रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्चिस अभिरामला विचारतो की रात्री नेमकं काय झालं? अभिराम सांगतो की रात्री जाग आली. मी बाहेर येऊन बघतो तर सगळे जण उभे होते. कुठूनतरी साामान हलविण्याचा आवाज येत होता पण कळत नव्हते की नेमकं कुठून? मग लक्षात आले की आतल्या खोलीतून आवाज येत होता. सगळे त्या दिशेने गेलो. (त्याला तो प्रसंग आठवतो, सामान हलवलेलं असतं) बघतो तर तिथे कुणीच नव्हते. अर्चिसचा विश्वास बसत नाही की खोलीत कुणी नसतांना सामान हलतं कसं? पुर्वा पण म्हणते की मला पण तसचं वाटले पण असंं झालयं. पांडू म्हणतो की असं होतं, पैसे पण जातात. गावातल्या पोलीसपाटलाचे पण पैसे गेले होतेे. कपाट बंद होतं. अभिराम विचारतो की तुला कसं माहित? तर तो सांगतो की मी तिथेच होतो, त्यांना वाटलंं की मीच चोरले पैसे. त्यांनी खूप मारलं मला मग नंतर त्याना कळलं की हे काहीतरी भलतच आहे. कारण कपाट बंद होतं. भांड्यांच पण असेच होते धुतलेली भांडी खरकटी होतात. ह्याला भानामती म्हणतात. तेवढ्यात निलीमा येऊन त्यांचं बोलणं ऐकते. ती अर्चिसवर वैतागते व पांडूला खाली जायला सांगते. ती अभिराम व पुर्वाला म्हणते की ह्या घरात तुम्हीच शिकलेले आहात निदान तुम्ही तरी असा विचार करू नका. अभिराम सांगतो की काय करावं काहीच कळत नाहीये. निलीमा सांगते की जे दिसतयं त्यावर विश्वास ठेवायचा. हे सगळं कोण करतयं हे शोधून काढायला पाहिजे. हे कोणीतरी मुद्दाम करतयं, दारं खिडक्या उघड्या ठेवा. ती अर्चिसला सांगते की तू ह्यावर विश्वास ठेवायचा नाहीये. इकडे माधव डायरीत लिहीत असतात, तेवढ्यात दत्ता त्यांना हाक मारतात. ते लगेच डायरी लपवितात. दत्ता म्हणतात की वहिनी नाहीये म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय. ते विचारतात की तुला काय वाटतयं हे सगळं कोणामुळे चाललयं? हे त्या सुषमामुळेच चाललयं. गुरवकाकांनी तिला घराबाहेर काढायला सांगितले आपण तसे केले नाही म्हणून हे भोगावं लागतयं, आपण तिला घराबाहेर काढू शकत नाही, मला माहित आहे की तू म्हणशील की कायद्याने तसं करू शकत नाही. पण ते फक्त तिच लग्न होइपर्यंत. तिचे लग्न लावून द्यायचे. माधव सांगतात की मला पटलं नाहीये पण तू म्हणतो तर ठीक आहे पण कुणाशी लावणार? ते सांगतात की बघू, तू तयार आहे तर मी व सरिता गुरवकाकांना भेटतो.
दत्ता हे सगळं निलीमापासून लपून ठेवायला सांगतात. इकडे सरिता यमुनाला घडलेलं सांगत असते तेवढ्यात दत्ता येतात आणि यमुनाला कपडे वाळत टाकायला सांगतात व सरिताला गुरवकाकांकडे सुशमाच्या लग्नााविषयी बोलायला जाऊया सांगतात. इकडे मााई कपाटातील दागिने बघत असतात. इतक्यात पुर्वा येते व माईंना सांगते की तुझ्याकडे इतके दागिने आहेत पण माझ्या आईकडे काहिच नाही. तिला तिच्या वाटचे दागिने दे. पण माई ते पिढ्यानपाढ्यांचे दागिने आहेत म्हणून नाही म्हणतात. इकडे दत्ता व सरिता गुरवकाकांकडे येतात. ते गमतीने म्हणतात की मला वाटलं की छोट्याच्या लग्नाची पत्रीका घेऊन आलात की काय. सरिता सांगते की सुषमाला घरातून बाहेर काढायचे आहे. ते म्हणतात पण तुमची जाऊ नाही म्हणते. पण ती सांगते की त्यांचे सोडा तुम्ही म्हणाल ती पुर्व दिशा. दत्ता सांगतात की मृत्युपत्राप्रमाणे सुषमा तिचे लग्न होईपर्यंतच इकडे राहू शकते. तिच्या लग्नाचं तेवढं बघा. ते म्हणतात की काहीतरी करायला पाहिजे. ती पीडा घरातून जाईल तेव्हाच मी तुमच्या घरचे पाणि घेईन.
अभिराम बाहेरच्या खोलीत अभ्यास करत असतो. सुषमा येते व त्याला सांगते की मला जरा बोलायचे होते. तो म्हणतो की मी अभ्यास करतोय. तरीही ती म्हणते की थोडा वेळ काढ व सांगते की तुम्ही पुढाकार घ्या व वाटण्यांचे काय ते बघा. तो सांगतो की प्रॅापर्टी सगळ्यांची आहे. तरी ती सांगते की तुम्ही शिकलेले आहात म्हणून तुम्हाला सांगते. बाकीच्यांंशी काय बोलणार? व मी बोलली तरी माझं कोण ऐकणार? तो सांगतो की मी माझं काम करतोय तुला ह्या घरात रहायला मिळतय की. ती सांगते की तुमच्या भांडणात माझंं मरण आहे. तो म्हणतो की प्रोसीजरला वेळ लागतो पण ती सांगते की ती वेळ कमी होऊ शकते. तुम्हीही मनावर घ्या. तेवढ्यात माई येतात व सुषमाकडे रागाने बघतात व अभिरामला अभ्यास करायला सांगून वरती जातात. सुषमा सांगते की मला माझा वाटा मिळाल्याशिवाय मी हे घर सोडून जाणार नाही. इकडे माई निलीमाच्या खोलीत येतात व तिच्या गळ्यात सोन्याची चेन घालतात. ती विचारते की माझी चेन हरवली तर तुम्ही तुमची चेन का देताय? ती चेन माधवंनी मला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी दिली होती, ती हरवली म्हणून जरा वाईट वाटलं. त्या सांगतात की तुझी हरवली म्हणून तुला दिली आहे. निलीमा तरीही सांगते की तुम्ही तिनही मुलांमधे भेदभाव केला नाही, मला ही चेन दिली व सरिताला काही नाही तर तिला वाईट वाटेेल. त्या सांगतात की तिचं पण आहे. तु कोणाला हे सांगू नकोस व माधवला पण नको कारण त्याच्या मनात काही राहत नाही. त्या निघतात तर निलीमा त्यांना थांबवते व मी ही चेन घेऊन तुमचे ऐकले आता तुम्हीही माझं ऐका. तुम्हाला कोणीतरी दिसतं, तुम्ही कोणाशी तरी बोलतात, हा आजार आहेे. वेळीच उपचार केले नाहीत तर तुम्हालाच त्रास होईल. हा आजार लवकर बरा होऊ शकतो जर ह्यावर वेळीच उपचार झाले तरच. जास्त काही नाही डाॅक्टर जे सांगतील ती औषधंं घ्यायची. तुम्हाला शांत झोप लागेेल व मनात विचारही येणार नाही. तुम्हाला भास होणार नाहीत. त्या चिडतात व तिला सांगतात की मी बरी आहे. माझ्या वाट्याला जाऊ नकोस. नाहीतर तू वाचणार नाहीस.

