माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरवीण मला तर चांगली वाटली. अगदी चार्चौघींसारखी आहे. म्हणजे मी पण चाचौ कॅटेगरीत मोडते म्हणुन असेल पण मला बर्‍याच वेळा साध्या हिरवणी पण बर्‍या वाटतात. Happy ज्या कुणी हिरवणींना दिसण्यावरुन नावं ठेवतात, माकड, घोडी वै इइ. त्या मुली -बायका स्वतः सुंदरच असतील अस आपलं मला वाटतं. Happy
बाकी हिरो आजकाल छान वाटतो. पहिल्या सिरेलीपेक्षा.

अरे जर दुसरी बायको नोकरी नसेल, खरंच दुसरीच्या प्रेमात असेल तर बायको शोभत नाही त्याला म्हणून दुसरी आवडते असं प्रेक्षकांना वाटावं म्हणून अशी जोडी घेतली नसेल ना?

>> सेम. मलापण हि "मुंबईचा फौजदार" (रंजना, प्रिया तेंडुलकर, शरद तळवळकर आणि रविंद्र महाजनी) ची स्टोरी वाटतेय.

बायको चारचौघी सारखी असावी म्हणून तिला घेतलं असेल सिरियलीत.

माझ्या नवर्‍याची बायको हा चित्रपट पण होता आलेला. भरत जाढव होता वाटते.

दुसरी बायको दाखवली>>> दुसरी बायको नसावी.. या माणसाला कदाचित त्याच्या बायकोचा कॉम्प्लेक्स असावा राहण्या वागण्याच्या बाबतीत म्हणुन त्याची तिच्याबद्दल ट्रिटमेंट धड नसावी.. कदाचित हिची लाज वगैरे येत असावी..

आणि दुसरी दाखवलीए ना.. निखार्‍यावर मिरची ठेवते तेव्हा तिला ठसका नै का लागत..
कशालाही कशाशीही जोडतात..
भयताड शिरेली Angry

भयताड शिरेली>>>>:हहगलो: चला हवा येऊ द्या आठवले. तो भारत गणेशपूरे ठाकूरच्या वेषात येऊन म्हणतो, "रामलाssssssल, आले का बे भैताड पोट्टे!:हाहा:

कालच्या नव्या प्रमोवरून 'मुंबईचा फौजदार'च्या वाटेवरून जाणारी मालिका वाटतेय. रंजनाचा अस्सल अभिनय होता त्यात. तसं असेल तर अनिता दाते त्या भूमिकेला उत्तम न्याय देऊ शकेल. अभिजीत खांडेकर मात्र फारच तोकडा पडणार तिच्यापुढे, असं त्याच्या आत्तापर्यंत पाहिलेल्या भूमिकांवरून वाटतय. तो अँकरींग मस्त करतो पण अभिनय आणि त्याचे समिकरण जुळताना अजून तरी दिसले नव्हते.

चला मालिकेचा विषय तरी वेगळा वाटतोय. पण यंदा पाऊस चांगला झालाय आणि पाण्याची कमी माहीये. त्यामुळे त्यातले किती मालिकेत घालतोय दिग्दर्शक ते बघायचे.

असेल, झीची आधी पण एक सिरियल सवत माझी लाडकीसारखी येऊन गेलीय फार पुर्वी, दुहेरी नाव होतं. गिरीश ओक, ऐश्वर्या नारकर, गौरी यादव होते. गौरीचं काम मला त्यावेळी ऐश्वर्यापेक्षाही आवडलं होतं, फार सहज केलं होतं तिने. लिमीटेड एपि. होते.

मुं. फ. ची स्टोरी नाही वाटत पियु, एका प्रोमोमधे भिंतीवर फॅमिली फोटोत मुलगा देखील आहे, करिष्मा कपूर सलमान खान च्या बिवी नं. १ सारखी स्टोरी असावी.

