ओह डाऊनटन! (अर्थात Downton Abbey memories)

Submitted by जिज्ञासा on 24 December, 2015 - 10:01

Spoiler Alert: जर मालिका पाहीली नसेल किंवा पहायची असेल तर ह्या धाग्यातील पोस्ट्स कदाचित रसभंग करणाऱ्या असू शकतील!

गेली सहा वर्षे British TV वर चालू असलेल्या Downton Abbey ह्या मालिकेचा शेवटचा भाग उद्या २५ तारखेला येईल. एकूण ६ सिझन चालू असलेली ही मालिका जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Downton_Abbey). एखाद्या गोष्टीची भट्टी जमून येणं म्हणजे काय हे ह्या मालिकेकडे बघितलं की समजतं. ह्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट आहेत पण हिच्या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे कथा-पटकथा-संवादांचा. ह्या मालिकेच्या ह्या तीनही गोष्टी एका हाती सांभाळणारा जादुगार लेखक आहे ज्युलियन फॆलॊज (Julian Fellowes). Thank you Julian for these gems! धाग्याच्या सुरुवातीला ह्या मालिकेच्या एका पैलूवर मला लिहावसं वाटतंय ते म्हणजे मला ह्या मालिकेने काय दिलं? तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स!

१. It is not my secret to tell – हे वाक्य बऱ्याच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणतात. एका क्षणी मला लक्षात आलं की हे किती पॉवरफुल वाक्य आहे! कोणा एका व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण हा विचार करतो का? भले ती गोष्ट फार गुप्त ठेवण्याजोगी नसेल. पण तरीही आपल्या नकळत आपण किती तरी गोष्टी अशा पसरवत असतो. I started giving a second thought before telling things that weren’t about me to others.

२. Let’s focus on what really matters – हे वाक्य दुसऱ्या सिझन मध्ये लेविनियाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर Lord Grantham म्हणतो. Another very powerful sentence. कोणत्याही प्रसंगात प्रतिक्रिया देण्याआधी मी आपोआप हे वाक्य मनात म्हणायला लागले आहे. आणि ह्याचा खूप उपयोग होतो. आपल्याला चटकन लक्षात येतं की जगात अशा फारच कमी गोष्टी आहेत ज्या खरोखरी महत्वाच्या आहेत, ज्यांनी फरक पडतो. हा फोकस असेल तर तुम्ही बऱ्याच अनावश्यक गोष्टी/ड्रामा टाळू शकता.
माझ्याकडून सध्यातरी हे इतकंच! बाकी मायबोलीवर Downton चे बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या प्रतिसादांनी धाग्यात भर घालावी! मी ही नंतर लिहीनच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप लोकांकडून या मालिक्ेविषयी कौतुक ऐकलं होतं. पण माझी सम हाऊ पाहायची राहूनच गेली.
आता रीपीट टेलिकॅस्ट केली तर नक्की बघिन.

सुरुवातीला आवडली होती- नंतर तद्दन एकता कपूर स्टाईल ड्रामा आणि किचन पॉलिटिक्स सुरु झालं..सोडूनच दिलं बघायचं. आता फिनाले आहे का?

जितकं पाहिलं होतं त्यात आवडलेलं -
१. 'तो काळ' दाखवायला घेतलेली मेहनत. कपडेपट, फर्निचरपासून सर्व प्रॉप्स. आवडलं. त्या काळाचे घेतलेले रेफरन्स आवडले. सुरुवातीला टायटॅनिक, फर्स्ट वर्ल्ड वॉर, टेलिफोनचे आगमन, कार्सचा वाढता वापर, ग्रामोफोन वगैरे छान घेतलं होतं. कार्सन फोन वापरायला शिकतो तो सीन अजून आठवतोय. भारताचेही रेफरन्सेस होते.रशियन रिव्होल्यूशन पण घेतलं होतं. झालंच तर womens suffrage वगैरे.
२. Dowager Countess of Grantham- I enjoyed this character and all the comments made by her a lot. Is the character still alive? She was the best thing abt Downton !

जिज्ञासा - धन्यवाद. हा धागा पूर्ण विसरलो होतो. मस्त ओळख. त्या वाक्यांबद्दल तर एकदम सहमत. मलाही जाणवली ती. अशी अजून असतील बहुधा.

