तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना

Submitted by Rajesh Kulkarni on 12 January, 2016 - 12:58

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.

मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.

दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?

केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.

वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.

त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.

या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.

“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“

निश्चय असावा तर असा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न विचारावे नक्की विचारावे
फक्त अपमान न होता विचारलेले चांगले..
अर्थात हा माझे वैयक्तिक मत आहे

भारती, फेफे, तारतम्य असेलेल्या तुमच्या दोघांच्याही पोस्ट्स आवडल्या.

बाकी पगारेंची प्रतिक्रिया पहिली आणी लेखाच्या समर्थनार्थ असणार हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती.>> my thoughts !

४८ तास उलटुन गेल्यावरही अशा बॉम्ब टॉपिक वरचा धागा शांत? आणि विशेषशी मारामारी नाही? आश्चर्य Lol

माझा आहे बुवा देवावर विश्वास.... नास्तिक नाही मी, तरीही पुराणातल्या बर्‍याच कथा मलाही मजेशीर किंवा स्पष्टच शब्दात भंपक वाटतात. त्या वाचल्यावर विश्वास ठेवताच येत नाही. उदा. अंगावरच्या मळातुन जन्म, बेंबी/कानातुन जन्म इ इ. ( कोणाचे ते मात्र आठवत नाही. कोणाला माहित असलं तर जरा आठवुन सांगा. कधी तरी आजीने सांगितलेल्या गोष्टीत असं काहीसं ऐकलं होतं. आणि हेही किंचित आठवतं आहे की हे ब्रम्हदेवाशी संबंधित काही तरी होतं. )

झालंच तर हनुमाने समुद्रावर उडताना जो घाम सांडला तो मगरीने गिळला आणि तिला हनुमानापासुन मुलगा झाला हे पण जरा टु मच. Happy अगदी संध्यानंद मधलं एक कात्रण, जे मी वॉस्सॅपवर वाचलं ( हेडिंग होतं - १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर तरुणी प्रेग. ) आणि ही हनुमान कथा सेम टु सेम. Wink

तिसरी महाकरमणुक म्हणजे रावण सीतेचे वडिल होते त्या संदर्भातली सीतेची जन्मकथा. तिला रावणाने का पळवुन नेलं याचं एक भलतच ओढुन ताणुन लॉजिक वाचलं होतं. कुठे तो संदर्भ आठवत नाहीए, म्हणुन ती कथा कितीही मनोरंजक असली तरी इथे सांगत नाही. उगीच पुरावा आणि संदर्भ नाही म्हणुन मार खावा लागेल. पण अशी कथा वाचली आहे नक्की आणि अति भयाण करमणुक आहे ती. सॉरी ! पण भंपक कथे मधे तिचा नंबर पहिला नक्की. ( माझ्याशिवाय ही कोणाला माहित असेल तर प्लीज संदर्भ द्या, मग मी लगेच चालु होते. Happy )

आपण रहस्यमय चित्रपटांची यादी किंवा हॉरर चित्रपटांची यादी असे धागे आहेत तिथे भर टाकतो तसं मी फक्त भंपक गोष्टींच्या यादीत भर टाकते आहे. बस्स अगदी एवढंच. अजुन जास्त काहीच नाही.

मनिमाऊ , Illogical आणी बुद्धीला न पटणार्या गोष्टींना न मानणं किंवा प्रसंगी विरोध करणं हे स्वाभाविक आणी यथोचित आहे.

प्रत्येक धर्मात अशा गोष्टी आहेत. ७२ हुर साठी दहशतवाद करवणार्या गोष्टींपेक्षा ह्या गोष्टी खुपच मिळमिळित आणि सप्पक आहेत. पण असो.

प्रत्येक धर्मात भंपक गोष्टी आहेत हे खरं आहे. त्यांना कवटाळून बसण्याचे परिणाम देखील समोर आहेत.

