तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना

Submitted by Rajesh Kulkarni on 12 January, 2016 - 12:58

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.

मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.

दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?

केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.

वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.

त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.

या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.

“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“

निश्चय असावा तर असा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> तुम्ही परधर्मातील गोष्टींवर का आलात? ही नेहमीची पळवाट आहे. त्याने विषयांतर होते. तेव्हा तसे करू नये. <<<<
का आलो त्याचे कारण त्याच पोस्टित सु:स्पष्ट निवेदिले आहे. ते विषयांतर नाही वा पळवाटही नाही.

फेसबुकवर नंग्या मंग्याने पार धुराळा उडवला आहे हे मात्र खर!
त्याच स्पष्ट आणि निर्भीड लेखन सध्या भारतात असलेल्या पै़की कुणावर च्या प्रोफाईलवर मी अजुनतरी तरी बघितली नाही. पुराणातल्या भाकड कथा तर फक्त तोच त्याच्या पध्दतीने लिहु जाणे. त्याच नास्तित्व ठाम आहे हे मात्र खरे. पण हा विषय इथे मायबोलीवर ही चर्चेला येईल अस वाटत नव्हत. कारण मंग्या ची भाषा आणि शैली तुर्तास तरी अवघड आहे. बदल मात्र अपेक्षीत.

तसेही मायबोलीवर ऋन्मेष आणी १०-१२ अजून मुले मुली सोडुन बाकी सर्व विवाहीत आहेत.
>>>>
कमॉन, गर्लफ्रेंड आहे ना मला. गर्लफ्रेंड असणे आणि विवाहीत असणे यात काय फारसा फरक असतो. त्रास तर तेवढाच असतो .. इथे विषयांतर होत असेल तर कधीतरी वेगळा धागा टाकतो.

@ टॉपिक,
लोकांच्या श्रद्धा न दुखावता समाजसुधारणा होत असेल तर आणि तरच त्याला अर्थ आहे.

कमॉन, गर्लफ्रेंड आहे ना मला. गर्लफ्रेंड असणे आणि विवाहीत असणे यात काय फारसा फरक असतो. त्रास तर तेवढाच असतो .. इथे विषयांतर होत असेल तर कधीतरी वेगळा धागा टाकतो. >>>

अरे तु काय टपलेलाच असतो का ? मिळाला टॉपिक कि काढ धागा.

"कमॉन, गर्लफ्रेंड आहे ना मला. गर्लफ्रेंड असणे आणि विवाहीत असणे यात काय फारसा फरक असतो. त्रास तर तेवढाच असतो .. "
ऋ, कधीतरी एक टाचणी टोचणे आणि एखाद्याला बांधून ठेवून दर १ मिनीटाला टाचण्या टोचणे यात तुलना कर पाहू...

कमॉन, गर्लफ्रेंड आहे ना मला. गर्लफ्रेंड असणे आणि विवाहीत असणे यात काय फारसा फरक असतो. त्रास तर तेवढाच असतो .. "
ऋ, कधीतरी एक टाचणी टोचणे आणि एखाद्याला बांधून ठेवून दर १ मिनीटाला टाचण्या टोचणे यात तुलना कर पाहू...>>>>>>>>>>>>>>>> Sad हे खरंय मात्र!!!!

मंगेश सपकाळ कोण? त्यांनी लिहिलेलं कुठे वाचायला मिळेल?>>>फेसबुक वर Mangesh sapakal नावाचे प्रोफाईल शोधा. एका आचाट आणी वेगळ्या जंगलात आल्यासारखे वाटेल. काहीतरी वायफळ वाचता वाचता खुप काही सांगुण गेल्या सारख जाणवेल.

ऋ, कधीतरी एक टाचणी टोचणे आणि एखाद्याला बांधून ठेवून दर १ मिनीटाला टाचण्या टोचणे यात तुलना कर पाहू...>>>>>>>>>>>>>>>> अरेरे हे खरंय मात्र!!!! >>.

तुम्ही दोघी स्वतःला "टाचणी" संबोधत आहात ? युगे युगे कलियुगे. इतके खरे "कन्फेशन" पहिल्यांदा बघितले Light 1 Happy

आम्ही स्वत:ला नाही, आमच्या अ‍ॅक्शन्स ना टाचणी म्हणत आहोत!! Happy
(बॉफ्रे आणि नवरा असे उल्लेख असले तरी सेम वाक्य लागू होईल.)

