आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
मला तर या सिरीयलचा एकच शेवट
मला तर या सिरीयलचा एकच शेवट संभवतो -
डांबरी रस्त्यावरून आर्चिस गाडी मातीच्या कच्च्या रस्त्यावर वळवतो व हंळूवार आणून नाईकांच्या घरासमोर उभी करतो. आल्याची सूचना द्यायला तो हॉर्न वाजवतो . निलीमाची उतरण्याची लगबग सुरुं होते व तिच्या लक्षांत येतं माधव गाढ झोंपला आहे. "माधव, चल उठ, घर आलं." माधव खडबडून जागा होतो . निलीमाच्या लक्षांत येतं , तो घामाने डबडबला आहे. " काय रे, काय झालं ? " " अग भयानक स्वप्न पडलं. कशाचा कशाला मेळ नाहीं. पण इथलीं सगळीं माणसं काय काय रुपं घेवून मला भेडसावत होतीं." हें सांगतानाही माधवचा आवाज अजूनही कांपराच. " तुझं रहस्यकथांचं वेड तुला खरंच एक दिवस वेडा करणार आहे ", मिष्किलपणें हंसत निलीमा त्याला कोपरखळी मारते. "हें बघ माधव, यापुढे १५ दिवस इथल्या साध्या ,भाबड्या लोकांत आपणही तसंच होवून रहायचं. मस्त कोकणाचं वातावरण एंजॉय कारायचं. मीं लॅपटॉप आणला असला तरीही तो उघडणार नाही व तूंही तुझ्या रहस्यकथांची टिपणवही बंद करून ठेव".
इतक्यांत अण्णा, माई , दत्ता, सरिता, छाया, गणेश, अभिराम सगळे येवून गाडीला गराडा घालतात. सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडत असतो. पांडू हंळूंच पुढे सरकत " माधवानुं, मीं वळखलंय तुमकां. नाय इसरांक मीं !" म्हणतो. नाथा, त्याची बायको व मुलगीही लांबून हें बघत आनंद व्यक्त करत असतात. माधव घरांता शिरतां शिरतां हंळूच समोरच्या झाडाकडे बघून गालातल्या गालांत हंसतो ! समाप्त !!
स्वप्नच म्हटलं कीं कशाचंही कांहींही स्पष्टीकरण देण्याची अर्थातच गरजच उरत नाही !!!
ती सुषमा CID वगैरे असणार आणि
ती सुषमा CID वगैरे असणार आणि अण्णा-नाथा यांनी मिळून केलेल्या खूनाचा तपास करत असणार अशी उगीच शंका आली आज ...
सुषमा आणि पांडूचा मोठा रोल
सुषमा आणि पांडूचा मोठा रोल आहे काहीतरी. तो बरोबर तिलाच कशी नेऊन देतो कागदपत्रं.
आज सरीताने निलिमाला छान सुनावलं. गप्पच बसली.
वकिलकाका, माधव, दत्ता व सुषमा
वकिलकाका, माधव, दत्ता व सुषमा बाहेरच्या खोलीत बसलेले असतात. माधव नेेनेवकिलांना म्हणतात की झालं गेलं सगळं विसरून जाऊया. ते पण सांगतात की ह्या घराशी माझे जुुने संबंध आहे. मलाही आवडत नाही अशा गोष्टीकरिता अडून बसायला. ते माधवंना म्हणतात की तुमच्या मुलाचे काॅलेज असेल. दत्तांना पण सांगतात की पुर्वा चांगलं शिकतेय, तिला नोकरी मिळेल. ते गणेशविषयी बोलू लागतात तेवढ्यात दत्ता विषय बदलतात व सरिताला अजून चहा झाला नाही का विचारतात. माधव पांडूला बोलवतात व बिस्किटं आणायला पाठवतात. सुषमा विचारते की मला इथे का थांबवलंं आहेे? वकिलकाका सांगतात की तिला पण कळायला पाहिजे की कोणाच्या नावे काय आहे ते. दत्ता परत चहा झाला का विचारतात. तेवढ्यात निलीमा येते. माधव तिला विचारतात की चहा झाला का? ती म्हणते की दुध नासलं पण ते म्हणतात की कोरा चहा करायला सांगितला होता. ती कशीबशी उत्तरं देते व तिथून जाते. दत्तांना संशय येतो व ते आत जातात. सरिता रडत असतेे. माई बडबड करत असतात. सरिता दत्तांना सांंगते की आत्ता जे झालं त्याची मला खूप भिती वाटते.
