स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकपेटला बसनी जाऊन चालत shopping करायची ओ ताई Happy मग येताना मिळाली तर ओला/उबर नाहीतर मग रिक्षावाला म्हणेल तेवढे पैसे द्यायचे आणि घरी या! फक्त कढईच घेतलीत तर बस नी पण परत येता येईल Happy

अरे हे लोखंडी कढया, तवे इ प्रकार आठवडी बाजारात नक्की मिळतात. पुण्यात तुमच्या भागात आठवडी बाजारात विचारा किंवा घरी कामवाल्या असतात त्या जनरली लोकल असल्याने त्यांना हे माहीत असतं.
राहिली मंडईची बाब, तर आपल्या राहात्या जागेवरून एवढं लांब जाणे आणि या वस्तू आणणे हे जरा कटकटीचं होऊ शकेल तरीही चवीसाठी म्हणून करायलाच हवं Wink तर मंडईसमोर जे पार्किंग आहे त्या लेन मध्ये जरा फिरून पाहा. तसंही आपले ते हे सुप्रसिद्ध लेखक म्हणले आहेत ना - तुळशी बाग पुणे आणि रानडे रोड, दादर याठिकाणी स ग ळ्या चीजा मिळतात...!

डिशवॉशर वापरणे फायदेशीर ठरते का? सध्या कामवाल्या काकूंंनी असहकार पुकारल्यामुळे, नवीन बाई की डिशवॉशर अशी चर्चा सुरू झाली आहे. आम्ही गावात राहत असल्याने अधूनमधून, लाईट आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न असतो. अनुभवी लोकांनी मार्गदर्शन करावे.

मी bosch चा डिशवॉशर वापरते आहे गेल्या ५-६ वर्ष पासून, आणी बाई च्या कंपॅरिसन मध्ये डिशवॉशर फायदेशीर आहे, पण वॉटर pressure मिनिमम १० लिटर पर मिनिटे असावा, light चा issue नाही जिथे सायकल थांबली तिथून पुन्हा सुरु होते परत रिस्टार्ट करायला लागत नाही. भान्डे अगदी छान निघतात, दिवसातून २-३ वेळा ही वापरता येते पाहुणे आल्यास, बिना कटकट आणी सुट्टी नाही बाई सारखी, भांडे गरम पाण्यात धुतले गेल्याने जर्म फ्री होतात.

Voltas beko चा table top model आहे , कलीग चा अनुभव समाधानकारक आहे

Check following links - price range 20000+, the space and other information check on Bosch site, in local shop you will get discount and for less price than given on website.

But take from the local shop instead of online, sometimes we get defected or used / returned products from online purchase so it's better to take the appliances from local shop.

https://www.amazon.in/Voltas-Beko-Settings-Dishwasher-DT8S/dp/B07NF7NHSN...

https://www.bosch-home.in/products/dishwasher

https://www.bosch-home.in/productlist/dishwashers/free-standing-dishwash...

चुकून जुन्या धाग्यावर विचारलेला प्रश्न आणि उत्तर इकडे टाकते.

बिर्याणी / मूगडाळ खिचडीसारख्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या भाताच्या प्रकारांसाठी तुम्ही कुठली भांडी वापरता? लोखंडी कढई चालेल का? लोखंडी काढईत केलं तर लगेच काढून ठेवावं लागेल ना?
Submitted by गौरी on 20 January, 2021 - 12:26

मी किचन विषयातील तज्ञ नाही, पण बिर्याणीमध्ये दही आणि टोमॅटो असतो त्यामुळे लोखंडी कढईत शिजवुन चालणार नाही असं मला वाटतं. आम्ही जिथुन बिर्याणी ऑर्डर करतो ते अतिशय जड स्टीलच्या भांड्यात, ज्याला कॉपर बॉटम आहे, अशा भांड्यात शिजवतात. खुप मोठं भांडं असलं तरी शेप क्युट असतो. तपेलीसारखा. शिवाय कढईत बिर्याणी केली तर सील करायला (दम बिर्याणीसाठी) अवघड जाईल.

खिचडी तर आम्ही कुकरमध्ये शिजवतो. कमी लोकांसाठी चिंटुमींटु कुकर, जास्त लोक असतील तर मोठा फ्युच्युरा कुकर.
Submitted by मीरा.. on 20 January, 2021 - 13:57

या धाग्यावर २००० पेक्षा जास्ती पोस्ट्स आहेत. नवा धागा उघडलेला आहे मॅगी यांनी.
पुढली चर्चा तिथेच करा
https://www.maayboli.com/node/59101
नवीन Submitted by मेधा on 20 January, 2021 - 18:31

मला बेसिक बेकिंग आणि पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी otg घ्यायचा आहे.. छोटा 9-10 लिटर चा पण चालेल. मला otg बद्दल काही माहिती नाही. कोणी सांगेल का कोणता घ्यावा??

