माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा एपिसोड थोडासा बघितला, खुप डिस्टर्बन्स येत होता नेटवर्कमधे, त्यामुळे पुर्ण नाही पाहता आला.
त्या दुसर्‍या हिरोइनपेक्षा अनिता दाते बरीच उजवी वाटली ( मला मुख्य हिरोइन म्हणून आवडली नसली तरीही :फिदी:)
अभिजीत खांडकेकरला दाढी शोभत नाही अगदीच खप्पड दिसतो, खुललाही नाहीए अजुन, ते बच्चा वैगरे म्हणणे जरा अतिच नाटकी वाटले. अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते.

अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते. >> बरेच नकोच तिथे.. खुप भाषा मिक्स केल्याय तिनं.. त्यांच लव्ह मॅरेज आहे हे लॉजिकच पटत नाही मला..

बघितला एपिसोड रिपीट टेलीकास्ट. फार काही आज कळलं नाही. अनिता काम छान करतेय. तो छोटा मुलगा गोड आहे पण अभिजीत नाही फारसा आवडला. प्रेयसीपण काही खास नाही वाटली.

आणि ते प्रेयसीला बच्चा, बच्चा सारखं म्हणणं फार बोअर झालं, माझे कान किटले तेच तेच ऐकून.

साडी निथळंत ठेवते नायिका गॅलरीत ते पटलं नाही, हाताने धुतली असेल पण दोन मिनीटं ड्रायरला लावली असती तरी चाललं असतं.

बायको त्याला आवडत नाहीये, ते जाणवतंय पण हा मुलाशीपण बोलला नाही, की जवळ घेतलं नाही. एखादा सीन हवा होता मुलाचे लाड करतो किंवा निदान हाक तरी मारतो असा. त्याचं सगळं लक्ष प्रेयसीशी बोलण्यात आणि तिला बच्चा म्हणण्यात होतं म्हणून स्वत:च्या बच्च्याकडे लक्ष नाही गेलं बहुतेक त्याचं. खटकलं मात्र ते.

बच्चा आणि बेबी बोअर झालं.

अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे.

अनिता दाते बरेच सदोष नागपुरी टोन मधे बोलते. >> बरेच नकोच तिथे.. खुप भाषा मिक्स केल्याय तिनं.. >> हे राखेचाच्या मालवणीसारखं असावं बहुतेक. Wink

अनिता त्याला मिठी मारते तेव्हा तो ज्या पद्धतीत तिला दूर करतो, माझ्या नवर्‍यानं असं केलं असतं तर कचकचून भांडण झालं असतं आमचं. Angry

अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे.>>+१. पहिल्याच भागात जाणवलं ते.

पहिला एपिसोड तरी आवडला.

ही मालिका आहे त्यामुळे चित्रपटासारखी टेक्नीकली करेक्ट बोली बोलली जावी अशी अपेक्षा नाहीये माझी. पण निदान हा लहेजा तरी शेवटपर्यंत टिकवून ठेवावा एवढी माफक अपेक्षा.

अनिता दातेसमोर अभिजीत खांडकेकर फिका पडणारे >>> अभिनयात तो कोणासमोरही फिकाच पडेल.

एपिसोडची सुरुवातच नायक वायरलेस रीसीव्हरवर बोलताना दाखवून केली त्यामुळे त्या फोनच्या प्रसंगात तो वायरलेस रीसीव्हरवर बोलतोय हे आधीच माहीत होते त्यामुळे त्यातली मजाच गेली. आणि कानाला ते यंत्र लावलेले असले म्हणजे नवरा फोनवर बोलतोय हे नायिकेला कळू नये ? कितीही गांवढळ असली तरी निरीक्षणातून तरी तिला ही बाब माहितीच पाहिजे!

कितीही गांवढळ असली तरी निरीक्षणातून तरी तिला ही बाब माहितीच पाहिजे!>> होना बाकी तर वाघीण दाखवलीय! एवढे कसे समजत नाही

पण ती किती डोक्यात जाते?! भयप्रदा आवडले. पण मला असे कोणी सकाळी बेल मारून घरी पोहे खायला बोलवले तर डोकेच फिरेल माझे. आणि टॉवर मध्ये राहतो हाय सोसायटी हे काय? तिचे बोलणे खूपच इरिटेटिन्ग आहे. गर्ल फ्रेंड बरी आहे.

मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.

मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील. >>> Lol Lol Lol

मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.>> Rofl
पण खरंच रुमालाला का किस करत असाव्यात??? Uhoh

खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील. >>> Rofl मग त्या शिवाय कल्पनाशून्य कथालेखक / दिग्दर्शक मालिका कशी पुढे नेणार?

आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? तरी बरे, ब्रेकमध्ये वॉशिंग पावडरी / साबणाच्या जाहिराती येतच असतात.

पण खरंच रुमालाला का किस करत असाव्यात??? >>> एकदा लेकीने विचारले होते की "हिरो हिरॉइनचे कान का चावतो" ते आठवले Proud

मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील.>> Rofl

अरे वर धाग्यात कलाकारमध्ये अनिता दातेचे नाव राहिले की.

आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? तरी बरे, ब्रेकमध्ये वॉशिंग पावडरी / साबणाच्या जाहिराती येतच असतात. >>> कंपन्या जशा खाण्याचे , शाईचे , चिखलाचे डाग घालवण्याचे दावे करते , तसेच लिपस्टिक चे डाग घालवण्यासाठी पण करावी जाहिरात.
शेअरिन्ग द लोड मध्ये नवरा आपला शर्ट आणि रूमाल आपण धूतो कारण त्याला त्यावर लिपस्टिक चा डाग दिसतो.

अगं, तोंड पुसत असाव्यात किंवा एक्स्ट्रॉ लिपस्टीक टिपत असतील...आपल्याला काय माहित!! आपण काही विबासं वाल्या प्रेयस्या थोडीच आहोत!
::खोखो::

आणि मालिकेतल्या कुटुंबात रुमाल धूत नाहीत का? अगदी काल हेच मनात आलं. अनिताचं पात्र जास्त अघळपघळ दाखवलंय, खांडकेकर फारच अभिनयशून्य वाटतायेत. मी माझिया प्रियाला प्रीत कळेना पण क्वचित पाहिलीय.

मला एक कळत नाही की बाया, खासकरुन विबासं वाल्या प्रेयस्या, गडद लिपस्टिक लावुन रुमालावर काय म्हणुन किस करत असतील
>>> Rofl Rofl

भयप्रदा आवडले.>>> कोण ही भयप्रदा. मी ही मालिका बघितली नाही म्हणून विचारते.
त्यांच लव्ह मॅरेज आहे हे लॉजिकच पटत नाही मला.>>> सहमत. त्यान्चे लव्ह मॅरेज कसे झाले हे दाखवले का सिरियल मध्ये?

Pages