ओट्सचे आप्पे

Submitted by पूनम on 12 January, 2016 - 04:38
oats aape
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे Proud त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!

साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.

तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)

बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! Happy मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.

क्रमवार पाककृती: 

१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.

oats appe.png

मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351

वाढणी/प्रमाण: 
२१
अधिक टिपा: 

कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरचा रेसिपी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पात्र नसेल तर सरळ त्याचे 'उत्तपे' घाला. हाकानाका. मी उत्तपेच केले होते. आप्प्यांपेक्षा कमी वेळेत झाले. भिजवताना इडली पीठापेक्षा थोडंस जास्त सैल ठेवलं तर दडस होणार नाहीत.>>>> थॅंक्स अंजली .. करूनच पाहीन .

पण इथे फोटो देणार नाही . नाहीतर पूनम धपाटे देईल Proud Lol

नाहीतर पूनम धपाटे देईल फिदीफिदी हाहा>>>>

ओट्स च्या बॅटरचे धपाटे कसे करणार? Wink
दोसे उत्तपेच होणार फार फार तर!

तेच की कृष्णाजी! Lol

धनश्रीएल, थँक्स! Happy
प्राजक्ता, मामी- खलास फोटो! प्राजक्ता, तीळांमुळे फोटो कातिल दिसतोय!
(खाण्याच्या पदार्थामध्ये खलास, कातिल हे शब्द घालणं चुकीचं आहे, माहितेय, पण भावनाओंको समझो :खोखो:)

अमि, एका बाजूने फ्लॅट झाले तर आप्पे चालणार नाही. ते दोन्ही बाजूंनी फुगले तरी चालत नाही.

आप्पे कसे चालणार ना? Lol

ओटस काय असते? कुठे कशा स्वरुपात मिळते? किराणा दुकानात पाकिट लटकलेले बघितले होते ज्यावर ओटस लिहिले होते. पण जवळून बघितले नाही.

ओटस काय असते>>>

हे गव्हा सारखे एक तृण धान्य असून त्याला सातू किंवा यव- जव असे म्हणतात!

ह्याची यज्ञ-कर्म धार्मिक विधी ह्यामध्ये अधिक प्रमाणात वापर होतो हे आपणास सांगणे न लगे! Wink

बाजारात आजकाल जे ओट्स मिळते पाकीटात ते ह्या यवाचे पोहे होत! Happy

तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा! Happy

प्राजक्ता.. मस्त दिस्ताहेत आप्पे..

मामी.. कसला सुर्रेख सोनेरी रंग आलाय .. यम!!!

आता इथे वेरिएशन्स पाहण्याची उत्सुकता निर्माण होतीये .. Happy

मी आज केले. फटू काढायचा राहिला, पण तरीही चवीला उत्तम आणि चांगले खरपूस झाले होते. ओट्स एरवी लेक खात नाही, पण यात नक्की काय आहे ते न समजल्यामुळे सगळेच गट्टम झाले आहेत.

मी चिरोटी रवा वापरला आणि भिजवताना थोडं ताक घातलं.

आज केले. छान झाले होते. मी भिजवतना ताक वापरले आणि पिठात जिरे, मोहरी , कडीपत्ता, तीळ अशी फोडणी घातली.

ओके किस्ना, माहितीबद्दल धन्यवाद
ते सातू आहेत होय..... इंग्रजी नावामुळे दुर्लक्ष केले होते..... किंवा कधी कधी असेही होते की अदरवाईज आमच्या टाकाऊ वाटणार्‍या गोष्टी छान छान प्याकिंग मधुन इंग्रजी नावाने समोर आल्या की "पवित्र" होतात Proud असो....
एकदा आणुन बघितलेच पाहिजे. (होप सो की लिंबी नाक मुरडणार नाही - अन नाक मुरडायला नको असेल, तर तिला आधीच "हे सातू" आहेत असे सांगितले पाहिजे)

ए मी पण मी पण

oats appe.jpg

मस्त झाले आप्पे!
अमि, माझेही आप्पे एका बाजूने फ्लॅट झाले, पण दडस नाही झाले. छान हलके झाले. रवा आणि ओट्स आंबट ताकातच भिजवले. कांदा, वाटली आलं-मिरची घातली, मीठ आणि हिंग घातला. लेकीला डब्यात दिले होते, घरी आल्यावर काही डब्याविषयी काही तक्रार ऐकायला लागली नाही म्हणजे डब्यातही चांगले राहिले होते Wink
एक वाटी रवा आणि दोन वाट्या ओट्स या प्रमाणात ३६ आप्पे झाले.

आज परत केले होते. पण घरातलं आलं संपल्याचा शोध लागल्यावर मखलाशी करून त्यात कांदा आणि सिमला मिरची चिरून घातली. आल्यालाही कळलं नाही की ओटसच्या आप्प्यांत आपण नव्हतो Proud
तोंडी लावायला तेलात कालवलेली एमटीआरची इडली/डोसा चटणी (लाल रंगाची. त्याला लाडाने गनपावडरही म्हणतात.)

