तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना

Submitted by Rajesh Kulkarni on 12 January, 2016 - 12:58

तद्दन अनैतिक व भंपक पौराणिक कथा व तथाकथित आस्तिकांच्या भावना
.

मंगेश सपकाळ हे अश्लील लिहितात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या 'तशा' पोस्ट्स या सर्वांसाठी नसतात असे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. पण त्यांच्यावर तो शिक्का बसतो तो बसतोच. त्यांची लिहिण्याची शैली अगदी वेगळी आहे.

दत्तकथा ही त्यांची ताजी पोस्ट. दत्तजन्माशी संबंधित. अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो. म्हटले तर ही कथा नैतिकतेच्या दृष्टीने भयानक आहे. अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही. आपल्याकडचे दत्ताचे व दत्तसंप्रदायाचे महात्म्य पाहता अनेकांना ही पोस्ट वाचून (विशेषत: भाषा) धक्का बसलेला असणारच. अगदी भूकंप झाल्यासारखे वाटले असणार. पण मुळात ती कथाच हिणकस आहे. अशा कथांवरून आपल्या श्रद्धा जोपासण्या-यांच्या भावनांची गय कशासाठी करायची?

केवळ धर्माचा पगडा असलेल्यांनाच नव्हे तर जे आस्तिकता-नास्तिकता यांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी दत्तकथा ही पोस्ट धक्कादायक ठरेल. ज्याला वाचायची आहे त्यांनी जरूर वाचावी. ती अश्लील आहे किंवा नाही, यामध्ये न पडता आपण त्याच्या भावार्थ नक्कीच समजू शकतो, त्या आधारावर मूल्यमापन व्हावे असे वाटते. अशा भंपक कथांच्या बाबतीत माझ्याही भावना तीव्र असतात. असेच वारंवार दिसणारे उदाहरण परशुरामाचे. वामनावतारात बळी राजाला जी शिक्षा दिली गेली त्याचे. यातल्या काही कथा तर दशवतारांच्या आहेत. अशा अनेक कथा सापडतील. म्हणजे धर्माच्या मुलाम्याखाली आपल्यावर खोटेपणा, स्वार्थीपणा, वगैरे कसा अगदी लहानपणापासून लादला गेला आहे हे लक्षात यावे. मीही माझ्या पद्धतीने या प्रकारांवर टीका करतो. मला त्यांच्यासारखी भाषा वापरता येणार नाही. त्यामुळे मी म्हटले तसे मी त्यातला भावार्थ घेतला, त्यात मला काही वावगे वाटले नाही. माझ्याच भाषेवर काहीजण चिडतात, त्यापुढे त्यांची भाषा कोणाला फारच जहाल वाटल्यास नवल नाही.
कल्पना नसताना खूप तिखट लागल्यावर माणसाला कसे कानातून वाफा बाहेर पडताहेत असे वाटते आणि जेवायला बसलेला माणूस कसा ताटकन उभा राहतो, तसे. पण याचा भावार्थ समजावून घेऊ या आणि या भंपक कथा हद्दपार करूयात. मुख्य म्हणजे श्रद्धांच्या व भावनांच्या नावाखाली चाललेला बाजार त्यामुळे बंद व्हायला मदत होईल.

वर म्हटल्याप्रमाणे ज्या भंपक कथा आपल्या माथी मारल्या गेलेल्या आहेत त्या एकेक निवडून त्यांचे भंजन करण्याची आवश्यकता आहे. वर दोन उदाहरणे दिलेलीच आहेत.

त्या पोस्टवरचा सर्वात मोठा आक्षेप असा की त्यामुळे आस्तिकांच्या भावना दुखावतात. परंतु आस्तिक लोकांच्या भावना हा मोठा गहन प्रश्न आहे. गहन अशासाठी की आस्तिक या एकाच संकल्पनेत मोडणा-यांचा फार मोठा स्पेक्ट्रम आहे. अगदी भाबडे म्हणता येतील अशांपासून ते अगदी लबाड असे सर्व या सदरात मोडतात. जे लबाड किंवा त्याच्या आधीच्या काही पाय-यांपर्यंत असतात, ते देव म्हणून ते जे काही मानतात, त्याला त्यांनी पार पचवलेले असते. त्यामुळे ते आस्तिकतेच्या आवरणाखाली जर वावरतात, त्यांच्या ‘भावनां’ची ‘कदर’ कशासाठी करायची? कारण या लबाडांमुळेच धर्म रस्त्यावर आलेला आहे. व त्याचा आपल्या सर्वांना उपद्रव होतो.

