तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना

Submitted by Rajesh Kulkarni on 12 January, 2016 - 12:58

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.

मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.

दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?

केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.

वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.

त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.

या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.

“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“

निश्चय असावा तर असा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओणवा म्हणजे पालथा नव्हे Happy

ओणवा = १ कामरेपाशीं शरीर वांकुन उभा राहिलेला ; वांकलेला .

ओणवा = १ कामरेपाशीं शरीर वांकुन उभा राहिलेला ; वांकलेला . हं
इकडे पण बाळ ओणवे झाले असा शब्द वापरतात.

मुळात मंग्याचा चा प्रांत अश्लील लिखान हे आहे. पण कुणी त्याला प्रवचन करायला सागितल्यावर त्याने पुराणकथावर लिहायला सुरवात केली. पण मध्येच शिवप्रतिष्ठानच्या दोन चार कार्यकर्ताच्या उचकवनण्याने मंगु ने हे सर्व पुराण कथा बाहेर काढल्या . जाऊ द्या आता तो सुधारलाय म्हण्जे त्याचा अक्शील चाळ्यांचा नव नविन पोष्ट टाकायचा वायदा केलाय.

कोण कुठला तरी टिनपाट त्याच्या फेबुवर काहीतरी लिहितो आणि माबो जनता आपआपला वेळ (आणि नेटचा पैसा) वाया घालवते!!!
तरिच झुक्या ३०० कोट रुपये फ्री बेसिक्स वर खर्च करतोय.. Wink

तेच कोण तरी कुठे तरी मेळावे घेत बसतात आणि माबो जनता आपला वेळ आणि नेटचा पैसा त्याच्या प्रचारात वाया घालवते
तरी. Wink

मुळात मंग्याचा प्रांत अश्लील लिखान हे आहे >>> अगदी खरं. मी लंच अवर्स मधे खुप उत्सुकतेने वाचायला गेले. पण intentions काही नेक नाहीत. मला अपेक्षित होतं की बर्‍याच पुराण कथेंंमधे असणारा भंपकपणा आणि नास्तिक असल्यामुळे देवादिकांच्या वागणं/स्वभाव यावरती काहीतरी खोचक लिखाण असं काही असेल. But it is mostly gross. Both his writing and the responses to it.

अरे बाबा, काही डॉक्टर "मी आता इंजेक्शन देतोय (सुई खुपसतोय) " हे पेशण्टला आवर्जुन सांंगुन सुई खुपसतात, तर काही डॉक्टर अवांतर गप्पा मारित पेशण्टचे लक्ष विचलित करित पेशंटच्या नकळत सुई खुपसतात. या दोनही पद्धती वापरात आहेत तरी त्यास कुणी "मूर्खपणा" म्हणत नाही. फिदीफिदी मग वरील उदाहरणातच मूर्खपणा कसा काय?

>> Uhoh सुई टोचल्यावर पेशंट काय रिअ‍ॅक्शन देतो यावर तो चांगला कि वाईट आहे हे ठरते का? ते ठरवण्यासाठी डॉक्टर त्याचे लक्ष दुसरीकडे वेधतात का? कैच्याकै उदाहरण.

मी पण वाचलंय ते ब्लाब्लाब्ला. फालतू आहे. लहान मुलांना कसं वाटतं कि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडेच असावं. तसंच लिखाण आहे ते. भंपक कथांऐवजी भंपक पोस्ट असं पाहिजे शिर्षकात.

मुळात मंग्याचा प्रांत अश्लील लिखान हे आहे <<<<<<तिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा 'भारतीय विवाह संस्था चा इतिहास' वाचुन मग ठरवा मंग्या अश्लील की इतिहास.

चला एका कोपऱ्यात उकिडवे होउन पायाचे अंगठे धरा बरे >>>> नशीब एकमेकाच्या पायाचे अन्गठे नाही धरायला लावले.:खोखो:

Pages