माईंंना भास होतो व त्या दम देतात की परत आली तर बघ वगैरे. सरिता सांगते की इथे कोणीतरी आहे. तेवढ्यात माई भानावर येतात व विचारतात की चहा अजून केला नाही का? मी करते पण सरिता त्यांना थांबवते. दत्ता काय झालं विचारतात. ती सांगते की मी चहा ठेवायला गेले तर गॅस संपला. मग मी चूल पेटवायला जाणार तेवढ्यात इथे बघते तर पाणी उकळत होतं. कुणीतरी आहे इथे. निलीमा सांगते की इथे कुणी नाही पण दत्ता म्हणतात की तुम्ही डोळ्यांनी बघितले आहे. ते सरिताला आत जायला सांगतात. माई पण आत जातात. वकिलकाका माईंविषयी विचारतात. माधव सांगतात की तिची तब्येत बरी नाही व ती आराम करतेय. माधव चहाला खूप उशीर झाला म्हणून दत्तांना हाका मारतात. ते बाहेर येतात व मला काही बोलायचे आहे सांगतात व सुषमाला तिथून जायला सुचवितात. ते मग नेनेवकिलांना सांगतात की मागच्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. पैशाची गरज सगळ्यांना आहे. मी ठरवलयं की जे काही आहे ते ह्याच बैठकीत मिटवायचे. वकिलकाका पण म्हणतात की मला चालेल. मग दत्ता सांगतात की मृत्यूपत्राप्रमाणे इस्टेटीचे आम्हा भावंड व आई मिळून चार वाटे (?) केलेत. कोणाच्या वाट्याला काय आले हे ज्याचे त्याचे नशीब पण सुषमाचेे काय? वकिलकाका म्हणतात की तिचा मृत्यूपत्रात उल्लेख आहे म्हणून तर ती ह्या घरात राहते. दत्ता सांगतात की आम्हाला ती या घरात नकोय. ती या घरात आल्यामुळे आम्ही काय भोगतोय ते आमचं आम्हाला माहित. वकिलकाका सांगतात की तिला घरातून काढणे हा कायदेशीर गुन्हा आहे. दत्ता म्हणतात की या घरातून गेली पाहिजे आणि आम्हाला आमच्यावर कायदेशीर कारवाई पण नकोय त्याकरिता आम्हाला तुमची मदत हवी आहे. ते सांगतात की मदत केली तर माझा कााय फायदा? दत्ता सांगतात की तुमचा फायदाच फायदा आहे. इकडे सरिता काळजीत असते, ती माईंना सांगते की आपल्या घरात हे काय चालले आहे. गॅस बंद असतांना पाणी कसे उकळत होते? सीलेंडर फूटलं असतं तर? निलीमा म्हणतेे की असे काही होणार नाही. ती सांगते की तुुमचे आपले काही होणार नाही असेच असते पण दिसतय ना काय होते ते. निलीमा व माई जाऊ लागतात पण ती माईंना थांबवते. निलीमा म्हणते की बाहेर वकिलकाका आलेत मला जायला पाहिजे मग ती पुर्वाला बोलावते व सोबतीला रहायला सांगतेे. सरिता पुर्वाला सगळं सांगू बघते पण निलीमी तिला अडवते.
निलीमा पुर्वाला तिच्या आईची काळजी घ्यायला सांंगून तिथून जाते. इकडे दत्ता वकिलकाकांना सुषमाच्या लग्नाविंषयी सुचवतात व तुम्हला जे हवं ते देऊ सांगतात. तेवढ्यात पांडू बिस्कीटाऐवजी टोस्ट आणतो. दत्ता वकिलकाकांंना काहितरी करा सांगतात. ते म्हणतात की सगळ्यात हॅंडल करायला कठीण अशी सुषमाच आहे पण मी प्रयत्न करतो. बोलता बोलता त्यांच्या लक्षात येते की त्यांचा फाईल गायब झाली आहे. सगळे फाईल शोधतात. तेवढ्यात पांडू येतो व बाहेर कागदांचा पाऊस पडलाय सांगतो. सगळे बाहेर येतात. वकिलकाका फाडलेले पेपर बघतात व चिडतात की तुम्ही माझे पेपर फाडलेत मी तुम्हला कोर्टात खेचेन. दत्ता म्हणतात की आम्ही गरीब माणसं इथे कायद्याच्या बाहेर पण गोष्टी होतात. इथे वस्तू गायब होतात. पण वकिलकाका म्हणतात की काय चाललं आहे सगळ्या गावाला माहित आहेे, मी तुम्हाला बघून घेईन. तेवढ्यात माई येतात व माझ्यामुलांना काय बोलतात? तुमच्यामागे उभी आहे तिनेच पेपर फाडलेत. ते मागे वळून बघतात व घाबरतात.
