स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?

Submitted by Swara@1 on 30 January, 2016 - 01:29

कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.

हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )

तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.

खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, सहमत, अशी उदाहरणे पहाण्यात आहेत, अगदी कॅन्सर नाही, पण अन्य अनेक व्याधीउपाधी मागे लागलेल्या.
आमचे फॅमिली डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की धार्मिक वा अन्य कोणत्याही व्यावहारिक कारणाकरता (सहल/ट्रीप, स्पर्धा/परीक्षा इत्यादी) अशा गोळ्या घेऊच नका. आम्हि ते मानतो.
या गोळ्यांमुळे नेमके काय परिणाम होतात? साईडइफेक्टस काय? कुणी म्हणते की हार्मोन्सच्या स्त्रावांमधे अनैसर्गिकरित्या बदल घडून मग शरीर बेढब बनणे, इतर व्याधी जडणे असे होते, हे कितपत खरे आहे?

अरे वा संस्कार झालेल्या व्यक्तीला खालच्या पातळीवरची भाषाही अवगत असते वाटतं ? कुठून मिळाले बरे हे 'संस्कार '? असू द्या असू द्या.

चर्चा परत योग्य विषयावर आली त्याबद्दल अभिनंदन.
गोळ्या काही जणांना सूट होतात, काहींना नाही. काहींना केस गळणे, फॅट सेल्स अजून निबर होणे(म्हणजे चरबी वितळवायला कठीण) असे त्रास होऊ शकतात.आयर्न चे प्रमाण नीट असलेल्या गोळ्या घेतल्यास कमी होतात.
मुळात गावाकडचे/कोणत्याही पारंपारिक घरातले सणवार घेतले तर श्राद्धपक्ष सोडून प्रत्येक महिन्यात काहीतरी देव देव असतेच.जानेवारी-फेबः संक्रांत, मार्चः होळी, एप्रिलः पाडवा/चैत्रगौरी,मे:काही नाही पण लग्नकार्ये भरपूर्,जून जुलै जरा फ्री, ऑगस्टः श्रावण/मंगळागौरी,सप्टें: गणपती,ऑक्टः नवरात्र,नोव्हेंबर डिसेंबर कधीकधी वेगवेगळ्या इतर देवा देवींचे नवरात्र.
म्हणजे बर्‍याच महिन्यात 'गोळ्या घेऊन वेळ मारुन नेणे' ही सिच्युएशन येणार असली तर धोकादायक, पिरियड पुढे नेत बसल्याने कॅलेंडर चा ट्रॅक चुकणे वगैरे परीणाम.

मी-अनु, तुमच्या विवेचनावरुन एक कळते की आपण/आपला समाज एकंदरित स्त्रीयांचे आरोग्याचे प्रश्नांबाबत खाजगी व सार्वजनिकरित्या अत्यंत हलगर्जीपणे वागतो. मग तो स्वच्छता गृहाचा प्रश्न असो की मासिकपाळीचा किंवा गर्भारपणाच्या रजेचा...... !

समाज असेच नाही, स्त्रिया स्वतः पण.
बर्‍याच बायका(मी कमी केलेय हे सर्व आता आताच) शरीराला दणकट जर्मन बनावटीची मशिन समजून ते पूर्ण क्रॅश होईपर्यंत वाटेल तसे राबवत असतात.
'बाहेरुन आल्या आल्या क्षणभरही न बसता स्वयंपाकघरात शिरले'/'सकाळी उठल्यापासून अजून बसले पण नाहीये, चहा कॉफी नाश्ता केला नाहिये, दोन तास राबतेय' वगैरे वाक्यं हल्ली कमी ऐकू येत असली तरी पूर्ण शून्य नाहीत.
कॅल्शियम आयर्न बी१२ ची कमी किती बायकांत आहे?किती जणी कुटुंबाला गरमागरम पानात वाढून स्वतः एखादं गारढोण झालेलं थालीपीठ/पोळी/कढईत खाली असलेली थोडी लागलेली भाजी घाईत खाऊन पुढच्या आवराआवरीला आणि पुढच्या दिवसाच्या तयारीला लागतात?

