फिल्टर कापी

Submitted by मॅगी on 28 January, 2016 - 04:40
filter coffee
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ताजी (मिळेल तेवढी) कॉफी पावडर (इंस्टंट नको) - ३ टेब. स्पून
पाणी - ३/४ कप
दूध - दीड कप
साखर - दोन चमचे
हा आहे कॉफी फिल्टर
c1.jpg

क्रमवार पाककृती: 

युक्ती सांगा धाग्यावर बरेच डिस्कशन झाल्यावर, फिल्टर कॉफी प्यायची लईच हुक्की आली. लगेहाथ फोटोपण काढले. तर हि कॉफी आणि बरेच फोटो Happy
१. कॉफी फिल्टरच्या वरचा जाळी असलेला भाग नीट बसवून त्यात तीन चमचे कॉफी पावडर नीट पसरवून घाला. (कॉफी पावडर ताजी असावी, जुनी असेल तर कॉफी अती बोअरिंग लागते)

c2.jpgc3.jpg

२. पाउण कप पाणी खळखळीत उकळून त्यावर ओता. फिल्टर बरोबर एक स्टीलचा दट्टया मिळाला असेल तर त्याने कॉफी पावडर दाबून ठेवा.

c5.jpgc6.jpg

३. झाकण लावून १५ मि. बाजूला ठेऊन द्या.

c7.jpg

हा बंद करून ठेवलेला फिल्टर, मिडिअम साइज कॉफी मग बरोबर.

४. फिल्टर उघडल्यावर, आहाहा.. कॉफीचा दरवळ..

c8.jpg

जाळी खालच्या भागात कॉफी जमा झालेली असेल.

c9.jpg

५. दुध उकळून १ मि. ढवळा. कप मध्ये आवडीनुसार साखर घेऊन त्यात कॉफी ओतुन ढवळा.

c10.jpg

६. नंतर त्यावर दुध थोडं उंचावरून ओता म्हणजे मस्त फेस येईल. (कॉफी पावडर आणि दुधाचं प्रमाण आवडीनुसार बदला)

c11.jpg

७. आणि हा एकच प्याला! येंजॉय माडी Happy

c12.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ कप
अधिक टिपा: 

टिप्सः
१. फिल्टर कोरडा असावा
२. कॉफी पावडर ताजी आणि फिल्टर कॉफीचीच असावी (इंस्टंट कॉफी नको)
३. शक्यतो १५-२० मि. लगेच कॉफी तयार करावी. कॉफी (decoction) गाळून बराच वेळ ठेवली तर बेचव होऊ शकते..

माहितीचा स्रोत: 
सौथिंडीअन मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम, कॉफी पावडर ताजी आहे का? डबा उघडला की घमघमता वास आला पाहिजे.
मी एकाच कपासाठी पाणी फार थोडं घेते अगदी तीन चार चमचे म्हटलं तरी चालेल. पाणी केवळ कॉफीच्या डिकॉक्शनसाठी घ्यायचय.

डबा उघडला की घमघमाट हे बरोब्बर!!
मी निम्म दुध निम्म पाणी घेते. डिकॉक्शन तयार होइपर्यंत दुध ही उकळवायच. अन मिक्स करायच.

हो कॉफी ताजी आहे. घमघमाट येतो आहे. मला वाटतं, पाणी जास्त होत असावं. प्रयोग चालू आहेत. मनासारखा रिझल्ट मिळेपर्यंत चालू राहतीलच Happy

हा माझ्याकडचा फिल्टर -> कराफे किंवा ब्रुअर किंवा मॅन्युअल ड्रिप कॉफी मेकर

rsz_carafe.png

वरच्या स्टीलच्या जाळी असलेल्या भांड्यात कॉफी पावडर भरून वरून पाणी ओतायचं. १५-२० मिनिटात ५-६ कप कॉफी तयार (इथे पाणी उकळण्याचा वेळ जमेस धरलेला नाही. जर कमी कप कॉफी असेल तर अजून कमी वेळ लागतो). मी शक्यतो युगांडन बगिसु किंवा व्हिएतनामीज कॉफी वापरतो (मध्यम जाड दळलेली, उसगावात मिळणार्‍यांपैकी या मला आवडतात). या दोन्ही कॉफी भारतीय प्रजातीला जवळच्या आहेत आणि यांची चवही फार कडवट नसते.

