चिकाच्या वड्या (आणि खरवस)
आता वड्या आणि खरवस ही एकच पाककृती असू शकते असं कुणाला वाटू शकतं. पण तसं नाही. वड्या वेगळ्या आणि खरवस वेगळा. हो म्हणजे खरवसाच्या वड्या असूच शकतात. पण (चिकाच्या) वड्या म्हणजे खरवस नव्हे.
असो.......नमनाला घडाभर तेल!
गायीचा चीकः (ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे त्यांनी इकडे काणाडोळा करावा)
गाय व्यायल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हणतात.
छोट्या गावांमधे...... गाय व्यायल्यानंतर चीक घरोघर परिचितांमधे वाटण्याची पद्धत आहे. तसा आम्हालाही काल साधारणपणे १ लीटर चीक मिळाला. तर पहिला विचार........अरे बाप रे! आता या इतक्या चिकाचं करायचं काय?
म्हणजे वयानुसार आता ती पूर्वीची खच्चून खाण्याची कपॅसिटी नाही ना राहिली!
अगदी पूर्वी ...म्हणजे मुलं लहान होती आणि घरातच होती तेव्हा छंद म्हणून आम्ही थोडीफार शेती सुद्धा करत असू. तेव्हा शेतावर एक गाय ठेवली होती. तेव्हा मुलं भरपूर दूध प्यायली. फ्रीज दही, दूध, लोण्याने भरलेला असायचा!
आणि दुधाचं काय नाही केलं ते विचारा!
श्रीखंड, बासुंदी, पनीर............... आता नको नको वाटतात ते विचार! आज नुसती पदार्थांची नावं घेतली तरी पोट भरल्याचं फीलिंग येतं!
तर खूपच विषयांतर झालंय! पण इथे लिहिल्याशिवाय राहावलं नाही. कारण नुसती वड्यांची रेसिपी लिहिणं म्हणजे काही विशेष नाही ना!
तर हा चीक जेव्हा घरी येतो तेव्हा हा चीक गाय व्यायल्यानंतर कितव्या दिवशीचा आहे हे जाणून घेणं ही उत्तम खरवस करण्याची पहिली पायरी आहे.
कारण जर पहिल्या दिवशीचा चीक असेल तर तो खूपच दाट असतो. आणि खरवस करताना चीक आणि दूध यांचं प्रमाण जेवढ्यास तेवढं ठेवावं लागतं. तर खरवस मऊ होतो. जर दूध कमी पडल तर रबरासारखा होतो.
असो.............तर आधी चिकाच्या वड्यांची रेसिपी पाहू:
साहित्यः चीक, साखर, ड्राय फ्रूट्स चुरा(थंडीच्या सीझनमधे माझ्या फ्रीजमधे बर्याच वेळा काजू बदाम आक्रोड याची भरड असते),. ताटाला लावायला थोडं तूप. वेलदोडा पूड
कृती: छोट्या कुकरच्या एका भांड्यात मावेल एवढा चीक भांड्यात घालून कुकरला भातासारखा शिजवून घेणे.
म्हणजे १ शिट्टी झाल्यावर ३/४ मिनिटांनी गॅस बंद करणे. प्रेशर गेल्यावर चिकाचे भांडे बाहेर काढून तेही थंड झाल्यावर सुरीने हा शिजलेला चीक अलगद सोडवून घ्यावा.


हा शिजलेला चीक अगदी रबरासारखा असेल. कारण यात आपण दूध घातलेले नाही.
मग हा गोळा खिसणीवर खिसावा.
नंतर कढईत जेवढा खीस असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त साखर घेऊन नारळाच्या वड्यांप्रमाणे हे मिश्रण शिजवावे.

बुडबुडे यायला लागले व मिश्रण थोडे आळायला लागले की यात थोडा ड्राय फ़्रूट्सचा चुरा घालावा.
साधारण पाव वाटी. वड्या खुटखुटीत होण्यासाठी गॅस बंद करताना या मिश्रणात दोन चमचे पिठी साखर घालावी.
वेलदोडा पावडरही घालावी.
तूप लावून ठेवलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे.


थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
खरवसः
साहित्यः दूध, चीक, केशर, गूळ, वेलदोडा.
जेवढा चीक असेल तेवढेच दूध घालून गूळ केशर वेलदोडा पावडर घालून कुकरमधून शिट्ट्या काढून शिजवणे.
खरवस थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
हा शिजवलेला तयार खरवस


गोरेगाव/जोगेश्वरीच्या
गोरेगाव/जोगेश्वरीच्या गोठ्यांमध्ये मिळेल की चीक.
मानुषी ताई काय सुरेख लिहीतेस
मानुषी ताई काय सुरेख लिहीतेस ग तु..
फोटो तर त्या हुन जबरी...
मागेच गवळी राहातो, चीक मीळाला की नक्की करणार, नवर्याच्या अगदी आवडीच्या आहेत या वड्या.:)
सासु बाई खुप छान करतात..
तुझी पा. कृ. खुपच सोपी वाटते आहे.. धन्स.
अश्विनी बघते
अश्विनी बघते
क्या बात है!!! एकच
क्या बात है!!! एकच नंबर!!!
अमितव +१००००
वेल ट्राय कर आणि लिही
वेल ट्राय कर आणि लिही इथे.
मेधावि ....खरवस नाही टिकणार बाहेर. पण पहिल्या पद्धतीने चिकाच्या वड्या भर्पूर टिकतात.
सायु, जिप्सी धन्यवाद रे!
काय फोटो आहेत मानुषीताई.
काय फोटो आहेत मानुषीताई. ऑस्सम.
बरं झालं इतकं सविस्तर लिहीलेत. या पारंपारिक प्रकारांचे असेच सचित्र आणि सोपे डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे.
ते पाकातल्या चिरोट्यांचेही लिहा प्लीज प्लीज. तुम्ही लिहीले की करुन पाहणार.
धन्यवाद रैना. हो ...ते
धन्यवाद रैना.
हो ...ते चिरोट्याचं आहे लक्षात. बघू कधी जमतंय ते! पण नक्की.
भारीच मस्त फोटो खरवस माहित
भारीच
मस्त फोटो
खरवस माहित होता
वड्या आजच पाहिल्या
Pages