ओह डाऊनटन! (अर्थात Downton Abbey memories)

Submitted by जिज्ञासा on 24 December, 2015 - 10:01

Spoiler Alert: जर मालिका पाहीली नसेल किंवा पहायची असेल तर ह्या धाग्यातील पोस्ट्स कदाचित रसभंग करणाऱ्या असू शकतील!

गेली सहा वर्षे British TV वर चालू असलेल्या Downton Abbey ह्या मालिकेचा शेवटचा भाग उद्या २५ तारखेला येईल. एकूण ६ सिझन चालू असलेली ही मालिका जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Downton_Abbey). एखाद्या गोष्टीची भट्टी जमून येणं म्हणजे काय हे ह्या मालिकेकडे बघितलं की समजतं. ह्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट आहेत पण हिच्या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे कथा-पटकथा-संवादांचा. ह्या मालिकेच्या ह्या तीनही गोष्टी एका हाती सांभाळणारा जादुगार लेखक आहे ज्युलियन फॆलॊज (Julian Fellowes). Thank you Julian for these gems! धाग्याच्या सुरुवातीला ह्या मालिकेच्या एका पैलूवर मला लिहावसं वाटतंय ते म्हणजे मला ह्या मालिकेने काय दिलं? तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स!

१. It is not my secret to tell – हे वाक्य बऱ्याच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणतात. एका क्षणी मला लक्षात आलं की हे किती पॉवरफुल वाक्य आहे! कोणा एका व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण हा विचार करतो का? भले ती गोष्ट फार गुप्त ठेवण्याजोगी नसेल. पण तरीही आपल्या नकळत आपण किती तरी गोष्टी अशा पसरवत असतो. I started giving a second thought before telling things that weren’t about me to others.

२. Let’s focus on what really matters – हे वाक्य दुसऱ्या सिझन मध्ये लेविनियाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर Lord Grantham म्हणतो. Another very powerful sentence. कोणत्याही प्रसंगात प्रतिक्रिया देण्याआधी मी आपोआप हे वाक्य मनात म्हणायला लागले आहे. आणि ह्याचा खूप उपयोग होतो. आपल्याला चटकन लक्षात येतं की जगात अशा फारच कमी गोष्टी आहेत ज्या खरोखरी महत्वाच्या आहेत, ज्यांनी फरक पडतो. हा फोकस असेल तर तुम्ही बऱ्याच अनावश्यक गोष्टी/ड्रामा टाळू शकता.
माझ्याकडून सध्यातरी हे इतकंच! बाकी मायबोलीवर Downton चे बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या प्रतिसादांनी धाग्यात भर घालावी! मी ही नंतर लिहीनच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा केवळ तिचे संवाद/सीन्स नीट पाहण्यासाठी पूर्ण सिरीज पाहिली आहे पुन्हा. >> +१

मॅगी स्मिथ एकदम फेवरेट होती ह्यात. श्रद्धांजली.

खरेच बघण्यासारखे आहेत अनेक एपिसोड्स परत. तिचे व कार्सन चे काहीही संवाद नसलेले अनेक सीन्स नुसते त्यांच्या "मिनिमल" हावभावांवरून इतके अफलातून जमलेले आहेत. आजूबाजूला सगळे बदलत असताना जुन्या रीतींच्या बाबतीत अगदी आग्रही असणारे त्या घरातील ते दोघेजण कायम एकमेकांशी सहमत असलेले दाखवलेत. दोघेही अगदी कमीत कमी हावभावातून व्यक्त होताना दाखवले आहेत. वुडहाउसचा "जीव्हज" असाच रंगवला आहे कायम त्याने. त्यामुळे "घरंदाज ब्रिटिश" असेच असेल असे वाटते.

पहिल्यांदा पाहताना अत्यंत खत्रुड वाटणारी ही म्हातारी प्रत्यक्षात वेगळी आहे व इव्हन प्रेमळही आहे हे हळुहळू सिरीज पुढे सरकताना कळू लागते. बहुतांश वेळा जुन्या मूल्यांना कवटाळून बसणारी, पण घरातील लोकांना वेळप्रसंगी बरोब्बर मार्ग दाखवताना त्यातले बदलही स्वीकारणारी - अशा बर्‍याच लेयर्स आहेत तिच्या व्यक्तिरेखेत. त्यांमुळेच पहिल्यांदा थोडेफार दुर्लक्ष झालेले तिचे सीन्स व संवाद पुन्हा पाहायला आख्खी सिरीज पुन्हा पाहिली होती. (कार्सन बद्दलही तसेच). आणि तिचे खटकेबाज संवाद तर अफलातूनच. "You are a woman with a brain, and reasonable ability. Stop whining and..." Happy

मी लहानपणी पुण्यात असे अनेक नातेवाईक पाहिले आहेत. पुलंनी रावसाहेब मधे कर्मठ घरातील वडिलधार्‍यांबद्दल "तप्तमुद्रांकित" शब्द वापरला आहे - अगदी तसे नाही पण कोर्‍या चेहर्‍याने वावरणारे, सहजासहजी ओपन न होणारे, आमच्या पेक्षा नुसत्या जास्त चांगल्या आर्थिक स्थितीतीलच नव्हे, तर काही पिढ्या श्रीमंती असलेले. वरकरणी खऊट व आढ्यता असलेले वाटायचे पण तुम्ही जितके त्यांच्या सहवासात याल तितके त्यांच्या लेयर्स दिसू लागतात आणि पूर्वीचा समज पूर्ण बदलतो आणि यांना नातेवाईकांत मान मिळतो तो उगाच नाही हे लक्षात येते. असे अनेक अनुभव आल्याने ही व्यक्तिरेखा खूप रिलेट झाली मला. त्यांच्या व्यक्तिरेखेतील warmth ही जास्त ओळखीनंतरच दिसते.

डाऊनटन मधला रोल आवडतोच.
प्रो. मगॉनगल ची व्यक्तीरेखा पण अशीच आहे. एकदम कडक, करारी, शिस्तप्रिय. किमान शब्दांत भावना पोहोचवणारी. पण आतमध्ये मायेचा झरा/ गोडवा/ कंपास शाबूत असलेली. फार मोठा रोल नाही खरतर पण मॅगी स्मिथ साठीच लिहिलेली भूमिका आहे. ती आली की ( आणि हर्मायनी) चेहेऱ्यावर हसूच येतं. Happy

हा बाफ मगॉनगल साठी योग्य नाही, पण मॅगी स्मिथ साठी चालवून घ्या. फार आवडायची ती. Happy

Pages