फिल्टर कापी

Submitted by मॅगी on 28 January, 2016 - 04:40
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हा आहे कॉफी फिल्टर
c1.jpg

ताजी (मिळेल तेवढी) कॉफी पावडर (इंस्टंट नको) - ३ टेब. स्पून
पाणी - ३/४ कप
दूध - दीड कप
साखर - दोन चमचे

क्रमवार पाककृती: 

युक्ती सांगा धाग्यावर बरेच डिस्कशन झाल्यावर, फिल्टर कॉफी प्यायची लईच हुक्की आली. लगेहाथ फोटोपण काढले. तर हि कॉफी आणि बरेच फोटो Happy
१. कॉफी फिल्टरच्या वरचा जाळी असलेला भाग नीट बसवून त्यात तीन चमचे कॉफी पावडर नीट पसरवून घाला. (कॉफी पावडर ताजी असावी, जुनी असेल तर कॉफी अती बोअरिंग लागते)

c2.jpgc3.jpg

२. पाउण कप पाणी खळखळीत उकळून त्यावर ओता. फिल्टर बरोबर एक स्टीलचा दट्टया मिळाला असेल तर त्याने कॉफी पावडर दाबून ठेवा.

c5.jpgc6.jpg

३. झाकण लावून १५ मि. बाजूला ठेऊन द्या.

c7.jpg

हा बंद करून ठेवलेला फिल्टर, मिडिअम साइज कॉफी मग बरोबर.

४. फिल्टर उघडल्यावर, आहाहा.. कॉफीचा दरवळ..

c8.jpg

जाळी खालच्या भागात कॉफी जमा झालेली असेल.

c9.jpg

५. दुध उकळून १ मि. ढवळा. कप मध्ये आवडीनुसार साखर घेऊन त्यात कॉफी ओतुन ढवळा.

c10.jpg

६. नंतर त्यावर दुध थोडं उंचावरून ओता म्हणजे मस्त फेस येईल. (कॉफी पावडर आणि दुधाचं प्रमाण आवडीनुसार बदला)

c11.jpg

७. आणि हा एकच प्याला! येंजॉय माडी Happy

c12.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ कप
अधिक टिपा: 

टिप्सः
१. फिल्टर कोरडा असावा
२. कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
३. शक्यतो १५-२० मि. लगेच कॉफी तयार करावी. कॉफी (decoction) गाळून बराच वेळ ठेवली तर बेचव होऊ शकते..

माहितीचा स्रोत: 
सौथिंडीअन मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅगी, खूप छान. मी भारताबाहेर इतके वर्ष राहूनही चार पाच वेळा कॉफी प्यायलो आहे तीही जिथे चहा नाही म्हणून पर्यायी प्यालो. त्यामुळे कॉफी कशी करतात हे तसे माहिती नव्हते. तू इतक्या स्टेप बाय स्टेप ही पद्धत दिलीस त्याबद्दल तुझे शतश: आभार. एक ज्ञान मिळाले. आमच्या ऑफीसमधे कॉफीच्या बीया आहेत. माझे कलीग्स मशिनच्या सहाय्याने कॉफी करतात. पण त्यांची कॉफी इतकी गडग काळी आणि कडवट सुगंधाची असते की मला ती प्यायला जमेल की नाही माहिती नाही. शिवाय इथे चायनीज लोक चिनी मातीचे फिल्टर वापरतात. तू वर स्टीलचे दिले आहे. आता तुझे वरचे हे फोटो बघून कळले की कपात तो जाळीदार कप नक्की कशासाठी असतो.

कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
>> हे वर ठळक केलेले कळले नाही. फिल्टर कॉफीचीच असावी इंस्टंट नको म्हणजे नक्की काय?

करुन पाहीन आता. मी वेगवेगळ्या पद्धतीचे चहा प्यालो आहे पण कॉफीचा फॅशन म्हणूनही कधी लळा लागला नाही.

फोटो दिसेनात. फिल्टर कापी आणि मैत्रीणी असं आमच्याकडे भन्नाट गॉसिप कॉम्बो आहे. शेजारणीला माझ्या कॉफीची (तिला एकदा इन्स्टंट कॉफी पाजली) धास्ती बसली आहे की न कळे पण ती माझ्याकडे येताना आम्हा दोघींसाठी कॉफी घेऊनच येते. (हे गॉसिप सेशन बर्‍याचदा अंगणातच घडत असतं)

पण ती माझ्याकडे येताना आम्हा दोघींसाठी कॉफी घेऊनच येते. (हे गॉसिप सेशन बर्‍याचदा अंगणातच घडत असतं)>>>>> मज्जाच आहे की ग मग तुझी. Happy

वाह मस्त ! ज्यांना अमृत प्यायला मिळत नाही अशा पृथ्वी वरच्या माणसांनी, freshly ground beans ची कॉफी प्यावी. दोन्ही सेमच.

बी, तुम्ही म्हणताहात ते चायनि़ज लोकांचे जाळी बसवलेले कप्स ग्रीन टी साठी असतात. खाली ग्रीन टीची पानं टाकुन वर जाळीवाला फिल्टर लावायचा आणि दिवसभर गरम पाणी टा कुन ते पित रहायचं. सुरुवातीला स्ट्राँग आणि नंतर डायल्युट होत होत फिका ग्रीन टी. कॉफीचा फिल्टर वेगळा. तो coffee decoction साठी वापरतात..

Edited for a Spelling mistake Happy

आता फोटो आहेत.. Happy
खूप दिवसानी फोटो अपलोड केल्यामुळे समजत नव्ह्तं..
धन्स अनु.
बी, इंस्टंट म्हणजे नेसकॅफे ब्रु वगैरे.. फिल्टर कॉफीसाठी दळलेले कॉफी बीन्स वापरू शकता.
नंदिनी, तुझ्या expert tips हव्या आहेत..