"मला काही होत नाही, मी बाजूला वगैरे बसणार नाही" किंवा 'मला त्रास होतोय, मी बाजूला बसणार नाही, माझ्या खोलीत विश्रांती घेणार्,त्या वेळात गवार निवडणे/वाती वळणे इ. बैठी पण थकवणारी कामे करणार नाही' हे नीट शब्दात पण अर्थ पोहचेल असे किती जणी सांगू शकतात? त्यांना साथ न देता त्यातून 'उद्धट उत्तरं देते' अर्थ काढून त्यांना 'सासू चालेल पण नवरा आवर' असे किती नवरे घरात वागतात?
(जाऊदे विषय अजून तिसरीकडेच जातोय, मी थांबते.)

पूर्णपणे सहमत मी_अनु.... हे सर्व तुम्ही म्हणता तसेच होत रहाते.
अन घरातील बाई म्हणजे २४ तासाची घरगडीण अशाच प्रकारे तथाकथित "संस्कारी /खानदानी " वगैरे घरातही वागणे असते. असो. हा धाग्याचा विषय नाहीये. पण या गोष्टीही स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करतातच, म्हणून इथे उल्लेख होतोय इतकेच.
अहो, बाहेरुन आलेल्या पाहुण्याला पाणी दिले तर समजु शकते, पण घरातल्या "सोट्या पुरुषालाही" हातात पाणी द्यायचे?
अन टीपॉय नसल्याने कोचावर पहुडलेल्या त्याने तो ग्लास्/भांडे जमिनीवर ठेवायचे, अन नंतर स्त्रीने ते अगदी खाली वाकुन उचलुन न्यायचे वगैरे..... चीड येते असल्या प्रकारांची.
अर्थात हे देखिल खरे की ती स्त्री उचलसाचल वाकावाक केल्याने त्या पुरुषाच्या तुलनेत बर्‍यापैकी चालतीफिरती रहाते, तर असले ऐदी पुरुष हमखास ढेरपोटे, रोगट, आतुन पोकळ, काडीही उचलणे राहुदेच, स्वतःच्या पायावर स्वतःच्या देहाचा भार उचलण्यासही नालायक बनत जातात. वाईट असे की असल्या मुर्दाडांचेही शेवटी त्याच स्त्रीला करावे लागते... ! इट्स हॉरिबल. अन चीड येते ती अशी घरे बघितल्यावर की जिथे अगदि माना वेळावत वेळावत ठसक्यात सांगितले जाते की "आमच्यात ना, पुरुषांना घरातील काही काम सांगायचि पद्धत नाही" .... अरे धत्त त्यांची..... अजुन शतकभर तरी मागास असतात असली कुटुंबे.

बर्‍याच बायका(मी कमी केलेय हे सर्व आता आताच) शरीराला दणकट जर्मन बनावटीची मशिन समजून ते पूर्ण क्रॅश होईपर्यंत वाटेल तसे राबवत असतात.>>>>> एक नंबर वाक्य ... लईच भारी. माझ्या आधीच्या पिढीसाथी समजावणे सेशन्स सुरु असताना मी नक्की वापरणार.

त्यांना हेही सांगा की जर्मन मशिन असले तरी ते मुळात भरपूर वर्षे विनातक्रार चालायला त्याला व्यवस्थित नियमीत आणि गरजेनुसार तेलपाणी करावे लागते, त्याची निगा राखावी लागते Happy
हमारे पास ऐसे कागदी बाण बहुत है.

