स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?

Submitted by Swara@1 on 30 January, 2016 - 01:29

कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.

हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )

तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.

खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागाकर्तींचे लक्ष वेधले जावे म्हणून ही पोस्ट ठळक केली असे. Happy

होय स्वराताई, एक गोष्ट सांगायचि बाकी आहे.
ती अशी की, तिकडे "स्वच्छतेच्या बैलाला" या धाग्यावर फक्त स्त्रीयांना द्याव्या लागणार्‍या शुल्काविषयी मी विषय काढला होता.
तर, वरील मासिकपाळीबाबतच्या तथाकथित अंधश्रद्धा व गैरसमजांमुळेच तर फक्त स्त्रीयांकडून शुल्क आकारणी करीत नसतील ना? तिथेही मी याबाबीचा "लिखित/अलिखित नियंमांनुसार" असा अप्रत्यक्ष उल्लेख केलाच होता.
तर स्त्रीयांचे बाबत वरील मासिकधर्मावेळच्या "अपावित्र्याच्या अचाट" कल्पनेतुन तर ती स्त्रीयांच्या मुतारीकरताची शुल्करचना "अलिखित" नियमाद्वारे सुदूर देशात अंमलात आलेली नाहीये हे कशावरुन? अन तसे असेल, तर हे शुल्क घेण्याच्या काय अधिकार पोहोचतो? अन म्हणुनच मी तिथे पुन्हा पुन्हा स्त्रीपुरुषांच्या मूत्रात असा काय फरक असतो हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होतो, अर्थात कुणा कडूनच सम्यक/सु:स्पष्ट उत्तर मिळाले नाही (अपेक्षाही नव्हती).

सनव तै विचारत जाईन हो प्रश्न......

Swara@1 ,या घाग्या वरच्या सगळ्या जेन्ट्स्,पुरषांना हकलुन दे.
फक्त लेडिज्,बायका सासु-सुना एवढेच राहु दे.
म्हणजे थोडक्यात ज्यांना periods येतात तेवढेच.....

स्वरा, तुझ्या धाग्यावर पहिले तीन पान चांगली चर्चा झाली. आधी मलाही वाटलं होतं की यात काय धागा काढण्यासारखं आहे..आजच्या काळात या गोष्टी कालबाह्य आहेत...पण इथे आलेले स्त्रियांचे अनुभव पाहून जाणवलं की नाही..अजूनही खूप ठिकाणी हे पाळलं जातं..तू धागा काढून याबद्दल जागृती करायचा प्रयत्न केलास याबद्दल तुझं अभिनंदन व आभार.

इथे 'जात' हा शब्द लिंबू-सकुरा जोडगोळीने प्रथम आणला. काही लोकांना नाही जातीपलीकडे विचार करता येत..तर दुर्लक्ष करुन पुढे जावं.

लिम्बु भाऊ हिन्दु धर्माविरुद्ध बोलणार्‍याना सोडत नाहीत आणी सकुरा तै हिन्दु धर्मा विरुद्ध बोलणे सोडणार नाहीत. हे खो-खो नाहीतर कबड्डी खेळण्यासारखे आहे. एक नवीन बाफ काढावा ज्यावर हिन्दु-मुस्लिम-ख्च्रिशन-जैन-बुद्ध-शीख आणी ज्यु लोकान्विरुद्ध आणी बाजूने सतत भान्डता येईल. होऊन जाऊ द्या लढाई.

धन्स सनव...
मला हि सुरुवातीला चाललेली चर्चा बघून असच वाटल होत कि चला, अशा विषयावर धागा काढल्याच सार्थक झाल, पण कसलं काय इथेही 'येरे माझ्या मागल्या'.
त्यामुळे ह्या पुढे ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल त्यांनी फक्त याच विषयावर द्यावा उगी जातपात आणि धर्माचे राजकारण मधे आणू नये (आणल्यास सणसणीत अपमान करण्यात येईल )

लिम्बु भाऊ हिन्दु धर्माविरुद्ध बोलणार्‍याना सोडत नाहीत >>
काय सांगतात. धर्माचे ठेकेदारच आहे जणू. काय लिंब्या काय पगार मिळतो रे Wink
कि बिन पगारी फुल्ल अधिकारी Lol

