आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..
पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.
१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.
२) ‘सैराट-एक लव्हस्टोरी’ शाहरूख, चोप्रा आणि करण जोहार मंडळींच्या तोंडात मारावी अशी जमलीय. प्रेम म्हणजे काही तरी लार्जर दॅन लाईफ भावना आहे अश्या आविर्भावात बनवलेल्या बॉलीवूडी चित्रपटांनी आपले गंडवलेले कन्सेप्ट क्लीअर करत ईतक्या सहजसुंदर आणि नैसर्गिकपणे यात सारे काही घडते की चित्रपटाच्या पहिल्या भागात असंख्य गुदगुल्या मनाला सतत होतच राहतात. या अवस्थेतून मध्यंतरापर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही.
३) डोळ्यांची पारणे फिटावीत अशी द्रुश्ये एका मराठी चित्रपटात बघायला मिळतात आणि ती देखील आपल्याच मातीतील, गावखेड्यांतील, शेतातील दिसतात. मराठी चित्रपट गेल्या काही काळात तांत्रिकदृष्ट्या झेप घेऊ लागलेत असे म्हटले, तर ही भरारी आहे. हिंदीच्या तोडीस तोडच नाही तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. ते देखील मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये हे विशेष. हिंदी ब्लॉकबस्टरचे बजेट दिले तर हा माणूस पडद्याला आग लावेल.
३) तांत्रिक बाबींतले एक प्रेक्षक म्हणून जेवढे कळायला हवे तेवढेच मला समजते. पण ते पक्ष्यांचे थवे, शेतातील वाटा, खोल विहीरीतल्या पाण्यात ढुबुक आवाज होत पडणार्या उड्या, आकाशातून मनाचा ठाव घेत फिरणारा कॅमेरा, स्लो मोशनमध्ये केलेले गाण्यांचे अप्रतिम चित्रीकरण आणि अश्या कैक द्रुश्यांत हा चित्रपट थिएटरलाच बघायला आल्याचा निर्णय सार्थ वाटतो.
४) चित्रपटातील झिंगाट गाणी नाचायला लावतात तर पार्श्वसंगीत डोलायला लावते. येड लागलं गाणे तर अक्षरशा याड लावते. सैराटची गाणी चांगली आहेत यात प्रश्नच नाही. पण चित्रपट बघितल्यावर त्यातील भावना आणखी आत आत उतरत जातात. आता पुढचे काही दिवस तरी सतत रीपीट मोडवर लागणार्या येड लागलंची झिंग उतरणे कठीणच.
५) कुठेही मोठाले फिल्मी डायलॉग नाहीत. कुठल्या आणाभाका नाही. आपलेच प्रेम अमरप्रेम आहे असे दाखवायचा अट्टाहास नाही. बस्स आपण शाळा कॉलेजात असताना जसे प्रेम करतो, त्या प्रेमात जे घडते, तेच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे. चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करायचा प्रकार धमाल जमला आहे. मला सर्वात जास्त आवडलेला आणि स्वताशीच हसायला लावणारा प्रसंग म्हणजे जेव्हा आर्ची वर्गात बसल्याबसल्या परश्याकडे एकटक बघतच राहते आणि त्याची जी काही अवस्था होते..... बस्स आपले दिवस आठवतात!
६) दोघांनी अभिनय छान केला आहे. किंवा त्यांच्याकडून करवून घेतला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संवाद फार सहज आलेले आहेत. पण त्यातही आर्ची किंचित जास्त भाव खाऊन जाते. तिचा रांगडा स्वभाव तिच्या प्रेमातही उतरला आहे.
एका हॉटेलातील प्रसंगात पलीकडच्या टेबलावर बसलेला एक फुटकळ रोमिओ जेव्हा आर्चीकडे अधाश्यासारखा टक लावून बघत असतो, तेव्हा तिने त्याला जी प्रतिक्रिया दिली आहे ते बघून खुदकन हसायला येते. हे असले काही आर्चीच करू शकते असे आपल्याला वाटावे ईतके तिची व्यक्तीरेखा आपल्या डोक्यात भिनते.