'थ्रीलर' ,'सस्पेन्स', 'गूढकथा' व 'सूडकथा' ह्येच्यावरचीं अगणित पुस्तकां वाचलंय, सिनेमा बघलंय पण हंय जां काय चल्लाहा त्येच्यापुढे तां सगळां म्हणजे 'किस झाडकी पत्ती'च ! कदाचित, शेवंता लटाकलां 'वही झाडकी होगी' !! Wink

भगवती धन्स गो! !
रोज ऑफिसला जाताना वाटेत चेक करते आणि वाचते. नाहीतर चैन पडत नाही. ( फार पुर्वी ट्रॅप वाचायचे Happy )

पांडोबा डायलॉग लिहायला परत विसरले वाटतं. दत्ता-माधवाने सुसल्याच्या लग्नाबद्दल पाउण - पाउण एपिसोड भर चर्चा आधीच झोडल्या आहेत की. तरी काल परत नव्यानेच काहीतरी बोलल्यागत तेच सुरु. ती माधवची हरवलेली डायरी काल परत दिसली, तेव्हा जाणवलं की बहुतेक जुन्याच कुठल्यातरी एपिसोड मधलं ठिगळ काल जोडलं होतं.
त्या सुसल्याचा लग्नाचा विषय अख्ख्या कोकणात वर्ल्डफेमस झालाय. तरी त्याच विषयावर आलटून पालटून तेच लोक तेच तेच बडबड करत अर्धा एपिसोड खाताहेत. हे जे काय चाल्लं हां, ते अजिबात बरोबर नाय हां.
परत एकदा पूर्वा वर पण संशयाची सुई वळवलीन काल.
सुसल्या ने काल अक्षय तृतीये निमित्त नवीन जांभळा टॉप शिवून घेतला बहुतेक. पण मापाला म्हणून परत तोच जुना चॉकलेटी टॉप दिल्याने व्हायचा तो गोंधळ झालाच !
रच्याकने, काल कुठ्ल्यातरी पेपर मधे रोहीणी हट्टंगडी यांची बातमी होती . त्यानुसार सिरीयलची लांबी अवास्तवी पणे वाढणे हा सगळा टिआरपीचा खेळ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, ज्यावर एक कलाकार म्हणून काहीही करता येत नसल्यासारखं सांगितलं. आज ती बातमीच गायब झाली ! मी खरंच असं काही वाचलं काल , की तो माझ्या मनाचा भ्रम होता !

<< की तो माझ्या मनाचा भ्रम होता ! >> << हा आजार लवकर बरा होऊ शकतो जर ह्यावर वेळीच उपचार झाले तरच.>> एक उपचार करून बघा - कांहीं दिवस ही सिरीयल नका बघूं !! Wink

तृतीये निमित्त नवीन जांभळा टॉप शिवून घेतला बहुतेक. पण मापाला म्हणून परत तोच जुना चॉकलेटी टॉप दिल्याने व्हायचा तो गोंधळ झालाच !>>>>>>> मित Rofl उच्च आहे हे Proud

सुसल्याचा खंयचा जांभळा टॉप्?:अओ: माका दिसुक नाय तो, काल तिने निलीमाने दिलेला तो घामट ड्रेस घातलावं ना? मंग कित्यांक बोलतावं नवा टॉप, नवा टॉप्?:फिदी:

काल पूर्वा, उंदीर-मांजर खेळ खेळत होती वाट्ट. माई मधूनच फिस्कारत असतातच. काल त्या निलीमावर फिस्कारल्या. निलीमा वाचणार नाही म्हणजे काय? काय वाचणार नाही? ठोकळ्याची डायरी? ठोकळो त्याचो जूनोच खेळ ( डायरीचो) नव्याने खेळताहा.

माधवाचि डायरि मिळाक व्हयि कोनाक तरि वाचुक मगे थोड्यातरि समस्या सुटतल्या असा वाट्टा, ति आता खुर्चि हयसुन थय आनि थयसुन हय येता त्याचि काय कारना देतले मगे हे लोक कोनाक माहिति.

इतक्यात पुर्वा येते व माईंना सांगते की तुझ्याकडे इतके दागिने आहेत पण माझ्या आईकडे काहिच नाही>>>> तिकडे सुषमा येते असे असायला ह्वे होते.

काल पूर्वा, उंदीर-मांजर खेळ खेळत होती वाट्ट.>>>> म्हणजे नक्कि ती काय करत होती? कुणी सान्गाल का मला?:अओ:

इतक्यात पुर्वा येते व माईंना सांगते की तुझ्याकडे इतके दागिने आहेत पण माझ्या आईकडे काहिच नाही, हे बरोबर लिहीलंय. पुर्वा येते आणि आजीला असंच म्हणते.

अगं माई कपाटातुन दागिने काढुन पहात असतांना त्यांना बहस होतो की समोरच्या दुसर्‍या कपाटामागुन कोणीतरी बघतयं, मग त्या विचारतात ( बहुतेक, आठवत नाही) कोण आहे, तेव्हा पूर्वा समोर येते.

हो अंजू, पूर्वाच विचारते दागिन्यांबद्दल, सुषमा वाट्याबद्दल विचारते.

