साबुदाणा खिचडी फॅन क्लब

Submitted by टीना on 14 February, 2016 - 09:51

पेश है आपल्या सर्वांची (ज्यांची ज्यांची असेल त्यांनी हात वर करा रे) आवडती साबुदाण्याची उसळ्/खिचडी..

चतुर्थी म्हणु नका, एकादश्या घ्या, नवरात्री घ्या, हव तर रविवार (सोडून), सोमवार, मंगळवार, बुधवार (पण धरता का ?), गुरुवार, शुक्रवार, शनिवार धरणारे (म्हणजे उपासतापास करणार्‍या) सार्‍यांचीच आवडती ती ही साबुदाण्याची खिचडी..

ती कशापासुन बनते ते तिचे आहारातील चांगले वाईट स्थान इथवर सारे धागे दिसलेत मला पण फॅन क्लब दिसेना.. म्हणल आस कास ? ये धागा तो बनता ही है..
आता इथ जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे सलमान काय हाय, कस्सा हाय तरी त्याचे पंखे हायेच ना ? हायेच ना ? तस्सचं थोडूस साबुदाण्याचं हाय बघा.. वज्जेर कॅलरी का काय थे, उपयुक्तता म्हणाव तर अं अस म्हणत डोक्याले पार ताणेपर्यंत ताणा लागते पण तरी पाण्यात मुरलेली, गरम तेलात जिर्‍याच्या फोडणीत लाल हिरव्या मिरचीत ठसलेली, तळलेल्या आलुच्या काचर्‍यासंग, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटात, जोडीला लिंबाची फोड अन तळलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन सजलेली ती प्लेट दर उपासाले हाती पडावं म्हणुन हरेक माणुस मनोमन जप करतोच तस्सच...

तर इथं साबुदाणा खिचडी लव्हर्स चा कट्टा आपण सुरु करुया..
पयली मी..

तशे साबुदाण्याचे अजुनबी लय पदार्थ करता येतातच..
साबुदाण्याची खीर,
साबुदाणा वडे,
साबुदाण्याचे पापडं,
गेल्याबाजारी साबुदाण्याचा हलवा पन करुन टाका पण खिचडीची सर यातल्या कशालेच नाई म्हणजे नाई अस माजं सोच्च मत हयं.. तर जो जो या बाईचा (साबुदाण्याची खिचडी = स्त्रिलिंगी) पंखा असनं अन ज्याले ज्याले ती सार्‍या गुणदोषांसकट पसंत असन त्यानच तितक्याच सोच्च मनानं इथं हजेरी लावावी...

कृपया तिच्या दोषांचा पाढा इथं वाचु नये.. ती कोण हाय, कशी हाय सबकुछ हम जाणते हयं तरीबी, दिल क्या चीज है जानम अपनी जान इसके नाम करते है अशे डाय हार्ड फॅनच इथं येऊन या व्हॅलेंटाईन डे च्या पर्वावर काढलेल्या साबुदाणा खिचडी लव्हर्स च्या धाग्यावर तिच्या बद्दल असलेल प्रेम इथ व्यक्त करतीनं..

सोबत तिचा दिलखेचक फटू जो मीनं सोत्ताच्या कॅमेर्‍यान, सोत्ताच्या हातानं, सोत्ता कळ दाबुन (कॅमेराची..काय समजला)..आधी इटोबा न मंग पोटोबा म्हणत काल्ला तो देतायं..
भक्ताइनं भरपुर लाभ घ्यावा..

आरं काय राजेहो..
अँगल बिंगल काई पाहु नका..आरं प्रेम बगा प्रेम.. अन जोडीले समाजसेवा..पोटात भुकेचा आगडोंब उसयलेला अस्ताना त्याले चिमटा घेउन फक्त अन फक्त तुमाले दाखोता यावा म्हणुन तुमच्यासाटी काडलेला फट्टू..

नाइ नाइ .. माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका.. अज्याब्बात तिखट नवत्या त्या..तुम्ही निर्र उसळीवरं आपलं हे खिचडीवर कॉन्सन्ट्रेट करा..

शुद्द भाषेत लिवायच ठरुन परत गोल फिरुन बोली भाषेतच घसरली..जाउद्या लहान आहे म्हणुन सोडून द्या अन भाषेचा जांगळबुत्ता गोड मानुन घ्या.. तर चला चला चला रे...साबुदाणा खिचडी लव्हर्स..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा वा...माझे पहिले नाव फॅन क्लबात..:)

खिचडी म्हणजे जीव की प्राण! माझी फेवरेट खिचडी म्हणजे मस्त कोथिंबीर घातलेली, ओले खोबरे घातलेली आणि बटाट्याचे वेफर्स मस्ट!