पाश्चात्य जगात कुणी या कथांना कवटाळून बसत नाही. तसंच हिंदू धर्मात, मुस्लीम धर्मात अशा कथा आहेत तर आपल्या धर्माची का खिल्ली उडवता असा बुग सवाल कुणी विचारत नाही. तिथे दा विन्सी कोड सारखा सिनेमा येतो तो ख्रिस्ताबद्दलच्या धार्मिक मान्यतांना आव्हान देतो , त्याबद्दल तिथे कुठेही मोर्चे निघत नाहीत, निषेध होत कुणी, कुणी केलाच तर भावही दिला जात नाही. ते आपल्याकडे.

आपण कुठल्याही धर्मात गेलो तरी आपली ही संस्कृती सोबत घेऊन जात असतो. आपण ज्या धर्मात आहोत त्यालाच सुधारायचा प्रयत्न करणार ना ? कि हिंदूंनी मुस्लीम/ ख्रिस्ती धर्म सुधारायचा असतो ?

तिथे जाऊन तिथली स्वच्छता, टापटीप , वैज्ञानिक प्रगती याची बक्कळ उदाहरणे द्यायची, पण वैज्ञानिक दृष्टीकोण - धार्मिक बाबींकडे पाहण्याचा दृष्टीकोण याबद्दल डोळेझाक करायची हे कसे काय जमू शकते ? आपल्याकडची मानसिकता बदलायची तर कित्येक अशा गोष्टींवर मुळासकट प्रहार व्हायला हवा.

आमच्याच धर्मात का असा आक्रोश करणा-यांसाठी -
आपल्या घरात अस्वच्छता असेल तर ती साफ करायची कि शेजारचे पहा, गेली दोनशे वर्षे झाडलोट केली नाही, त्यांना का नाही सांगत असे विचारणार ? प्रत्यक्षात असे असाल तर तुमचे लॉजिक मान्यच !

बुग = बुद्धी गहाण

पाश्चात्य जगात कुणी या कथांना कवटाळून बसत नाही.
>>

पाश्चात्य जगात त्यांचे कॉमिक्स करतात आणि बक्कळ पैसा कमावतात Wink
उदा: मार्व्हल कॉमिक्सचा लोकी, थोर, हर्क्युलिस, झ्यूस, ओडीन.

तिथे दा विन्सी कोड सारखा सिनेमा येतो तो ख्रिस्ताबद्दलच्या धार्मिक मान्यतांना आव्हान देतो , त्याबद्दल तिथे कुठेही मोर्चे निघत नाहीत, निषेध होत कुणी, कुणी केलाच तर भावही दिला जात नाही. ते आपल्याकडे.
>>

ह्याबद्दल मान्य बर! आपल्याच (पक्षी, भारतीय) ख्रिस्ती संघटनांनी बोंब मारली होती.

https://en.wikipedia.org/wiki/Criticism_of_The_Da_Vinci_Code

हे पाहिलं की वाटत, सगळेच धर्म सारखे Happy

आपल्याकडची मानसिकता बदलायची तर कित्येक अशा गोष्टींवर मुळासकट प्रहार व्हायला हवा.
>>

मुळासकट व्हायला नको. पाश्चात्यांना आजच अचिव्ह व्हायला ४०० ते पाचशे वर्ष लागलीत. धर्मसत्ता, राजसत्ता, नंतर आलेला साम्राज्यवाद आदींमधून जाऊन त्यांची ती आजची मानसिकता तयार झालीय.

आपण एकदम त्या गोष्टीवर उडी मारली तर कितपत सक्सेसफुल होऊ आय डाऊट. खिचडी होऊन बसेल नाहीतर.

अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण तात्या देतील हे धक्कादायक !

लहान मुलांसाठीच्या परीकथा, जादुई विश्व आणि पौराणिक कथा हे वेगळं आणि कवटाळणे वेगळं. क्रिटीसीझम वाल्यांना तिथे भाव दिला असता तर हा सिनेमा प्रदर्शित झाला असता का ? समोरच्याचे मत प्रतिकूल असले तरी त्याला मांडू देण्याचा हक्क जिथे मान्य होतो तिथे सनातनी लोक सुद्धा आनंदाने वावरू शकतातच की.. असो !