नाही, कालच थोडी स्टोरी वाचली एका पेपरात. अनिता दाते आणि अभिजितचा प्रेमविवाह असतो, ते नागपूरहून मुंबईत येतात, त्यांना एक मुलगाही असतो. मग हा यशस्वी उद्योजक होतो. बायकोला साधे राहणीमान आवडत असतं, श्रीमंत झाले तरी आणि ते त्याला पटत नाही. ऑफिसमध्ये एक मुलगी असते ती स्वार्थी असते, तिच्या आकांक्षा मोठ्या असतात त्यासाठी ती ह्याला वापरत असते, तो भाळतो पण मग बायको दाखवून देते त्याला की त्या मुलीचं प्रेम नाही त्याच्यावर, ती स्वार्थी आहे. असा गोषवारा.

त्यासाठी ती काय काय युक्त्या करते त्याची स्टोरी हि सिरीयल. हि लिमिटेड एपिसोडची असेल तर छान होईल नाहीतर पाणी आहेच.

हे म्हणजे तेच का,
ज्यात एक मनुक्ष बसलेला, समोर एक स्री मिरच्या वगैरेची धुरी द्यायच्या थाटात नजर काढतेय आणी तसं करताना दुरवर गाडी चालवणार्या ललनेला ठसका लागतोय वगैरे ?????

पहिल्यांदा, नजर काढणारी स्री, त्या मनुक्षाची आईच वाटली मला .

अनिता दाते आणि अभिजितचा प्रेमविवाह असतो>>> प्रोमो मध्ये अनिता दाते खेडवळ,अशिक्षित दाखवलीये. एखादा सुशिक्षित मुलगा खेडवळ मुलीशी प्रेमविवाह का करेल? बर लग्नान्नतर जर तो यशस्वी उदयोजक झाला तर तो आपल्या खेडवळ बायकोला घटस्फोट देऊन मोकळाच होईल ना, तो दुसर्या कुणी modern मुलीची वाट का बघत बसेल?

बर, जर ती दुसरी मुलगी स्वार्थी असेल तर ते ह्या "यशस्वी उद्योजक" झालेल्या मुलाला कसे कळत नाही?

मला तरी ही "जुदाई" ची स्टोरी वाटते. म्हणजे सुरुवातीला अनिता दाते त्या मुलीचा दुस्वास करेल, नन्तर ती अभिजीत ला तिच्याशी लग्न करायला भाग पाडेल. दुसर्या प्रोमोत अभिजीत त्या मुलीच्या कारमधून येताना दाखवलाय. बायको तिचा उल्लेख "office वाली" असा करते. जर अभिजित श्रीमन्त असेल तर त्याची स्वतःची कार असायला हवी ना?

तसही पहील्या प्रोमोत online shopping वेबसाईटचा फोटो दाखवला होता. मग ह्यावरुन अर्थ स्पष्ट होतो की, बायकोला आपला नवरा विकायचा आहे. सिरीयलचे शिर्षकही सुचक आहे, "माझ्या नवर्याची बायको" अर्थात "जुदाई".

आमच्या बस स्टॉप वर या सिरियलची पोस्टर्स पाहिले. त्यात हिरो आणि त्याची बायको व 'ती' आहेत. बायकोच्या वेगवेगळ्या साड्या आणि पोझेस आहेत, पण 'ती' चे मात्र एकाच लाल रंगाचे तोकडे फ्रॉक टाईप ड्रेस आहे.

मला नाही आवडली हिरवीण.हिरोपेक्षा फार मोठी वाटते.नाहीतर हिरो तरी थोडा मोठा दिसणारा घ्यायचा होता. Wink
पण मी कुटुन राहिले माझ्या नवर्याची बायको,,,अस ठसक्यात म्हणत ती वेणी उडवते का अस च काहीतरी करते,,ते आवडल.

नाहीतर हिरो तरी थोडा मोठा दिसणारा घ्यायचा होता.>> अहो अश्या पोरगेल्या नवर्‍याच्या तर मैत्रिणी होणार ना. तो मिडल एज्ड मिडल मॅनेजर असेल तर तसाच दमून घरी जाईल. बिच्चारा. मला उत्सुकता आहे काय दाखवतात त्याची. ते दादा माई फार बोअर झालेलं

अहो अश्या पोरगेल्या नवर्‍याच्या तर मैत्रिणी होणार ना.>>>> झी च्या शिरेली मधल्या हिरोच्या कुठल्याही वयात मैत्रीणी होऊ शकतात.उदा. अवघाचि हा संसार.
मला उत्सुकता आहे काय दाखवतात त्याची.>>> +१

Pages