मानवीय!!

Submitted by कृष्णा on 10 February, 2016 - 01:44

हा मानवीय धागा!

आपण समाजात वावरत असता बरेच मानवतेचे अनुभव येतात ते एकमेकांशी शेअर व्हावे हा उद्देश्य!

सुरवातीलाच माझा एक किस्सा सांगतो!

साधारण १९९१ च्या सुमाराची गोष्ट... मी ऱोह्याला होतो तेंव्हा ऐन उन्हाळ्यात मे महिण्यात काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र बाईकवरुन अलिबागला गेलो होतो! काम आवरुन साधारण दु. १२ च्या सुमारास परत निघालो. रामराज मार्गे सधारण २५-३० किमी आल्यावर रोह्यापासुन १०-१५ किमी अलिकडे बाईक अचानक बंद पडली!!
अर्धा तास किक मारुन थकलो पण सुरु व्हायचे नांव नाही पेट्रोल प्लग सगळे ओके!! शेवटी बर्‍याच वेळाने एक बस आली तिच्यात मित्राला रोह्याला जाऊन मेकॅनिक घेऊन ये म्हटले! तो गेला मी आपला एका वडाच्या डेरेदार झाडाखाली बाईक जवळ बसुन राहिलो. दुपारची वेळ रणरणते ऊन रस्त्यावर चिट्पाखरु नाही. दमल्याने आणि उन्हाने घश्याला कोरड पडलेली जवळ पाणी नाही समोर साधारण शे दोनशे पवलावर काही घरे होती तिथे गेलो पाणी विचारले प्यायला कुणी देईना ३-४ घरात जाउन आलो सगळे म्हणे पाणी नाहीए.... तसाच धापा टाकत झाडाखाली आलो.... उजव्या बाजुला १०० पावलावर अथांग खाडी पण प्यायला पाण्याचा थेंब नाही.... शेवटी विचार केला २ घोट खाडी तर खाडी पिऊयात २ घोट. तिथे जाऊन ओंजळीत घेतले तर काळे कभिन्न पाणी!! तसाच माघारी आलो....
तहानेने व्याकुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवत होतो.... रोह्याच्या रस्त्याकडे पहात....

तेवढ्यात डाव्याबाजुने एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडाघेऊन वर आलेली दिसली हाताशी एक पोर.. दोघेही असल्या उन्हात अनवाणी ती जवळ आली तसे ताई पाणी मिळेल का प्यायला घोट्भर म्हणून विनवणी केली... तिने अगदी हसतमुखाने हंडा डोक्यावरचा खाली घेतला विशेष म्हणजे हंड्यावर एक ग्लास पण होता! ग्लास काठोकाठ भरुन तिने दिला प्यायला घटाघटा अधाश्या सारखे ते प्यायले.... खरोखर त्या क्षणी ते अमृत होते माझ्यासाठी... मी ग्लास परत देऊ लागलो तसे अजुन्हवे का म्हणून ती पुन्हा देऊ लागली... त्या माऊलीने उरापोटी आणलेल्या त्या हंड्यातुन आपण एक ग्लास घेतला हेच खुप हा विचार आला तत्क्षणी... त्या माऊलीच्या चेह-यावरचे समाधान माझ्या दहापट होते हे जाणवले... खिश्यात हात घालून हातालालागेल ती नोट काढून तिच्या मुलाच्या हातात ठेवली... मला ते पैसे कश्याला देताय म्हणून म्हणू लागली... विशेष म्हणजे मला पाणी दिल्यावर ती माऊली आल्या रस्त्याने पुन्हा गेली डाव्याबाजुचा रस्ता उतरुन......

आता हा अनुभव ह्याला दैवी म्हणा मानवी म्हणा वा मानवातल्या देवाचा म्हणा....
त्या २-३ तासातले अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखे आणि खुप काही शिकवुन गेले तेंव्हा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी बायको व्हेस्पा स्कूटरच हवी म्हणून हट्ट धरून बसली होती. इतक्या महागाची गाडी घ्यायची माझी ऐपतच नव्हती. मग मी साबुंना फोन करून परिस्थिती सांगितली तर दुसऱ्या दिवशी नवी गाडी दारात आणून लावली. माझा तर उर भरून आला. नंतर च्या दिवाळीला चक्क नवीन एनफिल्ड बुलेट मला गिफ्ट म्हणून दिली. खरंच मी खूप खूष आहे.

माझ्या मेव्हण्याने मला आयपॅड गिफ्ट दिलाव तर माझी बायको त्यात किराणा मालाचा हिशोब एक्सेल मध्ये ठेवायला लागली. स्टॉक किती आहे, काय संपलं, काय मागवायचं याच्या याद्या अपटूडेट अस्त्या तिच्या.

आमच्या कंपनीत दरवर्षी दहा दहा किलो खारे बदाम, खारेशेंगदाणे, खारे काजू, खारे पिस्ते दिवाळीला भेट म्हणून देतात. तर एका मित्राने माझे खारे शेंगदाणे घेऊन बदल्यात खारे पिस्ते दिले. मी रोज विजारीच्या खिशात खारे पिस्ते भरुन रस्त्याने खात खात जातो. मित्र असावा तर असा.