कपोचे,

तिकड आधी कादंबरीनी खूप मारामारी केली होती. त्यामुळे नंतर सिनेमाच्यावेळी सनातनी लोक थंड पडले होते. आपल्याकडे डायरेक्ट पिकचर आला.

विरोध तिकडे सिव्हीलैझ पद्धतीनी होतो. आपल्याकडे मोर्चे निघतात, तेव्हढी लेव्हल गाठायची आहे आपण अजून.
बुगवाले मेजोरीटीत असल्यावर असलच होत.

कादंबरी तुफान खपलीये तिकडे.. सिनेमाही तुफान चालला.
सनातन्यांना भाव देतात का ? मी तर त्यांची टर उडवणारी कार्टून्स भरपूर पाहीलीत.

हे उदाहरण देण्याचा उद्देश ( जो सहसा मायबोलीवर समजून न घेता प्रतिसाद दिला जातो) हा आहे कि इतरांची उदाहरणे देताना चांगली पण द्यावीत. उगीचच ते व्हॅटकिन सिटी आणि त्यांनी केलं तर हिंमत होईल का छाप नकोत.

मागच्या दोन तीन धाग्यांना प्रतिसाद न आल्यामुळे राकू यांनी हा स्फोटक धागा काढला आहे. आता लगेच पुढच्या फुसक्या बार वर सात प्रतिसाद जमा झाले आहेत.

हे उदाहरण देण्याचा उद्देश ( जो सहसा मायबोलीवर समजून न घेता प्रतिसाद दिला जातो) हा आहे कि इतरांची उदाहरणे देताना चांगली पण द्यावीत. उगीचच ते व्हॅटकिन सिटी आणि त्यांनी केलं तर हिंमत होईल का छाप नकोत.

>>

Biggrin

limbutimbu | 13 January, 2016 - 15:06

>>>> अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही <<<<<
हे तुमचे मत आहे.
आता अनावृत्त होऊन, म्हणजे नग्नच ना? तर हिंदु धर्माचे अध्यार्‍हुत गृहितकांप्रमाणे, षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे. तो स्वतःचे स्वतः देखिल तपासु शकतोच. व ही मात केल्याखेरीज मनुष्यदेहाबाबतच्या आसक्तितुन मुक्तता नाही, म्हणून मोक्ष नाही अशी धारणा आहे. आसक्तितून मुक्त झाल्याचे "पराकोटीचे" लक्षण म्हणुन हिंदु धर्मातिल काही विचारधारांमधे "नग्नते" बाबतही काहीच न वाटणे ही तपासण्याची एक परिक्षा म्हणून मानले जाते.

एक तांत्रिक चूक - अनावृत्त ऐवजी अनावृत असे हवे.

दुसरे म्हणजे हे तपासणी प्रकरण. ते पुरातन कालात होते / नव्हते / योग्य की अयोग्य यावर भाष्य करावयाचे नाहीये पण असे तपासण्याचे प्रकार आधुनिक काळातही घडतात.

साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी जेव्हा एम्बीए हा अभ्यासक्रम नावीन्याचा आणि औत्सुक्याचा विषय होता तेव्हा पुण्यातील सिम्बियॉसिस इन्स्टिट्यूट मध्ये एका प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना एक किस्सा ऐकविला गेला तो असा -

एका नामांकित कंपनीत अति वरिष्ठ पदाकरिता इंटरव्ह्यूव्ह चालू होता. इंटर्व्ह्यूव्हिंग पॅनेल मधील तज्ज्ञांनी उमेदवाराला विचारले, "तुम्ही कुठल्याही स्फोटक विधानाने विचलित तर होत नाही ना हे पाहण्याकरिता आम्ही इथे एक विधान करीत आहोत. त्यावर संतापून न जाता तुम्ही ते विधान हसत हसत झेलून परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवू शकता ते आम्ही तपासणार आहोत. तर ते विधान असे - तुमची आई वेश्या आहे असे जर आम्ही म्हंटले तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल?"

