आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
धन्यवाद भगवती!!! मी मिसला
धन्यवाद भगवती!!!
मी मिसला होता कालचा भाग.
एपिसोड चुकला तरी तुझ्या भरवशावर मी निर्धास्त असते. एकही डिटेल चुकत नाही. नंतर चा भाग पाहाताना आपण कालचा भाग पाहिलाच नव्हता हे अजिबातच जाणवत नाही.
<< पण ते कदाचित आज दाखविले
<< पण ते कदाचित आज दाखविले जाईल. तरीही गॅस बंद असतानाही त्यावर ठेवलेले चहाचे पाणी झरझर उकळू कसे लागले ? >> अशोकजी, अशी आशा आपण जरूर करूंया. पण आतांपर्यंतचा अनुभव तरी असा आहे कीं पुढच्या भागांत मागच्या भागातल्या प्रश्नांचीं उत्तरं नाहींच मिळत; उलट, असं कांहीं आपण दाखवलं होतं याचं भानही सिरीयलवाल्याना असल्याचं जाणवत नाहीं !
मोठ्या कौतुकाने बघत असे ही मालिका पण काय, ' भंरवशाच्या म्हशीक टोणगो !"
ह्या सिरीयलीचे गमकः-
ह्या सिरीयलीचे गमकः- कानगोष्टी. आणी पांडु आला की मज्जा असते आणी पांडु नसला की मज्जा नसते.
निलीमाचे काही डायलॉगः-
निलीमाचे काही डायलॉगः- (प्रत्येक भागात यातला फक्त एखादाच वगळायची मुभा आहे)
१. हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे
२. माधव तू सुद्धा !
३. असं काही नसतं..
४. ही अंधश्रद्धा आहे
५. सुषमाला सुद्धा बोलवा
६. माझ्या मुलाला या सगळ्यात ओढू नका
७. मी गोळी देते !
रच्याकने , काल पहिल्याच सीन
रच्याकने , काल पहिल्याच सीन मधे दत्ताच्यापाठीमागे पॅराशूटची बाटली दिसली
मित सरीताचे डॉयलॉग - हे जा
मित
सरीताचे डॉयलॉग - हे जा काय चल्लाहा ते तुमी बघताव ना.
जाऊ बाय तुमी विश्वास ठेवा न ठेवा.
रश्मी, 'तुमाक काय पटुचा
रश्मी, 'तुमाक काय पटुचा नाय.' पण.
या सिरीअलीत प्रत्येकाचे
या सिरीअलीत प्रत्येकाचे सिग्नेचर डायलॉग्स आहेत.
पूर्वा - काका/काकी/आर्चिस बरोबर बोलतोय.
चहा आणू का?
पांडू अरे काय बोलतोयस?
वकील - अण्णांच्या इछ्छेनुसार....
वहिनी मी समजू शकतो.
दत्ता/ सरिता- काहीतरी करूक व्हया
देविका - काय झालं ? घरी काही बोलले का?
दोन डायलॉग ना मात्र तोड
दोन डायलॉग ना मात्र तोड नाही:-
बेरी नाना: (हवेत हातवारे करत) घेऊन जा.... घेऊन जा...
पांडू: (त्याच्या स्टाईल ने हासत) काय तां... इसरलंय..
इसरलंय.. >>> मस्तच आहे. पांडु
इसरलंय.. >>> मस्तच आहे. पांडु बेस्ट.
माधव - अगं / अरे, हो हो
माधव - अगं / अरे, हो हो हो..... हो !
अंजली पर्फेक्ट मित, नानांचा
अंजली पर्फेक्ट
मित, नानांचा अजून एक डॉयलॉग आहे.
नाना- असं डोळे वटारुन कित्यांक बघतावं.
इसरलयं- पांडु मात्र भारी.
पांडू- काय ता? ता माका काय
पांडू- काय ता? ता माका काय माहित. इसरलय..
पांडू माका लय आवडता...
भाऊ.... "...पुढच्या भागांत
भाऊ....
"...पुढच्या भागांत मागच्या भागातल्या प्रश्नांचीं उत्तरं नाहींच मिळत....".
~ अगदी अगदी. दिग्दर्शक आणि भागाचे जे कुणी लेखक वा लेखिका असतील त्यांच्या ध्यानी मनी आपण काल शेवट काय केला होता त्याच्या संदर्भाने आजच्या भागात काहीतरी कथानकाची जोडणी म्हणून दाखविणे गरजेचे आहे, ही बाब हे लोक पूर्णपणे विसरून गेलेले दिसत्ये. त्या उलट्या पायांच्या ठशांचे रहस्य....छाया गावात भटकताना दिसणे....नंतर ती घरातच आहे हे पाहाणे....बाहुला जमिनीत पुरताना लहान मुलासारख्या त्या गठुड्याच्या हालचाली....तोच बाहुला नंतर नार्वेकरांच्या भिंतीला अडकवून ठेवणे....घरावर दगडांचा वर्षाव....निलीमाला पांढर्या साडीतील स्त्री दिसणे....आणि काल तर तिने ते बंद शेगडीवर उकळी फुटलेले पाणी पाहाणे.....या बाबी याना किरकोळ कशा काय वाटू शकतात ? असे प्रश्न समोर येतात पण याचे उत्तर आपल्याला मिळणार नाही हे तर उघडच आहे.
निलिमा : हे काय चाललयं माधव
निलिमा : हे काय चाललयं माधव ??