ऋन्मेऽऽष | 13 January, 2016 - 13:25
तसेही मायबोलीवर ऋन्मेष आणी १०-१२ अजून मुले मुली सोडुन बाकी सर्व विवाहीत आहेत.
>>>>
कमॉन, गर्लफ्रेंड आहे ना मला. गर्लफ्रेंड असणे आणि विवाहीत असणे यात काय फारसा फरक असतो. त्रास तर तेवढाच असतो
<<<< दोन्हींचा अनुभव असल्याखेरीज हे कसे बरे सांगावे? Proud

याच निमित्ताने माझीही अनेक वर्षांपासुन एक शंका आहे.
फार पुर्वी कुठल्यातरी लेखात वाचले होते की एक विशिष्ट मानसिक परिस्थीती / आजार झाल्यावर माणसाला कपड्यांचे / स्वतःचे भान राहत नाही. तसेच विशिष्ट अमंली व्यसन असते वगैरे.
ई. ई.
तर त्या लेखात त्या आजाराची सर्व लक्षण होती आणि असे म्हटले होते की ईतर लोक या व्यक्तीचा गैरफायदा घेतात.
त्याला देव बनवतात. मग तिथे देवस्थान सुरु होते. अमुक प्रसिद्ध देवाचा अवतार ई.

हा लेख कुणाला माहिती आहे का? कुठे प्रसिद्ध झाला होता ते? कुठलेतरी पुस्तक किंवा वर्तमानपत्र असण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते मी पुरेशा हिंट दिल्या आहेत.
हे खरे आहे का? यावर केस स्टडीज कुठे वाचायला मिळतील. या आजाराचे नाव काय आहे?

गजानन
Cyanide आणि Arsenic यात कोणते जास्त जहाल विष आहे हे न खाता ही सांगता येते ना Wink

मी कुठलाही क्लेम केलेला नसुन आणखी माहिती विचारली आहे
>>

होय स्पॉक तुम्ही काहीही क्लेम केलेलं नाहीये … मला त्या लेखावर हसू आलं !

चांगला आहे विषय. समाजप्रबोधनाकरता चांगले आहेत मुद्दे.
अजुनही असु शकतात. अभिमन्युने गर्भात कसलेतरी म्हणे शिक्षण घेतले आणि लढाई लढला. काहीही.
सप्तचिरंजीव वगैरे ढोंगांनाही खणती लावली पाहिजे.
मंदिरांचे बाजार बंद व्हायला हवेत.
हव्यात कशाला भाकडकथांमधल्या न बघितलेल्या हिरोंवर श्रद्धा? कामे करा. कामावर श्रद्धा ठेवा.

खोटं कशाला बोलु? मला भुतांची भिती वाटते.
देवाची तितकी वाटत नाही कारण देव वगैरे समजुती काही मुठभरांनी उपजिविकेकरता बनविल्या आहेत असे बरेच थोर लोक सांगुन गेलेत.
पण भुते, सैतान सर्व धर्मात असतात.
त्यांची भिती वाटू नये म्हणुन उपाय काय करावेत?
विविध धर्मांच्या भुताकरता वेगवेगळे उपाय असतील तर तसेही क्रुपया सांगावे.

परमेश्वर
देव-देवता
संत
आणि इतर - आस्तिक आणि नास्तिक असे सामान्य

अशा संकल्पना आहेत. ह्यात प्रत्येक धर्माप्रमाणे देव - देवता आणि संत बदलतात. जर काही बदलत नसेल तर तो आहे परमेश्वर, जो हिंदु धर्मातही आहे, मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्व धर्मात आहे. परमेश्वर म्हणजे ती सर्वशक्तिमान शक्ति.

आता त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे रुप सुद्धा प्रत्येक धर्माप्रमाणे बदलते. काही म्हणतात तो अत्यंत प्रेमळ आणि फक्त प्रेमळ आहे काही म्हणतात तो न्यायी आहे इत्यादी इत्यादी.

अगदी नास्तिक आणि विज्ञानवादी सुद्धा सर्वशक्तिमान अशी एक शक्ती आहे असे मानतात (हेसुद्धा न मानणारे कोणी असेल तर मी अजून तरी पाहिलेले नाही) त्यालाच परमेश्वर म्हणतात.

आता आपल्या पैकी कोणीच त्या परमेश्वराला पाहिलेले नाही त्यामुळे तो कसा आहे ह्यावर वाद घालणे म्हणजे आपण किती मूर्ख आहोत ते त्या परमेश्वराला दाखवून देणे.

हिंदु धर्माप्रमाणे अनेक देव देवता आहेत आणि त्या प्रत्येक देव देवतेला काही कार्य नेमुन दिले आहे आणि पौराणिक कथांनुसार ह्यांना मानवी भाव-भावना आहेत.

