आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
माईन्ची अॅक्टिग छान आहे.
माईन्ची अॅक्टिग छान आहे. चेहर्यावर मस्त एक्स्प्रेशन्स आहेत.
सुरुवातीला माई खोलीत छाया
सुरुवातीला माई खोलीत छाया बरोबर असताना बडबड करत असतात. छाया सगळ्यांना बोलावून आणते तेव्हा सगळे दारात येऊन थांबतात. आता माई त्यांच्या कडे बघत बडबड करु लागतात. अचानक तांब्या घेऊन दाराकडे धावतात, तेव्हा त्यांची ही रिअक्शन पाहून त्याच दारात थांबलेले सरिता, छाया वगैरे शूरवीर, दत्ता-माधव.... कोण्णी-कोण्णी अज्जिब्बात घाबरत नाहीत. का??? त्यांना आधीच माहित असतं की माई थेट बाहेर म्हणजे घराबाहेर पळत जाणार. आपल्याला नाही मारणार तो तांब्या. बर त्या बाहेर जाऊन इमाने इतबारे पांडू बरोबर आपले डायलॉग म्हणत असताना सुद्धा पण हे लोक बाहेर येत नाहीत. पांडूला जेवायला वाढ असा आदेश दिल्यानंतर मग दिग्दर्शक अॅक्शन म्हणतो आणि मग सरिता बाहेर येते ! आहे की नाही कमाल !
झीच्या इतर सिरियल्स रविवारी
झीच्या इतर सिरियल्स रविवारी सुध्दा दाखवतात म्हणून मुद्दाम टीव्ही गाईड चेक केलं होतं. मला वाटतं रविवारी आठ्वड्याच्या सहा एपिसोडसचा रिपिट टेलिकास्ट होता. बरंय रविवारी दाखवत नाहीत ते. दुसर्या चॅनेलवर तरी काही पाहता येतं.
हो ना! माई अशा तांब्या घेऊन
हो ना! माई अशा तांब्या घेऊन बाहेर धावत सुटतात तर त्या कुठे जातायत ते बघण्यासाठी लगेच कोणीतरी त्यांच्या मागे गेले पाहिजे होते.. आणि इतक्या वेळानंतर पण ते लोक दाराच्या आतच बघत उभे राहतात माईंजवळ कोणी जातच नाही.
kapoche मस्त पोस्ट. लोक्स,
kapoche मस्त पोस्ट. लोक्स, प्रतिक्रियांबद्दल आभार
माधवाची डायरी आणि पूर्वाचं घड्याळ बहुतेक मागच्या दरवाज्याला ज्याने कडी लावली त्याने (सुशल्या, पांडू किंवा देविका) चोरलं असणार. जेव्हा निलीमाला शोधायला हे सगळे लोक बाहेर पडले तेव्हा. पण का? त्यांच्यावर करणी केली असं दाखवायला? म्हणजे आता हे दोघं वेड्यासारखे करणार का? कालचा माईंचा हिस्टेरिया अतिताणाने आलेला असणार. हिप्नोटीझम असू शकतो का? डायरी आणि घड्याळ देविकाकडे सापडलं नाही म्हणजे मिळवलं. काल निलीमा ठोंब्यासारखी माईकडे बघत उभी होती. डोक्यात जाते अगदी! एक तांब्याभर गार पाणी ओतायचे ना डोक्यावर म्हणजे शुद्धीत आल्या असत्या. त्यांना कसली गोळी देणार होती काय माहीत. हिचं नाव 'गोळीवाली बाई' ठेवायला पाहिजे. मला तर वाटत होतं की पान्डोबाला माईकडून तांब्याचा प्रसाद मिळणार डोक्यावर.
ह्या घरात सगळीकडे कॅमेरे लावल्याशिवाय हे कोडं सुटेल असं वाटत नाही.
मला तर त्या भूतिणीची काळजी वाटतेय.....साडी तर इथे सोडुन गेली म्हणजे आता त्या दुनियेत साडीशिवायच???
