चिकाच्या वड्या (आणि खरवस)
आता वड्या आणि खरवस ही एकच पाककृती असू शकते असं कुणाला वाटू शकतं. पण तसं नाही. वड्या वेगळ्या आणि खरवस वेगळा. हो म्हणजे खरवसाच्या वड्या असूच शकतात. पण (चिकाच्या) वड्या म्हणजे खरवस नव्हे.
असो.......नमनाला घडाभर तेल!
गायीचा चीकः (ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे त्यांनी इकडे काणाडोळा करावा)
गाय व्यायल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हणतात.
छोट्या गावांमधे...... गाय व्यायल्यानंतर चीक घरोघर परिचितांमधे वाटण्याची पद्धत आहे. तसा आम्हालाही काल साधारणपणे १ लीटर चीक मिळाला. तर पहिला विचार........अरे बाप रे! आता या इतक्या चिकाचं करायचं काय?
म्हणजे वयानुसार आता ती पूर्वीची खच्चून खाण्याची कपॅसिटी नाही ना राहिली!
अगदी पूर्वी ...म्हणजे मुलं लहान होती आणि घरातच होती तेव्हा छंद म्हणून आम्ही थोडीफार शेती सुद्धा करत असू. तेव्हा शेतावर एक गाय ठेवली होती. तेव्हा मुलं भरपूर दूध प्यायली. फ्रीज दही, दूध, लोण्याने भरलेला असायचा!
आणि दुधाचं काय नाही केलं ते विचारा!
श्रीखंड, बासुंदी, पनीर............... आता नको नको वाटतात ते विचार! आज नुसती पदार्थांची नावं घेतली तरी पोट भरल्याचं फीलिंग येतं!
तर खूपच विषयांतर झालंय! पण इथे लिहिल्याशिवाय राहावलं नाही. कारण नुसती वड्यांची रेसिपी लिहिणं म्हणजे काही विशेष नाही ना!
तर हा चीक जेव्हा घरी येतो तेव्हा हा चीक गाय व्यायल्यानंतर कितव्या दिवशीचा आहे हे जाणून घेणं ही उत्तम खरवस करण्याची पहिली पायरी आहे.
कारण जर पहिल्या दिवशीचा चीक असेल तर तो खूपच दाट असतो. आणि खरवस करताना चीक आणि दूध यांचं प्रमाण जेवढ्यास तेवढं ठेवावं लागतं. तर खरवस मऊ होतो. जर दूध कमी पडल तर रबरासारखा होतो.
असो.............तर आधी चिकाच्या वड्यांची रेसिपी पाहू:
साहित्यः चीक, साखर, ड्राय फ्रूट्स चुरा(थंडीच्या सीझनमधे माझ्या फ्रीजमधे बर्याच वेळा काजू बदाम आक्रोड याची भरड असते),. ताटाला लावायला थोडं तूप. वेलदोडा पूड
कृती: छोट्या कुकरच्या एका भांड्यात मावेल एवढा चीक भांड्यात घालून कुकरला भातासारखा शिजवून घेणे.
म्हणजे १ शिट्टी झाल्यावर ३/४ मिनिटांनी गॅस बंद करणे. प्रेशर गेल्यावर चिकाचे भांडे बाहेर काढून तेही थंड झाल्यावर सुरीने हा शिजलेला चीक अलगद सोडवून घ्यावा.


हा शिजलेला चीक अगदी रबरासारखा असेल. कारण यात आपण दूध घातलेले नाही.
मग हा गोळा खिसणीवर खिसावा.
नंतर कढईत जेवढा खीस असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त साखर घेऊन नारळाच्या वड्यांप्रमाणे हे मिश्रण शिजवावे.

बुडबुडे यायला लागले व मिश्रण थोडे आळायला लागले की यात थोडा ड्राय फ़्रूट्सचा चुरा घालावा.
