आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
<< सावत्र बहीण ना ती माधवची .
<< सावत्र बहीण ना ती माधवची . एकतर त्यो लेखक खुळ्या**** आणि तुम्हीपण त्याची री ओढताय .>> राहुलजी, आजचो एपिसोड बघलास ? शेवंता बदनाम झालां, तिकां जीवय देवचो लागलो अण्णांमुळे. बरोबर ? आतांय 'जेनेटीकली' सुषमात तिच्ये गुण/अवगुण इले असतले म्हणान सुषमाकय जर निलीमा बदनाम करत असलां, तर अण्णांचो तो 'जेनेटीक' वारसोय माधवाकडे इलो असतलो, ह्यां तिच्या/लेखक पांडूच्या लक्षांत आणून देवक नको ? निदान आमच्या ह्यां लक्षांत इलां आनी आमकां तां खटाकलां ह्यां म्हणाक नको ? ह्येच्यात निलीमाची किंवा लेखक पांडूची री ओढण्याचो काय संबंध ?
काका , अग्रीड
काका , अग्रीड
निलीमा लॅपटाॅपवर काम करत
निलीमा लॅपटाॅपवर काम करत असते. अर्चिस खिडकीबाहेर बघत असतो. निलीमा पण खिडकीबाहेर बघते व माधवंना हाका मारते. अर्चिस म्हणतो की ती सुषमा आहे ना? निलीमा त्याला दुर्लक्ष करायला लावते. माधव येतात, निलीमा त्यांना सुषमापासून दूर रहायला सांगते. ती सांगते की सुषमा चांगली असेलही पण तिच्या डोळ्यात मला सुडाची भावना दिसते. तिच्यात तिच्या आईचे गुण उतरले आहेत. तेवढ्यात माधवंना, माई व दत्ता सुषमाला लग्नाला उभं करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकल्याचे आठवतात. इकडे यमुना नाथाला सांगते की सुषमा घराचा ताबा मिळवणारच. ती तिच्या आईसारखी नटली होती. नाथा सांगतो की तिचा बंदोबस्त करायलाच पाहिजे, नाहीतर तिचं म्हणणंं खर होईल की माझ्याकरिता कोणीतरी खड्डा खणत आहे. सरिता तिच्या खोलीत चादरीच्या घड्या करत असते. दत्ता येतात, ती दत्तांना सांगते की तुम्ही खूप छान केेलत की माधवभाऊजींना सुषमाच्या लग्नाची जबाबदारी दिली. बाहेर नाथा त्यांचंं दार वाजवतो.
दत्ता बाहेर येतात. नाथा सांगतो की सुषमाचा बंदोबस्त करायला पाहिजे नाहीतर गळ्याशी येईल. इकडे यमुना पाणी भरून आणते तर सरिता तिला विचारते की तू सारखी सुषमाकडे का जाते? ती सांगते की सुषमा आमच्याकडेच राहत होती व आता बघा कशी वागतेे, ती साडी नेसली होती. घरात आहेे तर बरयंं पण गावात फिरली तर नको ते ऐकू येईल, जरा जपून. बाहेर अर्चिस व पुर्वा सुषमाने नेसलेल्या साडीविषयी बोलत असतात. गणेश म्हणतो की ती तिच्या आईशी बोलत असते वगैरे. इतक्यात पांडू येतो व पोहे केले ना विचारतो व खायला साधे पोहे मागतो.
सुषमा येते, गणेश म्हणतो की मी तुझ्या जून्या घरी गेलो होतो कारण इथून गेल्यावर रहायची व्यवस्था नव्हती.