जबरदस्त आहे ही सिरीज! सध्या दुसर्‍यांदा पाहताना तिसर्‍या सीझन वर आहे. यावरचा चित्रपट नुकताच पाहिला - तो चित्रपटही मस्त आहे. या सिरीजचाच पुढचा भाग आपण बघत आहोत असे वाटते. पण तो पाहिल्याने पुन्हा एखादा भाग पाहू म्हणून बघितली तर पुन्हा खिळून बसलो.

The Dowager Countess of Grantham- Violet - हे मॅगी स्मिथ ने रंगवलेले कॅरेक्टर सर्वात इम्प्रेसिव्ह आहे यातले. खरे म्हणजे ती यातली लीड नाही. स्क्रीन टाइमच्या हिशेबाने टॉप ५ मधेही नाही. पण हळूहळू डेव्हलप केलेले तिचे कॅरेक्टर नंतर आले की पूर्ण सीनची पकड घेते. खूप लेयर्ड व्यक्तिरेखा आहे. ब्रिटिश उमराव लोक सोडून सर्व जगाबद्दलची तुच्छता, पण स्वतःच्या कुटुंबाकरता काहीही करण्याची तयारी, तर कधी मोक्याच्या वेळी लोकांना योग्य दिशा देणारी म्हातारी - टोटल अर्क उतरला आहे यात.

यातले रोमॅण्टिक संवाद अनेकदा चीजी होतात जुन्या कादंबर्‍यांसारखे. अनेक सीन्स जुन्या ब्रिटिश पद्धतींबद्दल रोमॅण्टिसाइझ केल्यासारखे आहेत. पण तरीही अत्यंत बघण्यासारखी आहे ही सिरीज. ते लॉर्ड्स, अर्ल्स, त्यांचे बटलर, व्हॅलेट, सर्व्हण्ट्स, मेड्स सर्व गोष्टींचे डीटेलिंग अप्रतिम आहे. आणि बहुधा अचूकही.

सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहे. तो चित्रपट एचबीओ मॅक्स वर आहे.

गेल्या काही दिवसांत गॉन विथ द विंड व द क्राउन बघताना या सर्व कलाकृतींमधे किती समान धागे आहेत ते जाणवते. इतर चित्रपट, सिरीज बद्दल जेव्हा असे जाणवते तेव्हा अनेकदा सर्वांचे मूळ हे शेक्सपियरची एखादी कथा असते Happy पण इथे तसे नसावे.

थोरली बहीण/मुलगी ही मुख्य लीड. तिचे स्थान एखाद्या राजकन्येसारखे असणे (क्राउन मधे तर शब्दशः). तिच्या धाकट्या बहिणीशी/बहिणींशी असलेले असूया व प्रेम दोन्ही मिश्रित नाते, एखाद्या बहिणीचे लाइफ वेगवेगळ्या घडामोडींनी/स्कॅण्डल्स ने भरलेले असणे, व या लीडचा त्यात हात असणे. सुरूवातीला प्रोटेक्टेड वातावरणात वाढ्ल्यावर मग आजूबाजूचे जग बदलणे व त्या बदलाबरोबर हिचे कॅरेक्टरही बदलणे, स्ट्राँग होत जाणे आणि नंतर अनेक अर्थांनी राणीसारखा रोल तिच्याकडे येणे - हे ऑल्मोस्ट सेम आहे तिन्हीमधे.

फा, खरंच की! तू लिहिल्यावर जाणवली ही गोष्ट.
मी लिहीन म्हटले आणि लिहीलेच नाही या धाग्यावर नंतर काही!
माझा डाऊनटनचा सगळ्यात आवडता भाग म्हणजे सिझन 4 चा ख्रिसमस स्पेशल ज्यात Rose चा coming out ceremony दाखवला आहे. मस्त जमून आलाय तो एपिसोड!

