कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.
हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )
तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.
खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?
रून्म्या बस शांत बिनधाग्याचा
रून्म्या बस शांत
बिनधाग्याचा बसवत नाही का?
बसवत नाही का? >>> उसवतो .
बसवत नाही का? >>> उसवतो .
इथले प्रतिसाद वाचून या
इथले प्रतिसाद वाचून या गोष्टींवर आजही सुशिक्षीत लोकांचा विश्वास आहे हे वाचून वाईट वाटले. मूर्खपणाचा कळस आहे.
सर्दी झाल्यावर वाहणार्या
सर्दी झाल्यावर वाहणार्या स्त्रावाप्रमाणेच मासिक पाळी हा स्त्राव आहे इतकेच.
लक्ष्मी नारायण चिवडा >> मग
लक्ष्मी नारायण चिवडा >>
मग तर फलाहारच करावा लागेल. घरी हिंग लक्ष्मी ब्रँडचा वापरतो, मग तर सगळेच फोडणीचे पदार्थ कटाप होतील.
सर्दी झाल्यावर वाहणार्या
सर्दी झाल्यावर वाहणार्या स्त्रावाप्रमाणेच मासिक पाळी हा स्त्राव आहे इतकेच. >> यक्क, नाही
सर्दी व्हायरस, बॅक्टेरिया इ मुळे होते, अॅलर्जीमुळे होते. तुलनाच करायची तर घामासारखाच मासिक स्त्राव एक त्याज्य शारिरीक घटक आहे.
घामासारखाच मासिक स्त्राव एक
घामासारखाच मासिक स्त्राव एक त्याज्य शारिरीक घटक आहे.>>> +१
तुपाचे भांडे,पाण्याचे तांब्याचे भांडे ,आदी ना हात लावू नये.घरी गणपती असेन तर ४ दिवस कोपरा,वैगरे अजुन ही बर्याच घरी पाळल जात.
सासु लोकांची अजुन एक मेन्टॅलिटी असते.स्वतःच्या मुलीने घरभर बागडाव.देव्हारा सोडुन सगळीकडे हात लावावा.मात्र हे सुनेने केलेले चालत नाही.
पंकजा मुंढेंनी पुन्हा तारे
पंकजा मुंढेंनी पुन्हा तारे तोडले. त्यांची बांधीलकी स्त्रीत्वाशी असण्यापेक्षा, पक्षाशीच जास्त आहे. मंत्रीपदाच्या एका तुकड्यासाठी !
कमाल आहे. अजुन किती पिढ्या
कमाल आहे. अजुन किती पिढ्या जाव्या लागणारेत या सगळ्यातुन बाहेर पडायला कोण जाणे
बाकी, सूनबाईंनी ठणकाऊन का नाही सांगितल की झालं खराब तर विकतच आणून देइन, उगाच कश्याचा संबंध कश्याला लावू नका. असो.
स्वराताई, तुमच्या घरी ही
स्वराताई,
तुमच्या घरी ही शिवाशिवीची पध्दत पाळतात का? जर नसतील पाळत, तर त्यामुळे कधी लोणची-मसाले बिघडले आहेत का? का तुम्ही लोणची-मसाले घरी बनवत नाही? विकतच आणता का? मग विकत आणताना चेक करता का की कोणी बनवले आहेत व कधी? जर नसाल करत तर कधी अचानक मसाला खराब झालाय वगैरे अनुभव आला आहे का? ही उत्तरं तुम्हाला आपली आपणच मिळतील.
अजून एक आयडिया- हा प्रयोग घरी करुन बघता येईल- मुद्दाम पिरियडसच्या काळात लोणचं बनवून बघायचं- एखादी सोप्पी लोणचं/मसाला कृती नेटवर मिळेल-हाकानाका!
दुसरं- 'जाणकारांचं' म्हणजे नक्की कोणाचं मत हवंय? ते लिहा. इथे जाणकार म्हणजे घरी मसाले/लोणची बनवणार्या स्त्रिया का? की गायनॅकॉलॉजिस्टचं मत हवंय पिरियड्सबद्दल?