उनाडटप्पू आता काय रे भाऊ काहीही काय बोलून राहीलास. मी खरं कधी बोलत नाय नि खोटं काय सांगत नाय.

बायकीची व्हेस्पा स्कुटर,आयपॅड मध्ये सामान यादी,खरावलेले पिस्ता हे योगायोगाने आलेत की मुद्दामहून?
मुद्दामहून ,खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने लिहिले असेल तर खरंच वाईट वाटले,ज्यांच्या बद्दल कुत्सित पणे हे लिहिलंय त्या लेखकाचे लेख माझ्यासाठी तरी स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात,

बायकीची व्हेस्पा स्कुटर,आयपॅड मध्ये सामान यादी,खरावलेले पिस्ता हे योगायोगाने आलेत की मुद्दामहून?
मुद्दामहून ,खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने लिहिले असेल तर खरंच वाईट वाटले,ज्यांच्या बद्दल कुत्सित पणे हे लिहिलंय त्या लेखकाचे लेख माझ्यासाठी तरी स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात,+१११११

बापरे मला कधीही वाटले नव्हते की 'त्यांच्या'बद्दल तरी कुणी कुत्सितपणे लिहू शकतो किंवा त्यांचा राग करु शकतो. इथे त्यांनी जे काही लिहिले आहे किंवा माझ्या वाचनात आले आहे त्यावरुन तरी त्यांनी कुणालाही दुखावल्याचे स्मरत नाहीये.

बायकीची व्हेस्पा स्कुटर,आयपॅड मध्ये सामान यादी,खरावलेले पिस्ता हे योगायोगाने आलेत की मुद्दामहून?
मुद्दामहून ,खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने लिहिले असेल तर खरंच वाईट वाटले,ज्यांच्या बद्दल कुत्सित पणे हे लिहिलंय त्या लेखकाचे लेख माझ्यासाठी तरी स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात,+१११११

शशिराम, बोकलत या सारखी मंडळी या धाग्याची पण वाट लावणार असे दिसतंय ... केवळ विघ्नसंतोषी मानसिकता +११११११११११

तर मंडळी अशीच शाळा सुटली चाराण्याचे फुटाणे घेतले. चड्डीच्या खिशात ठेवून खात खात निघालो. तेवढ्यात एक वीस पंचवीस वर्षांची बाई लहान मुलाला घेऊन समोरुन आली. मला म्हणाली मला खंडोबा आळीत जायचे आहे मला आठवत नाही कुठे आहे , मला नेऊन सोडतो का, मला तिची दया आली माझ्यासारखी खेडेगावातली दिसत होती.
झाले मग मीही तिच्याबरोबर प्रत्येक गल्लीत शिरून भेटलेल्या लोकांना खंडोबा आळी कुठे आहे विचारत विचारत जाऊ लागलो. कुणालाच माहीत नव्हते. असे दोन अडीच तास फिरत होतो आणि एका गल्लीत शिरताच ती म्हणाली " हेच घर हेच आहे घर". असं म्हणून ती त्या घरात शिरली.
तिने माझे आभारही मानले नाहीत की पाणी सुध्दा विचारले नाही. मी परत वाटेला लागलो, तहानही लागली होती. या गरबडीत माझ्या गावच्या वाटेपासून फार दूर आलो होतो. मला तिचा राग आला नाही. त्या वयातही मी असा विचार केला बरं झालं बिचारीला घर सापडलं.
आजही शहरात त्या बाजूला गेलो तर ती आठवण येते.

एकदा असेच मोटार सायकल वर घराकडे चाललो होतो. चार वाजता उन्हात एक तरुण पायी पायी चालला होता. मला दया आली व त्याला गाडीवर बसवले. कुठला, काय करतो असे विचारले तर नागपूरचा राहणारा आहे, पोलिसात गुन्हे दाखल असल्याने घरच्या लोकांनी हाकलून दिले आहे म्हणाला. दहा मिनिटात माझं घर येणार होते. व माझे घर रोडकडेच्या सोसायटीमध्ये होते. विचार केला. याने जर घर पाहिले व परत आला तर....
मी त्याला अलिकडे उतरवलं. बाजूच्या गल्लीत शिरून समांतर रस्त्याने घर गाठले.

एकदा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेटजवळच्या उतारावर एक शहरी मनुष्य पायीच शहराकडे निघाला होता. मी गाडी थांबवली व त्यांना बसा म्हणालो. बसल्यावर त्यांनी सांगितले की मुलाच्या काही कामासाठी विद्यापीठात आले होते व रेल्वेने मुंबईला परत चालले होते. बस , रिक्षा मिळेना म्हणून पायी चालले होते.
मी त्यांना रेल्वे स्टेशनला थेट बस मिळणाऱ्या स्टॅण्ड वर पोचवले. उतरताना I must pay you. म्हणून पैसे देऊ लागले. मी पैसे घेतले नाही. पण त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद व समाधान बघून खूप बरे वाटले. पुढे गेल्यावर वाटले अरे आपण त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला हवे होते.