माका दिसुक नाय तो>>>>
गे माजे बाय.. जाऊबाई, तुमका आमचो कायेक पटूचा नाय !
तुमका काय वाटतं. माजी बायको खोटा बोलतां...
तसं नाही दत्ता भाउजी, जे डोळ्यांना दिसतं त्यावरच विश्वास ठेवा न..
हो हो हो... दत्ता.. हो हो !
आई-बाबा, काकी सांगते तर खरंच असेल ना, या पांडुने पण पाहिलं. हो ना रे...
काय तां....
अरे त्या सुसल्याने जांभळा टॉपच घातलाता ना ?
....तां माका काय माहित !!!

images_0.jpg

तृतीये निमित्त नवीन जांभळा टॉप शिवून घेतला बहुतेक. पण मापाला म्हणून परत तोच जुना चॉकलेटी टॉप दिल्याने व्हायचा तो गोंधळ झालाच !>>>>>>> धन्य!
मित,एकदम सुसाट .

मित Rofl

इतक्यात पुर्वा येते व माईंना सांगते की तुझ्याकडे इतके दागिने आहेत पण माझ्या आईकडे काहिच नाही, हे बरोबर लिहीलंय. पुर्वा येते आणि आजीला असंच म्हणते.>>>> हो का? धन्स अन्जू. Happy

माका दिसुक नाय तो>>>>
गे माजे बाय.. जाऊबाई, तुमका आमचो कायेक पटूचा नाय !
तुमका काय वाटतं. माजी बायको खोटा बोलतां...
तसं नाही दत्ता भाउजी, जे डोळ्यांना दिसतं त्यावरच विश्वास ठेवा न..
हो हो हो... दत्ता.. हो हो !
आई-बाबा, काकी सांगते तर खरंच असेल ना, या पांडुने पण पाहिलं. हो ना रे...
काय तां....
अरे त्या सुसल्याने जांभळा टॉपच घातलाता ना ?
....तां माका काय माहित !!!:हहगलो:

Proud कालचा भाग न पटण्यासारखा होत. म्हणजे एकतर निलीमाबायने मिळालेली आयती चेन गपकन गळ्यात घातली. पण अर्चिसने शेवंताविषयी शंका घेतल्यावर मग मात्र टरकली. पण निलीमाने सासुला का नाही सांगीतले की माका जशी ही चेन देताव, तसेच काही दागिने सरीताक पण देवा. पण नाय हिला एकलीलाच हवे ते.

आणी गाडीची चावी कुणी अशी टपावर ठेवतं का? आणी गाडी ऑटोमॅटीक दिसतेय, आतुन पण उघडनां.

स्वप्ना खंय गेली, दिसुक नाय ती.