साधारण पाव वाटी. वड्या खुटखुटीत होण्यासाठी गॅस बंद करताना या मिश्रणात दोन चमचे पिठी साखर घालावी.
वेलदोडा पावडरही घालावी.
तूप लावून ठेवलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे.


थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
खरवसः
साहित्यः दूध, चीक, केशर, गूळ, वेलदोडा.
जेवढा चीक असेल तेवढेच दूध घालून गूळ केशर वेलदोडा पावडर घालून कुकरमधून शिट्ट्या काढून शिजवणे.
खरवस थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
हा शिजवलेला तयार खरवस


नलिनी, मस्त आठवण.. मुद्दाम
नलिनी, मस्त आठवण..
मुद्दाम सांगावेसे वाटते कि केनयात गायी भरपूर आहेत आणि दूधाचा धंदा जोमात आहे तरी ते लोक ( मसाई ) कधीही चीक विकत नाहीत. तो केवळ तिच्या वासरांसाठीच असतो यावर त्यांची श्रद्धा आहे.
ते लोक कधीही कच्चे फळ तोडत नाहीत. पक्ष्यांनी चोच मारल्यावरच ते तोडतात.. !
डोंबिवलीला आमच्याकडे नाही
डोंबिवलीला आमच्याकडे नाही यायच्या कोणी बाई विकायला
. अरेरे.
आत्ता आई राहते त्या एरियात पूर्वी गोठा होता, तिथे ओळखीचे राहायचे, त्या भैय्याकडे चिक असला की त्या ताई आम्हाला कळवायच्या मग आम्ही यायचो विकत घ्यायला. तेव्हा आम्ही जरा लांब राहायचो.
त्यांच्या एक पिशवीत केशर आणि
त्यांच्या एक पिशवीत केशर आणि दुसरीत वेलची फ्लेवरचे डबे असायचे. >> हायला येस... बरोबर
सुंदर! कधीकाळी खाल्लेल्या
सुंदर! कधीकाळी खाल्लेल्या खरवसाची आठवण झाली. वडया मात्र कधी खाल्ल्या नाहीत.
काय कातिल फोटो आहेत. अहाहा एक
काय कातिल फोटो आहेत. अहाहा एक नंबर.
बरीच वर्ष झालित चीकाच्या वड्या आणि खरवस खाऊन. इथे चितळेवाले काय देईनात त्यामुळे बनवुन खाण्याची शक्यता कमीच आहे. कुणी करत असेल तर मला बोलवा येते मी खायला
घ्या. अजून गरम आहे.
घ्या. अजून गरम आहे.
दिमा जिओ
दिमा जिओ
फोटो आहेत की चेष्टा! अप्रतिम!
फोटो आहेत की चेष्टा! अप्रतिम!
हि पा. कृ. बघून आज्जीची आठवण
हि पा. कृ. बघून आज्जीची आठवण आली. लहानपणी गावी दुध दुभत बरच होत. पण आता आज्जी हि नाही आणि दुध- दुभत हि नाही.
भारी दिसतय.. डोळ्यात बदाम
भारी दिसतय.. डोळ्यात बदाम असणारी स्मायली पाहिजे होती यार..
छळ!!
छळ!!
गाय व्यायल्यानंतर लगेच खरवस
गाय व्यायल्यानंतर लगेच खरवस मिळत का?
आई ग्गं!!! जीव खरवस् खरवस हो
आई ग्गं!!! जीव खरवस् खरवस हो गया. काय तोंपासु फोटो आहेत!!!
प्रथम सर्वांना नववर्षाच्या
प्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
मी चिऊ, अनुश्री, देवकी धन्यवाद!
स्वाती आंबोळे ............. भावना पोचल्या!
ममो..........आणि सर्वांनाच धन्यवाद. पण फोटो चं सगळं श्रेय आयपॅड्च्या कॅमेर्याला! तो जबर्या आहे!
अन्जू .......चीक मिळाला तर पहिल्या वड्याही करून बघ. सोप्या आहेत.