या तथाकथित श्रद्धा (अंधश्रद्धा असे वाचावे), भावनांमधूनच नको त्या अंधश्रद्धा पसरतात. त्यात या लबाडांबरोबरच भाबडेही बरोबरीने कळत-नकळत सहभागी असतात. अशांकडून आपल्याच जवळपासच्या कुटुंबियांमध्ये कोणावर कशामुळे व कोणत्या स्वरूपाचा अन्याय होईल याचा नेम नसतो.
त्यामुळे आपल्या जवळपासच्यांमध्ये हे प्रकार दिसत असतील तर त्याबद्दल बोलायलाच हवे असे वाटते. भलेही शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल.
वर कोणी अश्लीलतेचा उल्लेख केला आहे. अश्लीलतेची अर्थात गरज नाही, स्पष्टपणाची मात्र आहे.
सपकाळांच्या मूळ पोस्टवरील टीकात्मक प्रतिक्रियेवर त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल पोस्टमधील शेवटच्या परिच्छेदातील मनोगत खाली देत आहे.

“असो. चालत राहणार हे.
तर परमभक्तांनो,
तुम्ही हजार वेळा अकौंट रिपोर्ट करा, ब्लॉक करा. डिसेबल करा. वाट्टेल ते करा.
मी काही तुमच्या मनासारखं वागणार नाही.
उद्या ब्लॉग काढेन, वेबसाईट बनवेन.
'तुम्ही माझं लिहिणं बंद करू शकाल असं वाटतंय का ? '
साला, श्रद्धा म्हणजे ढुंगणावरचा फोड झालाय यांच्या, कुणीही येवून दुखावू शकतो.
ज्या धर्मात हिंसा होते, जो धर्म तुम्हाला हिंसा करण्यास प्रवृत्त करतो, ते तुमचे सर्व धर्म 'कचऱ्याच्याही लायकीचे नाहीत'.
तुमच्या धर्माची शिकवण तरी चुकीची आहे, नाहीतर तुम्ही तरी चुकीचा धर्म शिकलेला आहात.
तुमच्या श्रद्धा तुमच्याजवळ. माझी थिल्लरगिरी माझ्याजवळ.
तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि मी माझं.
ही नास्तिकता आता अशीच जहाल राहणार.
मी तुमच्यासारखा तुमच्या आई-बहिणी काढणार नाही.
तुम्हाला धमक्या देणार नाही.
तुमची डोकी फोडायला येणार नाही.
पण एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही गांधी नाही आणि तशी व्हायची बिलकुलही इच्छा नाही.
इट का जवाब पत्थरसेही मिलेगा. गाढवांशी वैचारिक समागम करण्यात मला अजिबात रस नाही.
आणि नास्तिकांनो, 'आमची कुठेही शाखा नाही' सारखं, 'आमच्या संघटना होणार नाहीत' हे बोलणं थांबवा.
यापुढे नास्तीकांच्याही संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्याच की लगेच तलवारी नाचवणं हा अर्थ नसतो.
पण ढाल तरी हातात गरजेचं आहे आता.“

निश्चय असावा तर असा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! मस्त! राकु तुम्ही या भम्पक कथान्बरोबर मोगा ( नसिर) आणी सकुरा याना मोठ्यान्च्या अरेबीयन नाईटस मधल्या पण कथा इथे लिहुन दाखवा. तसेही मायबोलीवर ऋन्मेष आणी १०-१२ अजून मुले मुली सोडुन बाकी सर्व विवाहीत आहेत. त्यामुळे ते लिहाच.:फिदी:
एकदा आमच्या शेजार्‍यान्च्या छोट्या मुलाने मला ते ( नाईटस) पुस्तक आणुन दाखवले आणी म्हणाला, काकु यातल्या गोष्टी मला वाचुन दाखव. सिन्दबादची पण असेल यात. ( त्या बिचार्‍याला काय माहीत की लहान मुलान्चे अरे-नाईट्स वेगळे आहे) ते पुस्तक पाहुन मी उडाले आणी त्याच्या आईजवळ नेऊन दिले. ती अवाक! तिला आणी मलाही तोपर्यन्त माहीत नव्हते की मोठ्यान्चे अरेबीयन नाईटस वेगळे आहे.