<<< (प्रिय सनव , प्लिज ताई नका म्हणू हो, मी लहान आहे.)
आमच्या घरी शिवाशिव वगैरे काही पाळत नाही त्यामुळे खरच अस काही होत हे माहित नाही. तसेच आम्ही घरी लोणच बनवत नाही आणि विकतच लोणच अजूनपर्यंत 'तश्या' काळात खराब झालेलं नाही आहे.
आणि जाणकार म्हणजे ज्यांच्या बरोबर खरच अस झालेलं आहे, ज्यांना खरच अनुभव आलेला आहे.
लक्ष्मी नारायण चिवडा >> धन्य
लक्ष्मी नारायण चिवडा >> धन्य धन्य!
बाकी, सूनबाईंनी ठणकाऊन का
बाकी, सूनबाईंनी ठणकाऊन का नाही सांगितल की झालं खराब तर विकतच आणून देइन, उगाच कश्याचा संबंध कश्याला लावू नका. >>+१
लक्ष्मी - नारायण चिवडा …. कहर
लक्ष्मी - नारायण चिवडा …. कहर आहे हा सगळ्याचा… काय म्हणायचं ह्याला.
लोल.. पण मग लक्ष्मी रोड ला
लोल.. पण मग लक्ष्मी रोड ला गेलं तर चालतं का?
आमचे एक नातेवाईक एका
आमचे एक नातेवाईक एका देवस्थानाचे विश्वस्त आहेत. आमच्या घरात आधी काही प्रमाणात शिवाशीव पाळत होते(सणावाराच्या काळात ताट जमिनीवर वाढून ठेवणे,(बाकी सगळे डायनिंग टेबल वर होत असताना)चहाचा कप जमिनीवर ठेवणे आणि जमिनीवरुन उचलावे लागणे इ.इ.) हे अजिबात आवडत नाही आणि पाळणार नाही आणि चालणार नाही, असं कन्व्हे केल्यावर सर्व शिवाशीव बंद झाली.(नवर्याच्या सपोर्ट मुळे आणि शिवाशीव वाल्यांच्या स्वतःच्या अडॉप्टेबिलीटी मुळे शक्य झालं.)
लोणचे मसाले याबद्दल इतका विचार कधी केला नाही, पिरीयड असणे ही इतकी नॉर्मल बाब आहे की रोजच्या घाईत हे लक्षात राहणारही नाही. अजून पर्यंत लोणची मसाले खराब झालेले नाहीत.
या काळात स्त्रीयांना पुजेला
या काळात स्त्रीयांना पुजेला सुध्दा बसवले जात नाही. बरोबर का?
पादुकानन्द | 30 January, 2016
पादुकानन्द | 30 January, 2016 - 20:57 नवीन
बाहेरून विकत आणलेल्या लोणच्याला तर कोणा कोणाचे हात लागलेले असतील . ती लोणची कशी नाही बिघडत बरे? >>>>>>>
हो बरोबर
आमच्याकडे हे अजिबात पाळले आत
आमच्याकडे हे अजिबात पाळले आत नाही. माहेरी आणि सासरी पण. मी कुलदैवतेच्या मंदीरात जाते, देवाची पूजा करते आणि यात काहीही चुकीचे वाटत नाही.
या विषयावर आपण पब्लिक फोरम वर उघडपणे बोलू शकतो हा ही चांगला बदल नाही का? आधीच्या पिढीतील सासूबाईंचे विचार बदलणे कठीण आहे, पण निदान आपल्या पासून तरी आपण बदल आणू शकतो की. कदाचीत पटणार नाही पण इथे तावातावाने लिहिणार्या किती मुली/बायका त्या दिवसात देवळात जातात?
स्वतःला विचारा की अश्या दिवसात तुम्ही तुमच्या नविन घराच्या सत्यनारायणाच्या पुजेला बसाल का? जर उत्तर हो असेल तरच जुन्या बायकांचे मसाला लोणची खराब होतात हे लॉजीक तुम्हाला मागासले पणाचे लक्षण वाटण्याचा अधिकार आहे.
