बासुंदी फोटोसह

Submitted by निल्सन on 22 March, 2016 - 08:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

फुल्ल क्रिम दुध - २ लिटर (मी टोन्ड गोकुळ किंवा म्हशीचे दुध वापरते)
साखर - १ वाटी / चवीनुसार
सुका मेवा - काजु, बदाम (थोडे भरड वाटुन), चारोळी, मनुके.

क्रमवार पाककृती: 

देवकी यांनी विचारल्यामुळे बासुंदीची पाकृ देत आहे.

बासुंदीची पाककृती अगदी सोपी आहे फक्त दोनच स्टेप पण वेळ मात्र खुप लागतो, घाईगडबडीचे हे काम नाही. एका बाजुचा गॅस २-३ तासांसाठी बिझी, त्यामुळे जर जास्त स्वयंपाक असेल तर मी आदल्या रात्रीच बासुंदी बनवुन ठेवते. दुसर्या दिवशी बासुंदी अजुन घट्ट होते.

तर, एका जाड बुडाच्या पातेल्यात्/टोपात दुध तापवत ठेवावे. भांडे थोडे मोठेच असु द्या म्हणजे दुधाला उकळायला चांगली जागा मिळेल.
पहिली उकळी येईपर्यंत गॅसची आच मोठी असु दे नंतर मात्र पुर्णवेळ मंद आचेवर दुध तापवत ठेवायचे आहे.
दर १०-१५ मिनीटांनी दुध मोठ्या पळीने / चमच्याने हलवत रहावे व पातेल्याला चिकटलेली साय काढुन परत दुधात एकत्र करत रहा.
दुध पातेल्याला खाली लागु नये तसेच ओतु जाऊ नये म्हणुन आई बशी, प्लेट किंवा वाटी दुधात टाकुन ठेवायची पण मी मात्र ज्या चमच्याचे दुध फिरवते तोच चमचा पातेल्यात उभा ठेवते. (तरीही या चमचा, बशीवर अवलंबुन न राहता दुध अधुनमधुन फिरवत रहावे नाहीतर दुध पातेल्याला लागतोच Happy )

दुधाचे प्रमाण निम्म्यावर आले की दुधाला गुलाबी छटा येण्यास सुरवात होते. अजुन थोडे आटले की त्यात साखर आणि सुका मेवा घालुन साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा.

या स्टेपनंतर २० ते २५ मिनिटांत मस्त घट्टसर , गुलाबी बासुंदी तयार होते. Happy

२ लिटर दुधाची साधारण पाऊण लिटर बासुंदी तयार होते. (घट्टपणा आपापल्या इच्छेनुसार. आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत नाही तर चमच्याने खातो Wink )

शनिवारी रात्री लेकीने बासुंदीची मागणी केली तेव्हा बनविली होती. रात्री ९.३० ला २ लिटर दुध तापत ठेवले तेव्हा रात्री १२.३० ला बासुंदी तयार झाली. दरम्यान स्वयंपाक बनवुन, जेवुन झाले, घरातील सगळे झोपले पण Proud
त्यातच थोडा मावा घालुन कुल्फीच्या साच्यात तयार मिश्रण ओतले, रविवारी दुपारी मस्त गारेगार मावा कुल्फीपण खायला मिळाली Happy

काल केली बासुंदी तिचे हे फोटो.

IMG-20160409-WA0007.jpgIMG-20160409-WA0005-1-1.jpgIMG-20160409-WA0008-1-1.jpg

वाढणी/प्रमाण: 
एक वाटी प्रत्येकी पकडली तर ६ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

एकच पण महत्वाची टीप.
दुध सतत ढवळत रहा जर करपले तर काही केले तरी दुधाचा करपलेला वास, चव जात नाही.