तो सांगतो की त्या घरात तुझ्या आईचा फोटो आहे. तू पण तिच्यासारखीच दिसते. तो तिला पिशवी देतो. त्यात तिच्या आईता पानाचा डबाा असतो. ती गणेशचे आभार मानते व पांडूला पानसुपारी आणायला सांगते. ती घरात येते तर माधव विचारतात की हातात काय आहे? ती सांगते की माझ्या आईचा पानाचा डबा आहेे. ती त्यांना सुपारी देते. ते सांगतात की मला लिहीण्याशिवाय दुसरं कुठलं व्यसन नाही, पण ते सुपारी घेतात व त्यांची कथा थोडक्यात सांगायला जातात पण ती म्हणते की मला अश्या गोष्टी आवडत नाहीत. ते दोघे हसत असतात तेवढ्यात निलीमा येते. हे बघून सुषमा निघून जाते. निलीमा खूप चिडते व सुषमाशी का बोललात? विचारते. इतक्यात दत्ता येतात व निलीमाची बाजू घेतात. सुषमा निघून जाते. दत्ता निलीमाची बाजू घेतात. माधव सांगतात की तिच्याशी मैत्री करून मग लग्नाचा विषय काढता येईल सांगतात. सरिता त्यांना तुम्ही हे काम कारालच व तुम्हाला केलचं पाहिजे सांगते. तेवढ्यात गावचे लोकं येतात व गावात लोकांनी शेवंता दिसली सांगतात.
काल आम्ही गप्पा मारत असताना
काल आम्ही गप्पा मारत असताना नवरा म्हणाला "आत्तापर्यंत १४० एपिसोड्स झाले असतील या मालिकेचे प्रत्येक भागात काही ना काही मिस्ट्री घडवलेली आहे पण अजुनपर्यंत एकही सॉल्व्ह नाही केलेली." घरी बघता येत नाही त्यामुळे तो यु ट्युबवर बघतो.
<< या मालिकेचे प्रत्येक भागात
<< या मालिकेचे प्रत्येक भागात काही ना काही मिस्ट्री घडवलेली आहे पण अजुनपर्यंत एकही सॉल्व्ह नाही >> म्हणानच हीकां " अनुत्तरित प्रश्नांची मालिका " म्हनतत !!
वेळ आली तर शेवंताचा कॅरेक्टर
वेळ आली तर शेवंताचा कॅरेक्टर पण सुसल्याच करणार बहुतेक.>>>> हे भाकीत खर ठरल. ती शेवन्ता सुषमासार खी दिसत होती. म्हणजे त्या त्या दोन दोन सुषमा दाखवत होत्या त्यातली एक शेवन्ता होती कि काय?:अओ:
कपाटातलो काढून तुमचो सिल्कचो
कपाटातलो काढून तुमचो सिल्कचो झब्बो, सरवार, फरची टोपी, राजस्थानी मुजड्यो आणि अत्तरां,
सगळां तयार ठेवा... गांवात म्हनतत फिरत असता परत तां शेवंता !!!
(No subject)
(No subject)
डबल पोस्ट
डबल पोस्ट
(No subject)
भाऊकाका.. आणि शेवंताक
भाऊकाका..
आणि शेवंताक गजरो पण आवडताहा. 
विराटच्या सणसणीत बॅटींगच्या
विराटच्या सणसणीत बॅटींगच्या मोहापायी आजचो भाग मिसलय.
<< आणि शेवंताक गजरो पण
<< आणि शेवंताक गजरो पण आवडताहा.>> पन तो मात्र कपाटात ठेवलेलो नाय हां !!

<< विराटच्या सणसणीत बॅटींगच्या मोहापायी आजचो भाग मिसलय.>> सेम हिअर ! पाऊसय थांबलो तां बघूंक तर आपलां काय घेवन बसलास ! सिंप्ली ग्रेट !! गुरवाक सांगाक होयां विराटची दृष्ट काढूंक !!
गावकरी नाईकांच्या घरासमोर उभे
गावकरी नाईकांच्या घरासमोर उभे असतात आणि सांगतात की गावात शेवंता दिसली. सरिता म्हणते की ती आता घरात येणार. दत्ता तिला गप्प रहायला सांगतात. माधव म्हणतात की हे कसे शक्य आहे? तिने तर झाडाला लटकून जिव दिला. गावकरी सांगतात की तुमच्या घरात काय चालले आहे हे आम्हाला कळतयं म्हणून सांगायला आलो की काळजी घ्या. माधव सांगतात की मला हे खरं वाटत नाही पण तुम्ही आलात, तुमचे खूप आभार. चहा घेणार का? ते नाही म्हणतात व काळजी घ्या सांगून निघून जातात. माई आत येतात व डोक्याला हात लावून बसतात. सरिता सांगते की ती इथेच आहे. तिने आधी मुलीला पाठवलं आता ती येणार. दत्ता म्हणतात की त्याआधीच सुषमाला घराबाहेर काढायचं. माई माधवंना सुषमाला लग्नाकरिता तयार करायला सांगतात. ते म्हणतात की मी करेल पण निलीमाला आवडणार नाही पण मी बोलेन सुषमाशी. ते खोलीत येतात तर निलीमा चिडलेेली असतेे व खोलीत येरझार्या मारत असते. ती सांगते की मी नाही सांगितले तरीही तुम्ही सुषमाशी थट्टा मस्करी करताय. ती शेवंताची मुलगी आहे. तिच्यात तिच्या आईचे गूण आले असतीलच.