स्वरा, वर एक विषयाला धरुनची पोस्ट दिलीये, होप त्यावरुन जम्प मारुन तुम्ही त्यातिल महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले नसेल. Happy

स्वरा, तुझ्या पोस्टचा मान राखुन मी वाचन मोड मधे.
असेच छान-छान विषय मांडुन या अडळीच्या अंधश्रधा गाडुन टाकायला हातभार लाव.
या साठी माझ्या कडुन तुला खुप-खुप शुभेच्छा!

बाळांनो आणि बालिकांनो, कुणीतरी दिल्या लिंका तर त्या न वाचताच किंवा त्यांचा मागचा पुढचा संदर्भ न पाहताच पुढची गंमाडी जंमत चालू आहे सगळ्यांची.
तर, वर दिलेल्या चर्चेत ख्रिश्चनांबाबत ओल्ड टेस्टामेंटचे कायदे दिले आहेत (ते ही आम्हाला अर्थ असा वाटतो स्वरूपात.) हे कायदे सुरूवातीच्या काही काळात (पहिल्या ५०० वर्षांनंतर) जारी होते. (असे का हा मोठा गंमतीशीर इतिहास आहे, पण तो नंतर कधीतरी)
मागच्या चारशे वर्षांपासून काही ऑर्थोडॉक्स चर्चेस सोडल्यास मेन्स्ट्रुएशनच्या काळात स्त्री अपवित्र मानली जात नाही.
ओल्ड टेस्टामेंटच्या काळात सॅनिटरी पॅडस नव्हती त्यामुळे स्त्री बसेल ती जागा अपवित्र(ब्लड स्टेन्समुळे) समजई जाई आणि संध्याकाळी आंघोळ करेपर्यंत तिथे बसलेला दुसरा माणूसही अपवित्र समजला जाई . हेच एखाद्या पुरुषाला सेमिनल डिसचार्ज झाला सगळ्यांसमोर तरी पाळले जाई.
तसेच मेन्सेसच्या काळात नवरा बायकोंनीही सेक्स करू नये असे सांगितलेय आणि त्यावेळच्या हायजिनच्या इश्यूमुळे ते योग्य आहे.

पण हायजिनमध्ये बदल झाल्यावर मागच्या तीन चारशे वर्षांत हे पाळत नाहीत.
(ख्रिश्चनिटीचा मधला काळ अतिचशय मागासलेला अंधारयुगाचा होता. यात स्त्री/ लग्न्/सेक्स हे सगळंच अपवित्र मानलं गेलं. त्यावेळचे अनेक रेस्ट्रिक्शनही आता नव्या काळात कोणी मानत नाही.)

वर नंदिनी यांनी दिलेल्या मुस्लिमांबद्दलच्या लिंकेत तर
१.
चक्कं गायनॅकोलॉजी आहे. ९ वर्षांच्या आत आणि ५०व्या वर्षानंतर जर मुलीला पिरेड आले तर ते अनैसर्गिक मानून पाळीच्या काळातले नियम लावू नये.
२. प्रेषितांच्या पत्नीने पाळीच्या काळात त्यांना पाणी दिले आणि ते ते प्याले. लोकांनी विचारले हे चालते का तर प्रेषित म्हणाले 'तिच्या बोटातून पाळी येत नाही आहे'
३. नमाज पडणे, मशिदीत जाऊन रहाणे, हजला जाणे, रमजानचे रोजे करणे , कुराणाला हात न लावणे एवढेच करायचे नाही आहे.
पण मनातल्या मनात देवाचे नाव घेऊ शकतात.
४. बाकी घरतली सर्व कामे करू शकतात.