हा सीन प्रोमोजमध्ये दाखवला
हा सीन प्रोमोजमध्ये दाखवला त्यावेळी माईंच्या चेहर्यावरचे हावभाव बघुन मला वाटल होत माईंनाच पकडलय की काय कोणी?
कालचा भाग फारच कंटाळवाणा
कालचा भाग फारच कंटाळवाणा होता. पांडु होता तरी जास्त मज्जा नाही आली. आजच्या भागात ते फाडलेले पेपर्स पांडु सुसल्याला देताना दाखवलाय पण तो ते सरीताला सांगतो. आता बहुतेक दत्ता-दत्ती, सुसल्याच्या झिंज्या ओढुन ते पेपर्स मिळवतील.
सुष्मा शिकलेली दिसत्येय. आणि
सुष्मा शिकलेली दिसत्येय. आणि धिटुकली पण दाखवली आहे. जरा स्वभावात गोडी अस्ती तर बरं झालं असतं!
पण तुमकां खरी भिती काय आसा ?
पण तुमकां खरी भिती काय आसा ? आत्तां माईक कोण दिसता ह्येची कीं,
पुढे माकां कोण दिसतली, ह्येची !!
सरिता देवाजवळ दिवा लावून पुजा
सरिता देवाजवळ दिवा लावून पुजा करते. नाथा झाडाजवळ दिवा लावतो. इकडे देविकाचे वडिल अंगणात झाडू पडलेेला बघून वैतागतात व देविकाच्या आईला हाका मारतात. तेेवढ्यात देविका येेते व झाडू जागेवर ठेवते. तिचे वडिल म्हणतात, ही दुसर्या घरची लक्ष्मी होईल. पण हिच्या लग्नाला पैसा कसा उभा करायचा? मी जमिनीचा तुकडा विकतो. तिची आई सांगते की असे काही करायची गरज नाही तुम्ही बघाच मी काय करते ते. इकडे दत्ता म्हणतात की नेनेकाका कोर्टात खेचायची भाषा करतात ना, आपण पण बघून घेऊ. माधव सांगतात की त्यांचा संताप झाला आहे. दत्ता म्हणतात की मग आपण काही बर्फाची लादी डोक्यावर ठेऊन बसलो आहे का? माधव समजावतात की जे काही करायचे असेल ते कायद्याने करावे लागेल नाहीतर प्रकरण अंगाशी येईल. अभिराम म्हणतो की आपण ओरिजीनल कागदपत्र मिळवू शकतो, मी तालूक्याला जातो व त्या कागदपत्रांकरिता अप्लाय करतो. तेवढ्यात सरिता व पुर्वा येतात. दत्ता पुर्वाला चहा करायला लावतात. सरिता म्हणते की ही कोर्टकचेर्यांची कामं होतील पण घरात जे चाललयं त्याचं काय? इथे गॅस संपला असूनसुद्धा चहाचं आधण उकळत होतं, घरातील वस्तू गायब होताय. निलीमा खाली येते. ती म्हणते की ह्या सगळ्यापेक्षा माईंची तब्येत महत्वाची नाही का? सरिता पण म्हणते की त्यांना कोणीतरी दिसतंय जे आपल्याला दिसत नाही.
निलीमा समजावते की माईंना मानसिक धक्का बसलाय, त्यांनी मनात एक आकृती किंवा व्यक्ती तयार केलीय व त्या त्याच्याशी बोलतात. त्यांना उपचारांंची गरज आहेे. तेवढ्यात अभिरामला देविकाचा फोन येतो. तो तिला सांगतो की मला अभ्यास आहे. ती म्हणते की तुम्ही पुर्वीसारखे बोलत नाही भेटत नाही. आपण भेटायचे का? तो सांगतो की मी तालुक्याला जाणार आहे, प्राॅपर्टीचे कागदपत्र आणायचे आहे. ती विचारते की कुठली प्राॅपर्टी? ह्यावर तो चिडतो व फोन कट करतो. इकडे पांडू फाडलेले पेपर्स घेऊन येतो व सुषमाला देतो. ती म्हणते की चांगल काम केलंं व ज्यांनी वाईट कामं केेलयं त्यांना भोगाव लागेल. ती पांडूला पैसे देऊ बघते पण तो नाही म्ह्हणतो व निघून जातो. सुषमा सगळेे कागदपत्र जुुळवतेे व आनंदीत होते. ती विचारते की तू ही कागदपत्र मला दिली हे कोणाला सांगितले नाही ना? तो नाही म्हणतो. पांडू खाली येतो तेवढ्यात सरिता विचारते की कुठे गेला होतास? तो सुषमाला फाडलेले कागदपत्र दिले सांगतो. ती चिडते व आमचं खातो पण कामंं दुसर्यांची करतो म्हणून त्याला हाकलून देते.
