स्टँड मिक्सर

Submitted by लालू on 19 December, 2009 - 19:57

स्टॅन्ड मिक्सर म्हणजे भारतात ज्याला "मिक्सर" म्हणतात तो नव्हे. नावाप्रमाणे याचे काम फक्त 'मिक्स' करणे असते. कणीक मळणे, केक -कुकीज करत असाल तर त्याची मिश्रणे, फ्रॉस्टिन्ग, ताक घुसळणे इ. कामे यात छान होतात. या यंत्राच्या कणीक मळण्यातल्या कौशल्यामुळे याला 'गृहिणीमित्र' ही पदवी द्यावी वाटते पण बदलत्या काळानुसार आपण याला 'स्वयंपाकघरातील सहकारी' किंवा 'किचन-मित्र' म्हणूया.

फूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.

यात बरीच मॉडेल्स आहेत पण Kitchen Aid 'Artisan' चे ३२५ वॅटचे ५ क्वार्टचे मॉडेल पुरेसे होते.
http://www1.macys.com/catalog/product/index.ognc?ID=77589&CategoryID=31665
सेलमध्ये २५०-२३० पर्यंत मिळते कधीकधी.

बर्‍याच दुसर्‍या अ‍ॅटॅचमेन्टसही मिळतात, पण त्या गरजेनुसार घ्याव्यात. सोबत येणार्‍या तीन पुरेश्या आहेत.

यात बाकी कंपन्याही असतील पण फूड प्रोसेसर किंवा मिक्सर यासारख्या उपकरणांसाठी Kitchen Aid हा डोळे झाकून घेण्याचा ब्रॅन्ड आहे.

mixer.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यापण विशलिस्ट वर आहे हा, दर वेळी दुकानात गेले की मी हा बघून न घेता परत येते, अपार्टमेंट्मध्ये एवढे मोठे किचनच नसते हे सगळे ठेवायला. Sad

कणीक मळायला हे असलं मशीन बरं पडतं की फुड प्रोसेसर मधे नीडिंग ब्लेड लावून केलेलं बरं पडतं ? साफ सफाईच्या दृष्टीने कुठलं मशीन चांगलं ?

भाकरीचं पीठ पण यातून मळता येते का ?

हे नायजेला च्या शोमध्ये नेहमी अस्ते. जबरी मिक्स करते. अगदी गृहिणी मित्र ! मला बेकिंगचे गोड पदार्थ ब्रेड्स जाम आवडतात पण वजन आणखी वाढेल म्हणून जास्त करत नाही. एग व्हाइट/ क्रीम पण मस्त बीट होते ह्यात.

भाकरी चे पीठ बहुतेक नाही मळणार कारण कणीक, मैदा मध्ये ग्लुटेन असते जे कण जास्त पकडून ठेवते
ते भाकरीच्या पिठात नसते. मशीनचे डिझाइन भाकरी साठी इंटेंडेड नाही.

बेकिंगसाठी मेनली जे फेटणे लागते ते यात मस्त होत अस्णार.
आम्ही सरफेस टेक्निकच्या वर्गात हा मिक्सर पिगमेंटस आणि मिडीयम मिक्स करायला वापरायचो.. Happy

देशी, मी हे वर लिहिलं आहे.
>>फूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.

भाकरीचे पीठ 'मळले' जाणार नाही, मिक्स होईल. ते हाताने पुन्हा मळावे लागेल. आणि भाकरीचे पीठ कणकेसारखे एकदम मळून ठेवायचे नसते. १-२ भाकर्‍यांपुरते मळून घेत जायचे असते.

मोदकाची उकड चांगली मळली जाते.

Heyyy can anybody tell me how do u type in marathi? Its too difficult for me...i knw i shud ask this in some other forum...but somehow m not able to access it.

फूड प्रोसेसर चा वेगळा धागा दिसला नाही म्हणून इथे लिहिते आहे. ह्या विकांताला हॅमिल्टन बीच चा एक नविन मॉडेल च फु प्रो आणला पण एकदा वापरल्यावर आवडला नाही म्हणून परत केला. प्रमाण कमी असेल तर एक छोटं भांडं येतं पण ते स्वतंत्रपणे न फिक्स करता मोठ्या भांड्यात च लावावं लागतं आणि मोठ्या भांड्यातून चॉप केलेलं मिश्रण छोट्या भांड्यात पडतं.झाकण लावण कटकटीच वाटलं उगाचच कॉम्प्लिकेटेड. ते टारगेट मधून आणलं होतं किंमत होती ७२.००

मग काल महागडा किचनेड आणला. तो ही रिटर्न करणार आहे.का ते लिहितेच ब्रेक के बादः)

अय्या, हा फु प्रो वर्ल्ड बेस्टच आहे. हा घ्यावा. ग्रेट इन्वेस्ट्मेंट. फॉर द रेकॉर्ड मी एक वायर व्हिस्क घेतली आहे.

लालुच्या कृपेने हे वापरायला सुरुवात केली होती. फक्त कणकेसाठी ह्याचा उपयोग केला तरी पैसे वसुल. फार उपयोगी आहे, वापरायला सोपे आहे. धुवायला सोपे आहे. पोळ्या छान होतात. वेज-पराठे चे पीठ छान भिजवले जाते.
म्हणे, इडली चे पीठ आंबल्यावर ह्याच्या एगबीटरने छान मळले(?) जाते. मस्त इडल्या होतात.

chioo तू घेतलास का हा BOSCH चा stand -mixer ??? कसा सुरु आहे ???

मला पण www.amazon.co.uk कडुन order करावा लागणार आहे म्हणून विचारात आहे ?? बाकी US मधल्या मैत्रिणीने सुचवलेले brands माझ्या कडे पण नाही आहेत.

गेली अनेक वर्ष विश लिस्ट वर होता हा KitchenAid मिक्सर, शेवटी मागच्या आठवड्यात घेतला. एकदम प्रेमात पडलेय मी याच्या. इतकी मस्त मऊ कणीक मळली जाते की बास. मला ऑलरेडी पैसा वसूल झाल्यासारखे वाटतेय.

़मी Kohls मधून घेतला, २०% चे कूपन होते तर २४०$ ला पडला. मी ४.५ क्वार्टचा घेतला. सध्या कॉस्कोमधे पण डील चालू आहे ६ क्वार्टचा २८०$ ला.

मला भारतात वापरतात तसला मिक्सर घ्यायचा आहे इथे उसगावात. अ‍ॅमॅझॉनवर प्रिती वगैरे ब्रँडचे मिक्सर दिसत आहेत. कुणी जर इथे मिक्सर-ग्राइंडर घेतला असेल तर सांगा पटापट

माझ्याकडे प्रितीचाच आहे मिक्सर. चांगला आहे. ईडली पिठ, चटण्या वगैरे चांगल्या वाटल्या जातात. एक मोठे आणि एक लहान भांडं आहे. ९९ $ ला घेतला.

टण्या, मी उसगावाला जातांना kenstar मिक्सर स्टेपडाउन करवून नेला होता. बराच चालला तो. मैत्रिणीकडे सुमित होता. त्याचेही रेव्ह्यु बरे ऐकले आहेत.

Pages