७) दोघांची चित्रपटातील वये आणि त्यांचे त्या वयाचेच दिसणे हा या पिक्चरचा प्लस पॉईंट आहे. प्रेम करायची अक्कल नेमकी कोणत्या वयात येते याची कल्पना नाही पण ‘प्रेमासाठी कायपण’ ही भावना अठरा-एकोणीस वर्षाच्या मुलांमध्ये जितकी प्रबळ असते तशी ती मोठ्यांना झेपत नाही.
८) जातीयवाद प्रत्येकालाच कळतो. कोणाला एडमिशन फॉर्मवर कळतो, कोणाला नोकरीच्या अर्जावर कळतो. कोणाला प्रेमात पडल्यावर कळतो, कोणाला लग्नाच्या बाजारात उतरल्यावर कळतो. तर काहींना योग्य वेळ येता घरातूनच बाळकडू दिले जातात. हा जातीयवाद दैनंदिन जीवनाचा भाग असलेले कित्येक जीव आपल्या आसपास वावरत आहेत हे देखील आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून का होईना माहीत आहेच. त्यामुळे निव्वळ तो जाणून घेण्यास म्हणून सैराट बघायला जाऊ नका. बस्स मनाची पाटी कोरी करा आणि सैराट बघायला जा.
९) कारण हा चित्रपट आपल्याला स्वप्नासारखा दचकवतो. जसे स्वप्नात जे काही दिसते ते सारे खरेच आहे असे वाटते, तसेच या चित्रपटातील ओळखीच्या वाटणार्या भावविश्वात आपण रमतो. आणि मग स्वप्नातल्या सारखाच एक धक्का बसतो. तो देखील खरा खुरा वाटतो. स्वप्नातून जागे झाल्यावर ‘अरे हे स्वप्नच होते’ असे आपण म्हणतो तसेच लाईट लागल्यावर हायसे वाटते. हा पिक्चरच होता हे आपल्यालाच समजावतो. हे आपल्याशी घडणार नाही, आपल्या आसपास असले काही घडत नाही.. हा विचार तेवढा रेंगाळत राहतो.
१०) हा पिक्चर हसवतो, खिदळवतो, गुदगुल्या करतो, पार्श्वसंगीताच्या तालावर डोलायला लावतो, आता पुढे काय ची उत्कंठा ताणून धरतो.. पण कुठेही टेंशन देत नाही, कुठेही रडवत नाही... शेवटाला एक धक्का तेवढा देतो. पण रडवत नाही. बस्स घरी आपल्या सोबत न्यायला एक किडा डोक्यात देतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच ‘सैराट’ बघा.
- समाप्त
कोणाला ११) वे कारण भेटले तर प्रतिसादात जोडा.
<<ऑस्कर लेवलची कलाकृती
<<ऑस्कर लेवलची कलाकृती अनुभवायची असल्यास सैराट पहावा>>
----- ऑस्कर लेवल बरोबर का तुलना करायची ? त्या पेक्षाही सुन्दर कलाकृती असण्याची शक्यता आहे...
माझ्यासाठी कलाकृती मुळातच चान्गली आहे, तिला ऑस्करचा आधार नको...
नागराज मंजुळेंचा आज यूट्यूबवर
नागराज मंजुळेंचा आज यूट्यूबवर एक ईंटरव्यू पाहिला.. किती साधा सरळ डाऊन टू अर्थ माणूस आहे हा.. हा एवढा पॉलिश चित्रपट याचा आहे असे कोणी सांगितले असते तर आधी विश्वास बसला नसता..
11 वे कारण नागराज मंजुळे नावाचा ब्रिलियंट डायरेक्टर ..
मुख्य प्रवाहातील व्यावसायिक सिनेमे आणि त्याला समांतर जाणारे सिनेमे यांच्यामध्ये मंजुळेनी जो पूल बांधला आहे त्यावर राईड घेण्याच्या अनुभवासाठी तरी सैराट बघाच.