उमेदवाराने हसत उत्तर दिले, "तुम्ही म्हणता तसे असेल तर मी इतकेच म्हणेन की माझ्या बापाखेरीज इतर कुठलेही गिर्‍हाईक तिच्याकडे आल्याचे माझ्या आयुष्यात मी आजवर पाहिले नाही."

अर्थातच पदाकरिता त्या उमेदवाराची पॅनेलने निवड केली.

राग, लोभ, मोह, माया इत्यांदीवर विजय मिळविला आहे की नाही याची खात्री करून घेणार्‍या अशा तपासण्या करणे की योग्य की अयोग्य हे इथेही सांगता येणे अवघड असले तरी अशा टेस्ट्स न घेता उमेदवार निवडले तर कमकुवत उमेदवार हाती लागेल ह्या भीतीने असल्या मेंटल अ‍ॅबिलिटी टेस्ट्स आजच्या जमान्यातही कॉर्पोरेट विश्वात घेतल्या जातात हे खरे आहे.

>>>> एक तांत्रिक चूक - अनावृत्त ऐवजी अनावृत असे हवे. <<<< ओके. नोंद घेतली आहे.
मुलाखतीचे उदाहरण भारी आहे.
मला नेमके खात्रीशीर माहित नाही पण ऐकिव माहितीनुसार मिलिटरी/पोलिस सेवेमधेही स्वतःच्या "नग्नतेची" भीड चेपावी म्हणून प्रशिक्षणादरम्यान काही एक उपाय केले जातात. यावर जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतील.

कपोचे -
वर उदाहरण दिलेले आहेच कॉर्पोरेट विश्वाच्या हायप्रोफाईल पदांच्या इंटरव्ह्यूव्हचे. अशा टेस्ट्स ना शास्त्रीय आधार वगैरे नसतो. फक्त समोरच्याला राग / लोभ आदी भावना चाळवतील अशा प्रकारे उद्युक्त करावयाचे आणि त्याची प्रतिक्रिया आजमावायची. यातला अगदी बेसिक प्रकार म्हणजे सकाळी अकराला इंटरव्यूहला बोलवायचे सोफ्यावर बसवुन ठेवायचे आणि दर अर्ध्या तासांनी साहेब मीटिंगमध्ये आहेत फ्री झाले की इंटर्व्यूह घेतील असे सांगत शेवटी संध्याकाळी सहा वाजता इंटरव्ह्ञूह घेताना उमेदवाराचा मूड पाहायचा.

लिबूटिंबू - लष्करातही अशा तपासण्या घडत असतील, गोपनीयतेमुळे कळू शकत नाही इतकेच.

अनावृत्त होउन येण्याच्या परिक्षेचे समर्थन करणारे धर्ममार्तंड स्वतः मात्र इतरांवर राग , द्वेष यांचा भडिमार करतात , ते पाहून हसू आले.

अर्थातच पदाकरिता त्या उमेदवाराची पॅनेलने निवड केली.
<<

हे असले किस्से वाचून त्या उमेदवाराने त्या मुलाखतवाल्याच्या कानाखाली का काढली नाही हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. 'मी तुला नोकरी देणार म्हणजे मी कसलीही बेअकली वा हीन विधाने तुझ्याबद्दल करू शकतो', हा माज काय कामाचा?

असले बिनडोक किस्से प्रसृत करून नोकर = गुलाम अशी मनोवृत्ती अंगात बाणवून घ्यायला भाग पाडणार्‍यांचा मला राग येतो.

<< हे असले किस्से वाचून त्या उमेदवाराने त्या मुलाखतवाल्याच्या कानाखाली का काढली नाही हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. 'मी तुला नोकरी देणार म्हणजे मी कसलीही बेअकली वा हीन विधाने तुझ्याबद्दल करू शकतो', हा माज काय कामाचा?

