सैराट का बघावा? १० कारणे द्या !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2016 - 16:57

आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..

पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.

१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.

२) ‘सैराट-एक लव्हस्टोरी’ शाहरूख, चोप्रा आणि करण जोहार मंडळींच्या तोंडात मारावी अशी जमलीय. प्रेम म्हणजे काही तरी लार्जर दॅन लाईफ भावना आहे अश्या आविर्भावात बनवलेल्या बॉलीवूडी चित्रपटांनी आपले गंडवलेले कन्सेप्ट क्लीअर करत ईतक्या सहजसुंदर आणि नैसर्गिकपणे यात सारे काही घडते की चित्रपटाच्या पहिल्या भागात असंख्य गुदगुल्या मनाला सतत होतच राहतात. या अवस्थेतून मध्यंतरापर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही.

३) डोळ्यांची पारणे फिटावीत अशी द्रुश्ये एका मराठी चित्रपटात बघायला मिळतात आणि ती देखील आपल्याच मातीतील, गावखेड्यांतील, शेतातील दिसतात. मराठी चित्रपट गेल्या काही काळात तांत्रिकदृष्ट्या झेप घेऊ लागलेत असे म्हटले, तर ही भरारी आहे. हिंदीच्या तोडीस तोडच नाही तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. ते देखील मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये हे विशेष. हिंदी ब्लॉकबस्टरचे बजेट दिले तर हा माणूस पडद्याला आग लावेल.

३) तांत्रिक बाबींतले एक प्रेक्षक म्हणून जेवढे कळायला हवे तेवढेच मला समजते. पण ते पक्ष्यांचे थवे, शेतातील वाटा, खोल विहीरीतल्या पाण्यात ढुबुक आवाज होत पडणार्‍या उड्या, आकाशातून मनाचा ठाव घेत फिरणारा कॅमेरा, स्लो मोशनमध्ये केलेले गाण्यांचे अप्रतिम चित्रीकरण आणि अश्या कैक द्रुश्यांत हा चित्रपट थिएटरलाच बघायला आल्याचा निर्णय सार्थ वाटतो.

४) चित्रपटातील झिंगाट गाणी नाचायला लावतात तर पार्श्वसंगीत डोलायला लावते. येड लागलं गाणे तर अक्षरशा याड लावते. सैराटची गाणी चांगली आहेत यात प्रश्नच नाही. पण चित्रपट बघितल्यावर त्यातील भावना आणखी आत आत उतरत जातात. आता पुढचे काही दिवस तरी सतत रीपीट मोडवर लागणार्‍या येड लागलंची झिंग उतरणे कठीणच.

५) कुठेही मोठाले फिल्मी डायलॉग नाहीत. कुठल्या आणाभाका नाही. आपलेच प्रेम अमरप्रेम आहे असे दाखवायचा अट्टाहास नाही. बस्स आपण शाळा कॉलेजात असताना जसे प्रेम करतो, त्या प्रेमात जे घडते, तेच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे. चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करायचा प्रकार धमाल जमला आहे. मला सर्वात जास्त आवडलेला आणि स्वताशीच हसायला लावणारा प्रसंग म्हणजे जेव्हा आर्ची वर्गात बसल्याबसल्या परश्याकडे एकटक बघतच राहते आणि त्याची जी काही अवस्था होते..... बस्स आपले दिवस आठवतात!

६) दोघांनी अभिनय छान केला आहे. किंवा त्यांच्याकडून करवून घेतला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संवाद फार सहज आलेले आहेत. पण त्यातही आर्ची किंचित जास्त भाव खाऊन जाते. तिचा रांगडा स्वभाव तिच्या प्रेमातही उतरला आहे.
एका हॉटेलातील प्रसंगात पलीकडच्या टेबलावर बसलेला एक फुटकळ रोमिओ जेव्हा आर्चीकडे अधाश्यासारखा टक लावून बघत असतो, तेव्हा तिने त्याला जी प्रतिक्रिया दिली आहे ते बघून खुदकन हसायला येते. हे असले काही आर्चीच करू शकते असे आपल्याला वाटावे ईतके तिची व्यक्तीरेखा आपल्या डोक्यात भिनते.