माहितीचा स्रोत: 
शेजारच्या मामी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ढवळून दमलात की आराम करण्यासाठी किचनमध्ये खुर्ची ठेवावी फिदीफिदी

Lol

मी म्हणते मग सुरूवातीपासूनच का ठेवू नये? Wink (बार चेअर घ्यावी म्हणजे उंचही असेल आणि भांड्याच्या आतलं नीट दिसेल)

सायविरहित, / कन्डेन्स्ड मिल्कयुक्त, / दाट नसलेली किंवा ब्लेंड करून गुळ्ळगुळीत केलेली/ अन्य शॉर्टकट वापरून केलेली बासुंदी खाणार्‍यांना प्रणाम. Proud Light 1

अशा बासुंदीला बासुंदी म्हणू नये. भेसळ नैतर काय! Wink

साय म्हणजे माझा जीव की प्राण आहे. मला ब्रू कॉफीपण पूर्ण दुधाची (साय काढलेलं चालतं पण मुळात फुल क्रीम!) लागते, आणि न गाळलेली. त्यावर पुन्हा साय धरली तरीही चालते. लहानपणी मी रोज पातेल्याला लागलेल्या २ लिटर दुधाची बाजूची तुपकट खरवड हावर्‍याहावर्‍या खायचे, आता हावरेपणा न करता १ लिटरची खाते Proud त्यावेळी रोजचं सायीचं विरजण आईने लावलं की पातेल्याच्या बाजूची खरवड ती घेत नसे, कारण तुपकट असूनही त्याचं लोणी चोथट निघे. ते आम्हाला चालत नसे. त्यामुळे ती खरवड माझ्या वाट्याला असे. आता माझंही तुप-लोण्याचं सायकल असंच असतं.

पुर्वी शनिवारवाड्याजवळ बासुंदी विकत मिळायची. मी बुधवार पेठेत गणपतीच्या दर्शनाला जात असे तेंव्हा परत येताना एक वाटी बासुंदी प्यायचो.

आमच्याकडे सण कुठलाही असला तरी मेन पक्वान्न बासुंदी. अनेकवेळा करते. मुलीला प्रचंड आवडते. त्यामुळे आजही बासुंदी आणि आमरस.
मल भरपूर साय असलेली दाट बासुंदी - अल्मोस्ट रबडी - आवडते. चिक्कार वेळ लागतो पण आवडत असल्याने जाणवत नाही. बिनासायीच्या बासुंदीची कल्पनाही करवत नाही.

Aaj basundi karaychi aahe. Ganapati sathi prasad mhanun. Kuni pedhe takale aahe ka basundi madhe? Changale lagel ka?

निल्सन , तुमच्या / तुझ्या पाककृती प्रमाणे आज बासुंदी केली. घरी सगळ्यानाच खूप आवडली. भरपूर प्रमाणात झाली. सुरवातीला दूध आटायला वेळ लागला पण नंतर खूप पटापट घट्ट झाली. या सोप्या आणि सुंदर रेसिपीसाठी धन्यवाद!!

धन्यवाद धनवन्ती Happy
मी पण आज बासुंदी बनवत आहे. दूध आटवायला टाकलं आणि माबोवर टिपी करत बसले होते. तितक्यात तुमचा प्रतिसाद पाहिला आणि गॕसवर ठेवलेल्या दूधाची आठवण झाली Wink थोडसं दूध ओतू गेलच पण नशिब करपलं नाही. त्यामुळे डबल धन्यवाद Happy

माझ्याकडे डिट्टो याच पद्धतीने करतात.. अगदी तळाशी बशी किंवा प्लेट टाकणे सुद्धा..
पण मी गोड्प्रेमी नाही त्यामुळे मी ताटात जोवर भाजी आहे जोडीला तोवर ती खाऊ शकते.. नुसता एक चम्मच तोंडात घालणे नाही जमत.. फारतर पाऊण वा अर्धी वाटी..बास..त्याच्याउप्पर नो नो नो नो..