आता या लिंकव्यतिरीक्त लिहायचे तर आता मुस्लिमांच्यात केवळ अरेबिकमध्ये असलेल्या कुराणाच्या प्रतीला (इतर भाषांतल्या चालते) हात न लावणे आणि इंटरकोर्स न करणे एवढेच रेस्ट्रिक्शन्स महत्त्वाचे आहेत.
बाकी सगळ्या बारिक सारिक रेस्ट्रिक्शन हदिथ म्हणजे कुराणाच्या लावलेल्या अर्थातून काढलेल्या आहेत. त्या सगळेच पाळतात किंवा पाळणे कंपल्सरी आहे असे नाही. हे मी माझ्या मुस्लिम डॉक्टर मैत्रिणींकडून प्रत्यक्ष ऐकले आहे.

ख्रिश्चनांच्यात तर ऑलमोस्ट कुठलेही रेस्ट्रिक्शन नाहीकेवळ सेक्श्युअल इंटरकोर्स या दिवसात करू नये शिवाय
(ते पण किती जणे पाळतात ते माहित नाही.)

पण उठसूट 'अमकीची पाळी आलीय, ती दूर बसलीत, तिच्या हातात सगळं नेऊन द्या' हे सगळ्या घरादाराला कळेल असे दाखविणे हिंदू आणि कट्टर ज्यूंमध्येच आहे.

साती मस्त माहिती. एक अजून उदाहरण देते. पण त्यातले विस्तारातले वाचले नसल्याने पुढचे माहीत नाही. पपु श्री गोन्दवलेकर महाराज ( गोन्दवले-फलटण) यान्च्याकडे एक स्त्री आली आणी दुरुन नमस्कार करुन म्हणाली की महाराज एक शन्का आहे. तुम्ही सान्गता की सगळ्यानी मुखात देवाचे नाव असु द्यावे. मग आम्हा स्त्रीयाना त्या चार दिवसात कसे शक्य आहे? महाराज म्हणाले, ताई, आपला श्वास हा सतत चालू असतो. पण पाळी आली म्हणून त्या चार दिवसात आपण श्वास घेणे ताह्म्बवतो का? बाजूला ठेऊ शकतो का? नाही ना? मग देवाचे पण तसेच आहे. हरकत नाही देवाचे नाव घेत जा.

आता ही घटना महाराज असतानाची म्हणजे बरीच जूनी आहे, मग आताच्या काळात हे पाळीचे स्तोम का चालू आहे?

घ्या! आता!

जेव्हा निरर्थक आणि त्रासदायक चालीरीती, अंधश्रंद्धा वगैरेंचा प्रश्न येतो तेव्हा, त्या देशात नाही का चालत, त्या धर्माला का काही नाही म्हणत, वगैरे समर्थन करणे बंद व्हायला हवे.

रमजानचे रोजे करणे >>>>>> एवढेच करायचे नाही आहे.

लिंक वाचलेली नाही. पण रोजे करायाचे नाही असे नसून केले नाहि तर चालते असे आहे.

ईतके लिहि पर्यंत साती ताईं नी प्रतिसाद संपादित केला Happy

अतरंगी रोजे करायचे नाहीत. रोजे आजारपणामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे बुडले तरी पुढच्या महिन्यात भरून काढावे लागतात.
मेन्सेसमुळे सोडलेले रोजे नंतर भरून काढावे लागतात. ( हे संपादित केलंय नंदिनीने चूक दाखवल्यावर. Happy )
प्रार्थना कराव्या लागत नाहीत.

हे लोणच्या पापडांचं सोवळं ज्यू मध्ये आहे का ते बघायला हबे. ज्यू लोकांबद्दल वाचून मला बरेच दिवस झालेत.

पण मेन्सेसमुळे सोडलेले रोजे नंतर भरूनही काढावे लागत नाहीत>> करावे लागतात!!!!

पण मेन्सेसमध्ये चुकलेल्या नमाझ नंतर करायच्या नसतात..

अतरंगी प्रतिसाद संपादित नाही, तुमच्या मुद्द्यासाठी नविन प्रतिसाद खाली लिहिलाय.
ते संपादन वेगळे मुद्दे अ‍ॅड करायला आहे.

अरे हो, नंदिनी तुझं बरोबर! रोझे परत करावे लागतात.
प्रार्थना नाही केल्यात तरी चालतात असे त्या लिंकेत आहे.