मला पण इतक्या वर्षात आताच बघायला मुहुर्त लागला. २ सीझन झालेत आता. मस्त वातावरणनिर्मिती, कॅरेक्टर डिवलपमेन्ट पण भारी. अ‍ॅबी, त्यातला सगळा स्टाफ , त्यांचे रुटीन मस्त वाटते बघायला. सुरुवातीला कोण कोणाचे कोण आणि वारस कोण ? का ? त्यात इतके कझिन्स आणि एकात एक नाती ते कळायला वेळ लागला मला. काउन्टेस ऑफ ग्रॅथम आजीबाई अन तिचा स्नॉबिशपणा बेष्ट आहे, ( व्हॉट्स अ वीकेन्ड?) तिच्या आणि मॅथ्यूची आईच्या एक्सचेन्जेस भारी आहेत.

हा धागा पाहिलाच नव्हता.
मी या मालिकेची टोटल फॅन. डिटेलिंग, तेव्हाचे सामाजिक बदल आणि 'डाऊन्स्टेअर्स'चं कथानक हे फार आवडतं.

२०१४/१५ साली भारतात झी-कॅफे चॅनलवर १ ते ५ सगळे सीझन्स एकसलग पाहिले होते.

प्राइमवर आता ६वा सीझनही आला आहे. पण अजून पाहिला नाही. तो पाहायला लागल्यावर मला आधीचेही सगळे सीझन्स पुन्हा पाहावेसे वाटतील. Proud

तिच्या आणि मॅथ्यूची आईच्या एक्सचेन्जेस भारी आहेत. >>> अगदी! पुढे पुढे त्यांचं नातं डेव्हलप होत जातं ते खूप सटली दाखवलं आहे. ते पण मला फार आवडलं होतं.

मी second season वर आहे आता.
जाम चसका लागलाय. :).
Perfect casting आहे.
Robert चा रूतबा , सिबिलचा गोडवा , Dowager Countess of Grantham चा खवटपणा , मेरीची अकड , Mr. Carson and Mrs Huges even Mrs Patmore - सगळेच भारी.

3 seasons बघून झाले , शेवटचा एपि संपला आणि अचानक नैराश्य आलयं . म्हणून काही दिवस break घेतलाय.
पहिले 2 seasons झपाटल्यासारखे बघून काढले.
आज्जी एकदम ब्येस्ट . (Well , now I have seen everything ) Happy .
काही काही problems ती ज्या पद्धतीने हाताळते , experience matters .
इडिथ मला सगळयात मूर्ख वाटली आणि नक्की काय ते सांगता नाही येणार पण टॉम मला अजिबात आवडला नाही. तो सिबिल ला पण फार force करतो असं वाटलं .
Thomas Barrow is creepiest charactor and Anna is most loyal.
Matthew n Mary , absolutely made for each other .
तो Matthew ह्रितीक रोशन सारखा वाटतो का अधूनमधून ??

मी पण तिसर्‍या सीझन वर आहे.
Matthew ह्रितीक रोशन सारखा वाटतो का अधूनमधून ?? >> हो हो ह्रितिक चा भास होतो जरा जरा. Happy
इडिथ बद्दल +१. थॉमस चा फार राग येतो. त्या कुत्र्याला कोंडून ठेवतो तेव्हा तर फारच.
त्या मानाने ओब्रायन बरीचशी नेगेटिव असली तरी अधून मधून ह्युमेन वाटते.
भारी मजा येते त्या लॉर्ड्स आणि लेडीज चं शाही लाइफ बघायला. तिसर्‍या सीझन मधे पहिल्यांदाच पैशाची चिंता वगैरे दिसली त्यांच्या आयुष्यात.

ही सिरीज बघायला मी सुरुवात केली होती पण पहिल्याच एपिसोडमधे २ तरुण पुरुष चुंबने घेत प्रणय करत आहेत हे बघुन बंद केले बघायचे.

मी गे-लेस्बिअन लोकांच्या विरुद्ध नाही पण त्यांचे प्रणयचाळे असे उघडपणे कधी बघीतले नसल्यामुळे ओंगळ वाटले. त्यांच्या बेडरुममधे ते काय करतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न व हक्क आहे पण टिव्हीवर त्याचे प्रदर्शन बघायला झेपले नाही.

बाकी सीरीज तुम्ही सगळे म्हणता तशी चांगली असेल .

मला वाटते ब्रिटिश मिडिया व सिरीजमधे असे समसंभोगी पुरुष पात्रे घ्यायची व त्यांचे प्रणय सिन्स पेरायची प्रथा व फॅशन असावी सध्या.

