ज्वारीचे पीठ
किंचीत मीठ
पाणी
सोलापूर, कोल्हापूर भागात तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात होणार्या भाकरी सर्वज्ञात आहेत. मोठ्या आकाराच्या पण पातळ, पापुद्रे सुटणार्या भाकरी इथली खासियत. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीत गावी गेलो की परसात होणार्या चुलीवरच्या स्वैपाकाचं अप्रूप असायचं - चवीसाठी आणि स्वैपाक होता होता होणार्या गप्पांसाठी. घरात किमान ५० लोक तरी असायचे. त्यामुळे पोळ्या भाकरींसाठी गावात राहण्यार्या एकजण यायच्या. सकाळी ९ वाजता पोळ्यांसाठी बसायच्या त्या साधारण १ वाजेपर्यंत भाकरी झाल्यावर उठायच्या. चुलीतला जाळ सारखा करत, लोखंडी तव्याचं तापमान योग्य ते राखत भराभर भाकरी थापून तव्यावर टाकून आधीची भाकरी चुलीच्या तोंडाशी नीट शेकून दुरडीत ठेवणं 'स्किलफुल' काम होतं. चुलीच्या तोंडाशी शेकायला ठेवलेली भाकरी फुगली की खरपूस वास सुटायचा. पापुद्रा सुटा करून त्यावर नुसतं तूप मीठ लावूनही फार चवदार लागायची. आठवणीनंच तोंडाला पाणी सुटतं :).
मायबोलीवर ज्वारीची भाकरी कशी करावी याच्या काही कृती आहेत. प्रिती या आयडीची यूट्यूब लिंकपण आहे. एका मायबोलीकर मैत्रिणीनं काही दिवसांपूर्वी भाकरी कशी करावी याचं फोटो फिचर टिपांसहीत मायबोलीवर टाकण्याची विनंती केली होती. त्यामुळे डॉक्युमेंटेशनही होईल या हेतूनं अजून एक कृती.
साधारण दोन वाट्या होईल इतकं ज्वारीचं पीठ किंचीत मीठ घालून, पाणी घालून मळून घ्या. त्याचवेळेस तवा मिडीअम आचेवर तापायला ठेवा. पीठाची कंसीटन्सी फार पातळ नको, फार घट्टही नको. ज्वारीचं पीठ जितकं मळाल, तितकी भाकरी करायला सोपी जाते. मळताना तळहाताच्या मनगटा जवळच्या भागाने चांगले रगडत पीठ मळावं. जेव्हढी भाकरी मोठी हवी असेल, तेव्हढं पीठ घेऊन छान उंडा करावा. परातीत थोडं कोरडं पीठ घेऊन त्यावर उंडा ठेवावा.
तळहाताला आणि बोटांना थोडं कोरडं पीठ लावून भाकरी थापायला सुरूवात करावी. सुरवातीला तळहातानं मध्यभागी थापायला सुरूवात करावी. थोडी मोठी झाली की बोटांनी कडेनं थापत मोठी करावी. मध्यभागी जास्त पीठ असेल तर परत थोडी तळहातानं थापत, नंतर बोटांनी थापत भाकरीची जाडी एकसारखी करायचा प्रयत्न करावा.
तोपर्यंत तवा मिडीअम आचेवर व्यवस्थित तापला असेल. भाकरी अलगद उचलून पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकावी (गॅस वाटल्यास किंचीत मोठा करावा).
त्या वरच्या (पिठाच्या) बाजूला नीट पाणी लावून घ्यावे.
पाणी सुकत आले की अलगद उलटावी. ती पाण्याची बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.
मग भाकरी तव्यावरून काढून वरची बाजू डायरेक्ट आचेवर भाजावी. पाणी नीट लागलेलं असेल आणि तव्याचं टेंपरेचर व्यवस्थित असेल तर मस्त फुगते.
वांग्याची भाजी, पिठलं, मिरचीचा ठेचा/खरडा, चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत याबरोबर वाढावी. बरोबर घरचं दही असेल तर डायरेक्ट स्वर्ग
१. पिठ नीट मळून घ्यावं. जेवढं मळाल, तेवढी भाकरी करायला सोपी जाते. ताज्या ज्वारीच्या पिठाच्या अर्थातच चांगल्या होतात. पिठाची विरी गेली की भाकरी थापता येत नाहीत. थोडं जुनं पीठ असेल तर चमचाभर तेल आणि कणीक घालून बघावं.