काये ना, हिन्दु धर्माचा फापट पसारा खूप आहे, आणी बाकीच्यान्चा कमी, त्यामुळे सकुरा वगैरे लोकाना असे विषय चघळायला बरे पडतील. मायबोलीवर एकट्या ऋने च मक्ता घेतलाय का सगळ्यान्चे मनोरन्जन करण्याचा?

मस्त! मस्त! राकु तुम्ही या भम्पक कथान्बरोबर मोगा ( नसिर) आणी सकुरा याना मोठ्यान्च्या अरेबीयन नाईटस मधल्या पण कथा इथे लिहुन दाखवा. तसेही मायबोलीवर ऋन्मेष आणी १०-१२ अजून मुले मुली सोडुन बाकी सर्व विवाहीत आहेत. त्यामुळे ते लिहाच.<<<<<

अय्या रश्मी तुम्ही पण या भम्पक कथा आहेत हे मान्य करता तर...
बा़की तुमच्या इतर पोस्टशी सहमत...

हो, कथा भम्पक आहेत. कारण आम्ही श्री दत्त याना तसेच पुढे झालेल्या अवतार पुरुषाना, म्हणजे श्री स्वामी समर्थ याना आमचे गुरु मानतो. तुमच्यासरखी इतर धर्माची टिन्गल टवाळी आणी उपहास करत नाही.:स्मित:

रश्मीकाकु, अरेबियन नाईटसच्या कथा धार्मिक साहित्य आहे का?
त्या देव्हार्‍यात ठेऊन सिंदबाद जयंतीच्या दिवशी त्यांचे पारायण केल्याने मोक्ष मिळतो अशी समजूत आहे का?
अरबनारायणाला मौलवींना बोलवून अरेबियन नाईटस वाचून, मौलवींना दक्षिणा देऊन खिमापुरीचा प्रसाद कागदाच्या द्रोणातून वाटतात का?

नाही ग पुतणीबाई.:फिदी: असे अजीबात नाही. पण तुम्हा कोणाला हिन्दुन्च्या कुठल्याही देवाने, या माझ्या बड्डेला आणी जेवा हिथच मन्दिरात असे म्हणून प्रत्यक्ष अवताण दिलेले आहे का? तुम्ही तिथे जाऊन शिरा, पेढे, जिलब्या खायच्या की नाही हे तुम्ही ठरवायचे, जबरदस्ती तर नाही ना? आम्ही घरीच पूजा-पाठ करतो, कारण जायला पाहीजेच असे मला अजीबात वाटत नाही.

माणसाने किती कोणाला लुटायचे आणी कोणी आपण स्वत किती लुटले जावे हे आधी बघावे. मी कर्म कान्डा वर विश्वास ठेवत नाही, आणी कोणाला जबरदस्ती पण करत नाही. माझ्या घराजवळ ४ मन्दिरे आहेत. पण मनातच हात जोडुन मी माझ्या मार्गाने जाते. पण शेवटी हेच म्हणेन की तुमचा विश्वास नाही तर निदान दुसर्‍याचा उपहास तरी करु नका, आणी टिन्गल करण्या ऐवजी त्या व्यक्तीला नीट समजावुन सान्गा.

पण शेवटी हेच म्हणेन की तुमचा विश्वास नाही तर निदान दुसर्‍याचा उपहास तरी करु नका, आणी टिन्गल करण्या ऐवजी त्या व्यक्तीला नीट समजावुन सान्गा.
।हेच महत्वाचे, सर्वांनी हे समजुन घेतले नक्कीच चांगले होईल.
प्रत्येकाला त्यांच्या मताप्रमाणे जगु द्या. उगाच दुसरे काय करतायेत यात ढवळाढवळ कशाला?

एका ठिकाणी वाचण्यात आले ,

चांगले माणसे शोधण्यापेक्षा, स्वतः चांगले बना, नक्कीच कोणीतरी तुम्हाला शोधायला येइल.

<हो, कथा भम्पक आहेत. कारण आम्ही श्री दत्त याना तसेच पुढे झालेल्या अवतार पुरुषाना, म्हणजे श्री स्वामी समर्थ याना आमचे गुरु मानतो>

इथे 'कारण' या उभयान्वयी अव्ययाऐवजी 'पण' हे अव्यय हवे का?