माझ्याकडच्या कापि मशिन ला डिकॉक्शन गोळा करणार्‍या भांड्याला वॉर्मर आहे. त्यामुळे पाच कपापुरता अर्क गोळा होइपर्यंतही तो गार होत नाही.

पूनम, कॉफी पावडर चार चमचे आणि पाणी अर्धा कप घेऊन पहा..

चार चमचे कॉफी? आणि त्यातुन अर्धा कप मिश्रण तयार होणार. हे साधारण किती दुधात वापरायचे?

मीही करुन पाहिली पण अजुन तितकिशी जमत नाहीय. मला फक्त एक कप कॉफी करायचीय कारण मी सोडून अजुन कुणी नाहीये कॉफीप्रेमी इथे. माझ्याकडे सेम फोटोतला फिल्टर आहे.

मी एका मोठ्या मग साठी (माबो मग) दोन स्कूप कॉफी + त्याच मग नी अर्धा ते पाऊण कप पाणी असं घेऊन डिकॉक्शन करतो. त्यात बरीच स्ट्राँग कॉफी होते.

ओके. म्हणजे अर्धा कप तयार झालेली त्या, त्यात दिड कप दुध घालुन २ कप कॉफी. मी परत करुन बघते. तयार कॉफी परत दुधात घालुन गरम करायची आयड्या बरीय. मला अर्धवट थंड चहा/कॉफी अजिबात आवडत नाही.

ओके, कॉफी पावडरचं प्रमाण वाढवून आणि पाण्याचं कमी करून बघते. मी एका कपाला अर्ध्यापेक्षा कमी पाणी आणि सव्वा चमचा कॉफी घेत होते.

केश्वि, ते एका कपाचं प्रमाण कसं सांगतील? त्यांच्याकडे एका पिंपाचं माप असेल! Proud मग त्रैराशिक मांंडून एका कपाचं माप काढायचं का? Biggrin

सांगतील गं. विचारुन तर बघ! हे प्रकरण थोडं आधी गेल्या बुधवारी उपटलं असतं तर माटुंग्याला आनंद भुवन मध्ये जाऊन पक्कं विचारुन आणि कॉफी पिवून आले असते. माटुंग्याला गेले असताना बाहेर खाणं झालं तर ते आनंद भुवन किंवा मद्रास कॅफेमध्येच होतं. नीर डोसा आणि वर फिल्टर कॉफी.

कॉफीचा एक तोटा आहे ना? शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते रोज रोज कॉफी घेतल्यानी आणि त्वचा कोरडीठक्क पडायला सुरवात होते.

कॉफीचा एक तोटा आहे ना? शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते रोज रोज कॉफी घेतल्यानी आणि त्वचा कोरडीठक्क पडायला सुरवात होते. >>> बहुतेक सगळ्या अम्मा तर छान तुकतुकीत चकचकीत स्कीनच्या असतात. त्यांच्याकडे तर आपल्यापेक्षा जास्त कॉफी पितात.

मनिमाऊ, आपण जिथे राहतो तिथले हवामान लक्षात घेणे गरजेचे आहे. थंड प्रदेशातील हवामान गार असते म्हणून त्यांची त्वचा कोरडी पडत नाही. भारतासारख्या देशात फक्त हिवाळ्यात गार वातावरण असते. तरीही युरप अमेरिकेच्या तुलनेनी आपल्याकडचे हवामान उष्णच म्हणायला हवे. म्हणून मला वाटतं सगळ्या अम्मा तुकतुकीत चकचकीत स्कीनच्या असतात. ह्याला अजून एक कारण म्हणजे तिथले पाणी, धुळरहित वातावरण, पोषक आहार ईद्यादी.