सरिता यमुनाला नैवेद्याच्या वाटीविषयी विचारते पण ती मी घेतली नाही सांगते. सरिता वैतागते व म्हणते की नैवेद्याची वाटीपण जाते. इकडे निलीमा तिची सोन्याची चेन शोधते व माधवंना सांगते की सोन्याची चेन गेली. इकडे देविकाची आई सोन्याची चेन बोटात फिरवत असते. ती देविकाच्या गळ्याला चेन लावून म्हणते की किती चमकते आहे ना? इकडे सरिता डोक्याला हात लावून बसली असते. दत्ता तिला विचारतात की काय झालं ती सांगते की नैवेद्याची वाटी गेली, पुर्वाचं घड्याळ पण गेलं. तेवढ्यात माधवपण येतात व निलीमाची चेन हरवली आहे सांगतात. सरिता म्हणते की ही एवढीच वस्तू नाही गेलीयं. तेवढ्यात माई येतात व बडबड करतात. अभिराम तालूक्याला जायला निघतो. पुर्वा त्यला कामं सांगू बघते पण दत्ता तिला सांगतात की आज महत्वाचे काम आहे जमणार नाही. दत्ता त्याला पैसे देऊ बघतात पण तो म्हणतो की आहे. त्याच्या लक्षात येते की पाकिट विसरलो,आहे. तो पुर्वाला आणायला सांगतो पण तिला सापडत नाही. तो स्वत: जातो पण त्यालाही सापडत नाही. सरिता म्ह्हणते की हे सगळं तुमच्या काकाकडे जातयं आपल्या वस्तू त्यांच्याकडे जाताय व त्यांची भरभराट होतेय. अभिराम म्हणतो पाकिटात पाच हजार रूपये होते, मी तालूक्याला जात नाही. इकडे देविकाची आई देविकाला पाच हजार रूपये देते व म्हणते की तुझ्या लग्नाकरिता ठेव. ती हसते.
.
चाँग्+चिंग्+चँग्+सुसल्या+पांड
चाँग्+चिंग्+चँग्+सुसल्या+पांडु हे पांचजन्य मिळुन गोंधळ घालतायत, यांच्यात ती यमुना ( सौ. नाथा) पण सामिल आहे.
हो रश्मी, असंच वाटतंय!
हो रश्मी, असंच वाटतंय!
हाय़ला।।
हाय़ला।।
हे लोक कोकणात प्रसिध असलेले
हे लोक कोकणात प्रसिध असलेले सगळे जादु टोन्याचे प्रकार या सिरिअल मधे दखवनार आहेत वाटत एक एक करुन
राखेचा ही शैक्षणिक मालिका
राखेचा ही शैक्षणिक मालिका आहे. यात आपल्याला काळी जादू, भुतांचे प्रकार, उतारे, त्याचे विधी आणि कोकणी भाषा याबद्दल शिकावयास मिळते.
मालिका संपल्यानंतर परीक्षा घेण्यात येणार असेल. नापास झालेल्यांकडून मालिकेचा खर्च वसूल करण्यात येईल. तेव्हां मन लावून पहा. अभ्यास करा. उत्तरे तयार ठेवा.
राखेचा ही शैक्षणिक मालिका
राखेचा ही शैक्षणिक मालिका आहे>>>>>:हाहा: हो, मग यात वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक पुढीलप्रमाणे
दत्ता- कृषी, भूगर्भ शास्त्र
सरीता- होम सायन्स
निलीमा- फिजीक्स, रसायन
माधव- भाषा
अभिराम- भूगोल
पूर्वा- वॅल्यु एज्युकेशन
माई- इतिहास
अर्चिस- क्रिमिनॉलॉजी
गणेश- जादू टोणा, टोटके, भानामती, देव-देवस्की
नाथा- कृषी,
यमुना- हातचलाखी, चौर्य शास्त्र
सुसल्या- ब्युटी पार्लर, इतर सर्वांगीण कला
देविका- नाटक, अभिनय शिकवणे
देविकाची आई- होमगार्ड
देविकाचे वडिल- होमगार्ड २
नेने वकिल- ऑफकोर्स कायदा शिक्षण
गुरव- देवदेवस्की, यज्ञ- याग
ती देविका अभिरामकडून सगळी
ती देविका अभिरामकडून सगळी माहिती घ्यायलाच फोन करत असते किंवा भेटत असते का? कालपण अभिराम सांगतो तिला तालुक्याला जाणार कामासाठी ते. ती फार चौकशा करते.