माधव सांगतात की तूू समाजकार्य करतेस आणि तू असं बोलतेस? ती सांगते की मी अनाथ मुलींना दिशा दाखवण्याचा प्रयत्न करते. पण हिने आधीच तिच्या आयुष्यात काय करायचे ते ठरवले आहे. तिच्या डोळ्यात मी सुडाची भावना बघितली आहे. ती काहीही करू शकते. ती छायाच्या लग्नाविषयी घरच्यांशी कधी बोलणार विचारते. इकडे सरिता स्वयंपाक करत असते तर छाया जेवण तयार आहे का विचारते. सरिता चिडते व तुम्ही काय करताय ते सगळं माहित आहे. मी, अभिराम व अर्चिसने पण तुम्हाला बघितले आहे. या घराचंं नाव खराब करता आहात. माई येतात व त्यांना भांडू नका सांगतात पण सरिता सांगते की मी सोक्षमोक्षच लावते. माधव भांडणाचा आवाज ऐकून खाली जायला निघतात पण निलीमा सांगते की तुम्हाला ह्या भांडणाचे कारण माहित आहे. तिचे लग्न लानून दिले की हे वाद आपोआप बंद होतील. अभिराम व अर्चिस येतात. सरिता विचारते की तुम्ही छायाला बाहेर बघितलेत का? अर्चिस सांगतो की मला भास झालाा असेल. छाया म्हणते की मला घरातून बाहेर काढायचे आहे ह्यांना म्हणून असेे बोलताय.
अभिराम सांगतो की मी बघितले आहे छायाला. सरिता म्हणते की मी त्यांना एका मुलाबरोबर हातात हात घालून बोलतांना बघितले आहे. गावात चर्चा झाली की तर तर कठीण होईल सगळं. माई छायाला हे खरं आहे का विचारतात. ती गप्प बसते तर माई चिडून तिला कानशीलात मारतात. ती रडत रडत नानांकडे जाते व सांगते ह्या लोकांना मी नकोय म्हणून हे असे वागतायं. तुम्ही मला दिलेली बाहूली पण ह्यांनी काढून घेतली. तुम्ही अात्ता खाली चला व त्यांना बोला. रात्री माधव नानांना बघायला बाहेर येतात तर सुषमा पान लावत असते. ती त्यांना पान खायला देते व सांगते की तुम्ही खूप चांगले आहात, नाहीतर माझ्याशी कोणी बोलत नाही. माधवंना पान खाऊन गरगरतंं व ते खाली बसतात. ते विचारतात की तू एकटी आहेेस, तूला भिती नाही वाटत का? आपलं कोणी असावं असे नाही वाटत? ती सांगते की आई गेल्यावर मी तशी एकटीच. यमुनाने व नाथाने फक्त रहायला दिलेे. आता कोण होणार आपलं, मी अशीच बरी आहे. तेवढ्यात निलीमा येते व माधवंना असे बसलेले बघून सुषमाकडे रागाने बघते. सुषमा तिच्याकडे बेरक्या नजरेने बघताना हसते.
ती शेवंताची मुलगी आहे.
ती शेवंताची मुलगी आहे. तिच्यात तिच्या आईचे गूण आले असतीलच.> हे निलीमा म्हणते का? पण माधवमधेही आण्णांचे गुण आलेच असतील की मग !
हो, हेे निलीमा म्हणते.
हो, हेे निलीमा म्हणते.
माधवमध्ये अण्णांचे गुण असणार
माधवमध्ये अण्णांचे गुण असणार म्हणून नीलिमा मनातून घाबरत असेलना. तिला नवऱ्याबद्दल आणि माधवला स्वतः बद्दल कॉन्फीडन्स नाहीये.
