समानता

Submitted by अतरंगी on 4 August, 2016 - 01:54

We do not discriminate any individual on the basis of nationality, language, religion, race , creed, gender, sexual orientation, ethnic origin etc.

एका प्रतिथयश कंपनीच्या वेबसाईट वरील वाक्य... वाचायला अगदी छान वाटलं. पण जरा विचार केला तर वाटतं की हे एका समूहापुरते प्रत्यक्षात आणणे कदाचित शक्य होईल, पण संपूर्ण मानवजातीसाठी हे कधीतरी शक्य होऊ शकेल का?

मला तर कायम वाटतं की आपण समानतेच्या निव्वळ गप्पा मारतो. समाजात संपूर्ण समानता असू शकतच नाही. या ना त्या प्रकारे सामान्य माणूस कायम असमानता पाळत आलेला आहे आणि आजही पाळतो आहे. एक ५ ते १० टक्के (काही थोर सामाजिक कार्यकर्ते आणि पापभिरू सामान्य लोक) सोडले तर समाजात प्रत्येक जण एका किंवा अनेक प्रकारे दुसऱ्याशी भेदभाव करतोच.

जात, धर्म, वंश, लिंग, सत्ता (पद), सांपत्तिक स्थिती, नागरिकत्व, जेष्ठत्व एक ना अनेक प्रकार ज्या द्वारे असमानता पाळली जाते. सगळीकडे दिसते, कित्येकदा खुपते. लोकांना यातल्या एखाद्या किंवा अनेक गोष्टीचा अभिमान, गर्व  असतो तो कित्येकवेळा ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दाखवतात सुद्धा....

समाजाविषयी बोलताना मी स्वतः तरी पूर्णपणे निरपेक्ष आहे का ? नक्कीच नाही. जसं जसं वाचनाने (यात मायबोलीवरील जात, धर्म, स्त्री पुरुष समानता विषयक बीबी पण आहेत) थोडी फार समज येत गेली तसं तसं मी माझ्याकडून होणारे भेदभाव कमी करत गेलो पण आजही माणूस म्हणून मी पूर्णपणे समोरच्याशी कोणताही भेदभाव न करता वागू शकतो का? माझ्या डोक्यातून सगळे न्यूनगंड, अहंगंड पूर्ण पणे गेले आहेत का ? काही काही भेदभाव तर इतके सवयीचे झाले आहेत कि तो भेदभाव आहे हे पण कोणीतरी जाणीव करून दिल्याशिवाय लक्षात येत नाही. कधी कधी लक्षात आले तरी ते तसेच रेटतो कारण ते माझ्या फायद्याचे असतात! 

मला पण कित्येकदा या ना त्या प्रकारे भेदभाव सहन करावा लागतोच. त्यावेळेस मात्र मी आधी मनात cost-benefit analysis करून पाहतो आणि मग ठरवतो कि या विषयी बोलावे कि नाही.

राग, लोभ, द्वेष, मोह, माया, ईर्ष्या, स्वार्थ या सर्वांचा परिपाक म्हणजे असमानता आणि भेदभाव. पण हे सगळे मनुष्याचे स्थायीभाव आहेत जे कधीही नष्ट होणारच नाहीत.

असमानता, त्यामुळे होणारे अन्याय, डालवले जाणारे हक्क कदाचित आपण कधीच नष्ट करू शकणार नाही पण त्याची दाहकता कमी नक्कीच करू शकतो.

स्वपरिक्षण करून कोण कोणते भेदभाव प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आपण पाळतो? आपल्या आजूबाजूला सहजतेने दिसणारे आणि केले जाणारे भेदभाव कमी कसे करता येतील? आपल्यासोबत झालेले/ होणारे भेदभाव, ते भेदभाव न स्विकारता भांडून मिळवलेले हक्क याविषयी उघडपणे इतरांशी बोलायला हवे.