माधवाची डायरी गायबली अन
माधवाची डायरी गायबली
अन पूर्वाचो घड्याळ
अभिरामाक श्वेतांबरा दिसली
माईना खूळ लागल्यान
येव्हढं सगळं होऊनसुध्दा
सायंटीस्ट बाई मख्ख
आणि राखेचाचे प्रेक्षक करताहेत
रायटर पांडूच्या नावाने शंख
गोळाक्का पण चालेल.
गोळाक्का पण चालेल.
मित सही पकड्या. मलाही तेच
मित सही पकड्या.:स्मित: मलाही तेच वाटले माई हातात तांब्या घेऊन पळत आल्यावर यांच्यापैकी एकजण तरी दचकेल. पण हे पाचीजण ( ठोकळा-ठोकळी, दत्ता-दत्ती, छाया) एकदम पांचजन्य शंखच आहेत.
स्वप्ना
कोकणातल्या कोणीतरी केस केलीये
कोकणातल्या कोणीतरी केस केलीये मालिकेवर... कोकणाची बदनामी करतायेत म्हणून.
कोकणाचीच काय हे लोक
कोकणाचीच काय हे लोक भुतन्चि पण बदनामी करतत म्हनुन भुतांका पण केस करुक होया...
<< कोकणाची बदनामी करतायेत
<< कोकणाची बदनामी करतायेत म्हणून.>> कोकण कसां काय बुवा बदनाम होता ? सिरीयलवाले बिचारे स्वतःचीच तर बदनामी करून घेतहत !!!
अजून एक गोष्ट कोणाला जाणवली
अजून एक गोष्ट कोणाला जाणवली का ? नायकांनी डझनाच्या हिशोबाने पॅराशूट तेलाच्या बाटल्या घेतल्या असणार. घरात जितकी फडताळं, कोनाडे आहेत, सगळी कडे १-१ बाटली तरी दिसतेच दिसते !
अजून एक गोष्ट कोणाला जाणवली
अजून एक गोष्ट कोणाला जाणवली का ? नायकांनी डझनाच्या हिशोबाने पॅराशूट तेलाच्या बाटल्या घेतल्या असणार. घरात जितकी फडताळं, कोनाडे आहेत, सगळी कडे १-१ बाटली तरी दिसतेच दिसते !>>>>> मियां तुका सांगतयं ना का प्रत्येकाक एक तरी बाटली नायतर लोणच्याचा सट स्पेशल पाहीजे.:खोखो: आणी प्रत्येक एपिसोड झाल्यावर जर ते इथे येऊन आपले प्रतीसाद वाचत असतील तर गरम झालेले डोके थंड करायला एकतरी तेलाची बॉटल हवीच.:खोखो: आणी तेलाचा परीणाम बघा. माईचे पण केस अजून तरी काळे हत.
मित बर्याच बारकाईने शिरेल
मित बर्याच बारकाईने शिरेल बघतात वाट्ट.
मी आपली माबोवर टीपी करत करत बघते त्यामुळे फडताळातल्या बाटल्या दिसल्या नाहीत.
आऊ, भाऊकाका..
आनि त्या केसची नका वगीच काळजी
आनि त्या केसची नका वगीच काळजी करूं ; नेने वकील 'मांडवली' करण्यातलो दादा माणूस आसा. बघा मिटवता कीं नाय तां सगळां आपापसांतच, अगदीं लागलांच तर गुरवाकय मधीं घालून !!!
काल पांच-दहा हजार भुतां
काल पांच-दहा हजार भुतां ओवाळून टाकूंची अशी
बॅटींग झाली रोहितची !!! >>> भाऊनु कंची भुतं ववाळनार असा तुमी , शिरेलीत इतक्या दिवसात एक भूत नाही . बाकी एक पांढरी साडी वाल दिसलं तेबी कुसळ ( बद्रीके ) निघालं ( लोकांच्या म्हणन्यानुसार ) , मग कंची धाग्यावली तर नाय ना !
ओ नाय ओ, त्या कुशलची कित्यांक
ओ नाय ओ, त्या कुशलची कित्यांक बदनामी करतावं? ती देविकाच असां.
निलीमाच्या रूममधल्या फडताळात
निलीमाच्या रूममधल्या फडताळात मला नेलपॉलिशच्या बाटल्या पण दिसल्या.
