ओह डाऊनटन! (अर्थात Downton Abbey memories)

Submitted by जिज्ञासा on 24 December, 2015 - 10:01

Spoiler Alert: जर मालिका पाहीली नसेल किंवा पहायची असेल तर ह्या धाग्यातील पोस्ट्स कदाचित रसभंग करणाऱ्या असू शकतील!

गेली सहा वर्षे British TV वर चालू असलेल्या Downton Abbey ह्या मालिकेचा शेवटचा भाग उद्या २५ तारखेला येईल. एकूण ६ सिझन चालू असलेली ही मालिका जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Downton_Abbey). एखाद्या गोष्टीची भट्टी जमून येणं म्हणजे काय हे ह्या मालिकेकडे बघितलं की समजतं. ह्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट आहेत पण हिच्या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे कथा-पटकथा-संवादांचा. ह्या मालिकेच्या ह्या तीनही गोष्टी एका हाती सांभाळणारा जादुगार लेखक आहे ज्युलियन फॆलॊज (Julian Fellowes). Thank you Julian for these gems! धाग्याच्या सुरुवातीला ह्या मालिकेच्या एका पैलूवर मला लिहावसं वाटतंय ते म्हणजे मला ह्या मालिकेने काय दिलं? तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स!

१. It is not my secret to tell – हे वाक्य बऱ्याच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणतात. एका क्षणी मला लक्षात आलं की हे किती पॉवरफुल वाक्य आहे! कोणा एका व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण हा विचार करतो का? भले ती गोष्ट फार गुप्त ठेवण्याजोगी नसेल. पण तरीही आपल्या नकळत आपण किती तरी गोष्टी अशा पसरवत असतो. I started giving a second thought before telling things that weren’t about me to others.

२. Let’s focus on what really matters – हे वाक्य दुसऱ्या सिझन मध्ये लेविनियाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर Lord Grantham म्हणतो. Another very powerful sentence. कोणत्याही प्रसंगात प्रतिक्रिया देण्याआधी मी आपोआप हे वाक्य मनात म्हणायला लागले आहे. आणि ह्याचा खूप उपयोग होतो. आपल्याला चटकन लक्षात येतं की जगात अशा फारच कमी गोष्टी आहेत ज्या खरोखरी महत्वाच्या आहेत, ज्यांनी फरक पडतो. हा फोकस असेल तर तुम्ही बऱ्याच अनावश्यक गोष्टी/ड्रामा टाळू शकता.
माझ्याकडून सध्यातरी हे इतकंच! बाकी मायबोलीवर Downton चे बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या प्रतिसादांनी धाग्यात भर घालावी! मी ही नंतर लिहीनच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप लोकांकडून या मालिक्ेविषयी कौतुक ऐकलं होतं. पण माझी सम हाऊ पाहायची राहूनच गेली.
आता रीपीट टेलिकॅस्ट केली तर नक्की बघिन.

सुरुवातीला आवडली होती- नंतर तद्दन एकता कपूर स्टाईल ड्रामा आणि किचन पॉलिटिक्स सुरु झालं..सोडूनच दिलं बघायचं. आता फिनाले आहे का?

जितकं पाहिलं होतं त्यात आवडलेलं -
१. 'तो काळ' दाखवायला घेतलेली मेहनत. कपडेपट, फर्निचरपासून सर्व प्रॉप्स. आवडलं. त्या काळाचे घेतलेले रेफरन्स आवडले. सुरुवातीला टायटॅनिक, फर्स्ट वर्ल्ड वॉर, टेलिफोनचे आगमन, कार्सचा वाढता वापर, ग्रामोफोन वगैरे छान घेतलं होतं. कार्सन फोन वापरायला शिकतो तो सीन अजून आठवतोय. भारताचेही रेफरन्सेस होते.रशियन रिव्होल्यूशन पण घेतलं होतं. झालंच तर womens suffrage वगैरे.
२. Dowager Countess of Grantham- I enjoyed this character and all the comments made by her a lot. Is the character still alive? She was the best thing abt Downton !