यातून लोकांना निदान इतरांना काय खुपते ते तरी कळेल कदाचित एखाद दुसऱ्या कोणाला तरी आपल्याकडून/ आपल्यासमोर होणारा भेदभाव कळून तो कदाचित सुधारता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ लेखातला मुद्दा समाजातल्या समानतेचा आहे ना? की फक्त ऑफिसांमधल्या? >>>>>मुद्दा समाजातील असमानतेचा आहे. मी पाहिले उदाहरण कामगारांना देण्यात येणाऱ्या कमी दर्जाच्या सोयीसुविधांचे घेतले तेव्हा पासून तोच विषय चालू आहे Happy

प्राॅब्लेम नक्कि काय आहे?..>>>>>
तो भेदभाव आहे. कसं आणि का ते सुरुवातीपासून लिहिले आहे.

आमच्या कंपनीत काही वर्षांपूर्वी मेडिकल रिइंबर्समेंट हा प्रकार आला.
कंपनीतर्फे मेडिकल इन्श्युरन्स मिळते, ते वेगळे. ते आधी पासून होते.
या मेडिकल रिइंबर्समेंट अंतर्गत, डॉक्टरांची फी आणि औषंधांचा खर्च क्लेम करता येतो. कमाल मर्यादा सगळ्या एम्प्लॉयीजना सारखी ठेवण्यात आली. ही सुविधा सुरु झाली तेव्हा पासून. सुरवातीला वर्षाला ३० हजार होती आता ५० पन्नास हजार आहे. या मर्यादेत कसलाच भेदभाव ठेवला नाहीय.

अहो समानता हा शब्द गणित वगैरे शास्त्रांत वाचला ऐकला असेल की तुम्ही तसे समता हा सामाजिक शास्त्र सोडुन इतरत्र ऐकलात काय? Lol

याउप्पर सोप्पे सांगणे कठीण बरे Proud

साधना,
खरेच सॉलिड्ड समानता आहे.

चर्चेत येऊन गेलेला अजून एक मुद्दा म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी, पदार्थांचे होणारे त्रास. मला वाटते हा मुद्दा भेदभावाचा नसून सहनशीलतेचा (टॉलेरेन्स) चा आहे.

आमच्या कंपनीच्या डायनिंग मध्ये पण साधना म्हणतात तसेच आहे. सगळ्या देशातील लोकांसाठी एकच सोय आहे( पदार्थ वेगवेगळे असतात). प्रत्येक जण जनरली खाण्याच्या सवयीनुसार ग्रुपने बसतो.
कधी कधी टीम लंच, पार्टीज, बार्बेक्यू पार्टी असते. तेव्हा सगळे एकाच टेबलवर असतात. यात युरोपिअन, अमेरिकन, भारतीय, फिलिपीनी, अरबी सगळे असतात. भारतीय तीव्र वासाच्या मसालेदार जेवणाला ते नाव ठेवत नाही आणि बाकी लोकांच्या ताटातील बीफ कडे भारतीय लक्ष देत नाहीत. कित्येक भारतीय आणि अरबी सरळ हाताने कालवून भात खातात, बाकी लोक मात्र काटे चमच्यानेच खातात. सगळे गुण्या गोविंदाने जेवतात. चक्क चक्क एकमेकांच्या ताटात हात पण घातलेला चालतो. एका इतक्या मोठ्या कंपनी मध्ये इतक्या विविध लोकांमध्ये असं कॉलेजच्या मित्रांसारखं ताटात हात/चमचा घालून बिनधास्त एखादा पदार्थ चाखणारे कालिग हा एक सुखद धक्का होता.

तर हा विषय भेदभावाचा नसून टॉलरेन्सचा आहे.
त्याच्या आधारावर कोणी भेदभाव करत असेल तर तो पण आक्षेपार्ह आहेच म्हणा.

मानव, आमच्याकडे मेडिकल रिइंबर्समेंट ग्रेडवाइज असे. ती पर्क्स आणि करपात्रही ठरू शके.

