तुमचे पहिले प्रपोजल....

Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48

इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्यातरी मी गंडलोय. >>> Happy

धीर सोडू नका. ऑलरेडी मैत्री आहे का? तिनं इंटरेस्ट आहे असं काही इंडिकेशन दिलं आहे का? प्रपोज करण्याची घाई काय आहे? टीए आहात तर इतक्यात का घाई करताय?

खरं तर याला पहिलं प्रपोजल म्हणावं का, याविषयी शंकाच आहे. ती पाचवी आणि सहावीला माझ्या वर्गात होती. तेव्हा खूप आवडायची. पंचवीस वर्षांनंतर पुन्हा भेटली आणि तिला मी ही ‘मन की बात’ आता सांगितली. आणि चक्क तिनेही तेव्हा तूही मला आवडायचास असा गौप्यस्फोट केला. आता तिच्या लग्नाला सतरा वर्ष झालीत आणि माझ्या लग्नाला तेरा. आता बोला.

मुले फक्त मुलगी सुंदर आहे का दिसायला इतके बघतात >>> हो, सुरुवात अशीच होते. अनुभवाने प्रगल्भता येते. >>> ऋन्म्या पटलं भो एकदम..

संशोधका, काल कि परवा भानगडी = पोरी म्हणलास तेव्हाच मला शंका आली तुझं नक्कीच काहीतरी वेगळं संशोधन चाललय म्हणून. चोराच्या मनात चांदणे.
अरे लाजतोस काय डायरेक्ट विचार प्रो कस करायचं म्हणून. :p

अरे पण त्या चित्रपटात त्याला ओरिजनल गर्ल्फ्रेंडच नाही आहे दुस्र्याची चोरून आणतो तो. याचा अर्थ काय गर्लफ्रेंड जरी दुसर्‍याची असेल तर प्रयत्न करत रहा नेमके हेच तुला कळले नाही.

धीर सोडू नका. ऑलरेडी मैत्री आहे का? तिनं इंटरेस्ट आहे असं काही इंडिकेशन दिलं आहे का? प्रपोज करण्याची घाई काय आहे? टीए आहात तर इतक्यात का घाई करताय? >> अहो मामी होऊन जाऊद्या ना.
अस अचानक भयानक झाल तरच होतं.
जास्त वेळ घालवला तर कोणीतरी येऊन पटवून सांगत आभ्यास कसा imp आहे ते ..

रच्याकने मला वाटत तो धाग्याच्या बाबतीत गंडलाय. त्याच्या तिच्या बाबतीत नाही.

हा अब ठीक है.
तर माझा एक सोसायटीमेट. एक बिल्डिंग सोडुन रहायचा. अगदी ६-७ वी पासुन माझा बेस्ट फ्रेंड. काय असेल नसेल ते शेअर करायचा. नंतर नंतर म्हणजे तो कॉलेजात नी मी नववी -दहावीला असताना तर, कुठल्या मुलीला प्रपोज केलं, कुठली मुलगी आवडते असं सगळं काही सांगायचा. अगदी रीपोर्टींग रोजच्या रोज. मला कुठलीही गोष्ट सांगितल्याशिवाय दिवस सरायचा नाही. आज इथे गेलो, हे खाल्लं. ती हे म्हणाली इइ सगळं. तर ह्या स्वछंदी भुंग्याबद्दल अस्मादिकांच्या मनात वेगळंच Wink पण त्याच्या सुरस कथा ऐकुन सगळे विचार मनातच दडपुन टाकले होते. आणि एक म्हणजे मी खुपच बावळट कॅटेगरी होते. म्हणजे रहण्याच्या/फॅशनच्या बाबतीत. (अजुनही आहे म्हणा) आणी त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंडा टकाटक. पण ...
जेव्हा मी कॉलेजला गेले. काय झालं माहीत नाही पण एकदम साक्षात्कार झाल्यासारखं त्याने मला एक दिवस प्रपोज केलं. डायरेक्ट त्याने येउन नाही तर आमच्या एका भैताड मित्राने सांगितळ्म त्याला तु आवडतेस. प्रेम करतो तो तुझ्यावर. कळत नाही का तुला येडी. Uhoh मी अवाक. त्याच्या वर खेकसले क्काय? येडा आहेस का?

