साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखित रताळ्याच्या किस चांगलाच लागत असणार. माझी आजी साखि मऊसर व्हावी म्हणून काकडी किसून टाकायची. बरी लागत असेल. मी साखि कध्द्दीच आवडीने खात नाही. कधीतरी नाइलाजाने खाल्ली असेल..

पार्टीला जाताना सुंदर स्लीव्हलेस इव्हनिंग गाऊन वर जाडा स्वेटर चढवल्यासारखं

>> अय्यो, तुम्ही पार्टीला जाताना गाऊन घालता?अन तोही स्लीवलेस? ऐ ते न. आमच्याकडे बै स्वयंपाकघरात गाऊन घालतात अन तो ही बाह्यांचा !

खरच माहित नाई? म्हण आहे ती - चुळ्चुळ मुंगळा, पळी पळी तेल..

चुळबुळी लहान मुले >>> आमच्या घरीही ही म्हण घाऊक प्रमाणात वापरली जात असे.

साखि फॅ. क्लबमध्ये सा. वड्यांची पोस्ट टाकणं फारच अस्थायी होईल का?

तळण नको म्हणून आप्पेपात्रात सा. वडे केले परवा. चांगले लागले.

IMG_1135[1].JPG

काल सा खि केली आणि खाल्ली तेव्हा कुठे जीव शांत झाला!

रायगड, ही अयडीयेची कल्पना भारीये. सा खि चे वडे केलेस की कसे? जरा उचकटुन सांग न!

अमेरिकेत बी पी गोल्ड ब्रँडच्या साबुदाण्याचा अनुभव चांगला आहे. साखि मस्त मोकळी होते.
मेधाविच्या पोस्ट्स खरंच मस्त आहेत एकदम.

इरफान खान अमिताभला म्हणतो ना - कमाल है आप हर बात को पेटसे कैसे जोड देते है. तसं झालं मला - कमाल है, आप हर बात को आप्पे से कैसे जोड देते है.... Biggrin

(आप = मीसकट एकूणातच सगळे मायबोलीकर Happy )

मेधाविच्या पोस्ट्स खरंच मस्त आहेत एकदम.>>> +१ हे मघाशी लिहायच राहिलं होतं.

मेधावि, आजेसासुबाई अगदी डोळ्यासमोर आल्या. त्यांच्या अजुन रेसिपी असतील तर नक्की लिही. त्यांच्या खास शैलीतच!

सीमंतीनी Lol

ते रायगडने केले होते तसे वडे मी पण एकदा केले होते. हेल्दी आहेत हे कळतं असा क्रिटीक्सचा रिमार्क मिळाला Wink

सीमंतीनी Lol >> तरी नशिब आप्पे- सा.वड्यांचा फोटो याच बाफ वर टाकला. पहिले त्या बाफवरच टाकणार होते. पण अगदीच मार बसेल असं वाटून इथे टाकला. Lol

तस नाय गं .
पण भिताडावर पाहण्यापेक्षा समोर लॅपटॉप असतो सदानकदा Wink
अन हो, मी संकष्टी सोडली कधीचीच.. आणि आत्ता आत्ता कळलं म्हणे नवरा चांगला मिळावा म्हणुन ठेवतात त्यामुळे अज्जिब्बात पकडणार नाही समोर Lol
हे आपल तुझी पोस्ट पाहुन आठवल कि घरात साबुदाणा आहे..
खाल्ला नाही तर वाईट वाटेल ना..साबुदाण्याला Wink

आज माझ्याकडेपण खिचडी, नवऱ्याला डब्यात बरेचदा उपासाचे थालीपीठ देते, आज खिचडी केली.

गेला आठवडाभर साखि खायचा मुड होता पण योग नव्हता, शेवटी काल मम्मीला सांगीतले की डब्याला साखीच दे.

मग काय आज अगदी पहाटे च साखी खाल्ली, ऊरलेली डब्याला घेवुन आली.
मजा म्हणजे साखी सोबत तोंडलावणी म्हणुन तळलेले अंडे खाल्ले. थोडे विचीत्र कॉम्बी पण मस्त लागले.

पर्ल साबुदाणा मी तरी खिचडी करायच्या 20 मिनिटे आधी भिजवते. या साबुदाण्याला जास्त पाणी, जास्त भिजवलेले तसंच अधिक आच चालत नाही. पटकन होतात.
कृपया पॅकेटवर भिजवण्यासाठीच्या instructions पहा.

पॅकेटवर भिजवण्यासाठीच्या instructions नाहीत. अपना बाजरचं पॅकींग आहे. ते तसं काही छापत नाहीत. Sad

या साबुदाण्याला जास्त पाणी, जास्त भिजवलेले तसंच अधिक आच चालत नाही.>>> Uhoh
२० मिनिट आधी किती पाण्यात भिजवायचे?

Pages