लेख वाचला आणि प्रतिक्रिया हि वाचतोय। मानवी संस्कृतीची सुरुवाती पासून असमानता असली तरी ही जास्तीत जास्त समानता आणणे हेच सुसंस्कृत समाजाचं ध्येय असलं पाहिजे. जास्तीत जास्त का तर काही ठिकाणी प्रोफेशनल आणि इतर कारणा करता सूट द्यायला हवी, उदाहरणार्थ आर्मी, काही उद्योग. याची सुरुवात हि शिक्षण आणि आरोग्या पासून करायला हवी. उदाहरणार्थ काही देशामध्ये (scandenevian) शिक्षण आणि आरोग्य ह्या सोयी शासन देते, तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील सर्व गरीब श्रीमंत लोकांना समान सोयी सुविधा मिळतात आणि हेच संस्कार त्यांच्यात रुजले जातात. तसेच industry चे structure हे hierarchical नसून mostly flat असते, त्यामुळे सगळे कर्मचारी एकत्र खातात, काम करतात , अपवाद ceo वैगेरे सोडून. वर्ण, रंग, लिंग ह्यावरून तरी असणारी असमानता ह्या देशातील समाजातून नाहीशी झाली आहे. जरी काही नैसर्गिक असमानता असेल तरी लोक मनातून असमानता कडूच शकतात दुर्बल लोकांना मान आणि मदत करून त्यांचा social स्टेटस वाढवू शकतो.

कशाची नोंद मानव? कळाले नाही.

मेडिकल रिम्बर्समेन्ट सारखी असावी कि वेगळी हा एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

काश के मैं ये सब पढ़ पाता...

खैर, किसी दिन पढ़ लूँंगा, फिर शायद कुछ 'प्रतिसाद' वगैरा लिख सकूँगा।

सुरुवातीच्या काही पोस्ट वाचल्या.. नंतर अधल्या मधल्या वाचल्या.. फक्त कंपन्यांबाबतच चर्चायचे आहे का हे समानता असमानतेचे धोरण?

असो, पण मला यात बेसिकच गंडल्यासारखे वाटतेय.
जर सोयीसुविधा समान असाव्या म्हणता, अगदी जेवण भत्ताही सेम असावे असा उल्लेख कुठेतरी वाचला. तर मग पगार का सेम असू नये? त्यात का असमानता? कोणी अंगमेहनतीचे काम करते त्याला कमी पगार आणि कोणी बुद्धीचे करते त्याला जास्त असे का? सफाई कर्मचार्‍याला ईंजिनीअरपेक्षा कमी पगार का? जर उद्या जगभरातल्या सफाई कर्मचार्‍यांनी बहिष्कार टाकला तर .... पण हे होणारच नाही.. का होणार नाही याचे उत्तर शोधल्यास तुम्हाला या सो कॉलड असमानतेचे उत्तर मिळेल.

प्रत्येक कामाची एक पैश्यात वॅल्यू असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीला पगार मिळतो.
उदाहरणार्थ, या देशात क्रिकेटर्सना एवढा पैसा मिळतो पण तेच हॉकी, कबड्डीला का नाही? याचेही उत्तर शोधा..

जे पैश्याबाबत लागू तेच मानसन्मानाबाबतही.. प्रत्येक कामासोबत एक मानसन्मानही येतो, तो त्या व्यक्तीला मिळतो.

खरा प्रश्न असा असावा की या किंवा कोणत्याही आधारे तुम्ही कोणाला हलके लेखता का?

माझ्यामते ही किंवा कुठल्याही प्रकारची असमानता अहंकारातून येते. तुम्ही आपल्याकडे असलेल्या पैश्यांचा, वा कुठल्याही वस्तूचा, वा अंगात असलेल्या कला गुणांचा, स्वता काही कर्तुत्व न करता मिळालेल्या जातीधर्म, प्रांतदेशाचा, अहंकार किंबहुना अभिमान (हा देखील साला एक फसवा शब्द आहे, अहंकाराचे गोंडस नाव) बाळगायला सुरुवात करता तिथेच असमानता आली Happy