धन्यवाद भरत.
Amazon वर जे 3-4 हजारातले आहेत otg ते काही उपयोगाचे आहेत का??

माहीत नाही. मी Morphy Richards चार घेतला . त्याचा thermostat बिघडला असावा. पदार्थ एकसारखे बेक होतं नाहीत आणि पटकन जळतात

माझ्याकडे प्रेस्टिजचा आहे. लहान आहे. मी त्यात कुकीज, कधीतरी केक, ब्राऊनी करते. चांगला आहे. अगदी खूप वापरला जात नाही माझा.

राईस कुकरवर वेगळा धागा आहे का? स्लो कुकरचा सापडला, पण राईस कुकरचा नाही.
माझा घेण्याचा विचार आहे. त्यात काय काय करता येतं आणि कुठल्या कंपनीचा चांगला असतो? किती साईजचा घ्यावा चौघांच्या कुटुंबासाठी?

देशात असाल तर इन्स्टापॉट चा देशी भाऊ आहे. तो घ्या. माझ्या जावेचा फीडबॅक छान आहे. नाव विचारून इथे लिहिते नंतर.

स्मूदी,शेक आणि ज्युस इत्यादीसाठी मॅजिक बुलेट घ्यावा का? प्रीती आहे पण एक ग्लास शेक साठी त्याचा मोठा जार खुप मोठा होतो. आणि डेट्स वगैरे खुप बारीक होत नाहीत.

मॅजिक बुलेट खुपच उपयो गी आहे. जरूर घ्या. आम्ही ग्रीन स्मूदी, ओट स्मूदी करतो व इतर चटण्या थोड्या प्रमाणात ल्या ग्रेव्ही साठी कांदे टोमाटो
वाटणे पालक प्युरे वगैरे नेहमी करतो. सुके मसाले वाटून घेतो. माझ्या कडे एकूणच कमी प्रमाणात स्वयंपाक अस्तो. त्यामुळे हा बरा पडतो. फक्त दोस्याचे वाटा यला हेवी ड्युटी मिक्सर काढावा लागतो.

ह्या बरोबर दोन झाकणे व दोन भोकाची झाकणे येतात म्हणजे एका बोल मध्ये पेपर वाटून त्यातूनच पदार्थावर घालता येते. किंवा शेंगदाणा कूट वगैरे ठेवता येते. मसाले नेक्स्ट वापरायला ठेवुन देता येते.

फक्त वाटायची वस्तू भांड्यात घालून ब्लेड लावून नीट बंद करा. बुलेट मध्ये नीट फिक्स करा चेक करा व मगच इलेक्ट्रिसिटी ऑन करा.
म्हणजे हातावर पडणे व अपघात होणार नाही.

थॅन्क्यु अमा.
वावे, Mealthy Multipot म्हणुन instapot चा भाऊ भारतात मिळतो. माझ्या जावेनी खुप छान फीडबॅक दिला आहे.

वावे, Mealthy Multipot म्हणुन instapot चा भाऊ भारतात मिळतो. माझ्या जावेनी खुप छान फीडबॅक दिला आहे. >>>

मी पण mealthy pot २ वर्षांपूर्वी घेतला. इन्स्टंट पॉट यूएस मध्ये वापरत होते/आहे. पुण्यात साधे कुकर खराब झाले मग नवीन घेताना इन्स्टंट पॉट घ्यायचेच ठरवले होते. पण त्याची किंमत भारतात त्यावेळी फार जास्त वाटली. १५-१६००० ला होते. आता माहित नाही काय किंमत आहे.अमेरिकेतून नेला असता तर adapter वगैरे कटकट होती व तरीही गॅरंटी वाटली नाही. मिलदी पॉट UK मध्ये पॉप्युलर आहे व सर्वात महत्वाचे २२० V ला उपलब्ध आहे. आणि त्यात काही एक्सट्रा features पण आहेत.

२ वर्षे वापरल्यावर माझा अनुभव छानच आहे, इलेक्ट्रिक कूकरमध्ये मला सर्वात सोयीचे वाटते कि आपण त्यात पदार्थ लावून दुसरी कामे करायला जाऊ शकतो. माझ्यासारख्या गॅसवर कढई ठेऊन विसरून जाणाऱ्या व नंतर जळाले म्हणून हळहळणाऱ्या व्यक्तीसाठी खूपच उपयोगी. नवऱ्यालाही डाळभात लावायला खूप सोयीचा वाटतो.

माझ्याकडूनही mealthy पॉट ला +१.

मेलथी मी पण घेतला आहे , इलेक्ट्रिक कुकर आधी सेट करत असल्यामुळे शिटी होण्याचा प्रश्न नाही, लावा आणि दुसरं काम करा

Pages