७) दोघांची चित्रपटातील वये आणि त्यांचे त्या वयाचेच दिसणे हा या पिक्चरचा प्लस पॉईंट आहे. प्रेम करायची अक्कल नेमकी कोणत्या वयात येते याची कल्पना नाही पण ‘प्रेमासाठी कायपण’ ही भावना अठरा-एकोणीस वर्षाच्या मुलांमध्ये जितकी प्रबळ असते तशी ती मोठ्यांना झेपत नाही.

८) जातीयवाद प्रत्येकालाच कळतो. कोणाला एडमिशन फॉर्मवर कळतो, कोणाला नोकरीच्या अर्जावर कळतो. कोणाला प्रेमात पडल्यावर कळतो, कोणाला लग्नाच्या बाजारात उतरल्यावर कळतो. तर काहींना योग्य वेळ येता घरातूनच बाळकडू दिले जातात. हा जातीयवाद दैनंदिन जीवनाचा भाग असलेले कित्येक जीव आपल्या आसपास वावरत आहेत हे देखील आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून का होईना माहीत आहेच. त्यामुळे निव्वळ तो जाणून घेण्यास म्हणून सैराट बघायला जाऊ नका. बस्स मनाची पाटी कोरी करा आणि सैराट बघायला जा.

९) कारण हा चित्रपट आपल्याला स्वप्नासारखा दचकवतो. जसे स्वप्नात जे काही दिसते ते सारे खरेच आहे असे वाटते, तसेच या चित्रपटातील ओळखीच्या वाटणार्‍या भावविश्वात आपण रमतो. आणि मग स्वप्नातल्या सारखाच एक धक्का बसतो. तो देखील खरा खुरा वाटतो. स्वप्नातून जागे झाल्यावर ‘अरे हे स्वप्नच होते’ असे आपण म्हणतो तसेच लाईट लागल्यावर हायसे वाटते. हा पिक्चरच होता हे आपल्यालाच समजावतो. हे आपल्याशी घडणार नाही, आपल्या आसपास असले काही घडत नाही.. हा विचार तेवढा रेंगाळत राहतो.

१०) हा पिक्चर हसवतो, खिदळवतो, गुदगुल्या करतो, पार्श्वसंगीताच्या तालावर डोलायला लावतो, आता पुढे काय ची उत्कंठा ताणून धरतो.. पण कुठेही टेंशन देत नाही, कुठेही रडवत नाही... शेवटाला एक धक्का तेवढा देतो. पण रडवत नाही. बस्स घरी आपल्या सोबत न्यायला एक किडा डोक्यात देतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच ‘सैराट’ बघा.

- समाप्त

कोणाला ११) वे कारण भेटले तर प्रतिसादात जोडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या मुली दिसायला सुंदर असतात त्यांच्या मागे लागूच नये. त्यांच्या मागे लागणार्‍यांच्यी संख्या इतकी असते हे त्यांनाही माहिती असते आणि मग मुलांना कसे टाळायचे आणि कसा भाव खायचा हे सर्व अशा सुंदर मुलींना बर्‍यापैकी ठावूक झालेले असते. त्यांच्या आधीच प्रियकर असू शकतो. त्यापेक्षा सर्वसाधारण बर्‍या दिसणार्‍या मुली लवकर मैत्री करतात.. चान्सेस जास्त असतात.

त्यापेक्षा सर्वसाधारण बर्‍या दिसणार्‍या मुली लवकर मैत्री करतात.. चान्सेस जास्त असतात.
>>>>
थोडेसे करेक्शन बी,
फार खाली जाण्याऐवजी ग्रूपमधील दुसर्‍या क्रमांकाच्या मुलीमागे लागायचे. कारण ती नेहमी पहिलीमुळे झाकोळली जातेय असे सतत तिच्या डोक्यात चालू असते. त्यामुळे पहिलीला इग्नोर करत तुम्ही तिच्याकडे पाहिले तर ती ज्यादा खुश होते आणि तिला तुमचे प्रेमही सच्चे वाटते.
तसेच जर आपण आपल्या ग्रूपमधील नंबर वन एलिजिबल बॅचलर असू तर चान्सेस जास्त वाढतात, आणि हे जमवून आणायला आपल्या बरोबरच्या पोरांचा ग्रूपही तसाच जमवायचा ..
कधी कधी यात एक धमाल अशी होते की पहिलीला हे बघवत नाही आणि तीच आपल्या मागे लागते Happy

बा ऋन्मेषा,
'स्वतःच स्वतःचा धागा भरकटू नये या साठी काय करावे ' असा वेगळा धागा काढतोस काय आता !
'सैराट' या विषयावरच पुरेपूर चर्चा झाल्याने आता या विषयावरचे सगळेच धागे कुठेहीहीहीही झिंगाटून निघालेत.

he asaM kaahItarI tejaab chitrapaTaata daakhavalaM hotaM.