अभिमान असमानता होऊ शकत नाही दुराभिमान हि असमानता असू शकते. बाकी लोकांना त्यांना त्यांच्या कुवतीनुसार काम नि कामाचे दाम मिळाले पाहिजे, त्यामुळे सगळ्या सारखा पगार असुच शकत नाही आणि मला नाही वाटत कि कोण अशी अपेक्षा करत असेल. सगळ्यांना सारखा पगार मग सगळ्यांनी 2 च भाकऱ्या आणि एक वाटी रस्सा खाल्ला पाहिजे किंवा सगळ्यांनी एकच प्रकारची चड्डी घातली पाहिजे असं म्हणलं पाहिजे. परिपूर्ण समानतेवर आधारित समाजाची निर्मिती नाही होऊ शकत मात्र कमीत कमी असमानतेवर आधारलेला समाज उभारला जाऊ शकतो. बेसिक सुविधा शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक इत्यादी आणि मान सन्मान सर्व लोकांना समान हवे, सामाजिक समरसता हवी. बाकी ज्यांच्या गरजा अफाट आहेत ते दुसर्यांना त्याची झळ न लावता भागवू शकतील.

समजा एका कुटुंबात दोन भाऊ आहेत. त्यातला एक हुशार आहे, भरपूर कमावतो. दुसरा कमी हुशार आहे, त्याला पगार कमी आहे.
तर पाहिल्याला तूप रोटी आणि दुसऱ्याला शिळी भाकर चटणी असे जेवण दिले जाते का घरात ?

प्रत्येक ठिकाणी व्यावसायिकता बघायची नसते.
अगदी एक सो एक नावाजलेल्या कंपन्या स्टाफ आणि वर्करला जेवणखाण एकंच देतात. वेगळं नाही. त्याच्या मागे काहीतरी विचार असतो उगाच गंमत म्हणून देत नाहीत ना.

हे सर्व मुद्दे आधी येऊन गेले आहेत, त्यावर प्रतिवाद पण केला गेला आहे. जरा वाचाल का प्लिज. म्हणजे नवीन मुद्दा मांडू शकाल आणि मग त्यावर चर्चा करता येईल.

अमितदादा नेमकं आणि परिणामकारक लिहीत आहात.
मला तेच म्हणायचं असून इतकं नेमकं लिहिता येत नाही

अभिमान असमानता होऊ शकत नाही दुराभिमान हि असमानता असू शकते.
>>
कसे ठरवणार अभिमान की दुराभिमान?

बाकी लोकांना त्यांना त्यांच्या कुवतीनुसार काम नि कामाचे दाम मिळाले पाहिजे, त्यामुळे सगळ्या सारखा पगार असुच शकत नाही
>>>
+ ७८६
हेच तर मी म्हणतोय
तुम्हीही हेच म्हणत आहात की याच्या उलट म्हणत आहात? Happy

समजा एका कुटुंबात दोन भाऊ आहेत. त्यातला एक हुशार आहे, भरपूर कमावतो. दुसरा कमी हुशार आहे, त्याला पगार कमी आहे.
तर पाहिल्याला तूप रोटी आणि दुसऱ्याला शिळी भाकर चटणी असे जेवण दिले जाते का घरात?
>>>
असे कशाला, समजा मी काहीच कमावले नाही तरी माझे आईवडील मला पोसतील. भावाबाबत तितकीशी ग्यारंटी देता येणार नाही, मुख्यत्वे तो आपल्या संसाराला लागल्यावर कठीणच. शेजारीपाजारी पोसतील हि शक्यता आणखी कमी होईल. समाज पोसेल ही अपेक्षा काल्पनिक ठरेल.
बहुधा आपण कंपनी आणि फॅमिली यांना एकाच तराजूत तोलत आहात. कंपनी तुम्हाला पोसते, तुमची काळजी घेते कारण तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात, जेवढी त्यांना तुमची गरज तेवढेच ते तुमची काळजी घेणार.