ब्रु वाल्यांची रोस्ट ग्राऊंड कॉफी मिळते (हिरवा पॅक, नीट वाचून इन्स्टंट नाही हे बघून घ्यावी लागते.)
एकदा चिकमंगलोर वरुन जयंथी नावाची कॉफी आणली होती ती पण छान होती.

धन्यवाद मनिमाऊ आणि मॅगी.

आत्ताच मी माझ्या एका कलीगला विचारले तर तो म्हणाला ऑफीसमधील मशिन मधे बिया टाकल्या की काही वेळात जे काही कपात पडते त्यात दुध घालून ते फेटले की फिल्टर कॉफी तयार होईल.

ह्या अशा कॉफीची चव छान लागते का? नक्की बिया किती घ्यायच्या.

मॅगी. एक्स्पर्ट टिप्स कसल्या? मस्त कॉफी आपापल्या आवडीनुसार बनवायची आणि एंजॉय करयाची. फोटो तर मस्त दिसतेच आहे.

आता पुढच्यावेळी स्टीलचे ते छोटे ग्लास वाटी पण घेऊन ये. त्यात कॉफी घलून फेसाफेसी करायला फार मजा येते.

तुला तर हव्वी तेवढी फ्रेश कॉफी पावडर मिळु शकते.>>>> यप्प..मिळते की.पन आपल्याला आपली करुन घ्यावी लागते.नंदिनी ला तिची शेजारीण आयती बनवुन देते ग,, म्हणुन म्हटल मज्जा आहे.

धन्यवाद मनिमाऊ, अंकु, चनस..
नंदिनी, थांकू!! फोटो काढतानाच वाटलं, ते स्टीलचे ग्लास आणि वाट्या असते तर पिक्चर पर्फेक्ट झाले असते..

mastach !

हायला, काय नशीब आहे!! मी अमेझॉनच्या सेलमधुन हा फिल्टर मागवला, तो आजच आला घरी. पण कॉफी कशी करायची हे मात्र नुसते वाचुनच होते. घरी जाऊन यु ट्युबवर धुंडाळणार होतेच. तोच ही रेस्पी पाहिली.

आता घरी गेल्यावर करतेच. केरळा फेस्टिवल मध्ये घेतलेली ऑथेंटिक कॉफी आहे घरी. पण लेकीने केलेल्या निरिक्षणानुसार त्या फिल्टरच्या जाळीची भोके तिला जरा मोठी वाटताहेत. त्यामुळे घरी जाऊन बघितल्याशिवाय काय खरे नाही. पण जे काय असेल ते असो, आज फिल्टर कापी प्यायला मिळणार हे नक्की.

मुंबैत विलेपार्ले( पू ) , सांताकृझ (प) इथे एस टी एम ( सांताकृझ टी मार्ट ) नावाचे दुकान होते. अजूनही असेल कदाचित. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बिया ऑर्डर नुसार ताज्या दळून मिळायच्या. माझ्या लहान्पणी कायम तिथून कॉफी पावडर येत असे घरात.

विलेपार्ले (पू) इथेच शबरीच्या जवळपास एक मद्रासी दुकान होतं - बहुतेक मुरुगन स्टोअर्स असावं नाव. तिथे पण कॉफी बिया ताज्या दळून मिळत असत. पण ज्ये ना म्हणत की त्यांच्या बिया कधी तरी ऐतिहासिक कालात भाजलेल्या असतात . तामुळे जास्त कडवट चव असते. एस टी एम वाले लहान बॅच मधे बिया भाजतात त्यामुळे चव छान असते.

एस टी एम मधे दुकानाच्या मागच्या भागातच बिया भाजल्या जात असत एवढे नक्की - कारण दुकानात गेलं की तो भाजण्याच्या वास अन आवाज येत असे.

अरे वा मस्तच स्टेप बाय स्टेप लिहिले आहे. मी मणीज, कॅफे मद्रास आणि आनंदभवन मधे फिल्टर कापी प्यायले आहे. पण एन्स्टंट आणि यातला फरक असा कधी कळलाच नाही. चहा फॅन असल्यामुळे कदाचीत आवडीने कॉफी प्यायले नाही. चेन्नई ला कलिग्स सोबत कॉफी पिणे झाले पण ती थोडीशी कडवट लागली.
आता सगळे एवढे कौतूक करत आहेत तर ऑथेंटिक कॉफी प्यायलीच पाहिजे.

वा वा मस्त फोटो. Happy

या फिल्टर मध्ये, आधी कॉफीपावडर त्या दट्ट्याने दाबून बसवून मग वर गरम/ उकळतं पाणी ओतावं. जास्त चांगल्या प्रतीचं डिकॉक्शन मिळेल.

मला या वेळेला माझ्या आजिनी नवीन प्रकारचा फिल्टर दिलाय. त्यात चहाही होतो. त्याचे फोटो उद्याला डकवतो.

मायबोलीकरांच्या क्रुपेने हा फिल्टर घरी येणार असं दिसतय. त्यात या विकांताला मी तिरूपतीत होते. तिथे फिल्टर कापी शिवाय इतर पेय पिण्याचं पातक केलेलं नाही. नवरोबाने विचारले, आपल्या कडे कुठे मिळेल? मी म्हटलं, याची मायबोलीवर चर्चा झाली आहे. आता फक्त जाऊन घेऊन यायचं बाकी आहे
BTW, टाटा ची नवीन coffee ची जाहिरात filter coffee ची आहे का?

Pages