>>>> आणी टिन्गल करण्या ऐवजी त्या व्यक्तीला नीट समजावुन सान्गा. <<<<
रश्मीतै, इथे वर अन एकंदरीतच मिडीयावर जे आगी लावणे चाललय तेव्हड पुरे नाहीये का?
अजुन या असल्या भंपक अर्धवट बुद्धीच्या आचरटांनाच सांगताय का की "समजावुन सांगा?"
धन्य आहे तुमचीही. असोच.
यांच्याकडुन काही "समजुन घेण्यायेवढी" बौद्धिक व संस्कारित दिवाळखोरी अजुन आमचि झाली नाहीये.
मी या बेशरम्/निर्लज्य लिखाणाकडे दुर्लक्ष करतोय. कारण त्यांना काही समजावण्याच्या पलिकडचे आहेत ते..... !

"

<हो, कथा भम्पक आहेत. कारण आम्ही श्री दत्त याना तसेच पुढे झालेल्या अवतार पुरुषाना, म्हणजे श्री स्वामी समर्थ याना आमचे गुरु मानतो>

इथे 'कारण' या उभयान्वयी अव्ययाऐवजी 'पण' हे अव्यय हवे का?"
मयेकर, एक नंबर.

मयेकरांचा विजय असो. शनिवारवाड्यावर सत्कार आयोजित कर्स्ण्यात येत आहे. पाधूझाक.

लिंबुटिंबु,
ते ज्या पद्धतीने लिहिले अाहे, ते थोडावेळ बाजुला ठेवू. थोडा वेळ. आता मूळ कथेबद्दल तुमचा काही आक्षेप आहे का ते सांगा.
त्यांचे लिखाण बेशरम/निर्लज्ज आहे असे म्हणताना मूळ कथाच बेशरम/निर्लज्ज आहे असे वाटते का?
ते जाऊ दे, वर कोणी सत्यनारायणाच्या कथेचा उल्लेख केलेला आहे. प्रस्तुत पोस्टमध्ये त्याचा उल्लेख नसला तरी तुमचा सत्यनारायणाच्या पोथीतल्या कथांबर विश्वास आहे का? अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मुळात आपल्याकडे धर्माच्या नावावर असा भंपकपणा खपवला जातो, विकला जातो हे व्हायला नको असे तुम्हाला वाटते का? त्यावरून "काही "समजुन घेण्यायेवढी" बौद्धिक व संस्कारित दिवाळखोरी अजुन आमचि झाली नाहीये" यातल्या अभिनिवेशाबद्दल बोलता येईल.