मित Lol

सरिता स्वयंपाक करत असते तेवढ्यात पुर्वा येते. सरिता तिला सांगते की माझं होतच आलयं, तू जा आणि अभ्यास कर. ती जाऊ लागते तर सरिता तिला उचटणे द्यायला सांगते, तिच्या लक्षात येते की पुर्वा गप्प गप्प आहे. ती विचारते की काय झालं? कुणी काही बोललं का? पुर्वा म्हणते की कोण कशाला बोलेन? मी काल आजीला कपाटातील दागिने काढतांना बघीतले, खूप सारेे होते. सरिता आश्चर्याने विचारते की कुड्या, बांगड्या, चेन, हार असेल? पुर्वा म्हणते की सगळंच होतं. सरिता हरखून जाऊन विचारते की तू घालुन बघितलेस का? ती नााही म्हणते. सरिता नाराज होते की मला नाही तर निदान लेकीलातरी घालू द्यायचे दागिने. पुर्वा सांगते की मला ह्या सगळ्याची हौस नाही पण तुला आहेे ना? सरिता सांगते की माझ्या माहेरी अंथरूण पाहून पाय पसरावे तर अंथरूण कायमच तोकडे असायचे. ह्यांच्याशी लग्न ठरले तर सगळे म्हणू लागले की आता तू नाईकीण बाई होणार , तुला दागिने मिळणार. मग मी आरशासमोर उभी राहून गळाभर दागिने, कानात कुड्या, हातात बांगड्या अशी सोन्याने मढलेली बघायची स्वत:ला. पण मला वेडीला काय माहित नशीबातच दागिने नाही तर अंगावर कुठून येणार. मग इथे आल्यावर मागून मागून दागिने घालू लागली. स्वत:चे करायचे तर दिवाळसणामागून सण गेले. ह्यांना तरी काय सांगणार. एकटा माणूस कुठेकुठे बघणार. पुर्वा सांगते की मी आजीला सांगितले की आईच्या वाटचे दागिने तिला दे, पण ती नाही म्हणाली व म्हणाली की हे पीढ्यानपीढ्यांचे दागिने आहेत. ह्यात सगळ्यांचा वाटा आहे. सरिता चिडते व म्हणते की ह्यांचं सगळं मी करायचे पण वाटा सगळ्यांचा. थांब मी बोलतेच त्यांच्याशी. पण पुर्वा तिला थांबवते व आपण वाईटपणा का घ्यायचा? मी बोलते का काही? सरिता सांगते की मला तुझ्यासारखे गप्प बसता येत नाही. पण पुर्वा सांगते की तसा प्रयत्न तरी कर. आपण ते नंतर बघू. सरिता म्हणते की हे कोणाला पचायचे नाही. इकडे निलीमा माईंनी दिलेली चेन आरशात न्याहाळत असते तेवढ्यात अर्चिस येतो व तिचे अभिनंदन करतो व म्हणतो की मला माहित आहे की चेन इथेच कुठेतरी असेल पण निलीमा सांगते की ही ती चेन नाही व मला माईंनी दिली आहे. तू हे कोणाला सांगू नकोस कारण घरात वाद चालू आहे आणि सरिताला पण वाईट वाटेल. अर्चिस विचारतो की ही चेन कपाटातील दागिन्यांपैकी आहे का? ती सांगते की असेल. मग तो म्हणतो की सरिताकाकूला काही न देता आजीने तुला ही चेन दिलीये हेच पटत नाही. त्यात सुषमाच्या आईने आत्महत्या केल्यावर तिच्या अंगावरचे दागिने काढून त्या कपाटात ठेवले आहे. ही चेन त्यातलीच असेल तर? ती विचार करू लागते.