कारण नुकतीच पी बी एस वर ...वर्ल्ड ऑन फायर ...ही दुसर्‍या महायुध्हाच्या पार्श्वभुमीवर आधारलेली एक सिरीज आली होती.. अतिशय सुंदर सुरुवातीचे काही एपिसोड... पण त्यातही २ समसंभोगी पुरुष पात्रे उगाच पेरल्यासारखी वाटली. एक अमेरिकन व्हाइट माणुस व एक फ्रेंच ब्लॅक माणुस... त्यांची प्रणयक्रिडा व चुंबने स्क्रिनवर सुरु झाल्यावर बघवले गेले नाही व सिरीज बंद केली बघायची.

पॉलिटिकली करेक्ट बोलणे सोपे असते. मी असल्या जिवनशैलीच्या व्यक्तिंना.. तशी जिवनशैली जगण्याचा पुर्ण अधिकार असावा.. या मताचा आहे. पण तरीसुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांनी ती जिवनशैली बघु शकण्याइतका मी पुढारलेलो नाही याचा मला साक्षात्कार झाला.

ही सिरीज बघायला मी सुरुवात केली होती पण पहिल्याच एपिसोडमधे २ तरुण पुरुष चुंबने घेत प्रणय करत आहेत हे बघुन बंद केले बघायचे.

Lol

हे कोण होते? मला अजिबात आठवत नाहीये. तो गे नोकर असतो त्याचा सीन असतो का?

मुकुंद, तुम्ही अमेझॉन प्राईमवर मेड इन हेवन अजिबात बघू नका. त्यात असेच प्रत्येक एपिसोडमध्ये गे सीन पेरलेले आहेत ज्याचा कथेशी तसा काहीच थेट संबंध नसल्यामुळे मला तो प्रकार जरा प्रचारकीच वाटला.
त्यापेक्षा sony liv वर 1992 नावाची सिरीज बघा. त्यात कसलीही प्रणयदृष्ये नाहीत. एकदम क्लीन आहे. अमेरिकेत sling वर आहे सोनी.

मुकुंद, तुम्ही नक्की याच सीरीज बद्दल बोलताय ना? असे म्हणावेसे वाटले Happy
तसे एक कॅरेक्टर + त्याचा एक सीन (खरं तर २-३ सेकंदांचा एक किस) असेल तसा, (तोही पहिल्या भागात नाहीये बहुतेक)
१९१४ चा काळ आणि बहुतेक सर्व काँझर्वेटिव वगैरे कॅरेक्टर्स असल्यामुळे गे काय कोणताच रोमान्स फार जास्त दाखवलेला नाही.

गे काय कोणताच रोमान्स फार जास्त दाखवलेला नाही. >> Happy टोटली. मुकुंद - नंतर कोणतेच रोमान्स सीन्स नाहीत पुढे.

थॉमस चे कॅरेक्टर फार मस्त डेव्हलप केले आहे सीझन बाय सीझन. त्याचा रागही येतो आणि कीवही वाटते. काही लोकांशी त्याची लॉयल्टी कायम असते, ते ही छान दाखवले आहे. त्याचा नंतर त्या चित्रपटातही रोल आहे.

गॉट बघून मग ही बघणार्‍यांना ओळखीचे चेहरे दिसले का? Happy

मैत्रेयी.. अग हो.. याच सिरीजबद्दल बोलत आहे.. आणी हो.. पहिल्याच एपिसोडमधे आहे हा चुंबन/ प्रणय प्रकार.. तोही एकदम ध्यानीमनी नसताना... अचानक तो सीन सुरु होतो.. म्हणुन जास्तच अंगावर आला.. नो पन ईंटेंडेड..

कदाचित वर्ल्ड ऑन फायर मधे असाच अनुभव आल्यामुळे.. या सीनवरुन एकंदरीत सिरीजबद्दल अनुमान काढले व काढता पाय घेतला.

सनव.. थँक्स फॉर द हेड्स अप!... Happy

पहिल्याच एपिसोडमधे आहे हा चुंबन/ प्रणय प्रकार >>> तेवढा एकदाच आहे, नंतर नाही.... पुढे थॉमसची कुचंबणा फार छान दाखवली आहे.