प्रत्येक ठिकाणी व्यावसायिकता बघायची नसते.
अगदी एक सो एक नावाजलेल्या कंपन्या स्टाफ आणि वर्करला जेवणखाण एकंच देतात. वेगळं नाही. त्याच्या मागे काहीतरी विचार असतो उगाच गंमत म्हणून देत नाहीत ना.
>>>>
काही वेळा सोय बघितली असते, तर काही वेळा कंपनीच्या रेप्युटेशनला कसे फायद्याचे होईल हे बघितले असते.
अर्थात कदाचित असेही असू शकते की हा निर्णय घेणे एखाद्याच्या हातात असेल आणि ती व्यक्ती माणूसकी, समानता जपणारी असेल तर तो मनापासून आणि उदात्त हेतूने घेतलेला निर्णय असू शकतो. पण ईतरांना तो योग्य वाटत असेल हे गरजेचे नाही. त्या समान पॉलिसीतही एक्जेक्युशन करताना असमानता दाखवली जाऊ शकते. कधी ती भिंत द्रुश्य असते तर कधी अद्रुश्य ईतकेच Happy

हे सर्व मुद्दे आधी येऊन गेले आहेत, त्यावर प्रतिवाद पण केला गेला आहे. जरा वाचाल का प्लिज. म्हणजे नवीन मुद्दा मांडू शकाल आणि मग त्यावर चर्चा करता येईल.
>>>>
आधी येऊन गेला असेलही मुद्दा, प्रतिवादही झाला असेल, भले सर्वानुमते तो प्रतिवाद मान्यही झाला असेल..
पण म्हणून त्या मुद्द्यावर मला माझे मत मांडू न देणे ही असमानता नाही का झाली Happy

ती भिंत द्रुश्य असते तर कधी अद्रुश्य ईतकेच>>>>

अशा दृश्य आणि अदृश्य भिंती शोधून त्या नाहीश्या करणे महत्वाचे. त्यालाच समानता म्हणतात.

ती व्यक्ती माणूसकी, समानता जपणारी असेल तर तो मनापासून आणि उदात्त हेतूने घेतलेला निर्णय असू शकतो. >>>>>

अशीच माणुसकी आणि समानता सर्व कंपन्यांनी दाखवावी अशी अपेक्षा आहे. सक्ती केली जाऊ शकत नाही. म्हणून अपेक्षा आहे. कोणताही संवेदनशील आणि प्रगल्भ विचारांचा माणूस हेच करेल.
फक्त एक माणूस कमी पगारावर काम करतो, त्याची बौद्धिक आणि शैक्षणिक पात्रता कमी आहे म्हणून त्याला कमी प्रतीचे जेवण देऊ नये.

मुद्द्यावर मला माझे मत मांडू न देणे ही असमानता नाही का झाली>>>>
मत मांडा, प्रतिवाद करा कि. कोण नको म्हणतंय? फक्त त्यात जर नवीन मुद्दा असेल तर त्यावर चर्चा करू असे म्हणले आहे.

<<<<प्रत्येक कामाची एक पैश्यात वॅल्यू असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीला पगार मिळतो.

जे पैश्याबाबत लागू तेच मानसन्मानाबाबतही.. प्रत्येक कामासोबत एक मानसन्मानही येतो, तो त्या व्यक्तीला मिळतो.>>>>

म्हणजे खालचे मानले जाणारे काम करणार्‍याला तुच्छ मानायचं का?

समानता वगैरे गोष्टी बोलायला सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आचरणात आणताना आपण आपले वेगळे निकष लावू शकतो. हेच आपल्या बाबतीत इतर करू शकतात.

ट्रेनमध्ये स्त्रियांसाठी वेगळी सोय असल्याने फारसा फरक पडत नाही पण बसमध्ये राखीव दोन सीट वगळता बाकी स्त्रियांना इतर पुरुषांसारखीच धक्काबुक्की करत स्वतः साठी सीट मिळवावि लागते. अशा वेळी मी ज्या सीटवर डोळा ठेवलाय तिथे कुणी पुरुष चपळाई करून बसला तर माझी थोडी चिडचिड होते. रिकाम्या सीटच्या बाजूलाच कोणी उभा असेल आणि त्याला सीट मिळाली तर मिनाईलाजाने गप्प राहते, पण त्याने जर तीच सीट मला ऑफर केली तर मी ती आनंदाने घेते. बस मध्ये चढताना मला मौका मिळाला तर मी सरळ बाजुच्याला धक्का मारून आधी चढते. मलाही यंर्जन धक्का मारून मागे सारून आत चढतातच, मला संधी मिळाली तर मीही तेच करते.

