मानवीय!!

Submitted by कृष्णा on 10 February, 2016 - 01:44

हा मानवीय धागा!

आपण समाजात वावरत असता बरेच मानवतेचे अनुभव येतात ते एकमेकांशी शेअर व्हावे हा उद्देश्य!

सुरवातीलाच माझा एक किस्सा सांगतो!

साधारण १९९१ च्या सुमाराची गोष्ट... मी ऱोह्याला होतो तेंव्हा ऐन उन्हाळ्यात मे महिण्यात काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र बाईकवरुन अलिबागला गेलो होतो! काम आवरुन साधारण दु. १२ च्या सुमारास परत निघालो. रामराज मार्गे सधारण २५-३० किमी आल्यावर रोह्यापासुन १०-१५ किमी अलिकडे बाईक अचानक बंद पडली!!
अर्धा तास किक मारुन थकलो पण सुरु व्हायचे नांव नाही पेट्रोल प्लग सगळे ओके!! शेवटी बर्‍याच वेळाने एक बस आली तिच्यात मित्राला रोह्याला जाऊन मेकॅनिक घेऊन ये म्हटले! तो गेला मी आपला एका वडाच्या डेरेदार झाडाखाली बाईक जवळ बसुन राहिलो. दुपारची वेळ रणरणते ऊन रस्त्यावर चिट्पाखरु नाही. दमल्याने आणि उन्हाने घश्याला कोरड पडलेली जवळ पाणी नाही समोर साधारण शे दोनशे पवलावर काही घरे होती तिथे गेलो पाणी विचारले प्यायला कुणी देईना ३-४ घरात जाउन आलो सगळे म्हणे पाणी नाहीए.... तसाच धापा टाकत झाडाखाली आलो.... उजव्या बाजुला १०० पावलावर अथांग खाडी पण प्यायला पाण्याचा थेंब नाही.... शेवटी विचार केला २ घोट खाडी तर खाडी पिऊयात २ घोट. तिथे जाऊन ओंजळीत घेतले तर काळे कभिन्न पाणी!! तसाच माघारी आलो....
तहानेने व्याकुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवत होतो.... रोह्याच्या रस्त्याकडे पहात....

तेवढ्यात डाव्याबाजुने एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडाघेऊन वर आलेली दिसली हाताशी एक पोर.. दोघेही असल्या उन्हात अनवाणी ती जवळ आली तसे ताई पाणी मिळेल का प्यायला घोट्भर म्हणून विनवणी केली... तिने अगदी हसतमुखाने हंडा डोक्यावरचा खाली घेतला विशेष म्हणजे हंड्यावर एक ग्लास पण होता! ग्लास काठोकाठ भरुन तिने दिला प्यायला घटाघटा अधाश्या सारखे ते प्यायले.... खरोखर त्या क्षणी ते अमृत होते माझ्यासाठी... मी ग्लास परत देऊ लागलो तसे अजुन्हवे का म्हणून ती पुन्हा देऊ लागली... त्या माऊलीने उरापोटी आणलेल्या त्या हंड्यातुन आपण एक ग्लास घेतला हेच खुप हा विचार आला तत्क्षणी... त्या माऊलीच्या चेह-यावरचे समाधान माझ्या दहापट होते हे जाणवले... खिश्यात हात घालून हातालालागेल ती नोट काढून तिच्या मुलाच्या हातात ठेवली... मला ते पैसे कश्याला देताय म्हणून म्हणू लागली... विशेष म्हणजे मला पाणी दिल्यावर ती माऊली आल्या रस्त्याने पुन्हा गेली डाव्याबाजुचा रस्ता उतरुन......

आता हा अनुभव ह्याला दैवी म्हणा मानवी म्हणा वा मानवातल्या देवाचा म्हणा....
त्या २-३ तासातले अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखे आणि खुप काही शिकवुन गेले तेंव्हा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी राहायला जळगाव येथे होतो, आणि शिकायला चोपडा (जळगावहुन ७० किमी). जळगाव जायचे होते, निघालो मी.. आधी २,३ वेळा ह प्रयोग केलेला, म्हणून बिनदास्त होतो.. प्रयोग म्हणजे एक फालतु साहस म्हणून पायी निघायचं, आणि लिफ्ट मागत पैसे न खर्च करता जायचं..

तर यावेळी निघायला तसा थोडा उशीर झालेला, 3 वाजता निघालो, उन्हाळ्याचे दिवस, खूप जास्त तापलेला रस्ता.. नेहमी तुरळक वर्दळ असणारा रस्ता आज मात्र खूप शांत होता.. ४.३० पर्यंत सारखा चालत होतो, अंतर सांगता येणार नाही पण एका गावपाशी पोचलो, आणि ऑटो दिसला त्यात बसून धरणगाव पोचलो, मालवाहू रिक्षा होती ती, फार हळू हळू जात धरणगाव पाशीच उन्हे कलु लागलेली.. मी विचार केला थोडसं तर राहिलंय भेटेल काही वाहन, निघालोय तर आपलं साहस पूर्णच करूयात.. धरणगावच्या बाहेरची कापुसकेंद्रे पार केली, तरी गाडी भेटेना. घशाला कोरड पडत चालली, पाय भयंकर दुखू लागले आणि मी हताश झालो, धीर गेला आणि पाय ओढत रडत रडत चालू लागलो, अखेर एका मोटरसायकलवाल्याला माझा हात दिसला आणि तो जरा पुढं जाऊन थांबला.. गडी भेलकांडत थांबला,

मोटरसायकलवाल्याला माझा हात दिसला आणि तो जरा पुढं जाऊन थांबला.. गडी भेलकांडत थांबला,

Submitted by अजिंक्यराव पाटील on 10 April, 2019
- पुढे काय झाले? घरी पोहोचले की नाही?

अजिंक्यराव असले साहस करण्याची मला पण सवय होती. एकदा नातेवाईकाचे लग्न होते. मी गावापासून अडीचशे किलोमीटरवर कामाला होतो. लग्नाच्या गावाला सरळ आदल्या दिवशी हळदीला जावे असे ठरवले. बाईकवर निघालो. उशीर झाला होता. जाता जाता अंधार पडला. दहा वाजले. एका ठिकाणी जेवण केले. आता रस्ता एकदम सुनसान होता. इतक्या उशिरा कसे जायचे याचा विचार करत मनात घाबरलो होतो. अचानक अंधारात एका माणसाने हात दिला. गाडीवर बसल्यावर त्याच्याशी गप्पा सुरू केल्या. तो पंधरा किलोमीटर वर एका देवस्थानाच्या ठिकाणी चालला होता. दर अमावास्येला तिकडे मुक्कामाला जात असे. त्याच्या गावावरून निघायला उशीर झाल्याने तो एकाकी रस्त्यावर पायीच चालला होता. मी तिकडे मुक्काम केला तर जमेल का असे विचारले तर चला म्हणाला.
आम्ही पोहोचलो तर सर्व झोपी गेले होते. तसेच ओट्यावर झोपलो. जानेवारी महिन्याची थंडी इतकी होती की झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर मग पुढे लग्नाला गेलो. परत असे बिनधास्त वागायचं कमी केले.

.

Pages