आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशी काळ नागीण सखे ग वैरीण झाली नदी >> म्हणत होती.. बापरे लेटेस्ट टाकलेल गाणं फार कमी वेळा ऐकलयं.. त्यामुळे लक्षात नाही आलं.. वेल डन कृष्णा

. वेल डन कृष्णा>>

धन्स!!

जेंव्हा मानव पहिल्या ओळींचा अर्थ नाही म्हणाले लगेच ट्यूब पेटली.. Happy

भरत, सांगा मग!! आणि ऐका पण खूप सुंदर शब्द स्वर आणि संगीत देखिल. अगदी भिडणारे मनाला. माझ्या आवडत्या गाण्यांपैकीं एक..

कोडे क्र 18

मराठी

त क ल ज अ त उ
व ब ज अ ग क

त्या क्रूर लाल ज्वाळा
आवर्त त्यात सुटले
वणव्यात बाग जळला
आता गुलाब कुठले

कोडे क्र. १९

मराठी.

त य अ ज य क क अ
अ ज फ म

ती येते आणिक जाते,
येताना कधि कळ्या आणिते,
अन्‌ जातांना फुलें मागते

शोभा, आधी जिप्सीने दिलेले गाणे फोडूया.

(जिप्सी, असशील तिथून परत ये. इथे तुझ्याविना सारे अडले आहे.)

आणि जो गाणे ओळखेल त्याने कोडे द्यायचे पुढचे नाही तर इथे नुसते अक्षर गोळा होतील मग बसा ऐसी अक्षरे मेळवीन करीत! Wink Proud

लोक्स, एक एक करुन सोडवुयात . आणि कोड्याला क्रंमाक पण देऊयात.
कोड्यांची ही घडी अशीच राहु द्या ही विनंती. Happy
अन्यथा कुठले राहीले कुठले सुटले, इत्यादि गोंधळ होऊ शकतो.

शोभा, तुमच्या गाण्याची घडी मोडली मानवाने! आत आधी जिप्सी मग गजाननाचे गाणे!>>>>>>...हो. कळले मला ते . Happy

जिप्स्या फ़ार अवघड कोडी देतो आणि लपून मजा बघतो. Proud

Pages