती पहाते आणि....

ते कानातले खरच छान होते पण , मला वाटत सवत माझी लाडकी टाइप सिच्युएशन तयार करतिल आणि ही दोघाना धडा शिकवेल(?) पण सवत माझी लाडकी गोड होता,खुप मस्त घेतला होता.
म्हणजे काहिही झाल , नवरा कितिही अब्युजिव्ह असला तरी बायकोने सगळ सहन करुन आपला सन्सार टिकवावा हा मेसेज जातोय की इथे... बास बर का आता.

म्हणजे काहिही झाल , नवरा कितिही अब्युजिव्ह असला तरी बायकोने सगळ सहन करुन आपला सन्सार टिकवावा हा मेसेज जातोय की इथे... बास बर का आता. >> +१.
राधिका तिच्या सेपरेट झालेल्या मैत्रीणीला पण सारखं सांगत असते ना.. असं नातंच काय तोडायचं.. संसार टिकवायचा की.. आपलं माणूस असायला पाहिजे वगैरे.. फारच चीड आणणार होतं ते. Angry
मला ती मैत्रीण आणि तिचे विचार पण आवडतात.

पती, पत्नी आणि वो मधल्या वो ला नेहमी वाईट समजतात. मला पती वाईट वाटतो कारण बायको कडे त्याची कमिटमेंट असणे अपेक्षेत आहे. वो ची नाही.>>>> सहमत. मला कालचा राधिकाचा तो dialogue आवडला नाही,"मी माझ्या नवर्यावर कधीच रागावणार नाही , पण त्या मुलीचे मी असे हाल करीन की ति मला या जन्मात तरी विसरणार नाही.' कुठल्याही विवाह बाहय सम्बन्धात फक्त त्या मुलीचीच चूक कशी? (काही अपवाद असु शकतात), नवरा सुद्दा तेवढाच दोषी असतो ना? टाळी कधी एका हाताने वाजत नसते.

ते कानातले खरच छान होते पण>>> राधिका गुरु ला कानातले ज्या romantic पद्दतीने दाखवते ते मस्त होते. पण गुरु तिकडे सोयिस्कर पणे दुर्लक्ष करतो. Angry

गोड आहे ग मुलगा.>>> अगदी अगदी.

हिने सेपरेटच व्हावे. इतके अपमान कसे सहन करू शकते?>>> हल्ली गावातल्या बायकासुद्दा घटस्फोट घ्यायला लागल्यात. नवरा काहीही बोलला तरी सहन नाही करत त्या, उलट नवर्यान्नाच तरातरा बोलतात. " ओ, उगाच माझी लायकी काढू नका, सान्गून ठेवते." Lol

Pages