नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझी कार घेऊन प्रिन्स्टन / एडिसन / मेट्रोपार्क ला येऊ शकेन. बस थांबे कुठे कुठे आहेत ? बुवा तोंडात विडी ठेवून बस चालवत आहेत. बस मध्ये ९० ज कुमार शानू अनुराधा पौडवाल गाणी, बसच्या एका बाजूला खांद्यावर टोवेल टाकून गोगा "चला गटग वीस डॉलर्स!" ओरडत आहेत.

गोगा, बसमध्ये चढून पटापट मागे न गेलेल्यांनां असं दटवा "ओऽ, चला की मागं पटापट. नदी वाहती की काय मागं, आँ? आन् ५० च्या नोटा घ्येनार न्हाय आधीच सांगून ठेवतो"!

शास्त्री बुवांची टेक्नो वरात, विकुंसाठी स्पेशल सिक्युरिटी वाले येतील ते , अजून काय काय सांगून ठेवू टाउनशिप वाल्यांना Happy

आमची क्वायेट सबर्बन टाउनशिप कसं काय मॅनेज करेल हा गोंधळ Proud

ओऽ, चला की मागं पटापट. नदी वाहती की काय मागं, आँ?
>>>
Proud हे नदी वाहती की काय मागं कधी ऐकलं नव्हतं आजवर

खास विकुंशी भेट घेण्यासाठी मिशेल बाखमनला विचारतो. इथेच राहते न ती मिनिसोटात

Lol

विकु, आम्ही बहुतेक अरुणना उचलायला येऊ एडिसनला, त्यामुळे तिथून शक्य होईल तुम्हाला उचलणं.

बाकी मंडळी, मै च्या घरापासून शोनूचं घर एक तास लांब आहे, त्यामुळे त्या हिशोबानी निघायची वेळ ठरवा.

नार्थ जर्सी स्टापला किती वाजता हजर व्हायचय?

मला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक जपानी पोस्टडॉक भेटलेली. ती १ वर्ष पुण्याला होती काही कामानिमित्त. तिला मी मराठी आहे सांगितल्यावर मला म्हणाली, "I know only two words in Marathi." म्हटलं कुठले? तर म्हणाली, "पुढे चला, पुढे चला!" Lol

>> पुढे चला

Happy

>> जपानी पोस्टडॉक

एकदम मुंबई पुणे मुंबई मधली स्वप्नील जोशीची जपानी गर्लफ्रेण्ड आठवली किंवा मग हसवा फसवी मधले प्रिन्स वांगटुंग पिंगपिंग. पुणे एकदम पॉप्युलर दिसतंय एपॅक मध्ये Wink

पुढे चला >>> Happy

मै - मागच्याच वेळची बस आणली आहे का बुवांनी चालवलेली? स्टिअरिंग अजून तिकडेच आहे Happy

ते नॉर्थ ईस्ट ईंडियातलं मणिपूर मिझोराम असलं पाहिजे राईट हँड ड्रायविंग दाखवलं आहे तर Wink

पुढे चला Biggrin

आम्ही एका भारतवारीत कुठेकुठे फिरायला गेलो होतो. तिथे टुरिस्ट ठिकाणी फार लोकं गर्दी करतात गाड्यांभोवती. त्यांना आम्ही 'नही चाहिये' म्हणायचो ते ईशान पण शिकला. नंतर मुंबईत आल्यावर एक बाई भीक मागत होती तिला पण 'नही चाहिये' Uhoh Biggrin

कब्बी धागां उप्पर काडते, कब्बी बारां नीचे गाडते
ऐसीवैसी बातां करते... नै बोले तो सुन्ते नै! Proud

कब्बी धागां उप्पर काडते, कब्बी बारां नीचे गाडते
ऐसीवैसी बातां करते... नै बोले तो सुन्ते नै! >>> जबरी Lol

Pages