चिठ्ठी चा प्रसंग मजेशीर आहे
चिठ्ठी चा प्रसंग मजेशीर आहे ...
..
..
ऋन्मेऽऽष छान लिह्ले अहे ...
सैराट ज्ब्राट आहे , नक्की
सैराट ज्ब्राट आहे , नक्की बघाच .
ऋन्मेऽऽष खूप सुंदर लिहितोस
ऋन्मेऽऽष खूप सुंदर लिहितोस तू. अगदी सर्व पटले.
सैराट का बघावा? २ कारणांसाठी. पहिले कारण की - सतत आदळणार्या बाताम्याच्या प्रवाहात बधिर झालेल्या मनाला गद्गदुन हलवायाचे असेल, विसरलेले प्रेम आठवायचे असेल तर जरूर बघावा.
मी सैराट बघितला आणि मनाचा हलकल्लोळ झाला. हृदयाच्या कोपर्यात दडवून, मुद्दाम विसरायला ठेवलेल्या आठवणी, ज्याला गरजेचे कुलुप लावले होते ते सहज गळून पडले. २० वर्षापूर्वीचे वडीलधार्यांच्या मर्जी राखायला तोडलेले प्रेम लख्ख तसेच्या तसे आठवले.
मन सैरभैर झाल. काही सुचेना. डोक्यात विचारांचा हलकल्लोळ माजला. जर २० वर्षापूर्वी आर्ची एवढी maturity असती तर आज आयुष्य वेगळे असते. एखाद्या धूळ खात पडलेल्या खोलीत दोन तपानंतर कोणीतरी जोरात पाच वर फॅन लावला तर काय होईल तेच झालय. सर्व धूळ उडाल्ये आणि आता ती धूळ राहत्या घरात सैरभैर पसरत्ये. आणि मी सुन्न आहे. चकचकीत पुसलेल्या furniture वरची ती अदृश्य धूळ खूप मनात खुपते आहे.
मनाची ही कोंडी ५ दिवस टिकली. आणि अचानक ढगफूटी व्हावी तशा डोळ्यांच्या कडा ओलावल्या, डोळ्यातून आसवांचा पाउस धो धो व्हायला लागला तो पार दादर ते मुलुंड च्या ट्रॅफिक ला न जुमानता बरसत होता. मला त्या आसवना अडवायाचे न्हवते. गाडीच्या बंद काचांच्या पाठी ते अश्रू सुरक्षित होते. लाल डोळ्याना, गरम कानशीलाना बघून घरी विचारले तर धुळीच्या चा allergy बहाणा पुरे होता. पराशा ही रडला की……. धाय मोकलून रडला.
नॉर्मल झाले आता. घरचे कुलुप उघडून आत आले आणि मनाच्या त्या खोलीला परत कुलुप घालून टाकले.
सैराट बघायचे दुसरे कारण खूप खोल आहे. एका पोक्त स्त्रीच्या नजरेतून दिसलेले. आर्ची चे जगण, वावरण, तिचे संवाद खूप खोलवर बोलून गेले. आपल्या पारंपरिक रूढी, स्त्रियाच्या अपेक्षा आणि मुळमुळीत वागणे ह्यावर खूप लिहायचाय. जे दिसले ते एका मुलीला, प्रेयसीला, बायकोला, जग फिरलेल्या अनुभवी डोळ्याना, व्यावसायिक जगात अनेक वर्ष काम केलेल्या स्त्रीला आणि एका आईला. बरीच वर्ष देशाबाहेर वास्तव्य करून बोथट झालेल्या मराठीत व्यक्त होत नाहीये आणि English मधून भावना जगता येत नाहीत. प्रयत्न करेन १-२ दिवसात.....
मोसा, सुरेख आणि प्रामाणिक
मोसा, सुरेख आणि प्रामाणिक पोस्ट !
well penned
well penned runmesh....absolutely agree with first 8 point...!!!!