२. भाजण्यासाठी नॉनस्टीक तवा शक्यतो नको(च).
३. भाजताना लावलेले पाणी फार सुकवू नये.
४. अमेरीकेत भाकरीचं पिठ चांगलं मिळत नाही, तेव्हा 'मासेका' पिठ वापरूनही करता येतील. पण या भाकरी गरमच चांगल्या लागतात. तसंच सुरवातीला सरावासाठीही हे पिठ चांगलं आहे.
५. भाकरीचा आकार सवय होईपर्यंत थोडा लहानच थापवा.
अनु, त्यात इतक नवल काय.
अनु, त्यात इतक नवल काय. ज्वारीचे डोसे पण करतात तमिळ लोक, इथे बघ:
https://www.google.com.sg/search?q=%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE&...
ड्पंबल. लाटूनच केल्या होत्या.
ड्पंबल. लाटूनच केल्या होत्या. (मग त्याला भाकरी का म्हणावे बरे?)
चुलीच्या तोंडाशी शेकायला
चुलीच्या तोंडाशी शेकायला ठेवलेली भाकरी फुगली की खरपूस वास सुटायचा. पापुद्रा सुटा करून त्यावर नुसतं तूप मीठ लावूनही फार चवदार लागायची. आठवणीनंच तोंडाला पाणी सुटतं >>>>> फार भाग्य असेल तरच अशी भाकरी खायला मिळते .... मला थोडाफार अनुभव आहे अशा भाकरीचा .... स्लऽऽऽऽऽऽर्प......
मस्त लिहिलंय आणि फोटोही झकासच....
सुरेख स्टेप बाय स्टेप. मला
सुरेख स्टेप बाय स्टेप.
मला पोळी आणि भाकरी फारश्या जमत नाहीत, कधीतरीच नीट होतात त्यामुळे भाकरी येणाऱ्या सर्वांबद्दल आदर वाटतो.
दिनेशदा ते हॉटेल बांबू हाऊस, आता वाढवले आहे, जेवणाची चव सुदैवाने टिकून आहे आणि दरसुद्धा ठीकठाक
हॉटेलातून कल्ट स्टेट्स गेल्या वीसेक वर्षातीलच आहे, त्या आधी हॉटेलात जाऊन भाकरी खायची वेळ येत नसावी बहुतेक
बी आश्चर्य यासाठी की
बी आश्चर्य यासाठी की भाकरीच्या पीठाचे डोसे करणे जितके शक्य तितकेच नुसत्या मळलेल्या कणकेची हाताने थापून भाकरी करणे अशक्य.
दिनेशदा, बरोबर. श्रीमंतांकडे
दिनेशदा, बरोबर.
श्रीमंतांकडे भाकर्या करत नाहीत , पोळ्या(चपात्याच) करतात. (असं गरीबांना वाटतं!)
इकडे उत्तर कर्नाटकातही सणासुदीला, अमावस्या पौर्णिमेला, सोमवारी भाकर्या करत नाहीत.
तसेच नंदिनीने लिहिलेली ती सुप्रसिद्ध पुंडीपल्ल्या पण या दिवशी करत नाहीत.
आम्ही हॉस्टेलात असताना सणासुदीलाच घरी यायचो आणि नवरा साबांकडे भाकरीच खायला मागायचा तर आमच्या साबा शेजार्यांनी नावे ठेवू नये म्हणून लपून छपून , बांगड्या बांधून ठेऊन, हळूहळू धोपटून भाकरी करायच्या.
अरे हो, कोंकणात भाकरी थापतात तर इकडे 'भाकरी बडवतात' असेल नसेल तितका जोर काढून!

अनु, विदर्भात त़ळहातावर थापून
अनु, विदर्भात त़ळहातावर थापून केलेल्या पोळीला जी की खूप लहान आणि जाड होते तिला पानगे म्हणतात आणि पानगे गोवर्याच्या निखार्यावर भाजतात.
मांडे म्हणतात ना? तसे मला
मांडे म्हणतात ना?
तसे मला पानगे आणि मांडे दोन्ही माहित नाही, कोकणातल्या पानग्यांबद्दल पण फक्त ऐकले आहे.