बायको नवऱ्याला बायको - काय
बायको नवऱ्याला
बायको - काय हो तुम्ही जेव्हा माका बघुक इल्लास तेव्हा मी कुठल्या रंगाची साडी घातलंलय काय आठवता की नाय तुमका?
नवरा- नाय गो बाय, आणि आत्महत्या करुची वेळ इली कि कोण बघता
येणारी ट्रेन बोरीवली हा कि विरार ?
गुरवाक सांगाक होयां विराटची
गुरवाक सांगाक होयां विराटची दृष्ट काढूंक !! >> +१.
<< ... कि कोण बघता येणारी
<< ... कि कोण बघता
येणारी ट्रेन बोरीवली हा कि विरार ? >>
देविका आजकाल दिसत नाही.
देविका आजकाल दिसत नाही.
निलीमा माधवंना बघायला बाहेर
निलीमा माधवंना बघायला बाहेर येते तर ते सुषमाच्या पायाशी बेेशूद्ध झाले असतात. ती त्यांना हाका मारते, हलवते पण ते प्रतिसाद देत नाहीत. सुषमा विचारते की त्यांना पान खायची सवयंं नाही का? व त्यांना उठायला मदत करते पण निलीमा सांगते आम्ही बघून घेऊ. अर्चिस, दत्ता, सरिता व माई बाहेर येतात. निलीमा त्यांना सांगते की तिने ह्यांना पान खायला दिले. दत्ता सुषमावर खूप चिडतात व पानात काय टाकलं होतं विचारतात. माई चिडून म्हणतात की तू माझ्या मुलांचे वाट्टोळे करू बघतेय, हा डाव आहे तुझा. त्या दत्तांना सांगतात की रघूकाका म्हणत होते की ह्या घराच्या वााईटावर जे काणी आहे ती ह्या घरातच आहे, ती सुषमाच आहे आणि आपण उगाच छायावर संशय घेत होतो. इकडे गणेश छायाला भेटायला येतो. ती खालीच जात असते पण तो तिला नको जाऊ म्हणतो व कशी आहेस विचारतो. ती सांगते की मी बरी आहे माझ्याशी बोलायला कोणाला वेळ नसतो. माझा बाहूलापण काढून घेतला. खाली माई म्हणतात सुषमाला घरातून काढायला हवं. आतल्या खोलीत अर्चिस व निलीमा माधवंना गादीवर झोपवतात. अर्चिस पाणी आणतो व निलीमा त्यांच्या डोळ्यांना पाणी लावते. अर्चिस विचारतो की काय झाले? ती सांगते की ह्यांना कसलं व्यसन नाही आणि सुषमाने पान खायला दिले. गणेश हे बघतो व निघून जातो. बाहेर सरिता व दत्ता सांगतात की आता नुसतं बोलून होणार नाही, काहीतरी करायला पाहिजे. माई सुषमाचा दंड धरतात तर ती म्हणते की तुम्ही असे मला घरातून बाहेर काढू शकत नाही. माई म्हणतात की मी पण बघते कशी नाही काढू शकत ते. त्या यमूनाला तिचे सगळे सामान आणायला सांगतात. इकडे छाया गणेशला विचारते की तू जी विद्या शिकतोय त्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? तो हो म्हणतो व मी हे सगळं घराकरिताच करतो आहे सांगतो. छाया म्हणते मी ही विद्या शिकली तर? माझं चांगलं होण्याकरिता मी काहीही करेन. गणेश म्हणतो की तूला जमणार नाही खूप कठीण आहे ते. ती नाराज होते. तर तो सांगतो की रोज कावळ्यांना दहीभाताचा नैवेद्य देे. इकडे माधव शुद्धीवर येतात, निलीमा त्यांना पाणी देते व ते दोघे त्यांना त्यांच्या खोलीत नेतात. बाहेर माई सुषमाला म्हणतात की तुझ्या आईलापण मी घरात येऊ दिले नाही कारण तिने माझ्या मुलांचे हाल केले असते. तू ह्या घरात आलीस व तू पण तेच करू बघतेस? पण मी खंबीर आहे तूला आता ह्या घरात येऊ देणार नाही. तेवढ्यात नाथा येेतो. दत्ता त्याला सांगतात की माईंनी सुषमाची आई कशीही असली तरी तिला तुझ्याघरी ठेवलं की तिच्या मुलीला त्रास नको पण ही सापाचीच औलाद. माई सांगतात की हिने माधवला काहीतरी खाऊ घातलं व त्याला चक्कर आली.