दोन दिवस एकमेकांच्या समोर येउन पण बोललो नाही. मग तोच म्हणाला, माझं काही चुकलं काय? तु बोलत का नाही? मला तु आवडतेस. आय लव यु. (हे तीन शब्द उच्च्चारल्य शिवाय प्रपोज होत नाही :-)) मग काय मी ही हसले. तो काय समजायचे ते समजला.

तर ही प्रपोजलची कहाणी. Happy

मामी
घाई करत नाहीये.
इथे अनुभव लिहा यासाठी लिहलं कारण मला नक्की कसं विचारावं हे समजेल. आणि जर ती नाही म्हणाली तर बॅकअप प्लॅन बनविता येईल.

सस्मित जी छान आहे अनुभव.
स्वस्ति जी ' देवा रे! आजकालची मुलं!!!'
म्हणजे ?

Ithe tp karanyapekha Tu karatoy tyapeksha jast abhyas kar.

Kal Melbourne madhye ek proposal baghitale. Vimanatun gulabee dhur kadhun akashat propose kele hote. Bagh tula jamatay ka asa propose karayala.

तो विवेक ओबेरॉय-ऐश्वर्या राय चा चित्रपट बघितलास का?

गुन्जीसी है सारी हवा ... गाण्याच्या शेवटी तो असच फटाके लावून प्रपोज करतो .

अजूनही तुम्ही सोबत आहात का.?>>> ह्यासाठी वेगळा धागा काढा. इथे फक्त प्रपोज बद्दल लिहायचं आहे. Happy

पण तरी उत्तर देते. हो. आता ही सोबत आहोत. कुटुंबकबिल्याबरोबर. प्रपोजल नंतर ५ बर्ष रीलेशन्शिपमधे राहुन कळलं की आता ह्याच्याशिवाय काही ऑप्शन नाहीये. खरंतर नव्हताच. Happy मग केलं लग्न. शिक्षणं पुर्ण करुन नोकर्‍ञा सुरु करुनच. आता लग्नाला ११ वर्ष झाली. Happy

अय्यो, टीए. मुलाला एका मुलीला प्रपोज करायचं आहे????? कशाला?
शिक्षणाचा पत्ता नाही, काही स्थैर्य नाही, भविष्याची आता शाश्वती नाही. मग प्रपोज कोणत्या बेसीस वर करणार आण ती बिचारी कोणत्या भरोशावर हो म्हणणार? टीए म्हणजे १९ वर्षांखाली, राईट? मुलांचं लग्न होतं, २८-३० ला. मग इतके वर्षं काय बुकिंग करुन ठेवायचं का? कि २१ पुर्ण झालं कि लगेच लग्न करणार आहे?

एक मिनिट, एक मिनिट. प्रपोज आणि कन्फेस मधे गोंधळ झाला आहे का? प्रेमाचं कन्फेशन द्यायचं आहे का? प्रेम काही प्रपोज करत नाहीत. कन्फेस करतात कि तु मला आवडतेस / आवडतोस. टीनएज मधे लग्नासाठी प्रपोज करणं म्हणजे फार दुरवरचं बुकिंग झालं.

मला वाटतं तुला प्रेम कसं व्यक्त करायचं असं म्हणायचं होतं. एकदा कन्फेस केलं आणि दोघांनी 'कुबुल है' केलं कि प्रेम फुलत जातं आणि मग योग्य वेळ आली कि प्रपोज. अजुन कुठे काही एकमेकांच्या भावनांचा पत्ताच नसताना सरळ प्रपोज नसेल करायचं तुम्हाला. हो ना? सो परत एकदा धाग्याचं नाव बदलणार का? Wink

सस्मित भारी आहे आपला अनुभव .. अश्या जोड्या पाहिल्या आहेत.. माझीही अशी एक कॉलेजमैत्रीन होती.. बहुधा मी सुद्धा तिच्या प्रेमात होतो, पण मी त्याला मैत्री समजायचो.. बहुधा तिनेही माझी वाट बघितली असावी.. पण मी मित्र बनूनच राहिलो आणि मग .. पण ठिक आहे, प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे प्रेम कधी ना कधी मिळतेच. गरज असते ते भिडायची.