आयुष्यात इतरत्र मी समानतेच्या गप्पा मारते पण माझ्या कम्फर्टची बात येताच मला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी हि अपेक्षा ठेवणे ही सुद्धा असमानता आहेच ना? आपण किती ठिकाणी हि अशी असमानता करत असतो आपल्या लक्षातही येत नाही, पण ज्याच्या बाबतीत हे घडते त्याला मात्र ते बोचते.

जे पैश्याबाबत लागू तेच मानसन्मानाबाबतही.. प्रत्येक कामासोबत एक मानसन्मानही येतो, तो त्या व्यक्तीला मिळतो.>>>>

म्हणजे खालचे मानले जाणारे काम करणार्‍याला तुच्छ मानायचं का?>>>>>>

भरत, दुर्दैवाने भारतात हे आजही सत्य आहे. तुम्हाला खालचे काम म्हणजे भंगीकाम, झाडुवले अपेक्षित असतील पण इतर क्षेत्रातहि उच्चनीच भावना आहेच. माझ्या मुलीने महाविद्यालयीन शिक्षण कलाक्षेत्रात करायचे ठरवले तेव्हा घरी 'डॉक्टर, इंजिनिर झाली असती तर बरे झाले असते, त्या क्षेत्राला मान आणि प्रतिष्ठा आहे' ऐकवण्यात आलेले. माझ्या नजरेसमोर तेव्हा ऑफिसातीळ कॉम्पुटर इंजिनेर शिव्या खात असलेले आलेले Happy

वर कोणी लिहिलेय तसे एकाच घरात दोन भाऊ दोन वेगळ्या क्षेत्रात असतील तर एकाला डोक्यावर घेऊन नाचणे आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणे सर्रास होते, तुम्हीही पाहिलं असेल.

समानता हि मानसिक आहे, आपल्या समाजात उच्च नीच कल्पना इतक्या खोलवर रुजल्यात कि त्यांना उखडून देणे अवघड आहे. कित्येक लोकांनी प्रयत्नांती आपल्या वागण्यात समानता आणलेली आहे, त्यांचे बघून इतरही शिकताहेत पण अजून प्रचंड मोठा रस्ता पुढे आहे आणि तो रस्ता खूप अवघड आहे. माणूस शिक्षित झाला म्हणजे या कल्पना किती पोकळ आहेत याची त्याला जाणीव होईल असे मला आधी वाटायचे पण भ्रमनिरास झाला. आपण आता मुलांना टार्गेट करून या कल्पना खोट्या आहेत हे त्यांच्यावर बिंबवून काही बदल घडेल अशी आशा करू शकतो. बाकी ज्यांना शहाणेसुरते म्हणतो त्यांचा शहाणपणा असमानतेच्या भींती अजून उंच करण्यात खर्ची होताना रोज दिसतो.

आपण किती ठिकाणी हि अशी असमानता करत असतो आपल्या लक्षातही येत नाही, पण ज्याच्या बाबतीत हे घडते त्याला मात्र ते बोचते.>>>>>> करेक्ट.
याचीच नोंद घ्यायला सुरुवात करणे हे संवेदनशीलतेचे लक्षण आहे.

तुम्ही दिलेल्या उदाहरणामध्ये बसने प्रवास करत असताना सर्वाना बसायला जागा मिळू शकत नसेल तर वृद्ध, अपंग, गरोदर स्त्रिया यांना प्राधान्य हवे. स्त्रियांना ऑफिस मधले काम, ऑफिसला येणे जाणे, परत घरी जाऊन घरकाम हे सर्व करावे लागते त्यामुळे त्यांना त्यानंतर प्राधान्य असावे. धडधाकट पुरुषांचा क्रमांक सगळ्यात शेवटचा Happy

तुमच्या दुसऱ्या पोस्ट मधील शेवटच्या पॅराग्राफला अनुमोदन.

सामाजिक समानता हि एका रात्रीत येणार नाही आणि लोकांच्या अंगवळणी पडणार नाही. ती स्टेप बाय स्टेप वाढवत न्यायला हवी.