बासुंदी /रबडी म्हणायला पाहिजे खरं तर Happy इतकी दाट रबडीच असते ना?
कारण मी तरी लहानपणीपासुन पातळच बासुंदी बघितलेली आहे. साय अज्जिबात न आवडणार्‍या गटातली अस्ल्याने फारशी कधी बासु आवडली नाही. किंवा मला गाळून देता यावी म्हणून आई पात्तळ बनवायची माहित नाही Proud
हा धागा वाचून आता मी आईला सांगू शकते बिनधास्त मी एकटीच नव्हते बघ बासुंदी गाळून पिणारी Lol

सगळे प्रतिसाद वाचले नाहीत पण मी यात खवा पण घालते (म्हकटकट्)टकन होते विना कटकट)
माझ्या बासुंदीला साधारण २ तास लागतात, आज घरी जाऊन, बनवुन मग फोटो टाकेन

इथल्या फुल फॅट दुधाची इतकी दाट होत नाही (गायीच दुध असत त्यामुळ असेल बहुदा ) म्हणुन् मी त्यात क्रीम घालते आणि मग आटवते. अगदी छान घट्ट होते मग. आणि ऑर्गॅनिक दुधाची जास्त चांगली होते. (चहा सुद्धा )
यावेळी मी फ्रुट सॅलड केल सरळ मागच्या शनिवारी नवरात्रीत म्हणुन. Happy फ्रुट सॅलड, पुरी,मसाले भात ,बीटची कोशिंबीर.

@रिया, फोटो अपलोडींगला प्रोब्लेम आला की मी तो whatsapp ला कोणाला तरी शेअर करतो. आणि मग तो शेअर केलेला whatsapp gallery तला फोटो इथे अपलोड करतो. या रितीने अजूनपर्यंत प्रोब्लेम आला नाहीये.

मी हल्ली मोठ्या कढईत दूध आटवायला ठेवते व गॕस मध्यम आचेवर. पसरट असल्यामुळे दूध पटपट आटते आणि बासुंदी लवकर तयार होते. फक्त थोड्या थोड्यावेळाने दूधावर येणारी साय कढईच्या साइडला लावत जावी व दूध निम्मे आटले की साइडची साय पुन्हा दूधात मिक्स करावी. या पद्धतीने खूप पटकन होते बासुंदी.

रिया , आता नेक्स्ट टाईम खवा घालून बघते करून.
ट्युलिप , मिल्क मेडच्या बासुंदीला तशी चव येत नाही. Sad
मी क्रीम घालून करते कारण एव्हन फुल्ल फॅट गाईच दुध पातळ असत. १ कप दुधाला पाव किंवा थोडी जास्तच क्रीम घालते आणि नेहमी प्रमाणे पुढची प्रोसेस.

मी कालच केली ( आज खाण्यासाठी) . हार्ड अ‍ॅनोडाइज्ड पसरट भांड्यात आधी आतून तुपाचा हात लावून घेतला सगळीकडून. मग १ गॅलन होल मिल्क घालून मंद आचेवर साधारण ३ तास वगैरे ठेवले असेल. बाकीची कामं, जेवणं, आवरा आवर हे होईपरय्न्त मस्त दाट आटीव बासुंदी झाली तयार.
मधे मधे ढवळले पण तुपाच्या ट्रिक ने बासुंदी अज्जिबात लागली नाही खाली. बाकी क्रीम, हाफ एन हाफ वगैरे काहीही घालायची गरज पडली नाही. फक्त केशर वेलदोडे, इ. घातले. फोटो नाहीये आत्ता, नंतर लक्षात राहिले तर टाकेन.

मी पण काल कोस्तकोतल्या हाफ&हाफ च्या आख्या कार्टनची बासुंदी केली. नॉन स्टिक च्या पसरट पॅन मध्ये केली. २ तासात छान झाली.
अस्र्ध्या बासुंदीत साखर न घालता खजूर घालून गोड केली आणि अर्धी बासुंदी नॉर्मल साखर घालून कारण लेकी ने सांगितलं डोंट मेस विथ बासुंदी म्हणून.

मस्त पाकृ. मला ही घरीच केलेली बासुंदी आवडते. मी रोज पोळ्यांची कणीक पितळी परातीत भिजवते त्यामुळे ती परात अगदी सोन्यासारखी चकचकीत आहे. मी बासुंदी त्या परातीत आटवते. -- ममो
>> पितळी भांडी कथिल धातू वापरून कल्हई करावी लागतात नाहीतर दुधाबरोबर केमिकल रिअॅक्शन होऊन फुड पॉयझनिंग होते असे वाचले होते.

Pages