हा एवढा पॉलिश चित्रपट याचा
हा एवढा पॉलिश चित्रपट याचा आहे असे कोणी सांगितले असते तर आधी विश्वास बसला नसता.. >> पोलिश नाही मराठीच आहे सिनेमा.
मिपावर पण सैराटबद्दल अनेक लेख आलेले आहेत.
मिपावर ना, अभ्यादादाने सगळी
मिपावर ना, अभ्यादादाने सगळी गोष्टच सांगितलीय. पण मस्त लिहिलंय. बिरूटेकाकांनी पकवलंय.
छान लिहीलंय!
सांजसंध्याने
काल रात्री महाराष्ट्र १
काल रात्री महाराष्ट्र १ नावाचे चॅनेल पहिल्यांदाच पाहिले.
त्यात एक निखिल वागळे म्हणून नागनाथ मंजुळेंची मुल॑खत घेत होते.
सैराट प्रदर्शित व्हायच्या आधीची मुलाखत परत दाखवित होते.
त्यात वागळेंनी मंजुळेंना विचारले सैराट का पहावा याची कारणे सांगा.
तर मंजुळे म्हणाले - 'पहिलं कारण म्हणजे फँड्रीच्यावेळी यात गाणी नाहीत असे लोक बोलले होते तर यात मी पाच गाणी (तुमच्याभाषेत असेही म्हणाले) टाकलीत.
दुसरं म्हणजे गोष्ट नेहमीचीच आहे पण मी दिलेली ट्रीटमेंट बघा.
दुसर्या फँड्रीची अपेक्षा माझ्याकडून ठेऊ नका. फारकाय, माझ्याकडून मी असेच करावे, ताएच करावे अशी अपेक्षा ठेऊ नका. मात्र मी जे करेन ते माझं स्वतःचं, सर्वोत्कृष्ट करायचा प्रयत्न करून केलेलं , वास्तवाशी जास्तीत जास्त इमान राखणारं (या आधीच्या एका प्रश्नाला कला ही वास्तवाशी पूर्ण इमान राखून नसते, काहीतरी वेगळं असतं वास्तवापेक्षा म्हणून ती कला असे म्हणाले होते)
असणार हे नक्की.
हा सिनेमा फँड्रीपेक्षा गाजणार आणि लोकांना खूप आवडणार हे ही नक्की असे त्यांनी प्रेडीक्ट केले होते.
तरिही मला वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात, लोकांच्या अपेक्षेनुसार मी काम करणार नाही हे ही त्यांनी ठणकावून सांगितले.
बघितला आज नेटवर सगळ्यांचा
बघितला आज नेटवर
सगळ्यांचा अभिनय छान आहे विषेशता आर्चिचा.
सैराट मधुन काय संदेश घ्यावा कळाले नाही हे असे सत्यात घडते हे वाचले आहे.
मनोरंजन म्हणुन ठिक आहे.
सामजिक बदलाची अपेक्षा किंवा मुले बिघडण्याची शक्यता वाटत नाही.
सैराट मी बघितला नाही त्याचे
सैराट मी बघितला नाही त्याचे कारण -
गेल्या काही वर्षांपासून दर काहीएक मराठी चित्रपटांमागे एखादा तरी चित्रपट फार गाजावाजा करत येतो. त्याच्याविषयी सगळीकडे कसं छान छान छापून येत जातं. वर्तमानपत्रांमध्ये (विशेषतः - महाराष्ट्र टाईम्स मध्ये) सोशल मीडियावर, टीव्ही चॅनेल्सवर. अनेकदा तर असंही वाटायला लागतं की हा चित्रपट पाहणं हे जणू काही राष्ट्रीय कर्तव्य आहे किंवा मतदानाप्रमाणेच नैतिकदृष्ट्या सक्तीचं आहे. प्रतिव्यक्ती अडीचशे-तीनशेचं तिकीट, जाण्यायेण्याकरिता पेट्रोल + पार्किंग, थेटरात महागडे समोसे आणि पॉपकॉर्न + बाटलीबंद पाणी हा सगळा खर्च मिळून हजार बाराशेची खिशाला चाट बसली तरी फारसं समाधान मिळत नाही असंही अनेकदा झालंय. देऊळ, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य, हापूस, जयहिंद, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, सरीवर सरी, पिपाणी, फक्त लढ म्हणा हे आणि असे अनेक चित्रपट पाहताना पैसे खर्चूनही अपेक्षित आनंद न मिळाल्याने फसवणूक झाल्याची भावना मनात निर्माण झाली.
