फिल्टर कापी

Submitted by मॅगी on 28 January, 2016 - 04:40
filter coffee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताजी (मिळेल तेवढी) कॉफी पावडर (इंस्टंट नको) - ३ टेब. स्पून
पाणी - ३/४ कप
दूध - दीड कप
साखर - दोन चमचे
हा आहे कॉफी फिल्टर
c1.jpg

क्रमवार पाककृती: 

युक्ती सांगा धाग्यावर बरेच डिस्कशन झाल्यावर, फिल्टर कॉफी प्यायची लईच हुक्की आली. लगेहाथ फोटोपण काढले. तर हि कॉफी आणि बरेच फोटो Happy
१. कॉफी फिल्टरच्या वरचा जाळी असलेला भाग नीट बसवून त्यात तीन चमचे कॉफी पावडर नीट पसरवून घाला. (कॉफी पावडर ताजी असावी, जुनी असेल तर कॉफी अती बोअरिंग लागते)

c2.jpgc3.jpg

२. पाउण कप पाणी खळखळीत उकळून त्यावर ओता. फिल्टर बरोबर एक स्टीलचा दट्टया मिळाला असेल तर त्याने कॉफी पावडर दाबून ठेवा.

c5.jpgc6.jpg

३. झाकण लावून १५ मि. बाजूला ठेऊन द्या.

c7.jpg

हा बंद करून ठेवलेला फिल्टर, मिडिअम साइज कॉफी मग बरोबर.

४. फिल्टर उघडल्यावर, आहाहा.. कॉफीचा दरवळ..

c8.jpg

जाळी खालच्या भागात कॉफी जमा झालेली असेल.

c9.jpg

५. दुध उकळून १ मि. ढवळा. कप मध्ये आवडीनुसार साखर घेऊन त्यात कॉफी ओतुन ढवळा.

c10.jpg

६. नंतर त्यावर दुध थोडं उंचावरून ओता म्हणजे मस्त फेस येईल. (कॉफी पावडर आणि दुधाचं प्रमाण आवडीनुसार बदला)

c11.jpg

७. आणि हा एकच प्याला! येंजॉय माडी Happy

c12.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ कप
अधिक टिपा: 

टिप्सः
१. फिल्टर कोरडा असावा
२. कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
३. शक्यतो १५-२० मि. लगेच कॉफी तयार करावी. कॉफी (decoction) गाळून बराच वेळ ठेवली तर बेचव होऊ शकते..

माहितीचा स्रोत: 
सौथिंडीअन मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखेर फिल्टर नीलम मधून आणला. काल सायंकाळी सहा वाजता कर्वे रोडच्या कॉफीवाल्याकडे गेलो असता नेहमीप्रमाणे तो बंदच होता. मग आठवले आज रविवार असल्याने बंद असणार. पादर्‍याला पावट्याचे निमित्त ! एकंदरीत माजच आहे असे दिसते. दुसरा कॉफीवाला सुच्वा

कापी पायजे होय..मला वाटले फिल्टर.
कापी मी रोस्ट अँड ग्राऊंड ब्रु ची ग्रोफर्स वरुन मागवली. (आजूबाजूच्या दुकानांमध्ये फक्त इन्स्टंट होती आणि लांब जाणे होत नाही.)

पुलं च्या कशात तरी आहे ना, 'कोपर्‍यावरचा शिम्पी उघडा आहे ना हो ?' हे वाक्य अश्लील न्नाही काय म्हणून.त्याचीच कापी मारली. ( इथे कापी चा अर्थ येगळा हय)

आज फिल्टरचे उद्धाटन केले . कापी घरातच असलेली जुनाट,निम्न दर्जाची वापरली . तो सुगंध आला नाही.दूध गार पुचुक पडल्याने मझा आला नाही Sad .

पी एस पी ओ नही जानता?
ग्रोफर्स, बिग बास्केट ही किराणा घरपोच (किंवा ऑफिस पोच) पोहचवणारी अ‍ॅप आहेत.
म्हणजे मला एका दुकानातून १० फळं, दुसर्‍या दुकानातून ग्रीन टी, तिसर्‍या दुकानातून कॉस्मेटिक घ्यायची तर हे अ‍ॅप वर खरेदी करुन पैसे भरायचे. हे लोक चार दुकानात वेळ घालवून ती खरेदी करतात आणि ऑफिसपोच पिशवी आणून देतात. भाज्या पण ताज्या असतात. (रेट मध्ये बाजारभावाच्या २-३ रु फरक.)

नाही माहीत. गरजच पडली नाही. हपीस नाहीये मला. आमी सोत्ताच जाऊन सगळा माल आणतो. रेट मधे फरक म्हणजे जास्त का कमी?

कधी कमी कधी जास्त(ऑफर्स च्या काळात कमी)
आम्हाला किराणामाल दुकाने जवळ असल्याने त्यातून भाजी घेऊन डिफॉल्ट ४-५ रु महाग पडते त्या ऐवजी ग्रोफराने २ रु पडते इतकेच.
जेव्हा अठरापगड वेगवेगळ्या वस्तू आणायच्या आहेत, आजूबाजूची ३-४ वेगवेगळी दुकाने फिरायला लागणार आहेत आणि वेळ कमी आहे(खाणे बनवणारा माणूस ८.३० ला घरी येतो आणि ९ ला कुटुंबाच्या पोटात एक भाजी एक कोशिंबीर, जमल्यास वरण भात असे खाणे घालायचेय) अशा वेळी चांगले उपयोगी.एम आर पी असलेल्या वस्तूत भाव महाग वगैरेचा पण प्रश्न नाही.

पादुकानंद - फ्रेश कॉफी बीन्स पूणे असे शोधल्यावर
http://thecookscottage.typepad.com/curry/2008/06/where-can-i-buy.html या साइट वरुन खालील दुकाने मिळाली

Fresh Coffee and coffee beans: Dukens Coffee, 636 Raviwar Peth, Near Railway Booking office.24458459

Parsuram, Opposite KEM Hospital ,RastaPeth

हो ग्रॉफर्स ऍप आहे, जी पी इस लोकेशन ट्रॅकिंग ने जवळची ग्रोफर टाय अप स्टोर दाखवतात.आमच्या इथे कधीकधी वाढदिवस केक पण ग्रोफर वरुन मागवतात.बिग बास्केट पेक्षा ग्रोफर ची सेवा चांगली वाटली.बिग बास्केट वाल्याने बिना पिशवी किंवा खोके वस्तू आणल्या होत्या.ग्रोफर वाले पिशवी किंवा नुसती भाजी फळे घेतली तर खोके देतात.

Pages