मी अश्या खूप मुली बघितल्या आहेत की या प्रथांबद्दल नाराज असतात आणि गणपती/ नवरात्र जवळ आले की पिरियडस पुढे जाण्यासाठी गोळ्या घेतात. आपण वागतो हे लॉजिकल आहे का हा विचार करणे गरजेचे आहे
नशिब माझ्या माहेरी सासरी अशी
नशिब माझ्या माहेरी सासरी अशी कुठल्याच बाबतीत शिवाशिव नाही. पाळीचे दिवस असोत वा नसोत सगळे दिवस सारखेच रुटीन असते. त्यात रोजचे पठण, पूजा, आन्हिक, दत्तजयंतीपासून ३० दिवस असणारे वर्धमान व्रत, नैमित्तिक पठण असे सगळेच येते. एकदा तर गणपती बसवला होता पुतण्याकडे प्राणप्रतिष्ठेची पूजा सांगून आणि नैवेद्याचे मोदकही केले होता. अशी अशी अडचण आहे हे मोठ्या जावेला, साबांना आणि पुतण्या व त्याच्या बायकोला सांगितलं होतं. त्यावर ते सगळे म्हणाले "त्याने काय होतंय! ते काहीही असलं तरी तू ये आणि तूच पूजा सांग".
त्यामुळे लोणचं, मुरंबा, केळी वगैरे टाळण्याचा तर प्रश्नच नाही.
इसाई,मुस्लिम धर्मात पण हे
इसाई,मुस्लिम धर्मात पण हे पाळतात का?
ओला हात लागला की लोणची,
ओला हात लागला की लोणची, अनारस्याचे पीठ बिघडते किंवा फसफसते याचा मासिकपाळीशी काहीही संबंध नाहिये.
स्पष्टच लिहितेय, पुर्वी बाजुला बसवायच्या नावाखाली त्या बाईकडुन धान्य निवडुन घे, साठवणीतले कपडे धुवुन घे, मोठ मोठाली भांडी घासुन घे अशी कामे करुन घेत असत. आणि त्यावर पाणी शिंपडुन ते वापरत असत. अश्या कामात बुडालेल्या बाईचा ओला हात लागुन कधीतरी बिघडलं असेल लोणच. तर त्याचा संबंध मासिक पाळीशी लावून तिच्या माथ्यावर खापरं फोडायला एक कारण. दुसर काय?
बाकी ते बाजुला बसवणे, शिवाशिव न करणे, झोपायला वेगळी चटई, वापरायच्या पाणी वेगळं, टॉयलेट पण वेगळं असल्या प्रकाराला कंटाळुन मी कित्येकांशी संबंध तोडलेत.
गुब्बे, आता काळ बराच बदललाय.
गुब्बे, आता काळ बराच बदललाय. आता फारच थोड्या घरांमध्ये आणि तेही आधीच्या पिढीकडून हे होत असेल. जाईल ते ही समजुतीने सांगत राहिलं की
आमच्या चाळीत बरेच मालवणी
आमच्या चाळीत बरेच मालवणी कुटुंब राहतात. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्याकडे शिवाशिव पाळायचे. आमच्या कडे असला काही प्रकार नसल्याने आम्हाला काहीच कळायचं नाही कि ह्या काकी अश्या बाहेर का बसतात आणि त्यांना कोणी हात का नाही लावायचा… त्यांना हात लावला कि त्यांच्या सासूबाई मग आम्हाला ओरडायच्या आणि मग आमच्या अंगावर पाणी उडवायच्या. आम्हाला तर मज्जा वाटायची आणि आम्ही मुद्दाम त्यांना हात लाऊन पळून जायचो. पण नंतर नंतर मोठ झाल्यावर कळल हे नक्की काय आहे ते. पण मग प्रश्न पडायचे कि ह्यांनी कशाला हात लावलेला चालत नाही मग ह्या भाजी का साफ करतात , तांदूळ कश्या निवडतात. त्यांनी हात लावलेल्या ह्या गोष्टी कश्या काय चालवून घेतात.
स्वाती२, तुमच्या विश्लेषणाला
स्वाती२, तुमच्या विश्लेषणाला अनुमोदन.
