तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.
मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.
दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?
केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.
वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.
त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.
या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.
“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“
निश्चय असावा तर असा.
>>>>> विनाकारण व्यक्तिगत
>>>>> विनाकारण व्यक्तिगत अपमान वेगळे.<<<<
दीडम्या, तिथे बिपिनच्या मुलाखतीच्या उदाहरणात विनाकारण अपमान केलेलाच नाहीये, तर आधी सांगितलय की काही एक "अचाट" विचारणार आहोत, सूचना दिलि आहे, सावध केले आहे, अन मग प्रश्न विचारलाय...... तो देखिल "अपमान करण्याचे" दृष्टीने नाही, तर अशी परिस्थिति आल्यास व्यक्ती काय प्रतिसाद देईल हे तपासण्याकरता.
तशी सूचना देऊन प्रश्न विचारणे
तशी सूचना देऊन प्रश्न विचारणे हा तद्दन मूर्खपणा आहे. त्यात रिअॅक्शन कशी काय तपासणार? तो कॅल्क्युलेटेड रिस्पॉन्स होइल.
तशी सूचना देऊन प्रश्न विचारणे
तशी सूचना देऊन प्रश्न विचारणे हा तद्दन मूर्खपणा आहे. त्यात रिअॅक्शन कशी काय तपासणार? तो कॅल्क्युलेटेड रिस्पॉन्स होइल.>>>>>>>>> +१.
अशा मुलाखातीच्या मुर्ख स्टोर्या डोक्यात जातात. कैच्याकय. दोन ठेवुन द्याव्या त्या मुलाखत घेणार्याच्या आणि वर 'अशी परिस्थिति आल्यास तुम्ही काय प्रतिसाद देता हे तपासण्याकरता दोन दिल्या' असे सांगावे.
>>>> तशी सूचना देऊन प्रश्न
>>>> तशी सूचना देऊन प्रश्न विचारणे हा तद्दन मूर्खपणा आहे. त्यात रिअॅक्शन कशी काय तपासणार? तो कॅल्क्युलेटेड रिस्पॉन्स होइल. <<<<
मग वरील उदाहरणातच मूर्खपणा कसा काय?
दीडम्या, एकदम मुर्खपणा वगैरे तू बोलतोस?
अरे बाबा, काही डॉक्टर "मी आता इंजेक्शन देतोय (सुई खुपसतोय) " हे पेशण्टला आवर्जुन सांंगुन सुई खुपसतात, तर काही डॉक्टर अवांतर गप्पा मारित पेशण्टचे लक्ष विचलित करित पेशंटच्या नकळत सुई खुपसतात. या दोनही पद्धती वापरात आहेत तरी त्यास कुणी "मूर्खपणा" म्हणत नाही.
अनुसयाबाईंनी इंद्राकडे पी ए
अनुसयाबाईंनी इंद्राकडे पी ए साठी अर्ज केला होता का ?
मग देवानी त्यांची परिक्षा का घेतली ?
तीन देवाना पाहुन चळली नाही , याचा अर्थ ती पतिव्रतेच्या टेस्टमध्ये पास कशी होते?
उद्या माझ्य्सासमोर पूनम धिल्लो , निरुपा रॉय व बिंदू आल्या व मी चळलो नाहे तर मला एकप्त्नीव्रताचे सर्टिफिकेट मिळणार का ?
वर चाललेली चर्चा इंटरेस्टींग
वर चाललेली चर्चा इंटरेस्टींग आहे, पण विषयला धरुन नाही (नेहमीप्रमाणेच
)
मला नविन नविन ( म्हणजे जुन्याच पण मला माहित नसलेल्या ) मजेदार पौराणिक कथा वाचायची उत्सुकता होती. फेबुवर जावुन त्या सकपाळांना शोधायचा उत्साह नाहीए.
पण तरी चालु दे. कारण सगळे सुखासुखी एखाद्या टॉपिकवर बोलताहेत हे बघुन पण छान वाटतं आहे.
या धाग्यामुळे मंगेश सपकाळ
या धाग्यामुळे मंगेश सपकाळ माहित झाले आणि बर्याच जणांना माहित करुन देता आले.
त्या बद्द्ल Rajesh Kulkarni यांना धन्यवाद.
उद्या माझ्य्सासमोर पूनम
उद्या माझ्य्सासमोर पूनम धिल्लो , निरुपा रॉय व बिंदू आल्या व मी चळलो नाहे तर मला एकप्त्नीव्रताचे सर्टिफिकेट मिळणार का ?
<<
दोन ठेवुन द्याव्या त्या
दोन ठेवुन द्याव्या त्या मुलाखत घेणार्याच्या आणि वर 'अशी परिस्थिति आल्यास तुम्ही काय प्रतिसाद देता हे तपासण्याकरता दोन दिल्या' असे सांगावे.
" असे सांगावे.
<<
नाही काही. कानाखाली काढून मग "असल्या प्रश्नांना हा माझा रिस्पॉन्स असेल, अजून थोडे असेच प्रश्न विचारा ना गडे
निरुपा रॉय ? अहो उदाहरणात
निरुपा रॉय ?
अहो उदाहरणात तरी मल्लीका शेरावत, इ. महान लोकांचा समावेश करावा
https://www.facebook.com/mang
https://www.facebook.com/mangesh.sapkal.5?fref=nf
Mangesh Sapkal
सकुरा, थँक्स ! सोपं केलंस.
