आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्रमांक ५ चे उत्तर

क ह ज अ
ह अ क ल य
प न त द ह ल क म अ

कोई होता जिसको अपना
हम अपना कह लेते यारों
पास नही तो दूर ही होता
लेकिन कोई मेरा अपना

भरत mansmi18 येई पर्यंत पुढिल कोडे द्या.

mansmi18, गाणे ओळखुन पुढिल कोडे देण्यात मजा आहे Happy

भरत, ठेवली होती, मी आताच संपादित करुन नियम क्र. ७ काढुन टाकला, कारण कोडी क्रमांका शिवाय येत होती.
तुम्ही तुमच्या कोड्याला ८ नंबर द्या. मी परत तो नियम टाकतो.

खालील प्रमाणे आता पर्यंत दिलेल्या कोड्यांचे क्रमांक:
१. मानव
२. साती
३. अभि.नव
४. _मनाली_
५. कृष्णा
६. mansmi18
७. mansmi18
८. भरत

साती, अभि.नव, _मनाली_, कृष्णा, mansmi18 कृपया संपादित करुन वरिल प्रमाणे आपल्या गाण्याच्या कोड्याला क्रमांक द्यावा.

भरत,

कोडे क्र
. ८

क ज क स क स क ह क
र त ग न ख न अ ग

कुणी जाल का सांगाल का सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको खुलवू नको आपुला गळा...

बरोबर?? Happy

गाणे प्रसिद्ध आहे. विख्यात कवीचे आणि विख्यात गायकाने स्वरबद्ध करून गायलेले चित्रपट गीत..
केवढा क्लु दिला बघा . Happy

कोडे क्र. ९
प प प प न प प
द ह ह द म झ

पोटा पुरता पैसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

लग्नानंतर होणारी स्त्रीची दोन स्त्री नाती म्हणजे या चित्रपटाचे नाव.
गायक दक्षीणेतला.

बाहेर जातोय तास - दोन तास म्हणुन क्लुज देऊन ठेवतोय.

Mansmi18

गाणे क्र ६
स ग म म म म
ग क प प त ग

सखे गं मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा

लग्नानंतर होणारी स्त्रीची दोन स्त्री नाती म्हणजे या चित्रपटाचे नाव. ही नाती बहुदा समवयस्क / एकाच पिढीतील असतात.
पण या नात्यांचा गाण्यात उल्लेख / संबंध नाही.

मानव
कोडे क्र. १०

मायेची साउली आनंदी बाहुली
आहे गुणाची मोठ्या मनाची
जाई जशी माझी ताई!

घास चमच्याने भरवल्यावर शेवटी गिळता आला.

नणंद भावजय

Pages