भाकरी मराठवाड्यात खेड्यात
भाकरी मराठवाड्यात खेड्यात चांगल्या जाडजूडच करतात. कारण घरच्या कारभारणीला घरातले सगळे, गडीमाणसे, पाव्हणेरावळे सग ळ्यांच्या बदडाव्या लागतात ना..
इकडे गुजराथमधे बाजरीच्या, मक्याच्या हातावर अन मोठ्यामोठ्या पातळ काय सुरेख करतात. झोपडपट्टीतल्या बायका सकाळी आपण चालायला जातो तेव्हा करताना दिसतात. बाजुच्या चुलीवर कालवण रटमटत असते.
केळीच्या पानात भाकरी करतात
केळीच्या पानात भाकरी करतात त्याला आम्ही पानगी किंवा पानग्या म्हणतो.
तोंपासु. तो शेवटचा फोटो
तोंपासु. तो शेवटचा फोटो म्हणजे त्रास आहे
तळकोकणात भाकर्या फारच कमी
तळकोकणात भाकर्या फारच कमी करतात. त्या खास करुन वरच्या कोकणातच.
इथे कुणाला केरळमधल्या, पथरी ( पतली ?? ) भाकरीबद्दल माहीत आहे काय ? खुप वर्षांपुर्वी एका लेखात उल्लेख वाचला होता.
अमेय, तिथल्या भाकर्यांची चव
अमेय, तिथल्या भाकर्यांची चव अजून आहे तोंडावर. आणि हेही खरे आहे, अगदी कोल्हापूरातही भाकर्या हॉटेलमधे मिळत नसत. डोसे, आंबोळ्या असत पण भाकर्या नव्हत्याच. आणि तेही बरोबर, मुद्दाम हॉटेलात जाऊन कोण खाणार त्या ?
विदर्भातली भाकरी खाल्ली आहे
विदर्भातली भाकरी खाल्ली आहे का कधी!!! आमच्या विदर्भासारख्या भाकरीची सर कुठेच नाही!!!
बी, विदर्भात पाहुणा म्हणूनच
बी, विदर्भात पाहुणा म्हणूनच गेलो होतो आणि पाहुण्याला कोण भाकरी वाढणार ? सोलापुरच्या खाल्ल्या आहेत. गुजराथेतल्या खाल्ल्या आहेत.
आमच्या विदर्भातल्या साबा लय
आमच्या विदर्भातल्या साबा लय बेक्कार भाक-या करतात. विस्तवाचे गणित त्यांना येत नाही. त्यामुळे पांढ-याफेक टाळकीची भाकरी करतात तर पातळ पण मागून पिवळी... जास्त विस्तू झाल्याने..
असो वि. तली चांगली भाकरी खाण्याचा योग आला नाहे.. आम्ही भाक-या पातळच पसंद करतो. बाजरी-ज्वारी-तांदूळ इ. ची केलेली आहे - थापून.. हातावरची अजून येत नाही. मक्याची करून पहायची इच्छा आहे.
एकदम भारी फोटो
एकदम भारी फोटो अंजली.
भाकरीचे पीठ कुठल्या ब्रॅण्डचे आहे ? लोखंडी तवा आहे का ? इथनं घेतलेला की भारतातून आणलास ?
एकदम मस्त!!! अंजली,
एकदम मस्त!!!
अंजली, पुढ्च्यावेळेस करणार असशील तर आधीच सांग. प्रत्यक्ष बघायला मिळेल कशी करायची ते (आणि खाउन पण होईल :))
मस्त जमल्या आहेत भाकरी.
मस्त जमल्या आहेत भाकरी. ज्वारीच्या इतक्या पातळ भाकरी मी पहिल्यांदाच बघतेय.
भाकरी मस्त झाल्यात माझ्याकडे
भाकरी मस्त झाल्यात

माझ्याकडे सेम टेबलक्लॉथ आहे
छान आहेत फोटो! भाकरी फार आवडत
छान आहेत फोटो!
भाकरी फार आवडत नाहीत. त्यातल्या त्यात तांदूळाच्या (फिश करी बरोबर) किंवा मग सिंहगडावरच्या एव्हड्याच त्यातल्या त्यात चालतात. जनरली भाकरी जाड्या असल्याने घास कोरडा कोरडा वाटतो. सोलापूरला भाकरी, भरीत, दाण्याची चटणी वगैरे मेन्यू खाल्ला होता, त्यातल्या ठिक वाटल्या होत्या. तरी मी धपाटेच जास्त खाल्ले भाकरी पेक्षा.