असं एक वेळ मान्य केलं की ह्या देव - देवता म्हणजे खरच होते तर आपण आज ऐकतो त्या कथा म्हणजे त्यांच्या आयुष्यात किंवा ते अ‍ॅक्टिव्ह होते तेव्हा घडलेले प्रसंग जे आपण कथा म्हणून ऐकु लागलो.

आता कथा म्हणजे कथाच की, एकाने दुसर्‍याला सांगितली, दुसर्‍याने त्याला समजली तितकी घेतली आणि तिसर्‍याला सांगितली. आणि ही चेन तशीच पुढे चालू राहिली. ह्यात प्रत्येक कथा प्रत्येकाला जितकी समजली तितकी त्याने घेतली आणि पुढे सांगितली हे महत्त्वाचे आहे. कारण ह्यातच सगळ्या कथांची तोडमोड झाली. प्रत्येकाने स्वतःच्या आणि समोरच्याच्या समजुतीनुसार त्यात काही अ‍ॅडिशन्स केल्या आणि त्यांचे मूळ स्वरुप बिघडून गेले. आणि त्याच कथा आज आपण ऐकत आहोत.

त्यामुळे ह्या कथांशी आपण आपल्या धार्मिक अस्मिता किंवा कुठल्याही अस्मिता जोडणे मुर्खपणाचे ठरेल किंवा त्यावरुन आपला हिंदुधर्म किती मागासलेला आहे किंवा तत्सम कमेण्ट्स करणेही चुकीचे ठरेल.

आणि हे केवळ हिंदुधर्माच्या बाबतीत नाही तर प्रत्येक धर्माच्या बाबतीत आहे.

तेव्हा बुद्धिवादी लोकांनी मी किती हुषार मला कसे समजते की ह्या कथा आणि त्यावर उभा राहिलेला आपला धर्म म्हणजे तद्दन फालतु आहेत आणि त्यावर विश्वास ठेवणारे कसे मूर्ख आहेत अशा भ्रमात राहु नये. कारण असा विचार करणारा माणूस मग तो कितीही बुद्धीवान असला तरी तो हत्तीला हाताने चाचपडणारा आंधळा असतो.

तसेच ह्या कथांवर विश्वास ठेवणार्‍या धार्मिक आणि आस्तिक माणसानेही तोडून मोडून बदलून ऐकलेल्या कथांकरीता आपल्या अस्मिता दुखावून घेऊ नये. कारण तुम्ही विश्वास ठेवताय त्या कथा मूळ कथा आहेतच ह्याची खात्री तुम्ही कधीच देऊ शकणार नाही, उलट तुम्ही ऐकल्यात त्या कथा प्रत्येक प्रदेशात कशा वेगवेगळ्या आहेत ह्याचे अगणित पुरावे तुम्हाला सादर होतील.

तेव्हा तुम्ही तुमच्या देवी देवतांवर विश्वास ठेवा पण त्यांच्याशी संलग्न कथांवर नव्हे.,

ह्याशिवाय एखादा बुद्धिवादी नास्तिक अथवा विज्ञान्वादी माणूस जेव्हा त्या देवीदेवतांवर किंवा कथांवर टीका करत असतो तेव्हा प्रत्येक आस्तिकाने हे समजून घेतले पाहिजे की तो त्याच्या विचारसरणीनुसार वागत आहे. आणि ह्या टिका म्हणजे तुमच्या देवी देवतांचा किंवा धर्माचा अपमान म्हणून तुम्ही घेऊ नये, कारण देवी देवता आणि धर्म इतके मुळातच ग्रेट होते की आमच्यासारखी यकःश्चित माणसं त्याचा अपमान कसे करु शकतील?

ह्याशिवाय दोघांनीही हे लक्शात ठेवलं पाहिजे की तुमच्या विरोधी विचारसणीचा माणूस आहे म्हणून तुमच्या विचारसरणीला किंमत आहे. तसा नसता आणि सगळेच तुमच्या सारखे विचार करत असते तर?

देवी-देवता अथवा कोणतेही श्रद्धास्थान असणे ही प्रत्येक माणसाची मानसिक गरज आहे.