त्याबरोबरीने घरातही समानता आणायला हवी ना हो? नोकरी करणार्‍या स्त्रीने स्वैपाकाला जुंपून घ्यायचं आणि पुरुषाने टीव्हीच्या रिमोटला हीही असमानताच.

अरे अरे अरे, प्रत्येक प्रतिसादावर कीस काढतच बसायचे का? कोणी म्हणाले की 'एक' हा आकडा आहे की लगेच 'म्हणजे दोन हा आकडा नाही का'? आँ?? अरे जरा इतरांना मनमोकळे लिहूद्यात की? सगळेच कसे महान असतील?

इथल्या पान ८५ वरच्या मे पु रेग्यांच्या लेखावरच्या नोंदी वाचा.

मी रेग्यांचा मूळ लेख वाचायचा प्रयत्न केलेला. पण त्यात समता म्हणजे काय यापेक्षा ती काय काय नाही हेच ते नेति नेति सारखे सांगताहेत असं वाटून राहिलं आणि सोडून दिला. हे जरा कळण्यातलं वाटलं.

नोटः ती ११० पानी पुस्तकाची पीडीएफ फाईल आहे.

अरे अरे, प्रत्येक प्रतिसादावर कीस काढतच बसायचे का? >>>>> सहमत आहे, लेखक साहेब सगळ्या प्रतीसादांचा आणि तुमच्या लेखाचा सारांश देऊन शेवटची प्रतिक्रिया द्या (अर्थात ज्यांना मत मांडायचं आहे ते धागा वाढवू शकतात, फक्त तेच तेच प्रतिसाद परत येवू नयेत म्हणून सूचना.)
तुम्हीही हेच म्हणत आहात की याच्या उलट म्हणत आहात? >>>> तुमि जे म्हणताय तेच मी म्हणतोय फक्त ठराविक वाक्यावर सहमत नव्हतो.
बाकी प्रत्येकाने मांडलेले मुद्दे हे अनुभवातून आलेले हेत त्यामुळं त्याना नाकारून चालणार नाही, परंतु बहुतेक लोक जे सांगतायत ती सध्याची परिस्थिती आहे. लेखक सध्याच्या परस्थितीचे विश्लेषण करून भविष्यात आपण असमानता कमी करू शकतो असा आशावाद मांडतो आहे असं मला वाटत. आपल्या देशात 100 वर्षापूर्वी असणारी असमानता आज नक्कीच कमी झाली आहे आनखी 100 वर्षांनी ती परत कमी होईल अशी आशा बाळगू. आणि मला आस वाटतंय समानता ह्या शब्दा पेक्षा भेदभाव ह्या शब्दावर भरपूर लोकांची सहमती होईल , भेदभाव रहित समाज उभारणे. असमानता आणि भेदभाव या शब्दांचा खिस नको पाडाय अर्थ ज्याचा त्याचा समजून घ्यावा.

अशा दृश्य आणि अदृश्य भिंती शोधून त्या नाहीश्या करणे महत्वाचे. त्यालाच समानता म्हणतात.
>>>>
पण तुम्ही कायदे बनवून या अद्रुश्य भिंती नाही नाहीश्या करू शकत.
त्यासाठी सोच बदलो देश बदलो याची गरज आहे.