मृण्मयी.........ते लिहायचं राहिलं. नववर्ष सेलेब्रेशनसाठी ३/४ दिवस बाहेर होतो. त्या आधी लिखाण व फोटो इथे डकवायचं होतं. पण बघ काळानुसार बदलः या वेळचा चीक प्लॅस्टिकच्या बाटलीतून(पाण्याच्या) आला.
आता यात धान्य कसं देणार? तरी मी वेगळ्या प्लॅस्टिक कॅरी बॅगेतून ज्वारी दिली.
अमितव.......... >>>>>>>>>आम्हाला दरवेळी वाटायचं आईने २-४ डबे तरी घ्यावे.>>> अगदी अगदी! खरवस ही चीजच तशी आहे. माझी पुतणी शिक्षणासाठी बाहेर असते. आम्हा जावाजावांचा घास तिच्यासाठी अडकलाच. मग आम्ही थोडा खरवस तिच्या मैत्रिणीबरोबर हवाबंद डब्यातून पाठवलाच. तोपर्यन्त(२ दिवस) फ्रिजमधे ठेवला. वड्यांचा काय प्रॉब नाय! त्या टिकतातच.
झम्पी....... >>>>>>>काय नशीब आहे हो तुमचे..>>>>> छोट्या गावात रहाण्याचे फायदे! धन्यवाद!
सायो>>>>>>>> नट जसा नाटकात ऐन वेळेस काही तरी मनाचे संवाद (अॅडिशन) टाकतो तसं अगदी पाक उकळल्यावर हे ड्राय फ्रूटचं नाटक आठवलं. आणि घातले!
वर्षू ............<<<<<<<<<< अगं पहिला फोटो ...दूध न घालता शिजवलेल्या रबरी चिकाचा आहे.
खरवसाला बेसिक वर्जन म्हणत असशील तर शेवटचे ३ फोटो आहेत बघ.
प्राजक्तमा, मामी, भरतमयेकर, अश्विनीके, स्रूष्टी, क्रिश्नन्त, मन्जू डी, मी नताशा सर्वांंना धन्यवाद!
असो....धन्यवाद!
रश्मी>>>>>>>>>> एक गोड गोड उम्मा!>>>>>>>>> अग्गोबाई!
साधना>>>>>अन्याय आहे हो बाई.....>>>>>>>
गजानन>>>>>>>> वाळवण्याची आयड्या भारीये! आणि नासकवणी .....माझी आज्जी ....दूध नासतयसं वाटलं तर ....गूळ, वेलदोडा इ. घालून करायची .............त्याला आम्ही नासकवणी म्हणतो. मला फारशी आवडायची नाही
अगो>>>>>>>>>>>>>>> थुत्तरफोड फोटो आहे शेवटचा>>>>>>> खरंय गं बै! तरीही त्या शब्दाला हसलेच गं!
जिज्ञासा, नरेश्माने, मॅगी धन्यवाद!
दिनेश ..........गुलाबाच्या फुलांची कसली सुंदर कल्पना आहे. करून बघायला हवी!
अनघा, पूनम, शब्दाली
अनघा, पूनम, शब्दाली धन्यवाद!
कांदेपोहे>>>>>>>>>>(लाळेरे लावलेला बाहुला)
अशा धाग्यांना बंदी करावी अशी लाडीक तक्रार करावी अॅडमीनकडे. >>>>>. भापो!
पण लाळेरं लावलेला बाहुला (वय ८ महिने संपूर्ण) सध्या घरातच आहे त्यामुळे अगदी डोळ्यापुढे आला
प्रज्ञा , शशांक, इन्ना सर्वांना ठांकू!
नलिनी .....खूप छान पोस्ट. पहिलारु शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि आवडला.
ऋन्मेष, अनघा, धनुडी सर्वांना धन्यवाद!