बाकी पांडूचा अभिनय मस्तच !
स्वप्ना धन्यवाद कालच्या
स्वप्ना धन्यवाद
कालच्या एपिसोडमधे माई तांब्या कि लोटा काहीतरी घेऊन बाहेर पळत जातात तेव्हां कुणीही मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या मागे धावत सुटले असते. पण सगळे एकमेकांच्या चेह-याकडे पाहत आता पुढे काय करायचे ? स्क्रीप्ट मिळालीय का भाऊ तुला ? अशा थाटात उभे होते. बहुतेक दिग्दर्शकाची झालेली अवस्था त्याने या प्रसंगातून सांगितलेली असावी. म्हणतात ना, इथे दिग्दर्शक दिसतो !!
डाक्टर म्हणाले,' ते आता
डाक्टर म्हणाले,' ते आता ठणठणीत आसत. होयां थंय फिरतीत. फक्त तुम्हीं
त्येंका " नाना " म्हणतास, म्हणानच ते उठांक अजिबात बघणत नाय !!!'
भाऊ नुसतच नाना नाsssssssssय,
भाऊ
नुसतच नाना नाsssssssssय, बेरी नाना.
भाऊ
भाऊ
(No subject)
भाउकाका ... टू मच !
भाउकाका ... टू मच !
(No subject)
भाऊकाका
भाऊकाका
मी बघितला मंगळवारचा भाग.
मी बघितला मंगळवारचा भाग. माईचा काहीतरी plan दिसतोय घरावरचे संकट निस्तरण्याचा. सॉलिड acting केली शकुंतला नरे यांनी.
माईचा काहीतरी plan दिसतोय
माईचा काहीतरी plan दिसतोय घरावरचे संकट निस्तरण्याचा.>>>> हे सगळे माई मुद्दामहून तर करत नसतिल ना सगळया नाईक family ला एकत्र आणण्यासाठि ?
भाउ

मला तर त्या भूतिणीची काळजी वाटतेय.....साडी तर इथे सोडुन गेली म्हणजे आता त्या दुनियेत साडीशिवायच???

नायकांनी डझनाच्या हिशोबाने पॅराशूट तेलाच्या बाटल्या घेतल्या असणार. घरात जितकी फडताळं, कोनाडे आहेत, सगळी कडे १-१ बाटली तरी दिसतेच दिसते ! >>>> बहुतेक पॅराशूट वाले sponsor असतील सिरियल चे,म्हणून ते पॅराशूट चि ad करत असावेत सिरियल मध्ये.:D
सरिता तिच्या कपाटात कपडे शोधत
सरिता तिच्या कपाटात कपडे शोधत असते. तेवढ्यात दत्ता येतात. ती सांगते की मी सगळे कपडेे इथेेच ठेवले होते पण सापडत नाहीत. आणि माईंचंं काय करायचे? त्या काहीबाही बरळत असतात. जास्त व्हायच्या आधीच उपाय करायला पाहिजे. दत्ता तिला अंगार्याची पुडी काढून सगळ्यांना लावायला सांगताात. ती म्हणते की उद्या मााधव भाऊजी मुंबईला निघून जातील. लोकं आपल्यालाच म्हणतील की तुम्ही नीट काळजी घेतली नाही. इकडे माधव अस्वस्थ असतात. ते म्हणतात की आजूबाजुला कोणीतरी आहे असा भास होतो. माईपण कोणाशीतरी बोलत असते. जणू कोणीतरी समोरच आहे. निलीमा त्यांना प्यायला पाणी देते. ती पुुढे म्हणते हे सगळं तुझ्या गोष्टींपर्यंत ठीक आहे पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर ते बरोबर नाही. माईंना एकापाठोपाठ होणार्या घटनांचा त्रास होतोय. अण्णा गेेले, त्यानंतर घडत असलेेल्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत पण त्याचे वेगवेगळे अर्थ मात्र लावले जात आहेत. माधव म्हणतात की आईला त्रास झालेला मला चालणार नाही. तिला आपण मुंबईला नेऊया. निलीमा सांगते की मलाही त्यांना काही झालेलं चालणार नाही. त्यांच्यावर योग्य उपचारांची गरज आहे पण त्यााआधी बाकी जे उपाय चाललेत ते थांबायला पाहिजे. सरिता अजूनही कपडे शोधत असतेे. दत्ता तिला चहा करायला सांगतात.
