तुमचे पहिले प्रपोजल....

Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48

इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी Lol
ए, आमच्या रेशनकार्डावर तुझं नाव घालशील का? >>>लै भारी ! Lol

नंदिनी Lol फुल्टु मार खायला लावण्याच्या आयडीया आहेत.
ए, आमच्या रेशनकार्डावर तुझं नाव घालशील का? >>> Lol
किंवा , ए माझी राणी व्ह्शील का ? Proud

एक अशीच सो कॉलड चीप वन लायनर मी माझ्या पहिल्या वहिल्या तोंडी प्रपोजच्या वेळी वापरली होती.. आजही त्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले शाळामित्र मला त्यावरून सुनावतात..

अत्यंत जिवाभावाच्या ( पण आता हयात नसलेल्या ) व्यक्तीचे हे प्रपोजल.

ती एक घटस्फोटीत, दोघे एकाच ग्रुपमधे, ग्रुपमधे सगळ्यांना तिची कहाणी माहित पण तो विषयच कुणी काढत नाही.

एका निवांत क्षणी, तो विचारतो, तू परत लग्नाचा का विचार करत नाहीस ? झाले त्यात तूझा काहीच दोष नव्हता.

ती म्हणते, हे खरे आहे, पण असा विचार कोण करणार ?

तो म्हणतो, मी करतो....

त्याने त्याचे विचार पुर्णत्वाला नेले... अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत तिची साथसोबत केली.. जातानाही तिच्याच हातात त्याचा हात होता.

विवाहेच्छुक मंडळींना प्रपोजल साठी आमच्या इथे सर्व मदत मिळेल.

ज्येष्ठांचा हाच तर फायदा असतो. मुलं मुली मोकळेपणी सगळं सांगतात. त्यामुळे स्मार्ट मुलांचे फॉर्म्युले आणि मुलींची आवड यांच विचार करून प्रपोजल बनवून देण्यात येईल.

आजच भेटा
कपोचे जुळवाजुळव केंद्र
हसवनिसांची बखळ
भोपळे चौक, कोळसे गल्ली

दिनेश जी खूप छान.
हे एक असं प्रपोजल आहे ज्यामध्ये तिच्याविषयी त्याला असलेली काळजी, प्रेम, आपुलकी हे सगळं व्यक्त होतं.
पण सध्याच्या काळात असा विचार करणं, तिचा/त्याचा पुर्वेतिहास विसरणं, कोणताच हेतू न ठेवता प्रेम करणं खूपच दुर्मिळ झालंय. काहीजण अपवाद असतील पण हे जगच स्वार्थी, आत्मकेंद्रीत बनत चाललंय आणि आपण सर्वजण याच जगाचा एक भाग आहोत.

माझ्या love story मध्ये प्रपोज मी केल. आणि ते हि शाळेतल्या मित्राला. पण कोलेज मधे असताना. आम्हि दोघेहि शालेचे toppers. पण मी दिसायला यथातथा. आणि तो अग्दिच handsome वैगरे. आता या गोष्टिला झालि ८ वर्षे. आणि आम्हि आता लग्न करतोय. Soo पहिल आणि शेवटच प्रपोज. Happy

प्रपोज करण्यासाठी आणखी काही
१ )माझ्या घरट्यातली चिमणी होशील काय प्रिये
२ ) माझ्या नातवंडानची आजी होशील का ?
३) माझ्या साठी रोज चहा करण्यासाठी माझ्या घरी येशील का ?
४ ) माझ्या बरोबर माझ्या सारखाच रोजच्या रोज टाईमपास करायाल येशील का ? Lol

सस्मित
छान आहे स्टोरी. हॅप्पी एंडींग वाली.

आधीचं शीर्षक ठीक होतं. प्रपोझं कसं करावं. आता म्हणजे कापाघेलो.
(काढता पाय घेतील लोक्स Happy )

रेशनकार्ड >> Biggrin

फेबुवर १ व्हिडिओ फिरत होता ना राजकपुरचा.. 'शिवजी की कृपा हुई तो हमारे २ बच्चे होंगे, आप चाहो तो और भी हो सकते है. हम उन्का नाम रखेंगे .... क्या आप उन्की माँ बनना चाहेंगी ?' Proud

रेशनकार्डावर तुझं नाव घालशील का? > >> Wink

उत्तर- लाज नाही वाटत मेल्या , तू बी पी एल वाला,मी ए पी एल वाली. अपनी हैसियत में रहके बात कर!

उत्तर २- रंग बघितलाय का आपल्या रेशनकार्डाचा! आला मोठा नाव घालून घ्यायला!

कालच ऐकलेलं एक भन्नाट प्रपोजल किस्सा

पार्श्वभूमी - घरगुती समारंभ

मुलगा - या बायका फार बोर करतात उखाणे वगैरे घेऊन

मुलगी - तुला काय प्रॉब्लेम आहे ? की तुझं नाव घेतलं जात नाहीये उखण्यात म्हणून चिडचिड होतेय

मुलगा - हॅ हॅ हॅ ! आपण नाही बा त्यातले

मुलगी - हॅ हॅ काय ! कोण आहे ते सांग . तुझं नाव घ्यायला लावू तिला

मुलगा - ते जाऊ दे . तुला एक चान्स आहे

मुलगी - कसला चान्स

मुलगा - हेच , तुझ्या उखण्यात माझं नाव घेण्याचा

यापुढे समजून जा Proud Lol

तिकडे २०५० च्या धाग्यावर मैत्रेयीने नोंदवलेले निरीक्षण की माबोकरांचे अ‍ॅव्हरेज वय तिशीपस्तिशीच्या पुढचे झालय..... Happy
पण इथे तर सगळे सोळाचे बनु लागलेत.. असे कसे झाले मैत्रेयी? Wink

नंदे Lol

आता हा कोल्हापुरी खाक्या..
तिच्या क्लासबिसच्या वेळा एव्हाना पाठ झाल्याच असतीलच. तर अशीच एखादी जातीयेती वेळ गाठा. तिच्यासमोर जा. आणि तिला विचारा "ओ रिस्पॉन्स ए का?"
ती हो म्हणाली तर मग प्रश्नच नाही. पळून गेली तर तुम्ही सुटलात.
पण नाही म्हणाली तर "काय अ‍ॅडजस्ट करा की!" असे अजीजीने म्हणा..

जमलं तर जमलं..

माझ्या बर्‍याच जुन्या "हळव्या" आठवणींवरची खपली काढल्याबद्दल धाग्याचा निषेध.... Proud
(विचार करु लागल्यावर लक्षात आले की माझ्या त्या तमाम हळव्या आठवणींनी देखिल आतापर्यंत वयाची पंचेचाळीशी ते पंचावन्नीशी गाठली असेल. .... छ्या छ्या.... या वयातल्या त्या आठवणींना मी आता "बघुही " शकणार नाही... [त्या त्या आठवणींनी तेव्हाच मला बघायचे सोडुन दिले होते, सबब त्यांना तो प्रश्न नाही Lol ] ) :फिदी

संक्रांतीच्या महिनाभर आधी तिळगुळ कसा करावा? दसर्‍याच्या सुमाराला "दिवाळी फराळाचा बीबी" वगैरे धागे निघतात तसंच प्रपोझ डेच्या थोडेच दिवस आधी हा बीबी निघालेला आहे.

Pages