>> ऑनलाईन ईथडगी बांधण्यापेक्षा काही अजरामर प्रतिसादांचे मायबोली अर्काईव्हज त्यापेक्षा कसे वाटते ? लिंबूंजींचे पण असतील ना काही प्रतिसाद, त्यांच्याच प्रतिसादांनी उद्घाटन करावे. <<<<<
कापोचेचाचा, मी फार पूर्वीच विचारले अॅडमिनना, की माझ्या काही जुन्या पोस्टी/स्वगते किमान मला तरी परत द्या एकत्रितपणे, तर इतका मोठा डाटाबेस खंगाळणे अवघड आहे असे सांगितले होते त्यांनी.
दुर्दैवाने असंख्य धाग्यांवरच्या माझ्या प्रतिसादाच्या पोस्टी तशाच गाडल्या गेल्या आहेत, अन त्या उकरुन काढणे, कॉपीपेस्ट करुन घेणे मला शक्य होत नाहीये.
>>>> मग ह्या भाजी का साफ
>>>> मग ह्या भाजी का साफ करतात , तांदूळ कश्या निवडतात. त्यांनी हात लावलेल्या ह्या गोष्टी कश्या काय चालवून घेतात. <<<< कोकणांत गेल्यावर हा प्रश्न आम्हीही आईला विचारायचो. (त्या काळी बाजुला बसणे सर्रास होते, अन आमच्याकडे नव्हते). तेव्हा मग "गप्प बसारे कार्ट्यांनो/रांडोळ्यांन्नो" असे म्हणत आई पाठीत धपाटे घालायची.
इसाई,मुस्लिम धर्मात पण हे
इसाई,मुस्लिम धर्मात पण हे पाळतात का?>>> हो. त्या धर्मातील लोकांना विचारलंत तर अधिक माहिती मिळू शकेल.
दुर्दैवाने असंख्य
दुर्दैवाने असंख्य धाग्यांवरच्या माझ्या प्रतिसादाच्या पोस्टी तशाच गाडल्या गेल्या आहेत,>>>>(

हे कदाचित थोडंस अवांतर होईल,
हे कदाचित थोडंस अवांतर होईल, पण मला कधीकाळी वाचलेली एक गोष्ट आठवतेय.
एकदा एका घरात सत्यानारायणाची पूजा होती, तेव्हा सासूबाई सगळी तयारी करत होत्या, पण त्या घरातली एक मांजर होती आणि ती सारखी त्यांच्या पायात लुडबुड करत होती. त्यामुळे मग चिडून सासूबाईनी त्या मांजरीला एका टोपलीखाली झाकून ठेवली. जेव्हा जेव्हा पूजा असायची तेव्हा सासू मांजरीला टोपलीखाली झाकायची, काही वर्षांनी सासूबाई देवाघरी गेल्या आता सुनेची जबाबदारी होती तयारी करायची. सगळी तयारी झाली पण तिला अचानक एक गोष्ट आठवली ती म्हणजे सासूबाई मांजरीला टोपलीखाली झाकायाच्या, पण आता ह्यांच्याकडे मांजर नवती आणि हा पूजेचाच एक भाग आहे अस तिला वाटत होत, तेव्हा तिने शेजार्यांकडून मांजर आणून टोपलीखाली ठेवली.
म्हणजे आपणही हि कदाचित असच आंधळेपणाने आपल्या पुर्वज्यांच अनुकरण करत असतो. (काही बाबतीत )
हे सगळे टाळायचे असेल तर
हे सगळे टाळायचे असेल तर गुरुचरित्रात सांगितल्या प्रमाणे म्लेंच्छ व्हावे हे उत्तम. हिंदू धर्मातल्या अंध श्रद्धा टाळायच्या असतील तर म्लेंच्छ व्हावे असा तोडगा एका कुडमुड्या डॉक्टराने इथे सांगितलेला आहे ( मात्र 'प्रार्थना स्थळात ' जायला मिळणार नाही मात्र !)
नवी प्रथा - पुजेच्या वेळी
नवी प्रथा - पुजेच्या वेळी झाकायचे मान्जर हे नेहेमी शेजारच्या घरातले असायला हवे.
Pages