जेम्स बॉन्ड>>>>>>>>>:खोखो:
निल्सन>>>>>>>थोडं थोडं माझ्या नावाने काढा नाहीतर पोटात दुखलं तर मी जबाबदार नाही हं >> आहे अजून . पुतणीसाठी ठेवलाय फ्रिजात. त्यातला तुला देईन! :स्मितः
वर्षा>>>>>>>>>आमची आई या वड्या करण्यासाठी जेव्हा चीक शिजवतो तेव्हा त्यात थोडे ( १/ ४ ) साधे दुध टाकते. त्यामुळे वडि चिवट ( रबरी ) लागत नाही.>>>>>>>
अगं पहिले रेसिपी दूध न घालता करण्याचीच अहे. दुसरी जी प्रॉपर खरवसाची आहे त्यात तर जेवढ्यास तेवढं दूध लागतंच. तेव्हा लुसलुशीत खरवस बनतो.
माधव>>>>>>>> आठवणीने व्याकुळ होऊन आता मिळणारा नकली पदार्थ खाल्लाच जातो >>>>. अगदी अगदी भापो.
रायगड , शुभांगी पद्मावती, मृणाल१, तेजस्विनी, आशूडी, स्वरा, टिना प्राची धन्यवाद!
शुगोल >>>>>>> "लागी करेजवा कटार" >>>>>>> खरंय! धन्यवाद!
पराग>>>>>>>>>त्यांच्या एक पिशवीत केशर आणि दुसरीत वेलची फ्लेवरचे डबे असायचे.>>>>>> हे भारीये!!
बस्कू>>>>> नगरला येशील तेव्हा ट्राय कर, मिळेलही कदाचित!
बी>>>>>>>> गाय व्यायल्यानंतर पहिल्या दिवशी जे दूध काढतात त्याला चीक म्हणतात. हा चीक खूप पौष्टिक व दाट असतो. याचा खरवस बनतो. दुसर्या तिसर्या दिवशीचा चीक कम्पॅरिटिव्हली पातळ असतो. त्यात दूध अगदी कमी घालायला लागते ......खरवस करताना.
अग्गोबाई.........दीमां नी केला की लगेचच खरवस. चीक मिळालेला दिसतोय! कौतुक आहे हं दीमांचं!
मानुषी, मस्त - पाकृ, लिखाण व
मानुषी, मस्त - पाकृ, लिखाण व फोटु ! आमच्याकडेही अश्याच प्रकारे सुकामेवा ऐवजी दूध घालून करतात ... माझ्या बहिणीने ई टीव्हीवरच्या कार्यक्रमात ह्याच वड्या दाखवल्या होत्या. ह्या खूप दिवस टिकतात .
आहाहा! खरवस. माझा अत्यंत
आहाहा! खरवस. माझा अत्यंत आवडता पदार्थ.
आणि फोटो कसले जबरी आलेत मानुषी ताई.
फक्त मला ते वेलदोडे नाही आवडत त्यात घालायला.
बाकी फ्लेवर्स वगैरे घालून करता येतो का खरवस? चॉकोलेट वगैरे?
धन्यवाद मानुषीताई. आमच्याकडे
धन्यवाद मानुषीताई.
आमच्याकडे खूप बालपणी घरी खरवस येत असे तेंव्हा आई त्यात साखर घालून ते उकळत ठेवत असे आणि मग त्यात घट्ट गोळे तयार होत असे. मी असेच खरवस खाल्ले आहे. वर जो जाळीदार फोटो आहे तो बघून खरवसबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे. बहिणीच्या गावी भरपुर मिळत. आता करुन पाहीन.
मी आताच गावी गेलो तेंव्ह ह्या
मी आताच गावी गेलो तेंव्ह ह्या दोन्ही प्रकारच्या वड्या खाल्या!! नुकतीच घरची गाय व्यायलेली!
मस्त!!
आईच्या हातची वड्यांची चव अजुनच गोड!!
फोटो लय भारी ग.