टॉमचं पात्रही पुढे छान होत गेलंय, आऊटसायडर असूनही तो या कुटुंबात कसा सामावत जातो हे मोजक्या सीन्समध्ये दाखवलंय, त्याचा कळस ५ व्या सीझनच्या शेवटी शेवटी आहे. त्यामुळे ५ वा सीझन पॉझिटिव्ह नोटवर संपतो, ते मला खूप आवडलं होतं.

इडिथ म्हणजे सिब्लिंग रायव्हलरीमधली कुढणारी बहीण असते. स्वभाव आणि नशीब म्हणा, मेरीशी स्पर्धा म्हणा, तिचे आयुष्यातले पुढचे काही निर्णयही चुकतात. ४ था की ५वा सीझन तिच्या कथानकावर बराच फोकस आहे.

मुकुंद, डाउनटन खूपच सोवळी सिरीज आहे म्हणजे तुम्ही सांगितलेला सीन मला जरा आठवावाच लागला इतकी! तेव्हा त्या एका सीनमुळे सिरीज सोडून देऊ नका. जर ब्रिटीश पिरियड ड्रामा हा genre आवडत असेल तर डाउनटन नक्कीच आवडेल तुम्हाला.
पहिले तीन सिझन जसे चढत्या भाजणीचे आहेत तसे पुढचे तीन नाहीत. पण मला तेही तितकेच आवडतात. इडिथचा प्रवास फार छान होत जातो पुढच्या भागांत. पहिल्या तीन सिझनमध्ये मेरी आणि मॅथ्यूची प्रेमकथा फोकसमध्ये आहे पण पुढच्या सिझन्समध्ये बाकीच्यांच्या कथा छान पुढे जातात. मि. मोझली, डेझी, मि. कार्सन, मिसेस ह्यूज, थॉमस, ॲना, मि. बेट्स या downstairs वावरणाऱ्या आणि काॅरा, इझाबेल या upstairs characters च्या गोष्टी इडिथ आणि मेरीच्या बरोबरीने पुढे जातात.

पुढे थॉमसची कुचंबणा फार छान दाखवली आहे. >>> अगदी अगदी . तो भारी कारस्थानी दाखवला आहे , पण कदाचित त्यासाठी त्याची परिस्थिती जबाबदार असते . कुत्र्याला शोधायला जातात तेन्व्हाही त्याचा सॉफ्ट कॉर्नर दिसतो . सिबिलच्या आठवणीने तो मनापासून रडतो .

सगळ्या पात्रांचा प्रवास आणि बदल अगदी मस्त दाखवले आहेत .
उदा. सुरुवातीला सायकल वरून फिरणारा आणि सहज बोलता बोलता टेबलवरचा कपकेक घेउन खाणारा मॅथ्यू नंतर एक्दम उमरावी थाटात बदलतो . डिनरसाठी टेल कोट मिळत नाही म्हणून वैतागतो .

या house help ची आपापसात किती स्पर्धा असते . first footman , second footman , valet , butler .
कोणी डिनर टेबल वर कोणती प्लेट पहिल्यांदा फिरवायची त्याचे पण नियम . कोणी कोणाला फोलो करायचे .
कोणी कुठे जेवायला बसायचे ? किचन स्टाफ या लोकांबरोबर बसणार नाही .
कोणी पाहुणे आले तर सगळे बाहेर लाईनीत स्वागताला Happy
valet आणि lady's maid ना personal space मध्ये प्रवेश.
अ‍ॅना चहाचा ट्रे घेउन मेरी आणि मॅथ्युच्या रूममध्ये पहिल्यांदा शिरते तेन्व्हा मीच दचकले .
डिनर टेबल किन्वा नंतर ही लोक बर्याच घरगुती गोष्टी चर्चा करतात . तेन्व्हा कार्सन किन्वा स्टाफ आजू बाजूला असतो .
अर्थात त्यांचेही काही प्रोटोकॉल असतील .
तो सर्वन्ट बॉल चा कन्सेप्ट पण मस्त . एकंदरीत हे सगळ फार वेगळं आयुश्य आहे म्हणून बघायला मजा येते .