त्या म्हणतात की ही अशी घराबाहेर पान लावतं बसली तर गावातील लोक आम्हाला वाळीत टाकतील. यमुना सामान आणते व दत्ता ते अंगणात फेकतात. माई तिला धक्के मारून हाकलतात व पुन्हा ह्या घराकडे बघायचे नाही असे बजावतात. इकडे छाया गणेशला विचारते की दहीभातच्या नैवेद्याने सगळ्या इच्छा पुर्ण होतात का? तो हो म्हणतो पण ज्याचात्याचा मान त्याला मिळायला पाहिजेे. तो तिची इच्छा विचारतो पण ती सांगतेे की आत्ता नाही पण सगळ्यात पहिले तुलाच सांगेन. ती विचारते की दहीभीतीचा नैवेेद्य कावळ्यांनाच का दाखवायचा? तर तो सांगतो की तेे आपल्याच वंशातले अत्रुप्त आत्मे असतात. त्यांच्या इच्छा पुर्ण झालेल्या नसतात. त्यांना दहीभातीचा नैवेद्य देऊन त्रुप्त करायचं मग ते आपल्या वाट्यातील सगळी संकटं दुर करतात. ती विचारतेे की दहीभात देऊनपण काही झालं नाही तर? तो सांगतो की रक्त द्यावं लागेल, ती घाबरतेे.
निलीमा माधवंना कसं वाटतय विचारतेे ते म्हणतात की बरंं वाटतयं पण डोकं जड आहे. अर्चिस म्हणतो की आपणं परत मुंबईला जाऊ हे असे सतत चालू राहिले तर? निलीमा सांगते की हे असेच चालू राहणार. ह्या सगळ्याला जेव्हा विरोध होईल तेव्हाच हे थांबेल. आपण मुंबईला जाऊच पण हे सगळे प्राॅब्लेम्स साॅल्व झाल्यावरच. बाहेर सुषमा तिच्या फेकलेल्या सामानातून मोबाईल काढते व नेनेवकिलांना फोन करते. ती सांगते की आत्ता इथे निघून या व बरोबर पोलीसांना घेऊन या.
निलीमाने आज माधवंना एकही गोळी
निलीमाने आज माधवंना एकही गोळी दिली नाही.
<< निलीमाने आज माधवंना एकही
<< निलीमाने आज माधवंना एकही गोळी दिली नाही.>> माधवला आतां जें कांहीं होतंय त्यावरचा 'प्रिव्हेंटीव्ह डोस' तिने माधवला आधींच पाजला आहे; त्यामुळें, त्याला फार त्रास होणार नाहीं याची तिला खात्री असावी.
अर्चिस पाणी आणतो व निलीमा
अर्चिस पाणी आणतो व निलीमा त्यांच्या डोळ्यांना पाणी लावते. >> नंतर तेच बोटे बुडविलेले पाणी निलीमा माधवला प्यायला देते.
तिची बोटं हायजेनिक आहेत
तिची बोटं हायजेनिक आहेत निल्सन. शा.बा ना ती? मग? सतत सॅनिटायझर घेउन फिरत असणार
आर्चिस अचानक त्याच्या बाबाला
आर्चिस अचानक त्याच्या बाबाला अहोजाओ काय करायला लागला ? "तुम्हाला बरं वाटतय ना? "
वगैरे... नाहितर ए डॅड म्हण्तो ना तो?
<< आर्चिस अचानक त्याच्या
<< आर्चिस अचानक त्याच्या बाबाला अहोजाओ काय करायला लागला ? >> कदाचित, माधव आतां अण्णांच्या पंक्तीला बसायची शक्यता निर्माण झाल्यामुळे असेल !!
गणेश त्याच्या आत्याशी बोलत
गणेश त्याच्या आत्याशी बोलत असतो, मग निलीमा माधवंना उठवत असते तर अचानक तो खाली कसा काय दिसतो?
Pages