सगळेे प्रतिसाद एकदम धमाल.
सगळेे प्रतिसाद एकदम धमाल. भाऊकाका व्यंगचित्र मस्त
ती देविका अभिरामकडून सगळी
ती देविका अभिरामकडून सगळी माहिती घ्यायलाच फोन करत असते किंवा भेटत असते का? >>>येस्स! म्हणून तिला निलीमाची सोन्याची चेन, छायाचा बाहुला, अभिरामचे पाच हजार मिळतात. पण हे मिळतात कसे? घराला चोर दरवाजा असला तरी नेऊन देणार कोण? यमुना? शक्यता नाकारता येत नाही, कारण एकदा यमुना, भांड्यातली एक वाटी साडीच्या निर्यांमध्ये लपवताना दाखवलीय, म्हणजे चोरताना. काल नैवैद्याची वाटी पण गायब झालेली दाखवली.
आज माई बहुतेक सैराट स्टाईलमध्ये विहीरीत उडी मारणार आहेत.
रश्मी, विहिरीत उडी भन्नाट.
रश्मी, विहिरीत उडी भन्नाट.
भाऊकाका व्यचि मस्तच.
आज माई बहुतेक सैराट
आज माई बहुतेक सैराट स्टाईलमध्ये विहीरीत उडी मारणार आहेत.>>>>
<< आज माई बहुतेक सैराट
<< आज माई बहुतेक सैराट स्टाईलमध्ये विहीरीत उडी मारणार आहेत.>> सिरीयलच्या फिल्मचीं भेंडोळीं कवटाळून ?
माझी आये म्हणता "वायंगा" की
माझी आये म्हणता "वायंगा" की काय ता असता... त्या दुसरेचे घरात ठिवला की ते घरातली संपत्ती आपलेकडे आपसूक येता... सोप्पा नाय का??
हे लोक कोकणात प्रसिध असलेले
हे लोक कोकणात प्रसिध असलेले सगळे जादु टोन्याचे प्रकार या सिरिअल मधे दखवनार आहेत वाटत एक एक करुन
राखेचा ही शैक्षणिक मालिका आहे. यात आपल्याला काळी जादू, भुतांचे प्रकार, उतारे, त्याचे विधी आणि कोकणी भाषा याबद्दल शिकावयास मिळते. >>>+११११११११११
येस्स! म्हणून तिला निलीमाची सोन्याची चेन, छायाचा बाहुला, अभिरामचे पाच हजार मिळतात. पण हे मिळतात कसे? >>>>:अओ: असं पण झालंय????
रश्मी तै ,तां पांडु काय्य
रश्मी तै ,तां पांडु काय्य शिकवतां?
<< "वायंगा" की काय ता
<< "वायंगा" की काय ता असता... त्या दुसरेचे घरात ठिवला की ते घरातली संपत्ती आपलेकडे आपसूक येता >> दुसर्याच्या घरातच कित्याक, बँकातय 'वायंगा' ठेवलेलां चलता; मल्ल्याक इचारा !
घरातच कित्याक, बँकातय
घरातच कित्याक, बँकातय 'वायंगा' ठेवलेलां चलता; मल्ल्याक इचारा ! डोळा मारा >>>
+१
रश्मी तै ,तां पांडु काय्य
रश्मी तै ,तां पांडु काय्य शिकवतां?>>> लाफ्टरक्लब गुरू??
रश्मी तै ,तां पांडु काय्य
रश्मी तै ,तां पांडु काय्य शिकवतां?>>>>>>अर्र! इसरलयं!:फिदी: पांडुला आपण विस्मरणाचे फायदे आणी उपचार यावर प्रवचन द्यायला लावुया.:फिदी: पण मग तो इसरलयं असे म्हणून हसत बसेल.:खोखो:
रश्मी तै ,तां पांडु काय्य
रश्मी तै ,तां पांडु काय्य शिकवतां?>>> लाफ्टरक्लब गुरू??>>>>> भगवती
हे माझ्या डोक्यात आलेच नव्हते, इसरलयं!:फिदी:
हॅ..हॅ....हॅ....इसरलयं
हॅ..हॅ....हॅ....इसरलयं ...माका बनवल्यान ना लाफ्टरक्लब गुरू?...माका काय माहीत नाय तां...खाउचा की पिउचा तां...हॅ...हॅ
Pages