करा आमचीही नोंदणी,
सोबत दही, भाजकी हिरवी मिरची, वेफर्स आणि सांडगे हवेतच.

कोल्हापुरात मोहक हॉटेलची खिचडी आता जरी पूर्वीसारखी राहिली नसली तरी सोबत एक तिखट गोड दह्याची चटणी देतात ती एकदम ऑस्सम असते.

माझी आजी जी साबुदाणा खिचडी करायची ती मला फारच आवडायची . तशी खिचडी माझ्या आईला मुळीच करता येत नाही . आई एकदम मऊसर करते . आता आजीही गेली आणि ती चवही
असो

माज्या मिरच्या खाण्यावर सुदीक घसरु नका..>> मला फारशी आवडत नाही म्हणून का काय. माहित नाही पण आधी लक्ष फोटोतल्या मिरच्यांकडेच गेलं. माझी लेक (वय वर्ष ६) मात्र नक्की आहे या क्लबमध्ये Happy

मला साखि आई करते तशीच आवडते.
इकडे साखर न घालता नुसती जिरे मिरचीची फोडणी असते ती नाही आवडत नुसत्या मीठाची.
त्यात ती भरमसाठ तेलात करतात.
त्यामुळे मी साखि आवडत नाही असे इकडच्या घरी डिक्लेअर केले आहे.

आमच्या एका विदर्भातल्या नातलगांकडे चक्क लसूण घालून साखि करत आणि त्याला ते साबुदाण्याची उसळ म्हणत!

आमचीही नोंद करा.
आम्ही कोंचा पन वार बीर करत नाय. पण ज्या ठिकाणी आहे तिथं ज्या वारी साबुदाण्याची उसळ पकेल तो आपला वार असं आपण जाहीर करतो, आणि साबुदाणा खिचडी खाऊन नंतर भूक लागली तर बाहेर दही मिसळ, इडली दोसा वगैरे हाणुन येतो.

कसं काय तुम्हाला फॅन म्हणायचं??? आं??? अर्धाच प्लेट खिचडी वाढून घेतलेली आहे!!!! ये इस फॅन क्लब की तौहिन है मायलार्ड.

आपल्याला ब्वा साखि प्लेटभर लागते. ती पण मस्त तुपात परतलेली. दाण्याच्या कूटाबरोबर दोस्ती केलेली. सोबत सायीचे गोड दही हवंच.

यस्स.. मला पण भरपूर हिरव्या मिरच्या असलेली, साजूक तुपातलीच (फक्त )आवडते..आणी बरोबरीला ताजं , सायीचं दही.. एक चमचा पण शेअर करत नाही कोणाबरोबर.. Proud

टीना लिवलंय लय भारी. मी fan नाही पण चालते खिचडी. आई छान करते. उपासाची करताना साजूक तुपाची फोडणी. बिनाउपासाची तेलात पण करते, कांदा घालून. एका मैत्रिणीकडे करतात ते बघुन करते मी, क्वचित कधीतरी.

वर्षुताईनी लिहिलंय त्याप्रमाणे खायला आवडते.

माझ्या मोठ्या मुलाचं नाव मोठ्या अक्षरात घाला साखि फॅन क्लबात. इतर वेळी डब्यात जनरली सँडविच फ्रीफर करतो पण साखि उरली आहे उद्या डब्यात देऊ का म्हटलं तर स्वारी एकदम खुश. डबा चाटूनपुसून घरात. मी आजकाल नाही खाऊ शकत पण आम्हा दोघांचा एकेकाळी शनिवार ब्रंचचा हा हीट्ट आयटम होता.

आमच्याकडे साबुदाणा खिचडी म्हणजे शुद्ध तुपातच Happy वरून भरपूर कोथिंबीर्‍ आणि बाजुला दही. यम्म...

एका गुजराती मैत्रीण तुपात मिरची/आलं कुटून घालून करायची ती पण मस्त असे.

