फिल्टर कापी

Submitted by मॅगी on 28 January, 2016 - 04:40
filter coffee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताजी (मिळेल तेवढी) कॉफी पावडर (इंस्टंट नको) - ३ टेब. स्पून
पाणी - ३/४ कप
दूध - दीड कप
साखर - दोन चमचे
हा आहे कॉफी फिल्टर
c1.jpg

क्रमवार पाककृती: 

युक्ती सांगा धाग्यावर बरेच डिस्कशन झाल्यावर, फिल्टर कॉफी प्यायची लईच हुक्की आली. लगेहाथ फोटोपण काढले. तर हि कॉफी आणि बरेच फोटो Happy
१. कॉफी फिल्टरच्या वरचा जाळी असलेला भाग नीट बसवून त्यात तीन चमचे कॉफी पावडर नीट पसरवून घाला. (कॉफी पावडर ताजी असावी, जुनी असेल तर कॉफी अती बोअरिंग लागते)

c2.jpgc3.jpg

२. पाउण कप पाणी खळखळीत उकळून त्यावर ओता. फिल्टर बरोबर एक स्टीलचा दट्टया मिळाला असेल तर त्याने कॉफी पावडर दाबून ठेवा.

c5.jpgc6.jpg

३. झाकण लावून १५ मि. बाजूला ठेऊन द्या.

c7.jpg

हा बंद करून ठेवलेला फिल्टर, मिडिअम साइज कॉफी मग बरोबर.

४. फिल्टर उघडल्यावर, आहाहा.. कॉफीचा दरवळ..

c8.jpg

जाळी खालच्या भागात कॉफी जमा झालेली असेल.

c9.jpg

५. दुध उकळून १ मि. ढवळा. कप मध्ये आवडीनुसार साखर घेऊन त्यात कॉफी ओतुन ढवळा.

c10.jpg

६. नंतर त्यावर दुध थोडं उंचावरून ओता म्हणजे मस्त फेस येईल. (कॉफी पावडर आणि दुधाचं प्रमाण आवडीनुसार बदला)

c11.jpg

७. आणि हा एकच प्याला! येंजॉय माडी Happy

c12.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ कप
अधिक टिपा: 

टिप्सः
१. फिल्टर कोरडा असावा
२. कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
३. शक्यतो १५-२० मि. लगेच कॉफी तयार करावी. कॉफी (decoction) गाळून बराच वेळ ठेवली तर बेचव होऊ शकते..

माहितीचा स्रोत: 
सौथिंडीअन मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र कालच पटेलकडे गेले होते आणि विसरलेच फिल्टर बघायचे Sad आता पुढल्यावेळी नक्की. बरीच भारतीय भांडी-कुंडी मिळतात तर फिल्टर पण मिळतील असं वाटतंय.

सिंडरेला,
ते शेवटचे दोन आहेत त्यातली कॉफी डायरेक्ट कपात ड्रीप होणार.
https://www.youtube.com/watch?v=_DwPGkq8SFE

पहीला देशी आहे त्यात खाली ड्रीप होण्यासाठी कंटेनर आहे.

पहिल्यांदा केली तेंव्हा माझी पण बिघडली होती. विचार केला की मी बरी आणि माझी instant coffee बरी. पण आज पुन्हा प्रयत्न केला, मस्त जमली Happy कॉफी नीट दाबून भरणे गरजेचं आहे.

स्टारबक्सच्या 'कॅफे वरोना' कॉफी पावडर वापरून कापी बनवली. Excellent झाली! इंडीअन ग्रोसरीमधे ताजी (किंवा फार जुनी नसलेली) कॉफी पावडर मिळत नाही. निदान आमच्या गावात तरी. त्याला चांगला पर्याय मिळाला.

कॉफी डे मध्ये व कॅफे कॉफी डे मध्ये नाहीत फिल्टर्स.आजच शोधले.पण त्याच्या समोर काका हलवाई च्या लागून असलेले जैन स्टील आहे तिथे आहेत .gas वरचे atlas चे आहे.झक्कास आहे.

कॉफी प्रेमींची क्षमा मागून ..

