ओह डाऊनटन! (अर्थात Downton Abbey memories)

Submitted by जिज्ञासा on 24 December, 2015 - 10:01

Spoiler Alert: जर मालिका पाहीली नसेल किंवा पहायची असेल तर ह्या धाग्यातील पोस्ट्स कदाचित रसभंग करणाऱ्या असू शकतील!

गेली सहा वर्षे British TV वर चालू असलेल्या Downton Abbey ह्या मालिकेचा शेवटचा भाग उद्या २५ तारखेला येईल. एकूण ६ सिझन चालू असलेली ही मालिका जगभरात प्रचंड लोकप्रिय झाली आहे (https://en.wikipedia.org/wiki/Downton_Abbey). एखाद्या गोष्टीची भट्टी जमून येणं म्हणजे काय हे ह्या मालिकेकडे बघितलं की समजतं. ह्या मालिकेतल्या सगळ्याच गोष्टी उत्कृष्ट आहेत पण हिच्या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा आहे कथा-पटकथा-संवादांचा. ह्या मालिकेच्या ह्या तीनही गोष्टी एका हाती सांभाळणारा जादुगार लेखक आहे ज्युलियन फॆलॊज (Julian Fellowes). Thank you Julian for these gems! धाग्याच्या सुरुवातीला ह्या मालिकेच्या एका पैलूवर मला लिहावसं वाटतंय ते म्हणजे मला ह्या मालिकेने काय दिलं? तर ह्या सहा सिझन्स कडे पुन्हा एकदा बघताना मला सापडलेल्या माझ्या दोन सगळ्यात मोठ्या आहा मोमेंट्स!

१. It is not my secret to tell – हे वाक्य बऱ्याच प्रसंगात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा म्हणतात. एका क्षणी मला लक्षात आलं की हे किती पॉवरफुल वाक्य आहे! कोणा एका व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण हा विचार करतो का? भले ती गोष्ट फार गुप्त ठेवण्याजोगी नसेल. पण तरीही आपल्या नकळत आपण किती तरी गोष्टी अशा पसरवत असतो. I started giving a second thought before telling things that weren’t about me to others.

२. Let’s focus on what really matters – हे वाक्य दुसऱ्या सिझन मध्ये लेविनियाच्या अंत्यसंस्काराच्या नंतर Lord Grantham म्हणतो. Another very powerful sentence. कोणत्याही प्रसंगात प्रतिक्रिया देण्याआधी मी आपोआप हे वाक्य मनात म्हणायला लागले आहे. आणि ह्याचा खूप उपयोग होतो. आपल्याला चटकन लक्षात येतं की जगात अशा फारच कमी गोष्टी आहेत ज्या खरोखरी महत्वाच्या आहेत, ज्यांनी फरक पडतो. हा फोकस असेल तर तुम्ही बऱ्याच अनावश्यक गोष्टी/ड्रामा टाळू शकता.
माझ्याकडून सध्यातरी हे इतकंच! बाकी मायबोलीवर Downton चे बरेच चाहते आहेत. त्यांनी आपल्या प्रतिसादांनी धाग्यात भर घालावी! मी ही नंतर लिहीनच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी, फा, +१
मला पण गिलिन्गमच आवडला होता मेरीसाठी.

त्या सिस्टीमचा र्‍हास होण्याबद्दल बघणार्‍याला वाईट वाटते "हेच या सिरीजचे यश आहे << अगदी पटलं

मस्त आहे तो चित्रपटही. <<< हा कुठे बघता येईल ?

मैत्रेयी, झकास आढावा.

धनश्री, मला वाटतं प्राइमवर आहे मूव्ही.

सिरीजचा असा परिणाम आहे, की मला मूव्ही बघावासाच वाटलेला नाही अजूनतरी.

Hmmmmmm
दिसत नाहीये आता Primeवर.
वेळेवर बघून झाला म्हणजे.

प्राइम वर सीरीज आहे की. मी इतक्यातच बघून संपवली. सिनेमा मात्र नाहिये बहुतेक. >>>> आता नाहीये.
December मध्ये काढली वाटतं Happy

ओह, नशीब, मी मागच्याच महिन्यात बघून संपवली! खूप आवडली. शेवटचा भाग जरा 'आणि ते सर्व सुखाने नांदू लागले' टाइप झालाय, पण संपूर्ण मालिका एवढी सुंदर आहे की ते माफ आहे. मी मॅगी स्मिथ फॅन झालो ह्या मालिकेमुळे.

हो मीपण. तिला आधी एक दोन पिक्चर्स मधे पाहिले होते पण इतके सलग नाही. नंतर तिच्याबद्दल माहिती वाचली तर ती एकूण ब्रिटिश मेरिल स्ट्रीप वाटते Happy

या सिरीज मधे पहिल्या महायुद्धानंतर समाजव्यवस्था ओपन होत जाणे, लोकांना इतर पर्याय उपलब्ध होणे, आधीचे प्रोटोकॉल्स, परंपरा वगैरे यांना लोक आपोआप मुरड घालत जाणे वगैरेही छान दाखवले आहे.