म्हन्जी डोक्यात किडा घुमतोय बगा.....
त्याच अस हाये...तर...सगळ्या कामात मदत घेणार्या...माझ्या साबा. फ़क्त मसाला करताना मात्र मी ऑ. मधुन येण्या पुर्वीच/ऑ. मधे गेली असतानाच का करुन घेत असतील?
पण- हा अनुभव बघता शिवाशीव असे काही नसावे असे वाटतेय.
अनुभव- लग्नाच्या पहिल्या वर्षी-गौरी च्या सणाला.... ही ग़ोष्ट त्यांच्या माझ्यात ठेव म्हाणाल्या-- स्वयंपाकात मदत घेतली हे दे ते ठेव इ. पण रांगोळ्या काढणे, इतर कामे कर असे म्हणाल्या. चुलत घरे शेजारी पाजारीच होती- गौरी आगमनच्या दिवशी- चुलत जावेने नमकी माझ्या कडेच 'उद्या' साठी नैवद्य वाढायला म्हणुन केळीची पाने दिली. मी घेतली.. घरी आल्यावर सा.बांअ कडे बघुन हसले फ़क्त..त्या म्हणाल्या अग असुदे धुवुन घेइन.
नक्किच फ़ुकटाचा किडा आहे.

तर- द्या सोडुन सगळ. देव काही म्हणत नाही. मग हे मधले कोण?
मुद्दा असा की- स्वरा यांनी उल्लेख केलेल्या
सो कॉल्ड 'बायकां' चा प्रबोधन वैगेरे करायला मात्र जावु नये. कृती करुन टाकावी. Happy
म/ लो. खराब झाल की बघु म्हणा.
मुळात या विषयात अडकुच नका. लेकबाईंना ही योग्य वयात हे समजवा.

सहमत निरा.
आजच्या काळात खरंच, अशाने मसाले / लोणचे खराब होतात का? पण मग अमुक का बरं खराबं होत नाही वगैरे प्रबोधनं करण्याच्या भानगडीत पडुच नये.

हे न समजण्याइतपत नासमज कुणी खरंच आहे यावर विश्वास बसणे कठीण.
उगाच पूर्वी पाळायचे म्हणुन / आमच्या सासूने आम्हाला किती पाळायला लावलं आम्ही नाही काही म्हटलं ..तुम्हाला एवढंपण करता येत नाही का वगैरे हेका असावा त्यामागे.

झालेल्या घटनेमागची विचारसरणी निखालस चुकीची आहे हेच प्रत्येकाचे मत असूनही येथे वाद होत आहेत ह्याचा अर्थ भरीव चर्चेपेक्षा वाद घालण्यात रस अधिक असावा.

सगळ्या कामात मदत घेणार्या...माझ्या साबा. फ़क्त मसाला करताना मात्र मी ऑ. मधुन येण्या पुर्वीच/ऑ. मधे गेली असतानाच का करुन घेत असतील?>> निरा, तुझ्या साबाना त्यांची मसाल्याची सिक्रेट रेसिपी तुला कळू द्यायची नसणार, तू पण तसाच मसाला बनवु लागली तर भाव कमी होईल की त्यांचा. Proud Light 1

>>>>> ह्याचा अर्थ भरीव चर्चेपेक्षा वाद घालण्यात रस अधिक असावा. <<<<<<
बेफिकीर, असच काही असेल असे नाही, पण......... पण स्वतः धागाकर्तीच्या घरी याबाबत काय पाळले जाते वा नाही? याचे उत्तर मिळतच नाही. लोणच्याची घटना घडते ति ऑफिसातल्या मैत्रिणीच्याकडे, अगदी सत्यनारायणाच्या पुजेवेळी कोंबडे झाकले जाते ते देखिल अशाच कुणाच्या तरी घरी...
हरकत नाही, पण मग अशा विशयाबाबत धागाकर्तीच्याकडे सासरी माहेरी काय पाळले जाते वा जात नाही याचाही सविस्तर तपशील आला अस्ता तर जाणकारांना त्यांची बहुमूल्य मते मांडावयास अधिक आनंद झाला अस्ता, नै का? असो. मी आपले निदर्शनास आणले हो वेगळेपण.