असले बिनडोक किस्से प्रसृत करून नोकर = गुलाम अशी मनोवृत्ती अंगात बाणवून घ्यायला भाग पाडणार्‍यांचा मला राग येतो. >>

Exactly....पण फक्त एम्बीए झाले म्हणजे पात्रता आली असे नव्हे. इतर कुठल्याही प्रॉडक्टिव्ह ठिकाणी महिना दहा हजार कमविण्याचीही लायकी नसणार्‍याला कॉर्पोरेट विश्वात जर महिन्याला दीड दोन लाख तेही एसी ऑफिसात बसून मिळत असतील तर तो काहीही ऐकून घ्यायला तयार असतो. गरजवंताला अक्कल (आणि पर्यायाने प्रतिष्ठा, आत्मसम्मान इत्यादी सारेच) नसते ही म्हण प्रत्ययास येते. नोकरीत पदोन्नती मिळावी म्हणून बॉसच्या बेडरूममध्ये स्वतःच्या पत्नीला (सोनाली कुलकर्णी सिनिअर) पाठविणारा नायक (तुषार दळवी) यांचे काही काळापूर्वी आलेले बदलत्या आशयाची चाहूल हे नाटक बरेच गाजले होते.

असले बिनडोक नमूने जबाबदारीच्या जागी (हाय प्रोफाईल) कामावर ठेवून त्यांना दीड दोन लाख देणारे लोक त्यांचं दुकान कसं काय चालवतात? कॉर्पोरेट = मूर्ख असणे असे असते काय?

दीडम्या, तुझ्या बेसिक विचारातच लोचा आहे. कारण,
जी व्यक्ति आपली 'प्रतिक्रिया/प्रतिक्षिप्त प्रतिसादा", तसेच मनातील भावभावना यांवर नियंत्रण मिळवु शकते तीच उच्चपदापर्यंत जाऊ शकते. बहुतेक सर्व राजकारणी अशाच प्रकारचे असतात. नोकरीमधे मात्र ते निवडुन घ्यावे लागतात, जे स्वतः बोलत राहून दुसर्‍यास ऐकवत रहाण्यापेक्षा, दुसर्‍याचे ऐकुन घेऊन त्यावर प्रतिक्रिया/मत न देता, जे करायचे तेच करतील. राजकारणी लोकांचे अजुन थोडे अवघड असते, त्यांना पब्लिक अ‍ॅड्रेसही करावा लागतो, तिथे जे बोलतील, ते तसेच वागतील याची खात्री कधीच घेऊ नये. असो.
उठसुठ जरा खुट्ट झाले की (मनात येतिल त्या) प्रतिक्रिया देत रहाणार्‍यांच्या "आयड्ञा" कशा उडतात हे इथेही बघितले नाहीयेस का तू? Wink Proud

इथे तर आपण फक्त पान्ढर्‍या स्क्रिनवर शब्दाने प्रतिक्रिया देत घेत असतो तरी इतकी तडतड होते.
क्लायेंट वा विरोधी पक्ष वा पक्षातीलच ज्युनियर्/स्पर्धक वगैरेंबाबत त्यांचे समोर त्यांचे कडुन त्यांचे मनातील काढुन घेताना, स्वतःचे मनातील उघड होऊ न देणे, मनातील एकाही भावभावनेचे प्रदर्शन चेहर्‍यावर उमटु न देणे या बाबी अतिशय आवघड आहेत, पण "असामान्य भुमिकेत" जगण्याकरता अत्यावश्यकही आहेत.

रश्मी, बोल ग बोल तू.... Wink
बाकी दीमांशी सहमती दर्शवलीस उघडपणे, तरी बोलले अस्ते म्हणत "प्रतिक्रिया द्यायचे/बोलायचे थांबवुन" शेवटी माझ्या विवेचनासच सहमती दाखवुन "उच्चपदस्थ-डिप्लोमॅट" आहेस असे सिद्ध केलस हं तू... Proud

बिपिन, त्या वर्णनावरुन असे वाटते की, "उथळ पाण्याला खळखळाट फार" या म्हणीला अनुसरुन, कोणती व्यक्ति किती "उथळ" आहे वा नाही हे तपासत असावेत. अर्थातच उच्चपदावर काम करताना "उथळपणा" अजिबात नकोच असतो.

Pages