आज माझ्या बायकोने रात्रीच्या उरलेल्या भातात चिकन टाकून अशी छान बिर्याणी बनवली की ज्याचं नाव ते. मस्त आडवा हात मारलाय. थोडी वामकुक्षी घ्यायचा प्रयत्न करतो.

जगणे. लिहीणं माझं स्वानंदासाठी. भरभरून लुटतोय मी जीवनाचा आनंद. सर्वांणी आनंदात जंगलं पाहिजे. कॉफीची वेळ झालीय. बायकोने इंपोर्टेड क्रॉकरी कुठे ठेवलीय काय माहीत. कुणाचा स्वानंद कुणाला संताप? करा रे आदळापट. थोडा सुकामेवा खाता का पाव्हणं?

कंपनीत एक दिवस माझ्या पायाला जखम झाली, अंगठ्याचे नख पुर्ण उखडून गेले. डॉक्टर कडून रोज ड्रेसिंग, अॅंटीबायोटिक गोळ्या घेऊनही जखम बरी होत नव्हती. अगदी हैराण झालो होतो.
आणि एक दिवस कंपनीत काम करणाऱ्या वयस्कर आजींनी काळी पावडर आणून दिली व खोबऱ्याच्या तेलात मिसळून लावायला सांगितली. कडुनिंबाची साल जाळून अजून काही औषधी वनस्पती टाकून ती पावडर त्यांनी बनवलेली होती.
दोन-तीन दिवसांत जखम कोरडी पडून बरी झाली.
मी त्यांचे आभार सुद्धा मानले नाहीत की काही पैसेही दिले नाही. आज आठवले तर वाईट वाटते.

आजच दिगू माझ्या मित्राने पोतंभर भोरचा आंबेमोहोर सुवासिक तांदूळ पाठवलाय. बिर्याणी तर बननीच चाहिए बॉस.

I guess u r jealous because of the fan following. Happy
Even if u r making fun because of whatever reasons, its very cheap!
Manaveey avrutti of amanaviy someone (both look ridiculous! :)), which is someone else afraid to show real id!

मर्‍हाटीत लिव गं तायी. विंग्रजी वाचायला लै कंटाळा. विंग्रजीच्या मास्तरनं नापास क्येलं तर खाजकुयली लावली बुडाला तेच्या.

इनोसंट लोकांना मी कधीच वाईट बोलत नाही. योगायोगाने सारखे शब्द, वाक्य असू शकतात. म्हणून कुणाच्या लेखनाची टिंगल केली असं कसं म्हणता येईल?

सुकामेवा खाल्ला की व्हीटॅमीन ई, ओमेगा फॅटी अॅसीड मिळून डोकं शांत राहतं माझं नि बायकोचं पण. आयपॅड वरच्या यादीत पहिलं नाव सुक्कामेवा अस्तय.

बिर्याणी खायला या मंडळीं. आजच उतर प्रदेशचे गुप्ता काकांचा फोन आलेला. भरपूर सुकामेवा घालून तयार केलेली रबडी खायला बोलावलं आहे मला. म्हणाले बापू आनाच पडेगा. मला प्रेमाने सगळे बापू म्हणतात. काही काळ अमेरिकेत होते. व्हाईट हाऊस मध्ये भारतीय मिठाया बनवायचे. ट्रंपसाहेब सोडतच नव्हते. कसेतरी खोटा पासपोर्ट बनवुन प्लॅस्टिक सर्जरी करून भारतात परतले. ब्रिजवासी मिठाई अशा नावाने चेन काढलीन भारतात. सगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिठाई पुरवतात. नंतर सविस्तर लिहीतो. चार्टर प्लेनसुद्धा आहे त्यांच्या कडे. लिमोझीन, रोल्स, मर्सीडिझ डझनाने आहे.

एकदा आमच्या गावचा लोकप्रतिनिधी गल्लीतील नवीन छानछान बिर्याणी दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी आला होता. घाईत लेंगा पायजमा घालून आला. त्याला पाहून एक पोरगं म्हणालं राच्ची उतरली नाही वाटतं याची. लगेच त्या पुढाऱ्याचे चमचे त्या पोराला मारायला धावले.‌ पुढारी गप घरात जाऊन स्ट्रॉंग कॉफी पेत बसला.

माहाराष्ट्री देशात खूप काळापासून स्वामीनिष्ठा हा प्रकार चालत आलाय. कुणी तरी पराक्रम करावा व आपलं नाव त्याला काहीही करून चिकटवावे अशी इथल्या एकनिष्ठांची इच्छा असते. स्वत:चं काहीही कर्तुत्व नसलं तरी चालेल. निष्ठेची विष्ठा झाली तरी यांना चालते.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता?

Pages