
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
मी पण काल केले ओटाप्पे आणि ती
मी पण काल केले ओटाप्पे आणि ती चटणी.
रंग मृणच्या आप्यांसारखा आला नाही पण नॉट बॅड इदर.
चव छान होती. कोथिंबीर विसरले
ओटाप्पे!
ओटाप्पे!
ही नविन सोपी, इंटरेस्टींग आणि
ही नविन सोपी, इंटरेस्टींग आणि पॉप्युलर रेसिपी खुणावत आहे दिमा चटणी सकट ..
>> ओटाप्पे
अमेरिकेत (बे एरियात) कुठे मिळतं आप्पेपात्र? आप्पेपात्राला काही पर्याय असू शकेल का? (आप्पे खाऊन खूप वर्षं झाली .. आई जशी करायची ते मस्त लागायचे एकदम .. पण मेहेनत फार आणि यिल्ड स्लो आणि कमी म्हणून मी काय फंदात पडले नव्हते आतापर्यंत ..)
वरचे सर्व फोटो फारच टेम्प्टींग दिसत आहेत ..
सशल, भरपूर पर्याय
सशल, भरपूर पर्याय आहेत:
Babycakes Mini Cake Pop Maker : http://www.amazon.com/Babycakes-Mini-Cake-Pop-Maker/dp/B00HEXQGFE
ह्यात पुन्हा बरेच प्रकार आहेत.
कास्ट आयर्न्चं हवं असेल तरः
Danish Puff Pancake Cast Iron Frying Pan with Pinewood Tongs
थँक्स मृ ..
थँक्स मृ ..
अॅमॅझॉन वर हेही
अॅमॅझॉन वर हेही मिळेल
http://www.amazon.com/Norpro-3113-Cast-Aluminum-Aebleskiver-Stuffed-Panc...
काल आप्पे केले. चव मस्त पण
काल आप्पे केले. चव मस्त पण रंग पांढुरका/ फिक्कट आला. नेहेमीचे आप्पे फुगतात तसे मस्त फुगलेही नाहीत. थंड झाल्यावर दडसपण झाले. माकाचु?
रेसिपीत दिलेलं तसं सगळं केलं (+ कांदा घातला) आणि फक्त १० मिनिटं बाजूला ठेवा स्टेपला जवळ जवळ तासभर दुर्लक्षित ठेवलं.
नेक्स्ट टाईम थोडा सोडा/ दही घालून करू का?
पूनम, दीमा चटणीची लिंक वर देता आली तर शोधायला आणखी बरं पडेल.
पुनम, ईथले प्रतिसाद वाचून न
पुनम, ईथले प्रतिसाद वाचून न रहावून काल संध्याकाळी केले. खरच खुप चविष्ट झाले. मी कांदा, लसूण, मिरच्या, दही आणि थोडा सोडाही घातला होता. घरातल्या नो अप्पे फॅन लोकांनी पण आवडीने खाल्ले. थॅक्स रेसिपी शेअर केल्याबद्दल
माकाचु: आप्पे फुगले नाहीत,
माकाचु:
आप्पे फुगले नाहीत, दडस राहिले. चव छान आली पण. काय चुकले?
दिमा, चटणी मस्त झाली होती. मी डाळी प्रमाण दुप्पट घेतले.
नेहेमीचे आप्पे फुगतात तसे
नेहेमीचे आप्पे फुगतात तसे मस्त फुगलेही नाहीत. थंड झाल्यावर दडसपण झाले. माकाचु? >>>> +1000000000
फुगले नाहीत हे एक वेळ ओके
फुगले नाहीत हे एक वेळ ओके आहे, कारण त्यात सोडा वगैरे घालत नाहीयोत आपण, पण दडस होता कामा नयेत!
रवा निम्म्यानेच घातला ना? मला वाटतं फुगावेत म्हणून अर्धा चमचा सोडा किंवा आंबट ताक घालून पहा. (मी वर रेसिपीतही ही सावधगिरीची सूचना लिहिते) मात्र स्टँडिंग टाईम १० मिनिटं पुरेसा आहे. ओट्स फुगतात भरभर. तासभर नको ठेवायला 
दीमांनी चटणी वेगळ्या धाग्यावर लिहिली आहे. त्याची लिंकही देते वर रेसिपीमध्ये.
आप्पे हलके होणे किंवा दडस
आप्पे हलके होणे किंवा दडस होणे यासाठी तुम्ही राहताय तिथली हवाही कारणीभूत असावी.
पूनम, मस्त आणि झटपट रेसिपी.
पूनम, मस्त आणि झटपट रेसिपी. थँक्यु

मी फक्त दही घातलं थोडं भिजवताना आणि रवा भाजलेलाच होता तो घातला.
अप्पे फार फुगले नाहीत पण दडस नाही लागले, चवीला छान होते.
आवडीनुसार कमीअधीक खरपूस अप्पे आणि बरोबर दीमांनी दिलेल्या रेसिपीने चटणी आणि सांबार
आप्पे इडलीच्या भांड्यात
आप्पे इडलीच्या भांड्यात बनविता येतात का?