गेल्या कित्येक वर्षांत बर्यापैकी समाधान देणारा एक चित्रपट म्हणजे श्वास. पण त्यातही अमृता सुभाषचं पात्र आक्रस्ताळं, अनाठायी आणि अनावश्यक वाटलं. ते वजा करता चित्रपट छान वाटला. त्याचा यूएसपी म्हणजे त्याचा शेवट. आजोबा नातवाला ऑपरेशनच्या दिवशीच घेऊन हॉस्पिटलमधून निघून जातात. त्याला आंधळा होण्याआधी जितकं दाखवता येईल तेवढं दाखवतात. शेवटी अंध मुलांच्या शाळेत घेऊन जातात तेव्हा तिथली मुले नायकाला स्पर्श करतात तो सीन तर अगदीच अप्रतिम. पण पुन्हा प्रश्न असा पडला की, डोळ्यांतून हमखास पाणी काढणारा सीन टाकून यश मिळवायचं असेल तर माहेरची साडी तरी काय वाईट आहे? कुठल्याही मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी निघणारच असा शेवट आणि इतर अनेक सीन (जवळपास चित्रपटाचा बहुतांश हिस्सा) माहेरच्या साडीत खच्चून भरले आहेत.
पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि शंभर टक्के चित्रपट पाहिल्याचा आनंद आणि समाधान देणारा चित्रपट पाहिला तो म्हणजे अश्विनि भावे निर्मीत - कदाचित. निळू फुले यांच्या अभिनयाने नटलेला हा शेवटचा चित्रपट. भावनिक नाट्य (मेलोड्रामा) न करता म्हणजेच काळजाला हात न घालता मेंदूला खाद्य पुरविणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी सचिन खेडेकरने रंगविलेले पात्र आयुष्यभर स्वतःच्या मनात कुठलं रहस्य जपण्याचं ओझं बाळगून जगणार आहे हे कळल्यावर मनावर येणारा ताण प्रेक्षकाला अस्वस्थ करून सोडतो.
त्याचप्रमाणे ध्यासपर्व हादेखील एक परिपूर्ण आनंद देणारा चित्रपट होता. अर्थात हा एक वास्तविक चरित्रपट असल्यामुळे लेखकाचं काम सोपं होतं.
तसेच एक डाव धोबीपछाड, रेगे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आजचा दिवस माझा हे चित्रपट देखील काही प्रमाणात आनंद देऊन गेलेत. पण ते हुकूमी यश देणार्या विषयांवर बेतलेले असल्याने ते बघितले तर चांगलंच पण नाही बघितलेत तरी काही नुकसान नाही या कॅटेगरीतले होते.
थोडक्यात गाजावाजा केलेल्या मराठी चित्रपटांपैकी आनंद देणारे कमी आणि डोक्याला शीण आणणारेच संख्येने अधिक होते असा स्वानुभव आहे.
सैराट हा कदाचित आणि ध्यासपर्व प्रमाणेच १०० टक्के उत्तम किंवा श्वासप्रमाणे बर्यापैकी चांगला असूही शकेल पण तो जर फक्त लढ म्हणा किंवा पिपाणी सारखा बंडल चित्रपट निघाला तर अजून एक नुकसान पचवायची माझी तयारी नाही.