असे नक्की होत आहे की सो कॉल्ड धार्मिक गोष्टींमुळे समाजाचे नुकसान होत आहे, आणि ते केवळ १८ आणि १९ व्या शतकात झाले नाही तर ते आजही होत आहे. पण त्याकरता केवळ दुसर्‍यावर टीका करुन त्यांना मूर्ख म्हणून किंवा इतर नावे ठेवून काही साध्य होणार नाही तर उलटा इफेक्ट होईल, त्यापेक्शा खर्‍या बुद्धीवाद्यांनी ह्या कथांचे स्वरुप इतरांना न टोचेल अशा प्रकारे दाखवून दिले जावे.

आसक्तितून मुक्त झाल्याचे "पराकोटीचे" लक्षण म्हणुन हिंदु धर्मातिल काही विचारधारांमधे "नग्नते" बाबतही काहीच न वाटणे ही तपासण्याची एक परिक्षा म्हणून मानले जाते.>> कुणाची आसक्ती? नग्न व्यक्तीची की तिला पाहणार्यांची?

वेल,
समाजाचे नुकसान होत आहे असे तुम्ही कशावरून म्हणता माहित नाही. आजुबाजुचा बकालपणा तुम्हाला लोक ईश्वर या संकल्पनेला भीक घालत नाहीत हे दाखवत नाही का? या बहुतेक लोकांनी त्या नसलेल्या देवालाही पचवलेले आहे.
“देवी-देवता अथवा कोणतेही श्रद्धास्थान असणे ही प्रत्येक माणसाची मानसिक गरज आहे.” हे तुमचे विधान तर फार धाडसी आहे. लहानपणी मुले परिकथेत रमतात. मोठेपणी परी वगैरे काही नसते हेही त्यांना कळून चुकते. पण लहानपणापासून बाप्पा बाप्पा म्हणून आणखी एक लोढणे त्यांच्या मागे लावलेले असते. परी नसते तसे बाप्पाही नसतो, हे त्यांना कळले तरी तो बाप्पा इतका भिनलेला असतो की त्याला मनातून काढून टाकणे क्वचितच काहींना जमते, बहुतेक लोक त्याला पचवतात. तेव्हा हे मानसिक गरज वगैरे थोतांड आहे. एवढे मोठे झाल्यावर जे नाही त्याची गरज कशाला भासते? जो नाही त्याच्यावर विसंबून रहायला, त्याच्यात मानसिक आधार शोधणे हा खुळचटपणा आहे. तेव्हा या असे डोके बाजुला ठेवण्याच्या प्रकाराचे समर्थन तरी नको.
ते गाडगेबाबा जितक्या स्पष्टपणे सांगायचे तेवढे सांगून थकले. समाज हलला का त्यामुळे? समाजाने देवाला पचवले, तसे गाडगेबाबांनाही पचवले. तेव्हा इतरांना न टोचेल अशा पद्धतीने सांगून काय उपयोग होणार? या मानसिकदृष्ट्या कमकुवत असणा-या आणि म्हणून अशा काल्पनिक आधारांची गरज असलेल्यांबद्दल का सहानुभूती बाळगावी?
कोणी म्हणेल, आम्ही आमच्या घरात, आमच्या कुटुंबापुरते हे करतो, तुमची काय हरकत? हे करताना त्यानिमित्ताने इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा रूजतात आणि फोफावतात त्याचा विचार कोणीच करत नाहीत. तेव्हा या तथाकथित श्रद्धा हे अंधश्रद्धांचे पॅकेज घेऊनच येतात. त्यांचा कुटुंबप्रमुखावर, त्याच्या पत्नीवर/पतीवर, मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहणे अशक्य असले तरी ते होते निश्चित.
त्यामुळे मूर्खपणाला मूर्खपणा म्हणणे हाच मार्ग आहे आणि हा प्रतिवाद सतत अशा मुर्खांच्या कानी पडला पाहिजे, ज्यायोगे वर ज्या साखळीचा उल्लेख केला आहे, त्यातल्या काही घटकांपर्यंत तरी हा प्रतिवाद पोहोचेल आणि ते या दुष्टचक्रात सापडणार नाहीत.
“ह्याशिवाय दोघांनीही हे लक्शात ठेवलं पाहिजे की तुमच्या विरोधी विचारसणीचा माणूस आहे म्हणून तुमच्या विचारसरणीला किंमत आहे. तसा नसता आणि सगळेच तुमच्या सारखे विचार करत असते तर?” याचा अर्थ कळला तरी काय म्हणायचे आहे ते कळले नाही. विचारसरणीला किंमत असण्या-नसण्याचा प्रश्न नाही, सगळेच असा विचार करू लागले तर लोकांना ऑब्जेक्टिव्ह विचारांची सवय लागेल. उठसुट भावना दुखावणे वगैरे प्रश्नच उद्भवणार नाहीत, धर्माला रस्त्यावर आणून दुस-यांना उपद्रव होणार नाही. झाले तर चांगलेच होईल की.

