ओट्सचे आप्पे

Submitted by पूनम on 12 January, 2016 - 04:38
oats aape
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे Proud त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!

साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.

तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)

बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! Happy मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.

क्रमवार पाककृती: 

१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.

oats appe.png

मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351

वाढणी/प्रमाण: 
२१
अधिक टिपा: 

कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरचा रेसिपी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे >>> Lol

पूनम, मस्त रेसिपी आहे.

माधवचे आप्पेही झकास दिसतायत. माधव, चटणी नाही का केली? अर्थात व्यवस्थित तिखट मीठ असेल तर नुसतेही छानच लागतात.

वा माधव खूप छान. मला डॅम खात्री होती भाजलेल्या रव्याचे आप्पे छान होतील. खूप सुंदर प्रकाश झिरपला आहे फोटोवर आणि आप्प्यावरची जाळी सछिद्र माठातल्या गार पाण्याची आठवण काढून गेली Happy

वा छान झालेत आप्पे, माधव यांचेपण.

रवा भाजून घेतला तरी फुगतात हे सिद्ध झालं.

मला ढोकळ्याचा जो अनुभव आहे तो मी लिहिला Happy .

काय ठरलं मग शेवटी? रवा भाजून घ्यायचा की न भाजता घ्यायचा की फ्रिजमधे जसा उपलब्ध असेल (जाडा, बारीक, मध्यम, शून्य नंबर, पावणेतीन नंबर, भाजून ठेवलेला, पुरचुंडी बांधून ठेवलेला किंवा एक पुरचुंडी बारीक रवा, एक पुरचुंडी मध्यम किंवा जो काही असेल तो) तसा घ्यायचा?
बरं, रव्याच्या ऐवजी फ्रिजमधे रव्याच्या जागी चुकून ठेवलेले वरीचे तांदूळ घातले तर चालेल का? (नाही चालणार! आप्पे उरपतणारच नाहीत!)

पावणेतीन नंबर>> Rofl
मयेकरांनी सांगितलंच आहे ना. सर्व तर्‍हेचे आणि नंबरांचे आणि स्थितीचे रवे वापरून करा आणि इकडे रिझल्ट कळवा. मीही वाट बघतेय कोण कधी कसे करताय्त हे आप्पे! Proud

अरे, वर ओट्स कुठले असा एक प्रश्न आहे. त्याचे काय झाले?>> हां ते राहिलंच. क्वेकर या ब्रॅन्डचे क्विक कुकिंग ओट्स! Wink हे सोडून ओट्सचे अन्य कोणतेही प्रकार मला माहित नाहीत, त्यांची नावं माहित नाहीत, त्यांचे गुणधर्म माहित नाहीत वा वैशिष्ट्यही. दुसर्‍या ब्रॅन्डचे अथवा दुसर्‍या प्रकारचे ओट्स घेतले तर काय होईल? मला खरंच माहित नाही! मी एकच उत्तर देऊ शकते- करून बघा आणि सांगा! सर्वांनाच शहाणं करा! Happy

प्राचे नालायक! Lol
माझं उत्तर- तुला पाहिजे तसं करून बघ Proud

पाणी कोणतं? हा प्रश्न नाही विचारलास? साधं? फिल्टरचं? मिनरल? बोअरचं? बोअर+कॉर्पोरेशन मिक्स (काय प्रमाणात)? विहीरीचं? उकळलेलं? उकळून गार केलेलं? फ्रीजमधलं? निम्मं फ्रीज, निम्मं साधं? (उलट केलं तर?) कोमट? (किती कोमट? आमच्याकडे गरमला कोमट म्हणतात, खूप गरमला गरम म्हणून विचारलं!) स्वच्छ? थोडंसं गढूळ?

वर्षा Proud मिरचीचे पाण्यापेक्षा जास्त प्रकार आहेत. तुला आवडते ती घे! तेच मीठाबाबत. चवीप्रमाणे घे हो पण.

अवनी, किस द जिंजर इफ यु लाईक इट, बट ऍज इज रिटन इन द रेसिपी, चेचिंग विल बी बेस्ट!

हैला!
माहितीचा स्रोत संदिग्ध लिहिला आहे हे प्रतिसादात लिहिलं नाही.
वहिनी कुठली वाहिनी बघते ते विचारलं नाही.
वहिनी(वर)चं प्रेम!

Pages