आताच्या समानता वगैरेच्या भिंगातून पाहताना अन्यायकारक वाटणारी समाजव्यवस्था, त्यातून नोकरवर्गाची अगदी नेमून दिलेली कामे, त्यातील काही तर परंपरागत पद्धतीने केली जाणे यात असलेल्या अन्यायाची जाणीव जोपर्यंत लोकांना होत नाही तोपर्यंत त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही - इतकेच नव्हे तर त्या कामात एक अभिमान असतो तेच काम आपण करण्याबद्दल. हे या सिरीज मधे आणि विशेषतः चित्रपटामधे चपखल दाखवले आहे. हे प्रत्यक्ष उदाहरणांमधूनही अनेकदा दिसते.

ब्रिटिश मेरील स्ट्रिप >> अगदी अगदी! मॅगी स्मिथ अजूनही नाटकात काम करते का हे शोधतो आहे. ते पाणी मुळात तिथलं आहे हे जाणवतं. तिच्या कुठल्या स्टेज परफॉर्मन्स चा व्हिडिओ मिळाला तर मला आवडेल!

प्राइमवरून सिरीज पण काढली होय... अरेरे... मला ६वा सीझन पाहायचा होता Sad

नोकरवर्गाची अगदी नेमून दिलेली कामे, त्यातील काही तर परंपरागत पद्धतीने केली जाणे यात असलेल्या अन्यायाची जाणीव जोपर्यंत लोकांना होत नाही तोपर्यंत त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही >>>

Upstairs-Downstairs नावाचं एक पुस्तक आहे (बहुधा)... त्याचा आधार मालिकेच्या सेट-अपमध्ये घेतलेला आहे असं एका ठिकाणी वाचल्याचं आठवतंय. तेव्हाच्या ब्रिटनमधल्या या प्रथेबद्दल अनेकांनी संशोधन, लेखन केलं आहे. यूट्यूबवर या विषयावरच्या डॉक्यु. सुद्धा आहेत. त्यातल्या १-२ फिल्म्समध्ये या मालिकेच्या अनुषंगाने निवेदन आहे.

इथली चर्चा वाचून मीही पाहिली. खूप म्हणजे खूपच आवडली! सगळी भट्टी मस्त जमून आली आहे. मिस्टर बॅरो आणि अर्थातच आजीबाई खासच. मला अमेरिकन विरुद्ध ब्रिटिश नोकझोंक पण आवडली.
प्राइमवरून सिरीज पण काढली होय >> सीरीज न् सिनेमा दोन्ही दिसत आहेत मला अजूनही प्राइम वर.

भारतात दिसत नाही आहे. कदाचित इतर देशांमध्ये अजून दिसत असेल प्राईम वर. डाउनटाउन मूवी भारतात प्राईम वर नव्हता, दोन्हि परत दिसू लागेल अशी आशा आहे.

हो मीही तेच लिहायला आलो होतो. काल ब्राउज करताना अ‍ॅमेझॉन प्राइम वर अजूनही आहे असे दिसले. भारतात नसेल कदाचित पण प्राइम वरचा कण्टेण्ट देशादेशात वेगळा असल्याचे पाहिले नव्हते फारसे (नेफि सारखे).

Upstairs-Downstairs >> याच नावाची एक सिरीजही आहे. तीही चेक करायला पाहिजे. नेफि किंवा प्राइम वर दिसली होती. यू ट्यूबवरच्या क्लिप्स चेक करतो. थँक्स.

अमेरिकन विरुद्ध ब्रिटिश नोकझोंक >> हो ती धमाल आहे. अनेकदा शर्ली तिच्यावर कुरघोडी करते पण हिची अनेक उत्तरे सुद्धा जबरी आहेत. शर्ली जेव्हा सिरीज मधे येते तेव्हा तिचे संवाद व तिचा या सगळ्या सिस्टीम कडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा "आपला पर्स्पेक्टिव्ह" वाटतो.

अमेरिकन विरुद्ध ब्रिटिश नोकझोंक >> हो ती धमाल आहे. अनेकदा शर्ली तिच्यावर कुरघोडी करते पण हिची अनेक उत्तरे सुद्धा जबरी आहेत. >>>>
"When I'm with her I'm reminded of the virtues of the English" -
"but she is an american?"
"precisely!" - कोण म्हणणार हे ?! Happy

Richard Carlisle : "I am leaving in the morning . I doubt if we will meet again "
आज्जी : "Do you promise ? "

रच्याकने , त्या Lord Robert Grantham ला Notting Hill मध्ये बघून मज्जा वाटली. Happy

Lol

मै - तो माझा अत्यंत फेवरिट संवाद आहे तिचा.

हा वरचा रिचर्ड कार्लाइल म्हणजे गॉट मधला सर जोरा ना? इथे थोडा वेगळा रोल आहे त्याचा.

या सिरीज मधे टॉम व इतर काही लोकांबद्दल बोलताना "तो रिपब्लिकन आहे" म्हणतात तेव्हा इथे अमेरिकेत ते ऐकताना मजेदार वाटते. टॉमचा आयरिश रिपब्लिकन ते या फॅमिलीत पूर्ण सामावून जाण्याचा प्रवासही मस्त आहे.