100 झाले. वेरी गूड. आता बॅक टू सैराट
आज संध्याकाळी नेहमीसारखी मंडे मॉल भटकंती करायला गेलेलो. साधारण सव्वा तासाची विंडो आणि किरकोळ शॉपिंग. पैकी पन्नास मिनिटे तिथे केवळ सैराट झिंगाट येड लागलं चालू होतं. विशेष म्हणजे मॉलमधील मराठी गिर्हाईकांचा टक्का वीसच्या आतच असेल. याआधी हिंदी ईंग्रजी वगळता कुठलेही प्रादेशिक संगीत तिथे लावलेले ऐकण्यात नाही. पण आज मराठी संगीताने हा मान पटकावला. आता याला जर कारनामा मानायला तयार झालात तर हा अजय अतुलच करू शकतात. या संगीताचा फील सिनेमासोबत थिएटरमध्येच घेण्यात मजा !

अशी जाहीरात कशी आली? कायद्याने मद्यांच्या जाहीरातींवरची बंदी उठवली आहे का आता?

वेगळाच दिसायला लागला
आधी गोंडस आणि आनंदी दिसायचा.आता थोडा दुःखी आणि गोंधळलेला वाटतोय.हा लॉकडाऊन इफेक्ट का?
यांच्याकडे बॉडी आहे, पोटेनशीयल आहे.थोडी भाषा सुधारून हिंदी मध्ये पण चांगली कामं मिळू शकतात.

मानव यांनी विचारलं, तेच मनात आलं.

आकाश केवढा मस्त दिसायचा, इथे नाही आवडला. त्याचे डोळे पण कित्ती बोलके आहेत खरंतर, तेही ह्यात जाणवत नाहीये.

मुख्य म्हणजे थोडाटेन्स आणि अवघडलेला वाटतोय
कदाचित जाहिरातीची काही स्ट्रॅटेजी त्याने तसं दिसावं असली तर माहिती नाही.

दारूच्या जाहीरातील बंदी आहे
हि सरकारी जाहीरात असेल
दारूच्या दुष्परीणामांची.
म्हणून तो असा दिसतोय वेगळा वेगळा

दुष्परिणाम दाखवायचे असतील तर दारू पिऊन गटारात पडलेला माणूस दाखवा. असा सुटाबुटातला माणूस बघितल्यावर लोक्स अजून घेतील.

आकाश चा सूट कमी फिटिंग चा वाटतोय. तसेच खूप प्लेन प्लेन आणि त्यात काळे असल्याने उगीच उदास छटा आलीय.
आतला ब्लॅक टी व्ही कट पण चालला असता. जरा बॉडी फिट पण हवा होता.कपडे आणि हेअरकट चुकल्याने असं काहीतरी वाटतंय.
तो अजून एका सेट वेट झटॅक च्या जाहीरातीत पाहिला. त्यात छान दिसतोय.

Happy आकाश ला एकंदर आत प्लेन टिशर्ट आणि मरुन चेक्स चा ब्राईट उत्साही रंगाचा ओव्हर शर्ट चांगला दिसतो असे वाटते.
सूट असल्यास जरा नीट फिटिंग हवे. हा शेजारच्या मोठ्या दादाचा एक दिवस मागून आणल्या सारखा वाटतोय.

"Mark of purity" सिद्ध करण्यासाठी असे डोळे दाखवणे त्यांना आवश्यक वाटले असावे.

यांच्याकडे बॉडी आहे, पोटेनशीयल आहे.थोडी भाषा सुधारून हिंदी मध्ये पण चांगली कामं मिळू शकतात. >>>. Lust stories मध्ये राधिका आपटेबरोबर होता, पण भाषेत मार खातो आहे. हिंदी पण सैराट च्या accent मध्ये बोलतो

Pages