फक्त एक माणूस कमी पगारावर काम करतो, त्याची बौद्धिक आणि शैक्षणिक पात्रता कमी आहे म्हणून त्याला कमी प्रतीचे जेवण देऊ नये.
>>>>
मला नाही वाटत, की कुठल्याही कंपनीत ते पिक्चरमध्ये जेलमध्ये दाखवतात तसे सुखी रोटी आणि दाल दिली जाते. तसेच तेच खा अशी जबरदस्ती केली जाते.
तरी खाजगी कंपन्यांमध्ये बरीच समानता असते. सरकारी कार्यालयात तर प्रोटोकॉल म्हणत कायद्यानेच बरीच असमानता दिसते.
मी माझ्या बॉसला, ज्याचे पद माझ्या दोन ग्रेड वरचे आणि पगार चारपट आहे त्याला नावाने हाक मारत एकेरी उल्लेख करतो. पण तरीही बोलण्याच्या टोनमधून आणि बॉडीलॅंग्वेजमधून तो बॉस असल्याचा योग्य तो सन्मान देतो. तसेच तो देखील मला मी त्याच्या टीममधील एक मेंबर आहे याचे भान ठेवून सन्मान देतो. ईथे या सन्मानाची आम्ही वर्ड टू वर्ड टॅली करत नाही. उदाहरणार्थ, मीटींग रूममध्ये तो लेट आला आणि बसायला जागा नसल्यास त्याला आपली सीट ऑफर करणे हे मी करतो हा मी त्याचा केलेला सन्मान झाला. तो ती चेअर न घेता, ऑफिसबॉयला सांगून आणखी एखादी मागवतो हा त्याने केलेला माझा सन्मान झाला. ऑफिसबॉयने चेअर आणून दिल्यावर त्याला हसून थॅन्क्स बोलणे हा ऑफिसबॉयचा सन्मान झाला. ईथे माझ्यासाठी आणि त्या ऑफिसबॉयसाठी ही एवढी सन्मानाची वागणूक पुरेशी ठरते. इथे कधी मी लेट आलो तर माझ्या बॉसने ये रुनम्या ईथे माझ्या सीटवर बस म्हणत उठणे आणि मी त्याला दिलेल्या सन्मानाची परतफेड करणे मला अपेक्षित नसते.

मत मांडा, प्रतिवाद करा कि. कोण नको म्हणतंय? फक्त त्यात जर नवीन मुद्दा असेल तर त्यावर चर्चा करू असे म्हणले आहे.
>>>
हो, पण आधी आलेल्या जुन्या मुद्द्यावर चर्चा सुफल आणि संपुर्ण झाली आहे हे कोण आणि कसे ठरवणार.
किंबहुना ते तसे नव्हते हे खाली माझ्या पोस्टला कोट करत आलेल्या काही प्रतिसादांवरून दिसून येते Happy

म्हणजे खालचे मानले जाणारे काम करणार्‍याला तुच्छ मानायचं का?
>>>>
अगदीच तुच्छ वगैरे टोकाचा शब्द वापरायची गरज नाही ईथे Happy
एखाद्याला जास्त आदर देणे आणि एखाद्याला कमी आदर देणे यात त्या कमी आदर देणार्‍याचा आपण अनादर करतो असे नसते.
उदाहरणार्थ, एखादा औषधनिर्माता आणि एखादा मद्यविक्रेता यांना मी समान सन्मान नाही देऊ शकत.
पण हेच काही लोकांच्या मते उलटही असू शकते. एखाद्याला मद्यनिर्माता खूप भारी वाटत असेल तर तो त्याला जास्त सन्मान देऊ शकतो. शेवटी हे व्यक्तीसापेक्ष आहे.

आणि हो, तुमच्यामते खालचे काम, वरचे काम, म्हणजे काय अपेक्षित आहे हे सांगितले तर ऐकायला आवडेल. मी माझ्यामते एक वर उदाहरणात दिले आहे.

तुम्ही कायदे बनवून या अद्रुश्य भिंती नाही नाहीश्या करू शकत.
त्यासाठी सोच बदलो देश बदलो याची गरज आहे.>>>>

इथे कोणीही कायदे बनवण्याविषयी बोलत नाही. विचार करणे आणि ते गरज असल्यास ते बदलणे यावर चर्चा चालू आहे.

बाकी मुद्दे नुसताच वकिली आवेशाने मांडलेले असल्याने त्याला पास. आम्हाला वादविवाद करून ते जिंकणे वगैरे यात काही स्वारस्य नाही. काही उपयोगी लिहिलेत तर बोलू. बाकी चालू द्या.

>>>>अगदीच तुच्छ वगैरे टोकाचा शब्द वापरायची गरज नाही ईथे स्मित
एखाद्याला जास्त आदर देणे आणि एखाद्याला कमी आदर देणे यात त्या कमी आदर देणार्‍याचा आपण अनादर करतो असे नसते.<<<<

परफेक्ट ऋन्मेष! ह्या अश्याच प्रश्नांमुळे चर्चा नको तिकडे जाते.

Pages