बेफ़िकीर | 2 February, 2016 - 04:42
झालेल्या घटनेमागची विचारसरणी निखालस चुकीची आहे हेच प्रत्येकाचे मत असूनही येथे वाद होत आहेत ह्याचा अर्थ भरीव चर्चेपेक्षा वाद घालण्यात रस अधिक असावा.<<< सह्मत

>>>>> ह्याचा अर्थ भरीव चर्चेपेक्षा वाद घालण्यात रस अधिक असावा. <<<<<<
बेफिकीर, असच काही असेल असे नाही, पण......... पण स्वतः धागाकर्तीच्या घरी याबाबत काय पाळले जाते वा नाही? याचे उत्तर मिळतच नाही. लोणच्याची घटना घडते ति ऑफिसातल्या मैत्रिणीच्याकडे, अगदी सत्यनारायणाच्या पुजेवेळी कोंबडे झाकले जाते ते देखिल अशाच कुणाच्या तरी घरी... हरकत नाही, पण मग अशा विशयाबाबत धागाकर्तीच्याकडे सासरी माहेरी काय पाळले जाते वा जात नाही याचाही सविस्तर तपशील आला अस्ता तर जाणकारांना त्यांची बहुमूल्य मते मांडावयास अधिक आनंद झाला अस्ता, नै का? असो. मी आपले निदर्शनास आणले हो वेगळेपण.<<<<< माझ लग्न व्हायचय अजुन

<<

<

<<

>>>>> <<<<< माझ लग्न व्हायचय अजुन <<<<< Uhoh
तुम्ही फारच फुल्लटॉस देताय...... सिक्सरशिवाय पर्यायच नस्तो अशावेळेस....
पण जाऊदे.. सोडुन देतो हा बॉल... ! Proud

निधी--:) Happy असेच असणार..
कारण मी या कारणा वरुन त्यांना चिडवले आहे. तेंव्हा, त्यात काय पुढच्या वेळेला सुट्टी च्या दिवशी करुयात असे उत्तर आले..पण 'ती' सुट्टी काही आली नाही...गेल्या १३ वर्षात Wink
बाकी...त्यांचा मसाला मात्र हटके असतो.
अर्थात...मला फ़क्त खाण्याशी मतलब त्यामुळे सिक्रेट राहुदे बापडे. Happy

limbutimbu | 2 February, 2016 - 05:27
>>>>> ह्याचा अर्थ भरीव चर्चेपेक्षा वाद घालण्यात रस अधिक असावा. <<<<<<
बेफिकीर, असच काही असेल असे नाही, पण......... पण स्वतः धागाकर्तीच्या घरी याबाबत काय पाळले जाते वा नाही? याचे उत्तर मिळतच नाही. लोणच्याची घटना घडते ति ऑफिसातल्या मैत्रिणीच्याकडे, अगदी सत्यनारायणाच्या पुजेवेळी कोंबडे झाकले जाते ते देखिल अशाच कुणाच्या तरी घरी...
हरकत नाही, पण मग अशा विशयाबाबत धागाकर्तीच्याकडे सासरी माहेरी काय पाळले जाते वा जात नाही याचाही सविस्तर तपशील आला अस्ता तर जाणकारांना त्यांची बहुमूल्य मते मांडावयास अधिक आनंद झाला अस्ता, नै का? असो. मी आपले निदर्शनास आणले हो वेगळेपण.

Swara@1 | 1 February, 2016 - 00:23
<<< (प्रिय सनव , प्लिज ताई नका म्हणू हो, मी लहान आहे.)
आमच्या घरी शिवाशिव वगैरे काही पाळत नाही त्यामुळे खरच अस काही होत हे माहित नाही. तसेच आम्ही घरी लोणच बनवत नाही आणि विकतच लोणच अजूनपर्यंत 'तश्या' काळात खराब झालेलं नाही आहे.
आणि जाणकार म्हणजे ज्यांच्या बरोबर खरच अस झालेलं आहे, ज्यांना खरच अनुभव आलेला आहे.

अरे देवा बाजारात मूग डाळ अन...... दिवे. घ्या.

धागाकर्त्या ताई माझा अपमान करू नका प्लीज. मी पोस्ट मेनोपॉजल आनंदात कुठे ही विहरते अन काहीही करते.

Pages