ओट्स खायचे तर आहेत, पण त्यांची चव आपलीशी वाटायला हवी हे आखुडशिंगीबहुदुधी काम या आप्प्यांमुळे विनासायास होत असल्यानेच ही रेसिपी होट होतेय असं वाटतंय Happy नंदिनी, चर्चा, मंजूडी, ललि धन्स! मंजू फोटो मस्त!

आता नारळ-गूळ घालून ओट्सचे गोड आप्पे करावेत असं म्हणतेय मी. पण परत कृती लिहिणार नाही, डोन्ट वरी Proud

ओट्स आणि रव्याचे प्रमाण सेम ठेऊन त्यात केळं आणि गुळ घालून...दुधात भिजवून, थोडा सोडा, वेलची पावडर घालून बनवले...हे पण खुप छान बनले!

काल परत केले. या वेळेला २ चमचे दही आणि चिमुटभर सोडा टाकला. हे मस्त हलके झाले. ओव्हरनाईट करून ठेवलेले आज डब्यात पण छान लागले.
काल पहिले २-३ डोसे टाईप केलेले, ते आणखी भारी लागळे खर तर. त्यात तर कांदा, आलं काहीच न्हवतं, नुसतं मीठ. तरी एकदम सह्ही झाले. पण उरलेल्याचे आप्प्याच्या ग्ल्यामरनी आप्पेच केले :p पुढच्यावेळी सगळे डोसे, तो पर्यंत कुणी अप्याच्या कृती लिहू नका फक्त.

पुढच्यावेळी सगळे डोसे>> किती पेशन्स लागतो एकेक डोसा करायला! आणि एकाने भागत नाही!! म्हणून मला आप्पे अ‍ॅट्रॅक्टिव्ह वाटतात जास्त Proud पण पसंद अपनी अपनी Happy

पुनम , मस्त रेसीपी आहे. करून पहाते.
वरती तु साहित्य लिहिलयस तेच वापरून मी मुठीया करते.
ओट बारीक करून. त्यात रवा अ‍ॅड केला कि बारीक चिरुन मेथी घालायची. आल,जीर,लसून पेस्ट आणि थोडा ओवा. लिंबू पिळून मिठ घालून मळून घेते. आता त्याचे सिलिंडर शेप मधे मुटके करून वाफवून घेते.
वाफविले कि काप करून कडीपत्ता ,तीळ घालून फोडणी.
अतिशय छान लागते.
हेल्थ बग चावून कॉस्टको मधून प्रचंड मोठ ओटच पोतं आणलं कि असले पदार्थ करावेच लागतात. मला कस माहित ते अज्जिब्बात विचारू नका. Wink

>>तो पर्यंत कुणी अप्याच्या कृती लिहू नका फक्त.

कुणी म्हणजे तूच लिहिणार आहेस नं अमित? शिकरणाप्पेवाली Wink

हे आप्पे माझ्या लिस्टवर आहेत पण अजून मुहुर्त लागायचा आहे आणि आमच्याकडे पब्लिक ओटमिल सध्यातरी न कुरकुरता खाताहेत. असे सारखे आप्पे वर आले की करावे लागतात म्हणून मी सुलेखाताईंचे आप्पे केलेत त्याचे नंतर फोटो टाकेन Proud

मग हे सगळं मिश्रण कुकरच्य भाताच्या भांड्यात ओतून ढोकळ्यासारखं शिजवून घेतलं आणि वरून चुरचुरीत फोडणी दिली तर? Wink (कुरकुरीतपणा गायब असेल पण एक वार आणि काम फत्ते .. Wink :))

आहा! कित्ती दिवसांनी असा पाकृचा धागा बघितला! नाहीतर तेच ते आपले चर्चासत्र आणि तोंडाचे मात्र! Angry
बाकि एक शंका- हेच आप्पे गोड बनवता येतील का ओ? Wink

बिघडवणारी लोकं, पदार्थ ' येन केनप्रकारेण ' बिघडवू शकतात . Happy

पहिल्यान्दा केले तेन्व्हा चिवट झाले होते आणि फुलले ही नव्हते .

काल दूसरा प्रयत्न केला .
ओट्स , रवा , साखर सगळं मिक्सरमधून गरकवलं . एक चमचा दही , पाणी आणि थोडासा खायचा सोडा घातला.
साबांच्या सूचनेनुसार ,थोडसं तेल घातलं , चिवट होउ नये म्हणून .

अर्ध्या तासाने करायला घेतले. यावेळी टप्प फुलले , पण उलटायला गेले तेन्व्हा फुटायला लागले. एक्दम रवाळ झाले होते. खाताना कुस्करले आणि शिर्यासारखे चमच्यासारखे खाल्ले.
पण अजून हिम्मत हरले नाही आहे . चवीला भन्नाट होते , त्यामुळे आणखी एक प्रयत्न होणारच . Happy

Pages