कट्टर नथुरामियन्स हिंदु पळाले वाट्टे इथून ? 'तिकडच्या ' चालीरीतीत झोडपायसारखे काहीच मिळाले नाही म्हणून.

>>>> ३. नमाज पडणे, मशिदीत जाऊन रहाणे, हजला जाणे, रमजानचे रोजे करणे , कुराणाला हात न लावणे एवढेच करायचे नाही आहे. <<<<<<
हे तर हिंदु धर्मात आहे तितकेच आहे कि! Happy
>>>>> पण मनातल्या मनात देवाचे नाव घेऊ शकतात. <<<< यासही हिंदु धर्मात बंदी नाहीये

>>>>४. बाकी घरतली सर्व कामे करू शकतात. <<<<< इथे मात्र थोडा फरक आहे, हिंदुंमधे बरेचदा ठराविक प्रकारची कामेच सांगितली जातात. "सर्व कामे" नाही सांगितली जात.
इतके आहे अन तिकडचे ते इतकेच "हलकेच" आहे, तर इकडच्याच तितक्याच प्रथांवर आगपाखड का बरे? Wink असो.

पादुकानंद झोडपण्यासारखे त्यांच्यातही बरेच आहे.
पण ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत इत्यादी समाज वेळोवेळी ज्ञात झालेल्या वैज्ञानिक सत्यांचा आधार घेत बदलत गेला.
हिंदू धर्मही बदलतोय. इस्लामचं असं नाहीये.
पण बदलाच्या या चाकाला कट्टरतावाद परत मागे घेऊन जायचा प्रयत्न करतोय. हे चुकीचे आहे.

इस्लामने याबद्दल काय म्हटलंय हे जाणून घ्यायला क्युरिऑसिटी म्हणून काहीच हरकत नाही.
पण ते इतके कट्टर तर आपण तितके असले तर काय बिघडलं असं आपण म्हणू नये असे मला वाटते.

सामी | 1 February, 2016 - 11:30
कदाचीत पटणार नाही पण इथे तावातावाने लिहिणार्या किती मुली/बायका त्या दिवसात देवळात जातात?
स्वतःला विचारा की अश्या दिवसात तुम्ही तुमच्या नविन घराच्या सत्यनारायणाच्या पुजेला बसाल का? जर उत्तर हो असेल तरच जुन्या बायकांचे मसाला लोणची खराब होतात हे लॉजीक तुम्हाला मागासले पणाचे लक्षण वाटण्याचा अधिकार आहे.
मी अश्या खूप मुली बघितल्या आहेत की या प्रथांबद्दल नाराज असतात आणि गणपती/ नवरात्र जवळ आले की पिरियडस पुढे जाण्यासाठी गोळ्या घेतात. आपण वागतो हे लॉजिकल आहे का हा विचार करणे गरजेचे आहे
>>
सामी,
पटलं. बर्याच मुली आहेत ज्या मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही हे काहीच पाळत नाही, फक्तं देवाच्या मुर्तीला हात लावत नाही, बास! पण का ते सुद्धा? म्हणजे मनात आहे काहीतरी की हे चुकीचं आहे किंवा काहीतरी वेगळं आहे.

पण ते इतके कट्टर तर आपण तितके असले तर काय बिघडलं असं आपण म्हणू नये असे मला वाटते.

>>

असं तुम्हाला वाटतं पण काही "भगव्या मुल्लांना ' नाही ना वाटत:
त्यांचण आपलं 'जाओ पहले उस आदमीकी साईन लेके आओ' चालूच आहे Proud

>>>> पण ते इतके कट्टर तर आपण तितके असले तर काय बिघडलं असं आपण म्हणू नये असे मला वाटते <<<<
हिंदु धर्मिय तसे कधीच म्हणत नाहीत, व पिढी दर पिढी गणीक सूक्ष्मपणे का होईना, ठोस सुधारणा - बदल घडतच जात आहेत.
प्रश्न तेव्हा येतो की काही एक वेगळाच "अजेण्डा" घेऊन व "सुधारकांचा आव आणित", "फक्त हिंदु धर्मातिल" तृटींवर "स्वतःच्या लाल सत्ताकारणाच्या फायद्याकरता" बोट ठेवत "हिंदुतर किंवा काही निधर्मी/बुप्रा हिंदु" जेव्हा "हल्लाबोल " करतात, तेव्हाच त्यांना विचारावेसे वाटते की बाकी धर्मांबाबत तुम्ही हे का बोलत नाही, कारण बाकी धर्माच्या स्त्रीयापुरुषही या देशाचे नागरिक आहेत, मग त्यांचा कळवळा का येत नाही? Wink