हे फक्त मी सैराट का बघणार नाही त्याचं अगदी वैयक्तिक असं कारण आहे. माझा चित्रपटाला अजिबात विरोध नाही किंवा इतरांनाही तो बघू नका असा सल्ला देण्याचा इरादा नाही.
सबब, या प्रतिसादावर कुठलाही वैयक्तिक स्वरूपाचा हल्ला अपेक्षित नाहीये याची कृपयाच नोंद घ्यावी ही विनंती.
सहकार्याकरिता आगाऊ आभार, धन्यवाद, इत्यादी.
बिपीनचंद्र, माझीही सेम अशीच
बिपीनचंद्र,
माझीही सेम अशीच स्टाईल आहे.
एखाद्या बंडल चित्रपटामागे पैसे फुकट जाण्यापेक्षाही वेळ फुकट गेल्याचे मला जास्त दुख होते कारण पैसे कमावता येतात वेळ भरून नाही निघत.
म्हणून अश्यावेळी मी सुद्धा कुठल्याही (अगदी शाहरूखच्याही) चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शो जायचे टाळून आधी ईतरांना आवडतोय का आणि का आवडतोय हे बघतो.. त्यानुसारच निर्णय घेतो. थिएटरला बघायचा, की घरी बघायचा की बघायचाच नाही. हा पिक्चर थिएटरला बघायचा निर्णय घेतला आणि सार्थ ठरला
सिनेमा न पाहताच त्याबद्दल मत
सिनेमा न पाहताच त्याबद्दल मत बनवता येऊ शकणा-यांबद्दल अतीव आदर आहे.
साती धन्यवाद, कुठले लेख वाचावेत हे कळवल्याबद्दल. यातले जे चांगले म्हणून सांगितले आही त्यातली गाड्यांचा रिव्ह्यू नॉन इंजिनियरिंग फिल्ड मधल्या लोकांनी केला तरी इंजिनियरिंग फिल्ड मधले लोक त्याबद्दल तुच्छतादर्शक प्रतिसाद देत नाहीत हे पटले. कदाचित आपल्या फिल्डचा नसूनही एव्हढी माहिती ठेवली हेच विशेष असे वाटत असावे. खरं तर आपण ज्या फिल्ड मधे आहोत त्या फिल्डचं १००% ज्ञान आपल्याला आहे असा दावा कुणीही करत नाही.
त्यामुळेच सैराट सारख्या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाबद्दल सर्व थरातून आलेल्या प्रतिक्रियांचं स्वागत करायला हवं. सिनेक्षेत्रातले जाणकार तर अशा प्रतिक्रिया मुद्दामून वाचताना दिसताहेत.
संगीतकार अजय अतुल बद्दल काय बोलायचं ?
टिंग्याचा संगीतकार रोहीत नागभिडेमुळे एकदा अजयला भेटता आलं. ते भेटणं म्हणजे रोहीत आणि अजय बोलणार आम्ही फक्त आपली शरीरं घेऊन तिथे आपले उपस्थित होतो. तेव्हां आवडलाच होता अजय. आमच्या एका वर्कशॉपला उपस्थित रहावं आणि एका व्हिडीओत त्याने एक गाणं गावं अशी गळ घालायची होती. पण मानधन कमी करूनसुद्धा ते काही जमलं नाही. शेवटी बिझी कलाकार आहेत.
आज दोन तीन व्हॉटसप ग्रूपवर एक
आज दोन तीन व्हॉटसप ग्रूपवर एक गंडलेला मेसेज वाचला, जसाच्या तसा देतोय.
>>>>>>>
सैराट - जसा दिसतो तसा नाही
कृपया चुकीचा बोध घेऊ नका !