अहो हा फिल्टर की काय म्हणायचा .. ते नशा बिशा करणार्‍या लोकांच्या उपकरणांसारखं दिसत आहे हे .. Wink

मला भावानी खास ब्राझिलची (डिकॅफिनेटेड) कॉफी पावडर आणून दिलिये. भारी कॉफी होतेय त्या फिळतरातून. मज्जानु सकाळ Happy
बहुतेक त्या पावडरीत चिकोरी नाही.

शेवटी मी हे घेतलेच!

http://www.bedbathandbeyond.com/store/product/bialetti-reg-musa-stovetop...

होल फुड मधुन रिच्युअल कॉफी एस्प्रेसो सेटिंगला दळुन आणली. एक मिल्क फ्रॉथर ही आणला. हे सगळा रात्री उशिरा आणल्यामुळे आता उद्याच त्राय करणार.

रायगड, तुझे फोटो बघत असताना इथे शेजारी कोणीतरी कॉफी घेऊन आले आणि तिचा तो धुंद सुवास दरवळला.... मला वाटले वर्चुअल सोय झाली की काय........... Happy Happy

रायगड तोंपासु फोटो! खरंतर कॉफी हा काही तोंपासु पदार्थ नाही. पण प्रोसेस बघूनच कॉफीचा सुगंध आला.

रच्याकने, एक कप कापीसाठी दोन चमचे कॉफी पावडर आणि पावच कप पाणी हे प्रमाण फिक्स केलंय मी. या प्रमाणात 'ती' चव येतेय कापीला. मागच्या पानावर मॅगीने प्रमाण दिलं होतं हे. थँक्स सो मच मॅगी! Happy :थम्ब्ज अपः

पूनम, मस्तच ना Happy आता रोज फिका पिऊन नवी कथा लिही Wink

रायगड, हि कॉफी तर अगदी टकमक टोकावरून येतेय Lol
भारी फोटो..

येस! आता जमायला लागली! कॉफीचे मिश्रण आधी - १५-२० मिनिटंच ठेवत होते. एकदा तासभर ठेवली. त्यानंतर जी चव आली! आता घरच्या घरी फिल्टर कापीचा खरोखर आस्वाद घेता येतोय.

हा फिल्टर कर्वे रोडवर 'कॉफी डे -फ्रेश अँड ग्राऊंड' मध्ये मिळतो. रसशाळा आणि सोनल हॉलच्या मधे हे दुकान आहे.
>> कळविन्यास अत्यंत खेद होत आहे की सदर दुकान बंद झाले आहे. हेलपाटा घेऊ नये .

कर्वे रोड वरील कॉफी डे दुकान बंद झालेले नाही.दुकान दार कॉफी डिलीवर करण्यासाठी स्वता जातो दुसरा कोणी हेल्पिंग हँड नाही. तेव्हा काही वेळा साठी दुकान बंद. असते मागील आठवड्यात ह्या दुकाना तुन मी मिडियम रोस्ट कॉफी आणली आहे.तेव्हा हा खुलासा झाला.

पादुकानन्द,माझा ही अनुभव तुमच्या सारखाच होता.म्हणून मालकाने त्यांचा मोबा. नं लिहुन दिला. फ्रेश एन ग्राउंड च्या दुकानदाराचा मोबाईल नं. ०९५४५-४१९९६३.तिथे जाण्यापूर्वी फोन करा.

काल कधी नव्हे तो कर्वे रोडचा तो कॉफीवाला उघडा दिसला. Wink . मोठ्या आशेने त्याचेकडे गेलो आणि वर वर्णन केलेला फिल्टर मागितला. अत्यंत आनंदाने त्याने तो शिल्लक नसल्याचे पटकन सांगितले. कोठे मिळेल हे विच्यारल्यावर अत्यंत आनंदाने माहीत नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडे कधी येणार हे विचारल्यावर अत्यंत आनंदाने त्याने ... .... .... ! ( दुपारी १ ते ४ हे दुकान बंद असते आणि ७ वाजून ५९ मिनिटे आणि ५९ व्या सेकंदाला बंद होते असे त्याच्या शेजार्‍याने दुपारीच सांगितले होते )

Pages