नाही ssssss कापी च हवं..

थंड प्रदेशातील हवामान गार असते म्हणून त्यांची त्वचा कोरडी पडत नाही. >> नॉय.. थंडीत स्कीन ड्राय होते ना?

तमिळनाडू थंड प्रदेशामध्ये???? इथली हवा गार??? इथले पाणी आणि धूळविरहित वातावरण???

आज अजून काही वाचायलाच नको!!!!

कॉफीचा एक तोटा आहे ना? शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते रोज रोज कॉफी घेतल्यानी आणि त्वचा कोरडीठक्क पडायला सुरवात होते.>>> Lol

मी अनुभवली आहे युरप आणि अमेरिकेतील थंडी. माझ्या अनुभवानुसार तिथल्या थंडीने त्वचा कोरडी नाही पडत. इतकेच काय अकोल्याची थंडी आणि पुण्याची थंडी पण केवढी तरी वेगळी आहे. अकोल्याच्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडून कोंडा निघतो आणि सगळी त्वचा आक्रसते. तर, पुण्याच्या थंडीत ओलावा वाटतो. मी नेहमी माझ्या आईला आणी पुतणीला थंडीत हे सांगत असतो की आता एक आठवडा अकोल्याला गेलो की त्वचेची वाट लागेल. तर मला हे म्हणायला आहे के युरप अमेरिकेच्या थंडीमधे ओलावा सुद्धा असतो.

शब्दाली तू पण तेच करते आहेस.

बी, आर्द्रता नावाचा एक प्रकार असतो. ,त्या मुळे अकोल्याची अन पुण्यातली अश्या थंड्या वेगवेगळ्या वाटत असतील.
युरोप अम्रीकेची थंडी पण सरसकट एकाच ओलाव्यात? Uhoh
असो , कॉफी पिउन ड्राय् झाली स्किन तर कोल्ड क्रिम लावायच .

फिल्टर कापी (हो हो कापीच! खबरदार कोणी कॉफी म्हणाल तर! ) महाप्रचंड आवडती आहे. आमच्या मणीजच्या फिल्टर कापीची सर आख्ख्या जगात कुठे येणार नाही.

माझ्या एका तेलगू मैत्रीणीनं फिल्टर कापी फिल्टर न वापरता करण्याची एक युक्ती सांगितली. एका स्टिलच्या भांड्यात हवी तितकी कॉफी घालायची आणि वरून चांगलं उकळलेलं पाणी ओतून लगेच व्यवस्थित बसणारं झाकण लावायचं. वाफा आतल्या आतच राहिल्या पाहिजेत. मग हे भांडं २-३ तास ( पूर्ण गार होईपर्यंत) तसंच ठेऊन द्यायचं. गार झाल्यावर झाकण काढून (हो बाई, डिटेल्स सांगितलेच पाहिजेत नाहीतर शंका उपस्थित होतात.) वरचं पाणी हलकेच दुसर्‍या भांड्यात ओतून घ्यायचं. हे डिकॉक्शन. मग यात दूध, साखर घालून गरम करून फिल्टर कापी प्यायची.

***********************************************************************

रच्याकने, मी आता आयडी स्पेसिफिक धमाल धागे काढायच्या विचारात आहे. एनी सजेशन्स? Wink

रायगड Biggrin
फिल्टर कापीच असते, तेव्हा कापीच असुद्या.
(मायेचा) ओलावा त्या ह्या ठिकाणच्या थंडीत नाही?? एतेन.
इन्ना, कोल्ड क्रीम लावलं तर त्वचा कोल्ड पडत नाही का? का हा काट्याने काटा काढायचा प्रकार आहे?

शनिवारी इंडीतल्या पटेलकडे इंडीयन ग्रोसरी केली तर तिथे चक्क $१२ ला कॉफी फिल्टर विकायला होते. हे फ्राचाइज वाले दुकान आहे. तेव्हा इतर लोकेशन्सना चौकशी केल्यास उपलब्ध होइल असे वाटते.

Pages