तुमचे पहिले प्रपोजल....

Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48

इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय प्रपोज करायचंय?
बिझनेस प्रपोजल
पॉलिटीकल प्रपोजल
मॅरेज प्रपोजल

यावर उत्तरे अवलंबून आहेत. कृपया आपल्याला कुठल्या बाबतीत मदत हवी आहे ते निसंदिग्ध शब्दांत लिहा.

विसरलं कधीच जात नाही. >> Biggrin डिपेंड्स. आता कुणाला रोज किती प्रपोजल्स येतात ते काय आपल्याला थोडीच माहिती असतं. काहीतरी अविस्मरणीय प्रपोजलची तयारी करून गेलेलं बरं असतंय. Wink

हो हो, रिसर्च प्रपोजल. संशोधक म्हटल्यावर माहितच असेल.
आणि पण काय काय प्रपोजले असतील.

भास्कराचार्य, तुम्ही तुमच्या पीएच्डीच्या मास्तरांना रीसर्च प्रपोजल कसं मारलं याचा भावविभोर, रोमांचक अनुभव लिहा बघू.

<<ऋन्मेशला एक धागा काढण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल निषेध! डोळा मारा>>
------ प्रपोजल१, २, ३.... ११,१२... अशी मोठी मालिका देण्याचे सामर्थ्य बाळगणार्‍या ऋन्मेशला कमी लेखल्याबद्दल भ्रमर तुमचा निषेध.

>>प्रपोजल१, २, ३.... ११,१२... अशी मोठी मालिका देण्याचे सामर्थ्य बाळगणार्‍या ऋन्मेशला.... << Biggrin

प्रपोजल१, २, ३.... ११,१२... अशी मोठी मालिका देण्याचे सामर्थ्य बाळगणार्‍या ऋन्मेशला.... Lol

हो अ‍ॅक्चुअली.. प्रामाणिकपणे कबूल करतो.. धाग्याचे शीर्षक वाचून आयुष्यात केलेले यशस्वी अयशस्वी प्रपोज क्षणार्धात डोळ्यासमोर तरळून गेले आणि आता यावर धागा काढायचा की मालिका बनवायची हाच पैला विचार डोक्यात आला.. कारण स्वतासाठीच नाही तर काही मुखदुर्बळ वा लाजर्‍या मित्रांसाठीही प्रपोज केलेत..

असो, येईल!

संशोधक,

प्रपोज जरुर कर! हल्ली तर तुम्ही ह्यासाठी सोशल माध्यम जसे फेबु, स्काईप, मेल, समस, व्हॉट्सअ‍ॅप पण वापरु शकतात.

न घाबरता प्रपोज कर. पण जर मुलींना प्रपोज करायचे असेल तर जवळ नोकरी, चांगले शिक्षण, चांगले दिसणे, जवाळ पैसा ह्या गोष्टी खूप जणींना हव्या असतात. मुले फक्त मुलगी सुंदर आहे का दिसायला इतके बघतात पण मुली चौफेर बघतात.

अरेरे. जी मुले फक्त मुलगी सुंदर आहे का हे बघत असतील त्यांनी मनातल्या मनात प्रपोज करून मनातल्या मनात नकार पचवून चौफेर बघायला शिकावे.

हो स्पॉक अगदी अगदी
नाही तर परत सोशल मिडीयावर स्त्री प्रोफाईल फेक आहे का कसे ओळखावे म्हणून परत धागा काढतील Rofl

तसे नव्हे. कायद्याच्या दृष्टीने म्हणत होतो. असे उठसुठ कोणालाही काहीही मेसेज टाकु नका सोशन मिडीयावर / ईमेल / ट्वीटर ई.वर.

सुंदर मुलगी: कॉलेज च्या पहिल्या वर्षाला: (खडा टाकून बघू, कदाचित एंगेज्ड नसेल, घरचे खडूस असतील, प्रेमभंग झाला असेल वगैरे वगैरे....)
सुंदर मुलगी: कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला: (एंगेज्ड आहे,पण जाऊदे,निर्णय बदलेल वगैरे,नुसत्या तिच्याबरोबर हसण्या बोलण्यात पण समाधान आहे....)
सुंदर मुलगी: नोकरीत (नक्कीच एंगेज्ड आहे,एक दोन वर्षं 'एक बहुत अच्छा सा दोस्त बनून' राहावे लागेल..पण ठिकाय.निदान हिच्याबरोबर राहून जरा प्रसिद्धी मिळेल..)
(एकदम लिमीटेड ज्ञानावर बेतलेले व्ह्यूज, बर्‍याच त्रुटींची शक्यता.)

हल्ली तर तुम्ही ह्यासाठी सोशल माध्यम जसे फेबु, स्काईप, मेल, समस, व्हॉट्सअ‍ॅप पण वापरु शकतात.

याबाबतीत सावधान.>>

स्पॉक, हो सावधान जरुर पण जी व्यक्ती आपल्या माहितीतील आहे अशाच व्यक्तीकडून मी हे अपेक्षित करतो आहे. अपरिचित व्यक्तीकडून असे मेसेजेस येत असेल तर सावधान. पण जर एखादा मुलगा जो आपण रोज बघतो बोलतो .. तो मुलगा जर त्याच्या मैत्रीणीला अशा माध्यमातून स्वत:ला व्यक्त करत असेल तर त्यात रिस्क अशी काय!!! प्रत्यक्षात भावना व्यक्त करायला कित्येकांना जमत नाही.

अरेरे. जी मुले फक्त मुलगी सुंदर आहे का हे बघत असतील त्यांनी मनातल्या मनात प्रपोज करून मनातल्या मनात नकार पचवून चौफेर बघायला शिकावे.>>

बहुतेक मुले सुंदर मुलीची अपेक्षा ठेवतात. मुली त्याहीपेक्षा अधिक जास्त अपेक्षा ठेवून असतात. हल्लीच्या काळात तर मुलीच मुलांना जास्त नकार देतात कारण त्यांच्या मागण्या जास्त असतात. त्यांना एकवेळ फार हॅन्डसम मुलगा नाही मिळाला तरी चालतो पण घरदार नोकरी शिक्षण ह्या गोष्टीतरी त्याच्याकडे असायलाच हव्यात.

Pages