पहिली बाजू प्रेमाचा अवखळपणा , मौजमजा भले दाखवून गेली पण प्रेमाने पोट भरत नाही , त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते जी आर्ची ने बरोबर आणलेल्या पैशापेक्षा कितीतरी मोठी होती . हे पाहणं गरजेचं आहे, बुलेट चालवणारी आर्चीची नंतरची अवस्था ही अविचाराने केलेल्या प्रेमाचंच फळ होतं, नंतर जरी ती स्थिर झाली तरी दोघांच्या कुटुंबाचे झालेले हाल हा त्यांच्या प्रेमाचाच दोष होता, राजकीय वर्तुळात वावरणा-या तिच्या वडीलांना पदोपदी मानहानी पत्करावी लागली आणि अतिशय गरीब, परश्याच्या कुटुंबाची तर वाताहात झाली, यासाठीच प्रेम करायचे असते का ?
आपल्यासाठी काबाडकष्ट करणा-या, आपल्याकडून अनेक अपेक्षा ठेऊन सुखी आयुष्याची स्वप्न बघणा-या परशाच्या आईवडीलांचं कुठे चुकलं ??
प्रेमासाठी जीव देण्यात शहाणपण नाही तर ज्या आईवडीलांनी आपल्या जन्मापासून आपल्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी जगावं आणि त्यांनाही सन्मानानं जगवावं ... हे सांगतो हा सैराट चित्रपट !
>>>>>>>
लोकं काय अर्थ काढतील कमाल आहे. ज्याने कोणी हा मूळ मेसेज बनवला त्याला आणि त्याच्या हेतूला ओळखत नसल्याने माफ करू पण व्हॉटस्सपवर बागडणारे सुशिक्षित लोकंही फॉर्वर्डही करतात हे कमाल आहे. चित्रपट असो वा वास्तव, कुटुंबाची वाताहत प्रेमामुळे नाही तर समाजात ठासून भरलेल्या जातीयवादामुळे होते, सडलेल्या जातीय राजकारणामुळे होते एवढेही समजू नये..
पण या मेसेजवरून एक मात्र समजते की आपला बहुतांश समाज आहे तसे राहण्यातच धन्यता मानतो.
ऋन्मेष, तुला या धाग्याचं नाव
ऋन्मेष, तुला या धाग्याचं नाव बदलायची विनंती केली पण एकदम मजेशीर घरचा आहेर मिळाला.

'सैराट झालं जी..' गाणं विंक म्युझिकवर ऑनलाईन ऐकत होते तर आमची सई (वय वर्षे पावणेचार) येऊन मला म्हणाली 'आई, तू माझं गाणं लावलंयस ना? माझं नाव आहे यात!'
तुमची पावणेचार वर्षांची सई
तुमची पावणेचार वर्षांची सई तशी त्याची पावणेचाळीस वर्षांची सई. तिची आठवण राहावी म्हणून तर त्याने बिचार्याने धाग्याला सईराट नाव दिले होते पण तुम्ही बदलायला लावले.
पावणेचाळीस!
पावणेचाळीस!

साती खरे तर शीर्षक ठेवताना
साती
खरे तर शीर्षक ठेवताना ते माझ्या डोक्यातही नव्हते आणि प्रतिसादातून समजेपर्यंत लक्षातही आले नव्हते. आले तेव्हा कपाळावर हात मारला कारण ते बदलावेच लागणार याची कल्पना आली.
अवांतर - पावणेचाळीस = ३० ?
{{ अवांतर - पावणेचाळीस = ३० ?
{{ अवांतर - पावणेचाळीस = ३० ? }}
इतकं कच्चं गणित कसं काय बुवा?
साडे अठ्ठावीस रुपये म्हणजे जर २८ रुपये ५० पैसे होतात तर मग पावणे चाळीस वर्षे म्हणजे ३९ (एकोणचाळीस) वर्षे आणि ९ (नऊ) महिने होतील नाही का?
ऋन्मेष ते जे काही आलेलं आहे
ऋन्मेष
ते जे काही आलेलं आहे ते तुला वेगळं कुणीतरी समजतंय. फक्त एन्जॉय कर. तुला बसमधे पाहीलेलं आहे ना, त्यामुळे माझा गोंधळ नाही होत. आख्ख्या प्रवासात एकही शब्द बोलला नव्हतास कुणाशीही.