सकुरा, थँक्स ! सोपं केलंस. एक झलक पाहिली फक्त. शनिवार / रविवारी बरंच काही वाचायला मिळणार बहुतेक. पुर्ण टाइमलाइन वाचुन काढते.
अग माऊ उडाली ती फेसबुक पेज.
अग माऊ उडाली ती फेसबुक पेज.:अओ:
Sorry, this content isn't available at the moment >>>>. असला सन्देश येतोय तिथे
अजून थोडे असेच प्रश्न विचारा
अजून थोडे असेच प्रश्न विचारा ना गडे >>>>>>>>>>
आम्हाला दिसतोय.
आम्हाला दिसतोय.
nasir | 15 January, 2016 -
nasir | 15 January, 2016 - 14:37
उद्या माझ्य्सासमोर पूनम धिल्लो , निरुपा रॉय व बिंदू आल्या व मी चळलो नाहे तर मला एकप्त्नीव्रताचे सर्टिफिकेट मिळणार का ?
यावरून आठवलं एकदा एकाने मोठ्या फुशारकीत अमूक एक नटी त्याच्यासमोर नैसर्गिक अवस्थेत प्रकट झाली तरी तो चळणार नाही असे सांगितले असता सहकार्यांनी त्याला त्याची शारिरीक तपासणी करण्याचा सल्ला दिला होता.
अजून एक - पूनम पांडेनेही अशाच प्रकारे अमूक एका स्पर्धेत आपण बीसीसीआयचा संघ जिंकला तर नैसर्गिक अवस्थेत प्रकट होण्याची घोषणा केली होती. अर्थात आपले बीसीसीआयचे खेळाडू खरे सत्वशील त्यांनी त्या स्पर्धेत मोठ्या उदार मनाने हार पत्करीत त्या महिलेचे पावित्र्य भंग होऊ दिले नाही.
मंगेश सपकाळ ने लिहिलेलं
मंगेश सपकाळ ने लिहिलेलं दत्तां बद्दल थोडं वाचलं त्यादिवशी. जे पोचायचं ते पोचतं/ पोचलं. पटलं. पण भाषा भयंकर. मला परवडली. विशेष धक्का बसला नाही. पण इतरेजनांना परवडणारी भाषा नाहीये ती.
रश्मी, मी काही वेळापुर्वी
रश्मी, मी काही वेळापुर्वी पाहिलं तेव्हा होतं पेज अॅक्टीव. परत पहा एकदा (फेबु काय माबो थोडा ही ना है
आता आयडी आहे कि ३ मिनिटात उडाला पण. :हाहा:)
मंस फेबु पेज नहीये का आता?
मंस फेबु पेज नहीये का आता? अर्र्र माझं अर्ध वाचायचं राहिलं की.
लिंबू, दीमा का भांडता रे
लिंबू, दीमा का भांडता रे बाळांनो ?
चला एका कोपऱ्यात उकिडवे होउन पायाचे अंगठे धरा बरे आणि नंतर एकमेकांचे गालगुच्चे घेउन संक्रांत मुबारक म्हणा एकमेकांना.
या दीडम्याचे गालगुच्चे
या दीडम्याचे गालगुच्चे घ्यायचे? ऑंं?
इतकी का वाईट सन्क्रांत आलीये माझ्यावर?
अरे शोन्या, म्हाताऱ्या
अरे शोन्या, म्हाताऱ्या माणसाचे ऐकावे हेच तर सांगितलेय ना आपल्या थोर संस्कृतीत?
Sorry, this content isn't
Sorry, this content isn't available at the moment >>>>. असला सन्देश येतोय तिथे
<<
फेबुवर तुम्ही लॉग्डिन हवात.
(No subject)
कापोचे आजोबा, ओणवे अन उकीडवे
कापोचे आजोबा,

ओणवे अन उकीडवे मधला फरक सांगा पाहू?
वयोमान नुसार डोळ्याला सूक्ष्म
वयोमान नुसार डोळ्याला सूक्ष्म फरक दिसत नाहीत रे दीडम्या..
{ बायका आणि म्हाताऱ्या माणसाच्या चुका काढू नयेत हे या रेम्याडोक्यास कधी समजणार? हर हर.. सटकेश्वरा!
तारचुका आंबटचुका घोडचुका नाचु
हे चुकांचे ढोबळ प्रकार होत.
यादीत जमेल तशी भर घालावी.
अर्र! मी फेसबुकावर नाहीये ना.
अर्र! मी फेसबुकावर नाहीये ना.:अरेरे: जाऊ दे. कोणीतरी त्यातला एखादा पॅरा टाका जमल्यास इथे, अर्थात आपल्या अॅडमीन आणी मन्गेश सपकाळ यान्ची परवानगी असेल तरच.
कोणीतरी त्यातला एखादा पॅरा
कोणीतरी त्यातला एखादा पॅरा टाका जमल्यास इथे,>>> नो रश्मी.
खेचुका
कोचुका
वाचुका
नुसत्याच चुका
ओणवे अन उकीडवे मधला फरक सांगा
ओणवे अन उकीडवे मधला फरक सांगा पाहू? ओणवे म्हणजे पालथा आणि उकिडवे म्हणजे हा (गायला) बसतात तशे
Pages