फोटो लय भारी ग. जबरदस्त.
चौथ्या पाचव्या दिवसानंतर खरवस केले की गुठळ्या होतात.
लहानपणी खुपदा करायचो आम्ही. आता हे दूधच मिळत नाही.
बरीच मोठी २ उत्तरं झाली. पण
बरीच मोठी २ उत्तरं झाली. पण मधे मधे "लाइटी"जात होत्या. त्यामुळे काही राहून गेलेलं:
मोकिमी: जाऊ दे ना! कधी तरी डाएटचा विचार सोडून द्यावा, भरपूर आडवा हात मारावा नतर ४ राउन्ड जास्त मारावे. हाकानाका!
मी आज खाल्ला . ) बहिणीने
मी आज खाल्ला . )

बहिणीने पाठवला होता .
मंजूताई कृष्णा जागू
मंजूताई कृष्णा जागू धन्यवाद
माझी आई आणखी एका प्रकारी चिकाच्या वड्या करायची.(खरवस नव्हे)
त्या अश्या: साखरेचा पाक करायचा. उकळी आली की त्यात चिकाची अगदी वरून एक बारीक आणि सतत अशी धार सोडायची. म्हणजे एकीकडे चीक पाकात ओतत रहायचं आणि एकीकडे ढवळत रहायचं आणि जरा आळंत आलं की मिश्रण ताटात थापायचं. यात चीक खिसून घेणे इ. भानगड नाही. पण तंत्र जमलं पाहिजे. त्या मानाने खिसाच्या वड्या सोप्या.
दक्स>>>>>>>>तू वेलदोड्याऐवजी जायफळ व केशर घालून बघ ना.
अगं पहिले रेसिपी दूध न घालता
अगं पहिले रेसिपी दूध न घालता करण्याचीच अहे. दुसरी जी प्रॉपर खरवसाची आहे त्यात तर जेवढ्यास तेवढं दूध लागतंच. तेव्हा लुसलुशीत खरवस बनतो. >> ताई , पहिल्या वड्याच्या रेसिपीतही थोडे साधे दुध घालते असे म्हणाय्चे होते मला
ओह...असं होय? सॉरी हं वर्षा
ओह...असं होय? सॉरी हं वर्षा मला नीट कळलं नव्हतं.
कसले सही फोटो आहेत. कित्ती
कसले सही फोटो आहेत. कित्ती दिवसांत खरवस खाल्लेला नाही. जीव जळला एकदम हे फोटो बघून... आता पुण्याला गेलं की खाणं मस्टच आहे
दीमांचा खरवस पण मस्त दिसतोय. (सकाळी फोटो हुकला तो इथे मिळाला बघायला...)
वरदा , इन्ना धन्यवाद!
वरदा , इन्ना धन्यवाद!
खरवस पहायला पुन्हा पुन्हा
खरवस पहायला पुन्हा पुन्हा याव वाटते इथे. चिकाच्या वड्या खूप हाणण्याची शेवटची आठवण सहावी - सातवीतली आहे, मी आणि बहिण वारंवार फळताळातला डबा उघडून एकेक वडी खायचो.
गेली ३० वर्षे खरवस सुध्दा खाल्ला नाही, वडीची तर बातच नाही. गाय नैतर म्हैस नोकरी संपली की घीन म्हनते
मला खर्वस इतका आवडतो की हा
मला खर्वस इतका आवडतो की हा सगळा खरवस मी एका वेळी एकटी खाऊन टाकेन, (मग मात्र काय होईल माहित नाही.)
बालदीभर लाळ गळाली हे फोटो पाहून, मुंबईत कुठे मिळतोय चीक आणि काय नि काय.. आम्ही फोटो वरच समाधान मानणार आता, (काय दिवस आलेत)
हा बाहेर किती दिवस टिकेल? (
हा बाहेर किती दिवस टिकेल? ( पार्सल पाठवायचे झाल्यास)
Pages