आणखी ही बर्याच छोट्या छोट्या गोश्टी आहेत , सीन्स आहेत जे आवडले .
क्रिकेट मॅचचा एपिसोड एक्दम मस्त फ्रेम वर संपतो . मॅथ्यु ज्या अधिकाराने ते 'रोझ'चे प्रकरण क्लबमध्ये हाताळतो .
अ‍ॅना आणि डेझी प्लेन्चेट करत असताना चकती हलते आणि दोघी एकमेकीना तु हलवली तु हलवली करतात . पण नंतर ते काय असेल याची हिन्ट आपल्याला मिळते Happy

आणखी बरेच . आज्जी च्या डायलॉग्जवर तर पूर्ण एक नविन बाफ निघाला पाहिजे . ( क्वीन ऑफ शिबा , म्हणे Biggrin )

धागा तसा जुना आहे मात्र कुठे दडलेला ठाऊक नाही. या सिरीजबद्दल नुकतीच टीपापा वर थोडी चर्चा केल्याचे आठवते आहे.

माझ्या आवडीचे कॅरेक्टर म्हणजे Violet आणि तिचे कोट्स. हा पुढचा अत्यंत आवडीचा.

Isobel: “How you hate to be wrong.”
Violet: “I wouldn’t know, I’m not familiar with the sensation.” Wink

Lol मॅगी स्मिथ भारी अ‍ॅक्ट्रेस आहे. तिने ती ग्रेस + खवटपणा अगदी पुरेपूर दाखवलाय.
तो सर्वन्ट बॉल चा कन्सेप्ट पण मस्त . एकंदरीत हे सगळ फार वेगळं आयुश्य आहे म्हणून बघायला मजा येते >>+११

गे सीन्स हल्ली मुद्दाम घालतात.एक प्रकारच्या अवेअरनेस चा, लोकांना सवय करून त्यांनी कमी होमो फोबिक बनावे अश्या उद्देशाचा तो भाग असावा.
पूर्वी पिक्चर्स मध्ये गे पात्रं जशी दाखवली जायची(दोस्ताना, फॅशन,गोलमाल रिटर्न्स) त्या मानाने सिरियल्स मध्ये काही नॉर्मल करियर वाली, नॉर्मल बोलणारी वागणारी ड्रेस करणारी आणि बाजूला स्वतःचे सुखी पर्सनल लाईफ(लव्हर) असलेली गे पात्रं दाखवली तर चालण्या सारखंच आहे
आपल्याला वेब सिरीज मधली हेट्रो किसिंग आणि इतर दृश्यं अंगावर येत नसली तर ही सुद्धा अंगावर येऊ नये(पॉलिटिकल करेक्ट वगैरे नाही.मलाही खटकायची.पण मग का खटकतात याचा विचार करत गेल्यावर जाणवलं.)

थॉमसची कुचंबणा फार छान दाखवली आहे.>>>>
खरंच. त्याचं व्यक्तिचित्र फार छान रेखाटले आहे. सिबीलच्या मुलीच्या बाबतीतही तो प्रोटेक्टीव असतो.

थोडंसं अवांतर :
त्या किंवा आसपासच्या काळातील गे व्यक्तींची कुचंबणा पहायची असेल तर ‘इमिटेशन गेम’ चित्रपट जरूर पहा. मुळ विषय होमोसेक्शुअलिटी नाहीये. पण समाज आणि न्यायव्यवस्था मिळून एखाद्या संवेदनशील माणसाला आयुष्यातून कसे उठवू शकतात याचं खरंखुरं उदाहरण आहे.

डाऊनटन सारख्या नॉन इंडियन सिरीज बघताना असं जाणवलं नाहीये की गे सीन मुद्दाम दाखवला आहे. कथेच्या ओघात आला तरच दाखवतात. डाऊनटन मध्ये तर मला आठवत पण नाही.
बॉलिवूड काय, बोलून चालून propaganda machine च आहे. त्यामुळे त्यांच्या मुव्हीज किंवा सिरीज मध्ये subliminal conditioning असतं आणि ते खटकतं.