नेटवर अख्खी लिस्टच आहे आजीबाईंच्या वाक्यांची!
Cora - I take that as a compliment!
Dowager countess - I must have said it wrong!
माझा सगळ्यात आवडता सीन म्हणजे जेव्हा मेरी आणि आजीबाई अमेरिकन आजीबाईंवर सरंजामशाहीचं इंप्रेशन मारण्यासाठी एक जंगी पार्टी ठेवतात आणि नेमका ओव्हन खराब होतो त्या एपिसोडमध्ये आहे. तेव्हाच अगदी ठरवल्यासारखे टॉम आणि लॉर्ड ग्रँथम दोघेही चुकीचे जॅकेट घालून येतात. आधीच प्लॅनचा फियास्को होत असलेला पाहून वैतागलेल्या आजीबाई लॉर्ड ग्रँथमला वेटर समजून त्याच्याकडे ड्रिंक मागतात! Absolutely hilarious.. Gets me every single time!
या लिंकवर 2.19 पासून पुढे आहे हा सीन -
https://youtu.be/BvqgboWKV9E

"Oh I thought you were a waiter" ते केवळ रॉबर्ट ला टोमणा मारण्यासाठी पण म्हणत असेल Happy
अजून एक फेवरेट -इस्टेट रन करणे मेरी ला जमणार नाही टाइप काहीतरी रॉबर्ट म्हणतो तेव्हा " When you say things like this I feel like ringing for the nanny and putting you to bed - without supper!" Lol

मला अजून एक वाटलेली मजा म्हणजे, संबोधनांची. उदाहरणार्थ रोझ ही सगळ्यानाच cousin म्हणते - रॉबर्ट, Violet आणि इसाबेलला पण. म्हणजे पिढीतल्या अंतराचा फरक असूनही वेगळं संबोधन नाही! माझ्यासाठी हे नवीन होतं Happy

मला अजून एक वाटलेली मजा म्हणजे, संबोधनांची. >>> absolutely Happy .
मेरी , इसाबेल ला , इसाबेल म्हणते आणि टॉम , रॉबर्ट ला रॉबर्ट Wink

Lol

यातली टायटल्स हा एक अचाट प्रकार आहे. पुढे पिक्चर मधे "लेडी इन वेटिंग" येते. आणि सगळ्यात भन्नाट म्हणजे "पेज ऑफ द बॅकस्टेअर्स"! तेव्हाचे राजे/राण्या व त्यांचा स्टाफ बहुधा पब्लिकला "इण्डिया" शोधायला कामगिर्‍यांवर पाठवून मग वेळ जात नसल्यामुळे दिसेल त्याला नवीन टायटल शोधून काढायचा खेळ खेळत असावेत.

भारतात दिसत नाही आहे. कदाचित इतर देशांमध्ये अजून दिसत असेल प्राईम वर. डाउनटाउन मूवी भारतात प्राईम वर नव्हता, दोन्हि परत दिसू लागेल अशी आशा आहे. >>>> सिरीज परत दिसतेय .
ईच्छूकांनी लाभ घ्यावा. Happy

संबोधनांची अजून एक गंमत म्हणजे इंग्रजीत संबोधन आधी आणि नाव नंतर अशी पद्धत आहे (उदाहरणार्थ, अंकल टॉम) पण मराठीत आणि बहुतेक हिंदीत देखील आपण उलटा क्रम वापरतो कमल मावशी, हरी काका इत्यादी. पण उर्दूत मात्र इंग्रजीप्रमाणे आधी संबोधन मग नाव असा क्रम आहे! हे माझ्या पाकिस्तानी मालिका पाहताना लक्षात आलं. ते चाचा अहमद, खाला (= मावशी) शीना असं म्हणतात.

सिरीज परत दिसते>>हो, आज सकाळी प्राईम च्या ऍप वर नोटिफिकेशन आले सिरीज दिसत आहे. सिनेमा पण दिसेल भारतामध्ये अशी आशा ठेवायला हरकत नाही. प्राईम शी निगडित कोणी येथे फेरफटका मारत आहे का? Happy

चाचा अहमद, खाला (= मावशी) शीना असं म्हणतात. >> चाचा चौधरी आठवले.

ता. क. इथे 'आठवले' हे आडनाव नाही.

ण मराठीत आणि बहुतेक हिंदीत देखील आपण उलटा क्रम वापरतो कमल मावशी, हरी काका इत्यादी >>> Happy मनातल्या मनात मावशी कमल, काका हरी असे म्हणून पाहिले Happy पण ही नाती आहेत. तुला बहुधा उपाध्या म्हणायचे आहे. त्याबाबत बराच मिश्र वापर आहे. छत्रपती हे आधी वापरले जाते, राजे हे काहींच्या बाबतीत आधी, तर काहींच्या बाबतीत नावानंतर. हिंदीत बहुतांशा "राजा" किंवा "राणा" आधी वापरलेले दिसते.

Pages