संपवून टाक पेग (विडंबन)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

अलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये Happy ) नसल्याने एक खूप पूर्वी केलेलेच विडंबन थोडे सुधारून टाकत आहे..

नवी बाटली जुना माल Happy

चाल : मालवून टाक दीप

संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट
बेवड्या किती दिसांत, लागले सुरेस ओठ

ह्या इथे नसानसात, झिंगते अजून रात
हाय! तू गमावलीस एवढ्यात का विकेट?

गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’

दूर दूर ह्या पबात, बैसलो निवांत पीत
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लूट

हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट

काय हा तुझाच र्‍हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट

बेवड्या किती दिसांत लागले सुरेस ओठ

प्रकार: 

गेले चार दिवस रोज मी हे विडंबन वाचतो. रोज थक्क होतो. रोज नवी नशा चढते.

व्वा!

शरददा

खि खि .... नाविकास बोट ..... बेश्ट होता हा .... Happy
परागकण

एकदम खल्लास्...
नाविकास बोट..झकास .....

<<<गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत

हे ...गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घेत "घोट " केल तर दुसर्या ओळीच्या "नीट" सोबत पण छान जुळेल..

परत एकदा सर्वांचे आभार...
शरद तुमचे चार वेळा आभार Happy

एक्_मुलगी : सुचने बद्दल धन्यवाद पण हवेत आणि घेत जुळणे जास्त आवश्यक आहे असे वाटते म्हणून घोट घेत असेच ठेवतो..
गैरसमज नसावा...

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
      मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’

      ह्यातला "नीट" फारच आवडला. मूळ गाण्याचा गाभा चांगला कळल्याशिवाय विडंबन करता येत नाही. तुला मूळ गाणे अतिशय चांगले कळले असल्यामुळे विडंबन करताना त्याचा चांगला उपयोग करुन घेतला आहेस. मूळ गाण्यासारखे हे गाता सुद्धा येते हे म्हणजे आमच्या १९८० च्या पुणेरी मराठी लिंगो मध्ये सांगायचं तर "वाईट उच्च" आहे ... किंवा "अषक्य" आहे... Happy ( पोटफोड्या श हा अपघात नाही...तो तसाच म्हणायचा )

      तुझे हे विडंबन प्रोग्राम मध्ये एक विनोदी आयट्म म्हणून गायलं तर चालेल ना?

      अजून येउ देत असेच काहीतरी ........

      अलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये ) नसल्याने >>>>>>>>>> मिल्या : तुला "बुधवारची अत्यंत आवश्यकता आहे", असे सुचवायचे आहे काय ??????? Happy

      बाकी, विडंबन मस्तच ........ Happy

      मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’ >>>> अगदी, अगदी ......... Happy

      ~~~~~~~~~~~~~~
      शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
      प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले

      मिल्या, खूप दिवसांनी....
      पण मस्तच... नाविकाची कल्पना तर छानच..
      प्राची....

      ओहो, आजच वाचलं. विडंबनकार मिल्या इज बॅक.
      ************
      हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
      मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

      गैरसमज नसावा...<<<<<<

      नाही नाही च्....तुम्ही explain करायची तसदी घेतली हा तुमचा विनय आहे.

      मस्त झाले आहे हे विडंबन. मजा आली!

      परत एकदा सर्वांना धन्यवाद...

      प्रशांत : जरूर वापरा पण माझ्यानावासकट वापरा Happy

        -------
        स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
        स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

          वा.. क्या बात है!! मजा आली वाचताना आणि गाताना सुद्धा.. Happy

          अप्रतिम विडंबन....
          ----------------------------------------------------------------------
          ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
          अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
          रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
          धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

          मिल्या मस्तच रे! क्या बात है! काय भन्नाट लिहितोस तू!
          मजा आली

          Pages