कापोचे बस? मी ११ नंबरची बसच
कापोचे बस?
मी ११ नंबरची बसच वापरतो.
बाकी मी शेवटचा बस प्रवास केव्हा केला माझे मलाच आठवत नाही. माझा रोजचा प्रवास ट्रेनचा असतो. किरकोळ प्रवास टॅक्सी किंवा रिक्षाने होते. लांब पल्ल्याचा प्रवास बसमध्ये गरगरते म्हणून बस टाळतो किंवा प्रवासच टाळतो.
त्यामुळे कधी बसप्रवास केला तर त्याचे फेसबूक स्टेटस टाकेन कंडक्टरबरोबर काढलेल्या सेल्फीसकट एवढे मला त्याचे अप्रूप आहे.
पण तरी असो, विषयांतर नको म्हणून थांबतो : - )
लोल! ऋन्मेष यू मेड माय डे विथ
लोल!
ऋन्मेष यू मेड माय डे विथ धिस लास्ट पोस्ट
सिनेमा न पाहताच त्याबद्दल मत बनवता येऊ शकणा-यांबद्दल अतीव आदर आहे.
>>
+११११११११
चित्रपट असो वा वास्तव,
चित्रपट असो वा वास्तव, कुटुंबाची वाताहत प्रेमामुळे नाही तर समाजात ठासून भरलेल्या जातीयवादामुळे होते, सडलेल्या जातीय राजकारणामुळे होते एवढेही समजू नये..
पण या मेसेजवरून एक मात्र समजते की आपला बहुतांश समाज आहे तसे राहण्यातच धन्यता मानतो.>>>>>>>>>+११११११
खरेतर नागराज मंजुळे ने आता पुढचा सिनेमा जाती व्यवस्था कशी निर्मान झाली ?कोणी केली का केली? यावर एक सिनेमा काढावा..
खरेतर नागराज मंजुळे ने आता
खरेतर नागराज मंजुळे ने आता पुढचा सिनेमा जाती व्यवस्था कशी निर्मान झाली ?कोणी केली का केली? यावर एक सिनेमा काढावा.. >>> तुम्ही काढा की, बघा निर्माता मिळतो का ते.
सकुरा, जपान मधे रिलीज झाला का ? तुम्ही पाहीला ना ?
११ नंबरची बस >> याला म्हणतात
११ नंबरची बस >> याला म्हणतात वेड घेऊन तुमच्या पेडगावला जाणे. तुमचा सेल्फी टाकू काय आता ? (नाही टाकत, पण कुठली बस ते आत्ता बरोब्बर कळाले असेल, तुमचा कंडक्टर, तुमचा ड्रायव्हर, तुमचा गर्लफ्रेण्ड, तुमचा बायको, तुमचा मिल्कशेक... तुमचा हॅण्डशेक, तुमचा हरून अल शेख...... थांबू क्या अभी ?
सकुरा, जपान मधे रिलीज झाला का
सकुरा, जपान मधे रिलीज झाला का ? तुम्ही पाहीला ना ?<<<<
कपोचे मी पाहिला नेटवर online तो कोणी टाकला कसा बघायला मिळाला या टेक्निकल गोष्टी मला महित नाहित मुलिने लावुन दिला मी पाहिला.
आवडला.
पीसी वर पाहिला कि काय ?
पीसी वर पाहिला कि काय ?
पीसी वचर पाहिला पण cd
पीसी वचर पाहिला पण cd नव्हती.
मुलिला विचारुन सांगते इथे नेट स्पिड जास्त असतो you tube वरचे सिनेमे आरामत बघु शकतो.
तुमचा गर्लफ्रेंड, तुमचा
तुमचा गर्लफ्रेंड, तुमचा बायको...>>>

अरे ऋन्मेषा, काय वाचत्येय मी हे तुझ्याबद्दल!
असो. काहिही वाचलं तरी मी तुझी फॅन आहे.
Pages