>>>> बर्याच मुली आहेत ज्या मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही हे काहीच पाळत नाही, फक्तं देवाच्या मुर्तीला हात लावत नाही, बास! पण का ते सुद्धा? म्हणजे मनात आहे काहीतरी की हे चुकीचं आहे किंवा काहीतरी वेगळं आहे. <<<<
समहाऊ, मी आजही पर्साकडला (संडासला) जरी जाऊन आलो, अन हात पाय स्वःच्छ धुतले नसतील तर देवाला स्पर्ष करीत नाही. त्यास "अशौच" मानणे म्हणतात.
अन जर काही कारणांमुळे "कन्टिन्युअस अनकन्ट्रोल्ड ढेण्डाळायला" लागत असेल, तर देवघरच काय, टॉयलेट सोडून घरातील कोणत्याच भागात स्वैंपाकघर/हॉल्/बेडरुम इत्यादी, मी वावरत नाही..... Wink मग मुक्काम पोस्ट टॉयलेट, अन त्यापुढील पोर्च ! Proud
त्या अशौचाचे वेळेस मलाही पुरुष असुनही सक्तिने "बाहेर बसावे लागते " Wink

इस्लामने याबद्दल काय म्हटलंय हे जाणून घ्यायला क्युरिऑसिटी म्हणून काहीच हरकत नाही.
पण ते इतके कट्टर तर आपण तितके असले तर काय बिघडलं असं आपण म्हणू नये असे मला वाटते.>>> एक्झाक्टली. जाणून घेण्यासाठी दर वेळी याला त्याला विचारण्यापेक्षा गूगल वापरले तरी चालू शकते. कुराण बायबल हे सर्व ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध आहेतच. ते वाचूनही बरंच काही समजू शकतं. या धर्मग्रंथांची मराठी प्रत देखील उपलब्ध असतेच.

वर सकुराताईंनी एक छप्परफाड वाक्य फेकलेले आहे.
मुस्लिम स्त्रीयां बुरख्यातुन बाहेर आल्या शिक्षण घेऊ लागल्या त्यांच्यात सुधारणा झाली तर आपल्या समाजातिल स्त्रीया पण त्यांचे अनुकरण करतिल.

"आपल्या" समाजातल्या स्त्रिया फुले- कर्वे यांच्या कृपेने फार आधीपासून शिक्षण घेत आहेत. नोकर्‍या करत आहेत. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेत आहेत. धार्मिक चिकित्सा करत आहेत. मायबोलीसारख्या फोरमवर आपली मते मांडत आहेत. धन्यवाद.

ते संपादन वेगळे मुद्दे अ‍ॅड करायला आहे.>>>>> हो पण जरा अ‍ॅडीशन केलीत. त्यामुळे तसे लिहिले. मी वाचलेल्या पुस्तकामधे केले नाहि तर चालते असे लिहिले आहे. तुमच्या " एवढेच रेस्ट्रिक्शन्स महत्त्वाचे आहेत " यात बरोबर वाटल्याने माझ्या कमेंट चि गरज नव्हति.

>>>>> वर सकुराताईंनी एक छप्परफाड वाक्य फेकलेले आहे.
मुस्लिम स्त्रीयां बुरख्यातुन बाहेर आल्या शिक्षण घेऊ लागल्या त्यांच्यात सुधारणा झाली तर आपल्या समाजातिल स्त्रीया पण त्यांचे अनुकरण करतिल. <<<<<
काही दशकांपूर्वीचे शहाबानो प्रकरण काय होते ग नंदिनी? शहाबानो शिकलेली होती की नव्हती?

Pages