अर्चिस निलीमाला हसतो व तू चक्क घाबरलीस असे सांगून तिथून निघून गाडीचे काम करायला जातो, इकडून सुषमा येते व अर्चिस गाडीचे काम करतांना बघून निघून जाते. इकडे गुरवं पुजा करत असतात. तेवढ्यात नेनेवकिल येतात. गुरव त्यांना कामकाज कसं चाललयं ते विचारतात व सांगतात की दत्ता व त्याची बायको येऊन गेले. हातापाया पडत होते. कामाशिवाय कोण येतो हो. ते वाटेतला काटा काढायला सांगत होते. नेनेवकिल असा कुठला काटा आहे ह्या विचारात पडतात पण गुरवकाका म्हणतात की सुषमा. ते पुढे सांगतात की तुम्ही समजतात तसे तिला संपवायचे नाही तर तिच्याकरिता स्थळ बघायचे आहे. नेनेवकिल म्हणतात की जरी ती नाईकांच्या वाड्या राहत असली तरी अख्ख्या गावाला माहित आहे की ती कुणाची मुलगी आहे. गुरवकाका सांगतात की खरं लग्न थोडीच लावायचे आहे, कुणालातरी उभंं करू. आपण ह्याचा फायदा उठवायला हवा. तिचे लग्न झाले की तुम्हाला हवे तसे करून देऊ. जमिनीचा पण प्रश्न सोडवायचा आहे. वकिलकाका म्हणतात की पटतयं मला, तिचं लग्न झाल्याशिवाय जमिनीचंं व दागिन्यांचं प्रकरण मिटणार नाही पण तुम्हीही काहीतरी करा. गुरवकाका सांगतात की तुम्ही त्याची काळजी करू नका, जे कोणी तुमच्या आड येईल त्याचा मी आज रात्रीच बंदोबस्त करतो. इकडे निलीमा चेन हातात घेऊन अर्चिसच्या म्हणण्याचा विचार करते व तिला शेवंताच बोलणं पण आठवते, तेवढ्यात सरिता येते व चेन बघून हरखून जाते. ती विचारते की चेन किती चमकते आहे कुठे मिळाली? निलीमा सांगते की ही माईंनी मला कपाटातील दागिन्यांमधून दिली आहे. ती वैतागते व म्हणते की तुम्ही ह्या घरातील मोठ्या म्हणून तुम्हाला मिळाली. निलीमा सांगते तुला हवी असेल तर घे पण मी तुला हिची गोष्ट सांगितली तर तुच नाही म्हणशील की नको म्हणून कदाचित ही शेवंताची पण असू शकेल. सरिता सांगते की घाला तुम्हीच व निघून जाते. इकडे दत्ता पुरलेल्या बाहुल्याचा , सुषमाचा बंदोबस्त कराण्याचा, सुषमाच्या खोलीत तिचं नसणं व अचानक आरशात दिसणं ह्याचा विचार करतात.
दत्तांना अतानक थंडी वाजू लागते व ते चादर पांघरून झोपतात. तेवढ्यात सरिता येते व दत्तांना इतक्या लवकर कशी झोप लागली म्हणून बघते तर ते तापाने फणफणलेले असतात. ती त्यांना,अंगारा लावते व गोळी आहे का बघते. इकडे माधव खाली येऊन बाहेरचंं दार बंद करतात तेवढ्यात निलीमा खाली येते व त्यांना सांगते की माझं काम झालं व खोलीत बसून कंटाळा आला म्हणून खाली आले. ते सांगतात की बाहेर जाऊ नकोस. ती विचारते की मला कोणी पकडून नेणार आहे का? ते सांगतात की तुझ्या ह्या धाडसी स्वभावामुळे जो कोणी बाहेर आहे त्याचीच काळजी वाटायला लागली आहे. तेवढ्यात सरिता येते व ह्यांना ताप आला आहे तर गोळी हवी आहे व उद्या कोणालातरी दाखवता येईन सांगते. निलीमाच्या लक्षात येते की मागे अर्चिसला दिलेली गोळी शेवटची होती. तिला आठवतं की माधव गाडीतपण मेडीसीन बाॅक्स ठेवतात. ती तो आणायला जातेे. सरितापण म्हणते की मी येते बरोबर. निलीमा बाहेर येते तर गाडी नेहमीच्या ठिकाणी नसते. सरिता सांगते की अर्चिस दुपारी काहीतरी कामं करत होता. निलीमा गाडीत गोळी शोधत असते व सरिता गाडी बघून हरखून जाते व खुप महाग गाडी असेल म्हणते. आम्हाला साधा बैल घ्यायचा तरी विचार करावा लागतो पण घेणं मात्र नाही होतं. निलीमा म्हणते की ही गाडी आपल्या सगळ्यांची आहे व तुम्ही पण घ्याल की. तिला गोळी सापडते व त्या दोघी निघणार इतक्यात गाडीची दारं बंद होतात. गाडीची चावी तिच्या टपावरच असते. त्या दोघी दारं उघडू शकत नाहीत.