सरिता सांगते की जे चाललयं ते थांबायला हवं. दत्ता म्हणतात की मी करतोच आहे पण ती म्हणते की करायचे तर सुुषमाचे लग्न करा. इकडे अभिराम माईंना चहा आणून देतो. त्या त्याच्या अभ्यासाची चौकशी करतात व सांगतात की ह्यांची इच्छा होती की तूू खूूप मोठा साहेब व्हावसंं, ते नाहीत पण तू त्यांची इच्छा पुरी कर. तो म्हणतो की मी करतोय अभ्यास. त्या देवीकाविषयी विचारतात तर तो मला थोडा वेेळ हवा सांगतो. तेवढ्यात सुषमा खाली येते माई परत मानसिक संतूलन गमावतात व बडबडतात की तू तूझे केस मागे घे व जा इथून नाहीतर मााझ्याशी गाठ आहे. तेवढयात माधव पण येतात व माईंना काळजीने आराम करायला लावतात. त्या म्हणतात की मला काय झालयं?... जाते मी माझ्या खोलीत. अभिराम पण काळजीत पडतो पण माधव म्हणतात की आम्ही पण आहोत ना, तू नीट अभ्यास कर. इकडे दत्ता व सरिता येतात. दत्ता माधवंना सांगतात की सुषमाविषयी बोलायचे आहे.
बाहेर वकीलकाका येत असतात. सुषमा त्यांना वाटेतच अडवते व माझ्या आईचे दागिने अजून मिळााले नाही सांगते. त्यांचे बोलणे चालू असतांना निलीमा गॅलरीतून हे बघत असते. खाली सरिता सांगते की हे सगळंं सुषमामुळे होतय. तिची आईपण इथेच आहे. तिचे काहीतरी करायला पाहिजे. तेवढ्यात निलीमा येते व सांगते की तुम्ही इथे बोलत बसलाय पण बाहेर सुषमा वकिलकाकांशी बोलतेय. हे ऐकून दत्ता म्हणतात की तिनेे
फोन लावला असेल वगैरे. त्यांचे आधीच बोलणे झाले असेल. निलीमा सांगते की आपण त्यांच्याशी बोलूया, सुषमाला पण बोलवा. माधव त्यांना बोलवूून आणतात व सरिताला चहा करायला लावतात पण ती नकार देते मग निलीमा म्हणते की मी करते चहा व ती आत जाते. सरिता पण तिच्यामागे आत जाते. ती चहाचं आधण ठेवते पण गॅस संपतो. तेवढ्यात गॅस बंद असला तरी पाणी उकळू लागतेे. निलीमा पण आश्चर्यचकित होते. माई तिकडे बघून दरडावतात की तू इथे का बसली आहेस? तूूला जाळून खाक करेन वगैरे.
भगवती.... ~ मी पाहिला आहे हा
भगवती....
~ मी पाहिला आहे हा भाग....आणि आता तुझ्या अहवालावरून पुन्हा सारे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले. "निलीमा पण आश्चर्यचकित होते..." असे तू लिहिले आहेस. त्यावेळी आता निलीमाचा वैज्ञानिक दृष्टिकोण आणि त्या प्रसंगाला अनुसरून ती काय प्रतिक्रिया व्यक्त करेल याबाबत मला उत्सुकता होती. पण ते कदाचित आज दाखविले जाईल. तरीही गॅस बंद असतानाही त्यावर ठेवलेले चहाचे पाणी झरझर उकळू कसे लागले ? हा प्रसंग निलीमाच्या उपस्थितीतच (खरे तर निलीमाच चहा करायला आलेली असते) घडल्यामुळे या मागील तर्कसंगती ती कशी लावेल याबद्दल प्रेक्षकवर्ग वाट पाहात राहील.
Pages