नुकतेच सगळे सीझन्स बघून संपले. फार एंजॉय केली ही सीरीज. एकदम फील गुड.
इडिथ ला शेवटी हॅपी एंडींग मिळालं. छान होता तिचा प्रवास, विशेषतः आधी न्यूनगंड असलेली काहीशी डेस्परेट मुलगी ते मायकलचा मृत्यू पचवून त्याचे पब्लिकेशन स्वतः चालवणे, मारिगोल्ड ला स्वीकारताना परिणामांची पर्वा न करणे हे ट्रान्स्फॉर्मेशन. मेरीचे कॅरेक्टर पण इवॉल्व होते, तिने इस्टेटीची जबाबदारी घेणे हे तिच्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला साजेसे. पण तिची आणि हेन्री ची स्टोरी त्या मानाने इफेक्टिव वाटली नाही. फार काही घटना , अप्स अँड डाउन्स न येता एकदम लग्नच. मॅथ्यूसारखी त्याच्याशी केमिस्ट्री जमली नाही. त्यापेक्षा तो गिलिन्गम बरा होता की.
टॉम चे कॅरेक्टर पण शेवटच्या २-३ सीझन्स मधे फार प्लेझन्ट वाटले. मेरी, इडिथ आणि बर्‍याचदा रॉबर्ट ला पण फार छान सपोर्ट करतो तो.
थॉमस चा पण कॅरेक्टर ग्राफ जबरदस्त. आधी त्याच्या बद्दल चीड, मग सिंपथी आणि शेवटी बटलर चा जॉब त्याला ऑफर होतो तेव्हा यू रूट फॉर हिम !
पाचव्या सीझन चे वैशिष्ट्य म्हणजे सिनियर सिटिझन्स च्या रोम्यान्टिक स्ट्रोर्‍या Happy इसाबेल, मि. कार्सन, मि. ह्यूज, इतकेच काय पण व्हायलेट आज्जी पण मागे राहिल्या नाहीत Happy
व्हायलेट आज्जी बद्दल किती बोलावे ते कमीच आहे. काय तो लव्हेबल खवटपणा! हुश्शार बाई. इडिथ, मेरी, इसाबेल .. कित्येकांच्या आयुष्यातले घोळ कसले चुटकीसरशी सोडवते! हॉस्पिटल प्रकरणात चिडून ट्रीप ला निघून जाते पण त्याच वेळी तिने रॉबर्ट ला कुत्र्याचे नविन पिल्लू आणून देणे तर मला इतके आवडले !
मजा आली एकूण. रोज एकेक भाग बघणे मिस करणार आहे आता. आता तो डाउन्टन मूव्हीही बघायचा आहे.

मस्त आहे तो चित्रपटही. तसा काही फार ड्रॅमॅटिक नाही. किंबहुना डिस्ने लेव्हलचा ड्रामा आहे त्यात पण तरीही जवळजवळ सगळे कलाकार तेच असल्याने आणि या सिरीज च्या पुढचे कथानक घेतल्याने जमला आहे.

त्या काळातील समाजव्यवस्था, ती उमराव घराणी, त्यांचे हक्क, एकूण असमानता वगैरे आता पुन्हा कोणालाही नको असली तरी त्या सिस्टीमचा र्‍हास होण्याबद्दल बघणार्‍याला वाईट वाटते "हेच या सिरीजचे यश आहे" वगैरे म्हणायला हरकत नाही, समीक्षक मोड मधे जाउन Happy

मैत्रेयी , प्रत्येक वाक्याला अनुमोदन. Happy
एक aunt Rosemand सोडली तर सगळ्यांंच्या जोड्या जुळल्या शेवटी.
मॅथ्यूसारखी त्याच्याशी केमिस्ट्री जमली नाही. त्यापेक्षा तो गिलिन्गम बरा होता की. >>>>> अगदी अगदी.
ते शेवटी इडीथ आणि तिच्या आयुष्यातला विरोधाभास दाखवण्यासाठी होतं वाटतं.
At the end , just loved Mr. Barrow.
रोझ पण मार्गी लागली.
मेरीला कोण झापू शकत तर तो फक्त टॉम. बाकी ती कोणाचं फारसं ऐकत नाही Happy

त्या सिस्टीमचा र्‍हास होण्याबद्दल बघणार्‍याला वाईट वाटते "हेच या सिरीजचे यश आहे" वगैरे म्हणायला हरकत नाही '>>>> पटलं

Pages