कुणी बनविले आहेत का?
येतील ना, फक्त त्यांना इडल्या
येतील ना, फक्त त्यांना इडल्या म्हणावे लागेल आणि आर्द्रता जास्त असेल
माझ्याघरी आप्पेपात्र नाही
माझ्याघरी आप्पेपात्र नाही म्हणून विचारले.
करून बघतो आता इडलीपात्रात सुट्टी लागल्यावर.
संशोधक, लोखंडाची पळी असेल तर
संशोधक, लोखंडाची पळी असेल तर आप्पे आणि इडलीच्या मधल्या साईजचा इडलाप्पा करता येईल तुम्हाला. फक्त टुकुटुकू करत बसावं लागेल.
मीपु! सही फोटो! इडलीपात्रात
मीपु! सही फोटो!
इडलीपात्रात आप्पे वाफवले जातील. त्याला कुरकुरीतपणा नाही येणार. मग त्यांची मजा नाही. (अनलेस तुम्ही इडलीचा एकेक स्टॅन्ड सुटा करून थेट गॅसच्या फ्लेमवरच ठेवणार असाल तर! :दिवा:)
पूनम, तासभर ठेवण्याचा उद्देश
पूनम, तासभर ठेवण्याचा उद्देश न्हवता, पण चटणी करण्यात एकतास गेला मी नाही अप्पा केला झालं. रवा निम्माच होता. सोडा/ दही घालून बघतो पुढच्यावेळी.
पण तसं असेल तर, तुमच्या कडचं आर्द्रता, तापमान, समुद्रसपाटी पासून उंची (अरे पण ती बदलता नाही येणार, तर ती जाउदे) आणि काय काय असेल ते सांगा हलके घेशिलच. 
मंजूडी, आमच्या हवेत 'ओलावा' आहे यु नो, तेव्हा हवेला बोलायचं कामच नाही.
मी अजून ओट्साप्पे केले
मी अजून ओट्साप्पे केले नाहीयेत त्यामुळे आमची हवा हलके घ्यायची की जड याबद्दलची टिप्पणी राखीव ठेवण्यात येत आहे
पुनमचे आप्पे आणि दिमांची चटणी
पुनमचे आप्पे आणि दिमांची चटणी केली

दोन्ही एकदम मस्त !!!!!
आभारी आहे
स्वगतः हे दोघानी पण हलके नाही घेतले तर माझी चटणी होणार हे नक्की !
धनवन्ती, नो प्रॉब्लेम!
धनवन्ती, नो प्रॉब्लेम!
नेहमीचे ओट्स (क्वेकरचे) न
नेहमीचे ओट्स (क्वेकरचे) न मिळाल्यामुळे स्टोअर-ब्रॅण्ड ओट्स आणले, आणि यावेळी आप्पे टमटमीत फुगले!
इंटरेस्टिंग!
ओटाप्पे केले! उत्तम झाले.
ओटाप्पे केले! उत्तम झाले. दिमा पद्धतीने चटणी केली ,ती विशेष आवडली नाही कोणाला . पुढच्या वेळी variation टोमॅटो वापरेन चिंचे ऐवजी . सांबार केले होते. पुनम ची कृती तंतोतंत पाळली .ओट्स पतंजलीचे होते. फोटो टाकण्याचा प्रयत्न करते. छान फुगले होते, जाळी पण छान पडली . Otherwise ओट्स खायला फारच खळखळ असते . पण असे केले तर रोज खाईन असे नवरोबा म्हणाला .
आप्पे पात्र नसेल तर सरळ
आप्पे पात्र नसेल तर सरळ त्याचे 'उत्तपे' घाला. हाकानाका. मी उत्तपेच केले होते. आप्प्यांपेक्षा कमी वेळेत झाले. भिजवताना इडली पीठापेक्षा थोडंस जास्त सैल ठेवलं तर दडस होणार नाहीत.
माबोवर आप्प्याची नविन रेसिपि
माबोवर आप्प्याची नविन रेसिपि ट्राय नाहि केली तर फाउल होइल... त्यात आप्पे अती आवडते.
नेहमिच्या आप्प्यईतके खमन्ग नाही झाले पण तरी आवडले आहेत.
दिमाच्या रेसिपीने चटणि ही केली.
सोमवारी मी देखिल केले होते.
सोमवारी मी देखिल केले होते. आप्पे आणि आप्प्यांची चटणी देखिल. मस्त झाले.
आप्पे एका बाजुने फ्लॅट झाले
आप्पे एका बाजुने फ्लॅट झाले तर चालते का? मला वाटायचं की दोन्ही बाजुंनी फुगले पाहिजेत.
ओट्स चे आप्प्यांनी
ओट्स चे आप्प्यांनी मायबोलीकरांना वेड लावले अक्षरशः !!!
परवा बायकोने पुन्हा केलेले अर्थात मला नाही खाता आले म्हणून व्हाट्स अप फोटो वर समाधान मानले!
I used broken wheat instead
I used broken wheat instead of regular rava. It turned out nicely. Soaked broken wheat overnight.
Pages