जियो!! फोटो अप्रतिम आहेत.
जियो!! फोटो अप्रतिम आहेत. छान समजवून सांगितलं आहेस. पुन्हा एकदा भाकरी करायचा घाट घालायची हिंमत आली.
आमचा विदर्भ वेगळा असल्यामुळे आमच्याकडे पानगे कधीच मळलेलं पीठ हातावर थापून करत नाहीत. पोळ्या, चपात्या, फुलके प्रकारांसाठी भिजवतो तसा गोळा न मळता पाणी टाकून, कणीक सरसरीत भिजवून, लोखंडी तव्यावर हातानी पसरलेलं प्रकरण म्हणजे पानगे. त्यात थोडा ओवा, मीठ आणि तेल घालतात.
सध्यातरी ज्वारी गरिबांची
सध्यातरी ज्वारी गरिबांची राहिली नाही.
गहुपेक्षा ज्वारी महाग आहे.४०ते५०रु किलो.
अंजली, एकदम भारी.
अंजली, एकदम भारी.
शेवटचा फोटो जीवघेणा!
शेवटचा फोटो जीवघेणा!
तरी मी धपाटेच जास्त खाल्ले
तरी मी धपाटेच जास्त खाल्ले भाकरी पेक्षा.
>> काय हे..
मस्त फोटो! मला भाकरी खूप
मस्त फोटो! मला भाकरी खूप आवडते. हल्ली हल्ली जरा चांगली जमते भाकरी, जलपुर या ब्रँड चं पीठ आणि मुठभर कणिक पण घालते पिठात

आमच्या विदर्भी साबांना अन चुलत साबांना पण अजिबात जमत नाहीत भाकरी
सामान्यतः थापून केलेली ती
सामान्यतः थापून केलेली ती भाकरी आणि लाटून केलेली पोळी असली, तरी आम्ही तांदुळाच्या पिठाच्या उकडीची 'भाकरी 'लाटूनच करतो.
माझ्या पोळ्यांच्या बाई धारवाडकडच्याच आहेत, त्यापण अशीच ज्वारीची पातळ भाकरी करतात, दोन्ही हातांनी थपथप् मोठा आवाज करत थापतात
अहाहा! काय सुबक्,निटनिट्के
अहाहा! काय सुबक्,निटनिट्के फोटो आहेत, शेवटचा तोपासु आहेच पण त्या ट्टम्म फुगलेल्या भाकरिचा पण लय भारी! ,तशिच उचलुन तुपाचा चमचा फिरवुन मटकवावी.
अरे वा! एवढे प्रतिसाद!. (आधी
अरे वा! एवढे प्रतिसाद!. (आधी पोटात गोळा आला :फिदी:).
सगळ्यांना मनापासून धन्यवाद
भाकरीच्या पिठात मीठ माहेरी आणि सासरीही घालत नाहीत. पण मला त्या किंचीत मीठाच्या कणीची चव आवडते म्हणून घालते. त्याला बाकी काही कारण नाही. आवडत नसेल तर न घालूनही काही फरक पडत नाही :).
मेधा, ज्वारीचं पीठ देशातून आणलं आहे. घरची ज्वारी आहे (म्हणून जास्त अप्रूप) :). इथे अगदी 'जलपूर' (?) ब्रँडच्या पण अशा जमल्या नाहीत. गरम पाणी, तेल, गव्हाची कणीक सगळे प्रकार करून बघितले. त्यातल्या त्यात निम्मं मासेका आणि निम्मं ज्वारीचं पीठ घालून केलेल्या जमल्या. त्याची चवही नुसत्या मासेका पेक्षा चांगली वाटली. तवा देशातूनच आणला आहे. हॉकिन्सचा हार्ड अॅनोडाईज्ड आहे. देशातही लोखंडी तवे हलकेच मिळतात आजकाल. त्याचं तापमान संभाळणं मला जमलं नाही. फार पटकन तापतो आणी भाकरी करपायला लागल्या. त्यात जर हँडल नसेल तर चिमट्यात धरून गॅसवरून बाजूला करून भाकरी आचेवर फुगवणं हे मला पटापट जमत नाही.
सुप्रिता, नक्की :).
Pages