तुमचे पहिले प्रपोजल....

Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48

इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता यावर धागा काढायचा की मालिका बनवायची हाच पैला विचार डोक्यात आला.. कारण स्वतासाठीच नाही तर काही मुखदुर्बळ वा लाजर्‍या मित्रांसाठीही प्रपोज केलेत..असो, येईल!.............................fainting-smiley-emoticon.gifsurprised-scream-smiley-emoticon.gif

कुणी जर सीरीअसली हा धागा काढला असेल तर त्या धाग्याची लोक इतकी वाट का लावतात कळत नाही. आणि हीच लोक अनेक ठिकाणी मायबोलि व्यवस्थापनेबद्दल ज्ञान पाजळत असतात आपले.

अय्या! काय काय एकेक प्रश्न.
बरं. प्रपोज कोण कुणाला करणारय? म्हण्जे मुलगा मुलीला की उलट?
त्यातही पुन्हा वयं कायेत? म्हणजे टीनेजर्स, मॅच्युअर, प्रौढ, वयस्क?
प्रपोज करण्याअगोदर किती ओळख आहे?
असे बरेच प्रश्न आहेत.

बरं. प्रपोज कोण कुणाला करणारय? म्हण्जे मुलगा मुलीला की उलट? >>> यात अजुन पण वेगळी कॉम्बिनेशन्स असु शकतात नं ??? Uhoh

सस्मित जी
इथे अनुभव लिहले जातील अस मला वाटलं होतं.
असो.
वयाविषयी विचारत असाल तर मी टीनएजर आहे.

वयाविषयी विचारत असाल तर मी टीनएजर आहे. >>> टीए, सध्या प्रपोज लग्नासाठी की मैत्रीसाठी करणार आहात? शिकता काय?

'कसे करावे' असा धागा आहे म्हणून लोक सल्ले देतायत, 'तुमच्या (पहिल्या किंवा एन व्या )प्रपोजल चे अनुभव' असे शीर्षक असते तर अनुभव आले असते.

'कसे करावे' असा धागा आहे म्हणून लोक सल्ले देतायत, 'तुमच्या (पहिल्या किंवा एन व्या )प्रपोजल चे अनुभव' असे शीर्षक असते तर अनुभव आले असते.<<+११

ओ, प्रपोज कसं करावं? असं शीर्षक आहे तर लोक अनुभव कसे लिहिणार? कसं करावं त्याचे सल्ले देणार ना. आणि सल्ल्यांआधी परीस्थितीची स्पष्ट कल्पना यावी म्हणुन प्रश्न विचार्णार.

आणी तुम्ही टीए आहात तर ज्या व्यक्तीला प्रपोज करायचं आहे ती पण टीए आहे असं धरलं तर प्रपोज ऑफिशियली प्रपोज करायची गरज पडणार नाही भौतेक. तिला तुमच्या टीए मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मधे सामील करुन घ्या. आपोआप कळेल.

म्हातारी मोड ऑनः
"बाळा, अजून टिनेजर आहेस आधी अभ्यास कर, प्रोजेक्ट कर, नोकरी मिळव, घर बुक कर मग प्रपोज कर"
म्हातारी मोड ऑफ

अभ्यास तर मी करतो(च)
नोकरीसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हा त्या टायटल चा थोडा घोळ झाला. बदलतोच २ मिनिटात.

आधी अभ्यास कर, प्रोजेक्ट कर, नोकरी मिळव >>>> अनु यासाठी म्हातारी मोड मध्ये जायचे गरज नाही. हे मला एका तरुण मुलीनेही उत्तरादाखल सुनावलेले. मी मनातल्या मनात म्हटले ताई जर एवढे केले तर माझ्याही अपेक्षा नाही का वाढणार ..

बाळा, अजून टिनेजर आहेस आधी अभ्यास कर, प्रोजेक्ट कर, नोकरी मिळव, घर बुक कर मग प्रपोज कर" >>> हो हो अगदी अगदी . फक्त तो पर्यन्त त्या मुलीचे लग्न होऊन २ मुल झालेली असेल तेव्हा प्रपोज करताना तिच्या नवर्‍याची परवाणगी घे Rofl

मी मनातल्या मनात म्हटले ताई जर एवढे केले तर माझ्याही अपेक्षा नाही का वाढणार .. >>

मनातल्यामनात ताईच म्हणायचे होते तर कशाला प्रपोज केलेस ? राखीच बांधून घ्यायचीस ना

पहिलेच काय म्हणून? जितकी जास्त प्रपोजलं तितका दांडगा अनुभव नाही का?

रच्याकने, तुम्हाला प्रपोज कसं करायचं याचं टेक्निक डायरेक्टली शिकायचं आहे की दुसर्‍यांची प्रपोझलं वाचून अनुभवातून शिकायचंय?

मनातल्यामनात ताईच म्हणायचे होते तर... >>> अहो एकदा तिने नाही म्हटल्यावर मग सारे भारतीय आपले भाऊबहीण नाही का..

अहो एकदा तिने नाही म्हटल्यावर मग सारे भारतीय आपले भाऊबहीण नाही का.. >> थुं तुझ्या तारुण्यावर Light 1 Rofl शाहरूखचा फॅन आहे आणि एकदा नाही म्हणाल्यावर परत प्रयत्न न करता हार मानतोस.?
फॅनक्लबचा गुरखा सुध्दा हार मानत नाही. ए याला बाहेर काढा रे. प्रयत्नाशी परमेश्वर.

निनाद, तुम्हाला शाहरूख बोलल्यावर डर किंवा अंजाम आठवत असावा... मला कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी हा कभी ना, कभी खुशी कभी गम, मोहोब्बते, ओम शांती ओम, कल हो ना हो वगैरे आठवतात Happy

Pages