सत्यनारायनाची भम्पक कथा, पाठ येथे पण आहे... जोडीस अन्गठी (अजुन सोन्याची चेन नाही आली बाहेर) बाहेर येण्याचे प्रकार पण कानावर येतात. भक्तगण केवळ अचम्बित होतो...

राकू यान्चा पुढचा धागा- अन्गात देवी येणे.... Happy

राजेश कुलकर्णी ह्यांनी काढलेले बरेच धागे पाहून, ह्यांच्याकडे एखाद्या काडेपेटी मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स आहेत की काय अशी शंका येते.

मुळातच हा धागा, बाकीच्या असंख्य धाग्यांप्रमाणेच बिनबुडाचा आहे. मंगेश सपकाळ ने जर स्वतः काही लेख लिहून त्याचा धागा काढला आणी त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या तर ते समजण्यासारखं आहे. पण त्याचे लेख वाचून, त्या विचारांना स्वतःचेच असल्यासारखे डिफेंड करण्यात काय लॉजिक आहे हे काही कळलं नाही. फार तर त्याचे अनुयायी म्हणू. पण मग ज्या गतानुगतिकतेवर ही सडकून टीका चालली आहे, तोच प्रकार स्वतः कुलकर्णी करताहेत.

बाकी पगारेंची प्रतिक्रिया पहिली आणी लेखाच्या समर्थनार्थ असणार हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती.

प्रत्येक संस्कृतीच्या मिथ्यकथा पुराणे वगैरे असतातच .त्यात रंगवलेले देव सहसा दानवांना स्पर्धा देण्याइतके क्रूर,विधिनिषेधशून्य असतात.ग्रीक पुराणे ,बायबल यातले दाखले घेता येतील.याचा एकूणच मानवी मनाच्या आणि संस्कृतीच्याही सामुहिक नेणीवेशी संबंध जोडता येईल,त्याचा निरनिराळ्या मानव्य ज्ञानशाखांचे अभ्यासक अर्थ लावत असतातच .

मंगेश यांचा मुद्दा असल्या पोरकट आस्तिकांच्या श्रद्धेच्या संदर्भात बरोबर असला तरी आस्तिकतेचे सगळेच आयाम,त्यातले सगळे अंतिम अर्थ आपल्यालाच कळले आहेत ,ते भंपक आहेत आणि नास्तिकता हा काहीतरी नवा प्रकाश दिसतो आहे हा एका विशिष्ट वृत्तीतून येणारा पवित्राही असहिष्णुतेचा आहे..

अशा पायावर आपल्या श्रद्धा आधारणारे आस्तिक आणि त्यांच्याशी शाब्दिक झुंज अष्टौप्रहर खेळत बसणारे नास्तिक हे दोन्ही परतत्वाच्या सूक्ष्म स्वरूपाचा विचारही करत नसतात.

फेसबुक वरचे आहेत ते मंगेश सकपाळ. मला स्वताला त्याचं कुठलीही भीड भाड न बाळगता स्वताचे मत ते जे बेधडक पणे व्यक्त करतात ते नक्कीच आवडते. लपवाछपवीचा मामला नाही. बर ते जे काही लिहितात त्यांच्या भिंतीवर लिहितात त्यामुळे त्याचं लिखाण कुणी डिलीट करण्याचा प्रश्नच नाही. सगळ काही रोख ठोक आणि भाषा पण बेधडक. बर्यापैकी अश्लील . घाबरत नाहीत कोणालाच Happy

एखाद्या प्रस्थापिताची खिल्ली उडवणं खूप सोपं आहे, पण त्याला समर्थ पर्याय देणं तितकच अवघड आहे. विरोधासाठी विरोध आणी constructive विरोध ह्यात खूप फरक आहे. मी स्वतःपुरता स्वतःला बुद्धीवादी मानतो. पण मानवी समाज पोकळीत जगू शकत नाही, त्यामुळे एखादा समाजमान्य आधार काढून घेतानाच त्याला तितकाच समर्थ, सक्षम,पर्याय देणं गरजेचं आहे. नुसता विद्ध्वंस करण्यात काहीही अर्थ नाही. जितकं नुकसान प्रस्थापित कल्पनांना चिकटून बसण्यामुळे होतं तितकच, किंबहूना त्यापेक्षा जास्त नुकसान ह्या बेसलेस destruction मुळे होतं.

Pages