>>>> अनावृत्त होऊन जेवायला वाढण्याच्या मागणीचा अनसुयेकडे केलेला प्रकार ना कोणत्याही संस्कारकथेत बसतो, ना कशात. उलट कळलाव्या नारदाच्या व आपल्या हलक्या कानाच्या बायकांच्या सांगण्यावरून (प्रत्यक्ष कथेत थोडाफार फरकही असू शकेल) असले उद्योग करणा-यांना देव कसे मानायचे हा प्रश्नही आपल्याला पडत नाही <<<<<
हे तुमचे मत आहे.
आता अनावृत्त होऊन, म्हणजे नग्नच ना? तर हिंदु धर्माचे अध्यार्‍हुत गृहितकांप्रमाणे, षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे. तो स्वतःचे स्वतः देखिल तपासु शकतोच. व ही मात केल्याखेरीज मनुष्यदेहाबाबतच्या आसक्तितुन मुक्तता नाही, म्हणून मोक्ष नाही अशी धारणा आहे. आसक्तितून मुक्त झाल्याचे "पराकोटीचे" लक्षण म्हणुन हिंदु धर्मातिल काही विचारधारांमधे "नग्नते" बाबतही काहीच न वाटणे ही तपासण्याची एक परिक्षा म्हणून मानले जाते.
आता क्षणभर तुमच्या व तुम्ही संदर्भ दिलेल्या लेखाकाच्या मतांनुसार, हिंदु धर्म, त्यातिल कथा, देव आणि भक्त गलिच्छ/मूर्ख/भंपक आहेत असे ग्रुहित धरुही..... तर असे बघा की वरील दत्तात्रेयांचे उदाहरण हे "संपुर्णपणे" पौराणीक आहे ज्याचा निश्चित कालखंडही सांगता येत नाही. अन त्यावर तुम्ही व तुमचे ते दुसरे लेखकु महाशय आपली वैखरी चालवित आहेत. पण मग इसवीसन २०१५ मधे देखिल हीच नग्नता वा नग्नतेतुन देहाप्रतीची आसक्ति नाहिशी करत जाणे हे व्रत, "जैन साधु/मुनी" करतात, व त्यांचे दर्शन घेण्यास जैन धर्मीय लोक आजही जातात, बहुसंखेने जातात, त्याबद्दल का हो नाही तुमची वैखरी पाजळली जात? झालच तर ख्रिश्चनांची मदर मेरी? मला त्यांच्या म्हण्जे जैनांच्या वा ख्रिश्चनांच्या तशा कथा असण्याबद्दल कसलाही आक्षेप नाही, पण निव्वळ हिंदु धर्मावर अर्धवट माहितीद्वारे ज्यापद्धतीचे घाणेरडे आक्षेप तुम्ही लावताय, तसा तुमचा उत्साह हिंदुतर बाबींमधे दिसुन येत नाही. असे का हे तुमच्याकडुन ऐकण्याचि अपेक्षाही नाही, ते उघड गुपित आहे.
कारण तुम्हां लोकांचा अजेण्डाच आहे की हिंदु धर्मसुधारणेच्या आवरणाखाली "आपल्या विखारी प्रचाराद्वारे हिंदु लोकांमधे त्यांच्याच श्रद्धास्थानांबद्दल अपरिमित गोंधळ उडवुन द्या " ... "इतकी नानाविध रुपे/सोंगे घेउन हे चालु ठेवा की हिंदुंच्या लक्षातही येवू नये की त्यांचे नेमके शत्रुवत कोण आहेत, व ते लक्षातच न आल्याने विखारामुले ते हिंदुत्वाचाच द्वेष करु लागले तर हवेच आहे, पण त्यांनी भलतीकडेच जनरलाईज करुन विरोधाचे टोक वळवले, तर ते देखिल पथ्यावरच कारण त्यामुले हिंदुंचेच शत्रुसंख्या वाढीस लागेल."
असे मला वाटते.

तर हिंदु धर्माचे अध्यार्‍हुत गृहितकांप्रमाणे, षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे. > अनसुयेचे तपसामर्थ्य वाढण्यावरून तिचा हेवा करणा-या त्रिमुर्तींच्या पत्नी. तर तिचे सामर्थ्य कमी करण्यासाठी तिचे शीलहरण करायचे असा डाव ठरतो.

लिंबाजीपंत, वरील पैकी लहिले वाक्य तुमचे आहे आणि दुसरे कथेनुसार. त्रिदेव नक्कीच सती अनुसयेने माया-मोहावर मात केली की नाही हे पहायला गेले नव्हते. मुळात एखाद्या स्त्रीचे सत्व तपासण्यासाठी अशी अट घालणे याला काय म्हणावे?

हिंदु धर्माचे अध्यार्‍हुत गृहितकांप्रमाणे, षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे. तो स्वतःचे स्वतः देखिल तपासु शकतोच. व ही मात केल्याखेरीज मनुष्यदेहाबाबतच्या आसक्तितुन मुक्तता नाही, म्हणून मोक्ष नाही अशी धारणा आहे. >> मग देव का बरं दागिने वगैरे घालुन, उंची वस्त्रे लेऊन फिरायचे ??

ईथे जैनांबद्दल लिहुन काय होणारे?? एक चांगले जैन होते मायबोलीवर, पण त्यांना एका हिंदू जोडगोळिने भरीस पाडुन हाराकिरी करायला लावली Wink