पण मस्त तुपात परतलेली. दाण्याच्या कूटाबरोबर दोस्ती केलेली. सोबत सायीचे गोड दही हवंच>>> अगदी अगदी ,अपुनको भी ऐसाइच मंगताय

अरे अरे अरे, इथे बसून डोळ्यांत पाणी आलं की हो (तोंडाला पण सुटलं)... गेल्या ७-८ महिन्यांत साखि खाल्ली नाही... Sad
आता घरी जाऊन इंडियन स्टोर मध्ये जाऊन घेऊनच येतो आणि करूनच खातो Happy
माझं पण नाव अ‍ॅड करा क्लबात... Happy

Me pan fan clubat.

Sajuk tupa(ch)+jeere+hi mi+vyavastheet da ku+ kothimbeer+dahee!

साबुदाणा खिचडी आवडते, नेहमीच्या साबुदाण्याची खिचडी आई गटाइतकीच चांगली जमते. इंस्टट साबुदाण्याची मात्र जमत नाही. फारशी आवडतही नाही.

एकदा कुणी साबुदाणा खिचडीत दाण्याच्या कूटाऐवजी भिजवलेली हरभरा डाळ भरड घालून खायला दिली होती. खानदेश का विदर्भ का कोकण कुठला तरी प्रादेशिक प्रकार आहे म्हणून Sad "अरे वा" करत खाल्ली पण "व्हाईट लाईज" ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ त्या दिवशी समजला Sad .

(अजूनही मनात येते की हा कुठलाही प्रादेशिक प्रकार नसावा, उगीच टॉर्चर म्हणून खाऊ घातले असावे. Sad )

साजुक तुपातली , लाल तिखट घातलेली, सोबत मधे मधे आलू च्या फोड़ी, एखाद कणीभर सरस मीठ असलेली, सोबत गोड दही किंवा अधमुरे ताक, म्हणजे जन्नत!! फ़क्त त्या खिचड़ीत साखर जितकी कमी घालता येईल तितकी असावी

वा वा! मस्त फोटो!

मेघना भुस्कुटेने साबुदाणा खिचडीबद्दल खूप मस्त ब्लॉगपोस्ट लिहिली आहे. खिचडी होता होता त्यावर हिरवी मिरची कातरून(च) घालण्याची टीप तिने लिहिली आहे ती एकदम सुपरहिट आहे.

इथे साबुदाण्याचे ब्रँड्स, हमखास खिचडी जमण्याच्या टिपा, किती माणसांना किती साबुदाणा वगैरे लिहा.

माझी खिचडी चवीला छान होते, पण काही वेळा कडकडीत होते. म्हणून पुढच्यावेळी तूप जरा जास्त घालावं तर तुपाळ होते, तूप कमी घातलं तर कडकडीत होते. हे म्हणजे सलीम तुझे मरने नही देगा और मै तुझे जीने नही दूंगा टाईप होतं. मायक्रोवेवमधे केली तर चांगली होते, पण फोडणीत परतून करण्याचा खमंगपणा येत नाही. तर यावर काही हमखास उपाय सांगा.

मायक्रोवेवमधे केली तर चांगली होते, पण फोडणीत परतून करण्याचा खमंगपणा येत नाही. तर यावर काही हमखास उपाय सांगा.<<<< मै क्या करती! थोड्ञा तुपाच्या फोडणीत साबुदाणा घालते. मीठ साखर मिरची कूट वगिअरे घालून थोडा परतला आला की गॅसवरून खाली उतरवते, मग त्यामधला हवा तितका साबुदाणा मायक्रोवेवमध्ये ठेवते. गरज पडली तर किंचित चमचाभर तूप वरून घालते- हे बहुतेकदा साबुदाण्यावर अवलंबून असतं पण जनरली अशी खिचडी कमी तुपातही चांगली खमंग होते. माय्क्रोवेव्हमध्ये केल्यामुळे खिचडी मोकळी आणि मऊमऊ होते.

उरलेला साबुदाणा नीट गार झाला की डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवते. हवं तेव्हा मायक्रोवेवमध्ये इन्स्टंट खिचडी करून खाता येते.

मी पण आहे या फॅनक्लबात. बाकी साबुदाण्याचे पदार्थ फारसे आवडत नाही, पण खिचडी ऑटाफे.. लहानपणी आठवड्यातुन चार वेळा खायला मिळायची.. आज्जीचा सोमवार, बाबांचा मंगळवार आणि शनिवार आणि आईचा शुक्रवार.. आणि आई-बाबा करतात तश्शी खिचडी मला मुळ्ळीच जमत नाही.

Pages