दत्ताकांत भलताच लेटकरंट निघाला, सगळ्या घटना होऊन इतके दिवस झाले, आणि ह्याला आत्ता ताप भरलान.

काल आर्चिस गाडीखाली झोपलेला असताना सुसल्या तिकडे येतो, तेव्हा पण टाॅप जांभळाच होता.>>> मला या ठिकाणी 'धूमधडाका' मधला लक्ष्या-महेश चा सीन आठवला. महेश असाच गाडीखाली असतो, आणि लक्ष्या येऊन त्याच्या पायाला गुदगुल्या करतो. सुसल्याने पण तसा केला असता, तर किमान तिच्या लग्नाचा प्रश्न तरी सुटला असता Wink
कालच्या भागाची स्ट्रॅटजी काहीशी अशी असावी.. सगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना घाबरवायचा प्रयत्न केला, पण ते काय घाबरत नाय. आता काय करायचा ? ती गाडी बरेच दिवस आपण दाखवली नाही. चालेल ती आज दाखवू आणि घाबरवू. नाहीच घाबरले , तर सरिताला चित्रविचित्र हावभाव करत बोलायला भरपूर डायलॉग देऊ !!!

नायतर काय एवढे दिवस झाले ता पोता पुरुन आनि ह्याका आता कित्या ताप इलो.

माका वटता शिरेलिच्या पहिल्याच दिवशि शेवन्ता निलिमा बबुन आलि असतलि समुद्रा वरुन, म्हनुन तर तेवा पासुन असा होता हा, आनि कोनाक काय द्यायचा झाला कि ता काय बोलना नाय स्वता सगळा बरोबर घेता, आनि खरि निलिमा खयतरि असतलि समुद्रा किनारि फिरत?????

मित >>>> १११११११११ न

Pages