मनिमाऊ, आपण जे कन्फेस म्हणत आहात ते बरेचदा न बोलता नजरेनेही करता येते. शब्दांचा सहारा न घेताही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करता येते.. पण तू माझी बायको वा गर्लफ्रेड बनशील का हे तोंड उघडूनच बोलावे लागते.. हेच प्रपोज झाले.

हल्लीची सुकुमार वयाची मुले 'संशोधक' हे नाव घेतील आणि त्या मुलांचे मराठी इतके छान असेल ह्यावर विश्वास नाही माझा. तुम्ही नक्की फसवणूक करताहात इथे.

एका ओळीत विचारायचे प्रपोझल : (काल्पनिक नाहीत. मित्रमैत्रीणींच्या कुटीरोद्योगामध्ये ऐकलेल्या गमतीजमतींमधले आहेत)

ए फ्रेंडशिप देतीस का? (हे फारच व्हेग आहे, पण एकेकाळी फार पॉप्युलर वाक्य होते. जमल्यास हातात फ्रेंडशिपचे कार्ड ठेवावे. हा उद्योग राखीपौर्निमेच्या आसपास करू नये. दोस्ती (भाईबहनके) रिश्तेदारीमध्ये बदलू शकतेच)
ए (आपल्या बहिणीचे नाव)ची वहिनी होशील का? (बहिण नसल्यास भावाचे नाव वापरावे. ही नावे आपली भाऊबहिण म्हनून तिला माहित आहेत याची खात्री करावी. अन्यथा "पूजा म्हणजे त्या अमक्याची बहिण ना? असं उत्तर येऊन अमक्याचे सेटींग व्हायचे आणि आपण तू ओरोंकी क्यु हो गयी)
ए, माझी लव्वर होशील का? (याचा सविस्तर किस्सा लिहेन)
ए, मिसेस (स्वतःचे आडनाव) होशील का? (जोशी, कुलकर्णी, सावंत, पवार, मोरे, चव्हाण इत्यादि सार्वत्रिक आडनाव वाल्यांनी हा फंडा वापरू नये. वर्गात त्याच आडनावाची चारपाच पोरं असू शकतात. भलत्याचेच सेटींग व्हायचे. आपल्या नशीबी रूलाके गया सपना मेरा... )
ए, माझी कतरीना होशील का? (हे विचारताना आपण गेटप अर्थात रणबीर कपूरसारखा करावा. त्यांचं नुकतंच काडीमोड झाल्याची बातमी आल्यानं हा प्रश्न कदाचित बोंबाबोंब ठरू शकेल. अन्यथा "तू जाने ना" असं अतिफ अस्लमच्या आवाजात रडायची पाळी येईल. )

एका मित्राने (काहीतरी क्युट नाव) ची आई होशील का? असे विचारायचे ठरवले होते. तिच्याऐवजी त्याच्या मित्रांनीच त्याला धुतला होता.

ही वरची एका ओळीतली अशीच इकडे तिकडे फिरताना टीपी म्हणून विचारायची गोष्ट. आपण कुणाबाबत "सीरीयस" असल्यास व्यवस्थित प्लान् करून विचारणे चांगले. त्यासाठी "सविस्तर उत्तरे लिहा" हा प्रश्न नंतर सांगण्यात येईल.
अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारा.

बी
मी कुठल्याही प्रकारची फसवणूक करत नाहीये. माझ्या वयाच्या मुलांविषयी विचाराल तर आम्हाला मराठी उत्तम प्रकारे लिहिता, वाचता येतं. (अपवाद वगळता!)

ए फ्रेंडशिप देतीस का? >> Biggrin सिनेमा पण आहे की मुझसे फ्रांड्शिप करोगे? एकदम अशक्य भन्नाट आहे Wink Happy

Pages