लिंबुटिंबू,
तुम्ही परधर्मातील गोष्टींवर का आलात? ही नेहमीची पळवाट आहे. त्याने विषयांतर होते. तेव्हा तसे करू नये. तुम्ही वाचत असाल तर दुस-या धर्मातील चालीरिती, कथा वगैरेंवरहि प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यातही ख्रिस्ती/जैन धर्माबद्दलचे आक्षेप तर आधीपासूनच प्रचलित आहेत.
"षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे." असे तुम्ही म्हणता, पण एखाद्याचे तपसामर्थ्य वाढते म्हणून असे उद्योग करण्याचा, हलक्या कानाच्या धंद्यांचे कसे समर्थन करायचे?
यात तुम्हाला कसला अजेंडा दिसतो? चुकीचे ते टाकून द्यायचे हा मार्ग का स्विकारला जात नाही. ते चुकीचे नाहीच, इथपासून चुकीचे असले तरी आम्हाला पूज्य आहे असे म्हणन्यापर्यंत मजल जाते काही लोकांची.
शिवाय धर्म म्हणजे केवळ देवदेव हे दोक्यात बसल्यामुळेही ही गल्लत होते. जरा काही झाले की भावना दुखावतात. ही अशी वेगवेगळ्या स्वरूपात असलेली व शतकोनशतके साचलेली घाण काढून टाकायला वेळ लागेलच की.
पण ज्या २०१५चा उल्लेख तुम्ही करता त्या आजच्या काळातही किती जणांची मानसिकता या गोष्टींकडे मोकळेपणाने पाहण्याची आहे?
एक उदाहरण म्हणून सांगतो, इथल्या कथांशी संबंध नाही. जाती नामशेष करण्यावरून चाललेल्या चर्चेत सुशिक्षित, हुशार, वगैरे सारे असलेली व्यक्ती म्हणते, बाकी काही असो, जाती नष्ट होणारही नाहीत, व त्या व्हायलाही नकोत. अखेर भंगीकाम काय आपले लोक करणार आहेत का? मी म्हटले, शिकला नाही, लायकी नसेल, तर ते काम करावेच लागेल भविष्यात. कामाचे स्वरूप जातीवेरून का ठरावे? यावर ती सुशिक्षित, हुशार, वगैरे असलेली मान नाही-नाही म्हणून इतक्या जोराने हलली की मोडून पडेल की काय वाटले.
हे आपल्याच धर्माबद्दल आणि धर्मातले आहे ना? तेव्हा प्रत्येक गोष्टीत अजेंडे शोधणे बंद करूयात आणि समोर जो मुद्दा आहे त्याबद्दल बोलुयात.

आता अनावृत्त होऊन, म्हणजे नग्नच ना? तर हिंदु धर्माचे अध्यार्‍हुत गृहितकांप्रमाणे, षडरिपुंवर/माया-मोहावर केलेली मात "तपासण्याचाच" अनेकांपैकी तो देखिल एक मार्ग आहे. तो स्वतःचे स्वतः देखिल तपासु शकतोच. >>

वा लिंबू ! आणि हेच गांधींजींनी केले की ते मात्र चुकीचे ! ( त्या सो कॉल्ड ब्रह्मचर्य तपासून पाहण्याच्या कथा. म्हणे. )

काही गरज नाही अश्या कथा अन कादंबर्‍यांची माझ्या धर्मात. बकवास पणा आहे ती सत्यनारायणाची कथा अन तश्या अनेक कथा.

लिंबु ,

दत्तगुरुनी अल्ला व इस्लाम यांच्याबद्दल आदर व्यक्त केलेला आहे.

गुरुवारी दत्ताचे नाव ३ वेळा घ्या.

शुक्रवारी अल्लाचे नाव ५ वेळा घ्या.

http://www.maayboli.com/node/56920

>>>>> काही गरज नाही अश्या कथा अन कादंबर्‍यांची माझ्या धर्मात. बकवास पणा आहे ती सत्यनारायणाची कथा अन तश्या अनेक कथा. <<<<<<
तुम्हा बुप्रावाद्यांना त्या कथा/पुराणे बकवास वाटत असली तरी माझ्यासारख्या श्रद्धाळूंना त्या आवश्यक वाटतात, पण म्हणून तुम्हाला बकवास वाटले तर तुमची मते येनकेनप्रकारेण श्रद्धाळूंवर थोपविण्याचा वा त्यास नावे ठेवण्याचा अधिकार तुम्हा कुणासच नाही. तुम्हांस तुमचे धार्मिक/बुप्रावादी वा जे काही असेल ते कृतिस्वातंत्र्य आहेच्चे.

>>>> वा लिंबू ! आणि हेच गांधींजींनी केले की ते मात्र चुकीचे ! ( त्या सो कॉल्ड ब्रह्मचर्य तपासून पाहण्याच्या कथा. म्हणे. ) <<<< गांधीबाबांच्या या गोष्टिचा संबंध इथे लावण्याचा प्रयत्न तुझ्याकडून तरी अपेक्षित नव्हता केदार.
या धाग्याचा विषयच गांधींचे सत्याचे प्रयोग हा नसल्याने यावर काहीही बोलत नाही.

Pages