मी गोळी देते !<<<< लॉलच...
मी गोळी देते !<<<< लॉलच...
चुकून माकून जर 'आप की अदालत'
चुकून माकून जर 'आप की अदालत' मधे राखेचा वाली लोकं गेली आणि
त्याच वेळी प्रश्न विचारायला प्रेक्षकांमधे माबो वरची या धाग्यावरची लोकं असली,
तर ह्यांचा काय खरा नाय
डबल पोस्ट
डबल पोस्ट
माधव - द्त्ता ... शांत हो
माधव - द्त्ता ... शांत हो ....
प्रत्येक वेळी तो हा डॉयलॉग बोलतो...
G

ठोच्या ड्रेस चा रंग किचन
ठोच्या ड्रेस चा रंग किचन मध्ये येईतो बदलला......
(No subject)
एपिसोड चुकला तरी तुझ्या
एपिसोड चुकला तरी तुझ्या भरवशावर मी निर्धास्त असते. एकही डिटेल चुकत नाही. नंतर चा भाग पाहाताना आपण कालचा भाग पाहिलाच नव्हता हे अजिबातच जाणवत नाही. >> +१११११११११
मामा शेवटच्या भागाशिवाय
मामा शेवटच्या भागाशिवाय उत्तरं मिळायची नाहीत.
माई, दत्ता, पांडू, सरिता अॅक्टींगमधे बेस्ट. पांडू मज्जा आणतो. कालपासून मालिका बघावी का विचार करतेय. वेगवान होईल बहुतेक असं उगाच वाटतंय.
एक वेडी आशा.... नाईकांचा काय
एक वेडी आशा....
नाईकांचा काय भरवसा नाऽऽऽऽय्य!
ह्म्म्म खरं आहे संशोधक.
ह्म्म्म खरं आहे संशोधक. म्हणून फक्त विचार करतेय, निश्चय नाही केला बघायचा.
गोळाक्का लय भारी!
गोळाक्का
लय भारी!
>> तेवढ्यात सुषमा खाली येते
>> तेवढ्यात सुषमा खाली येते माई परत मानसिक संतूलन गमावतात व बडबडतात की तू तूझे केस मागे घे व जा इथून नाहीतर मााझ्याशी गाठ आहे
त्या म्हणतात की तिच्या मागे कशाला उभी आहेस. मग त्या पुढे पण कायतरी बोलतात. मला तर 'बघ कशी तोंडावर तेज घेऊन उभी आहे' असं ऐकायला आलं तर आईला 'तेज' ऐवजी 'केस' ऐकायला आलं. आणि मग सुषल्यासुध्दा मागे वळून बघते.
कापडं म्हणजे काय? साड्या
कापडं म्हणजे काय? साड्या हरवल्या का सरिताच्या? प्रत्येकाच्या खोलीत कॅमेरे लावा रे आता. काल सरिता दत्तासमोर त्याच्या आईला चक्क 'म्हातारी' म्हणाली. खेड्यात आईवडिलांचा उल्लेख म्हातारा/म्हातारी करतात ठाऊक आहे पण असा उल्लेख आधी आला नव्हता म्हणून मला वाटलं दत्ता खवळणार. पण त्याचं काहीतरी दुसरंच. तो सुषल्या ह्यांना सगळ्यांना पुरून उरलाय. तो काय ह्यांनी ठरवलेल्या माणसाशी लग्न करणार. दत्ता, माधव ह्यांचीच दुसरी लग्नं लावेल तो. बाकी कालचं माधवचं 'दत्ता, शांत शांत' ऐकून 'शांत गदाधारी भीम शांत' आठवून खांद्यावर गदा घेतलेला दत्ता डोळ्यासमोर येऊन भयंकर हसू येत होतं. त्या माधवला चांगले डायलॉग दया रे. माई गॅसकडे टवकारून बघत होत्या तेव्हा ह्या आता नजरेने गॅस पेटवतात का काय असं वाटलं. 'बिडी जलई ले' चं आठवलं एकदम. शेखर सुमन आणि त्याची बायको ही सिरियल बघतात वाटतं. काल कुठल्याश्या चॅनेलवर कंगना जादूटोणा करते. आणि त्यांच्या मुलाच्या डेस्कमध्ये सुपारी आणि धागे मिळाले असं काहीतरी म्हणत होते.
डायरी, घड्याळ, सरिताच्या साड्या सगळं गायब होतंय. नाना का नाही गायब होत?
काल निलीमाला स्वयंपाकघरात
काल निलीमाला स्वयंपाकघरात बघून माधवसाठी उखाणा सुचला:
पांढऱ्या साडीतल्या बाईला तीन मुंडकी उलटे पाय
निलीमा किचनमध्ये कशी, लॅपटोप बंद पडला काय
बाकी गॅसशिवाय पाणी उकळताना पाहून असं शास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे का म्हणून नेटवर सर्च मारला तेव्हा निर्वात (vaccum) भांड्यात रूम टेम्परेचरला ठेवलेलं पाणी हवा काढून घेतली तर उकळतं असं काहीसं वाचायला मिळालं. ह्यात पुर्वाचा हात नसेल ना? इथे कोणी फिजिक्सचे स्टुडन्ट आहेत का?
मित, झकास. गेस>>>>> ह्या कोण
मित, झकास.
गेस>>>>> ह्या कोण बरां म्हणून विचार करेपर्यंत लक्षात आयला.गॅस असा म्हणून.
Pages